✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आजची स्त्रीची प्रतिमा - १

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 04/22/2010 - 15:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36978 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

रोज

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 15:16 नवीन
रोज मिपाच्या पानावर 'फिगर दाखवणार्‍या बाया' हीच आजच्या स्त्रीची सगळ्यांच्या प्रतिमा आहे का?
असे मुळीच नाही...
मुखपृष्ठाच्या एका तुकड्यासाठी असेलही.
आणि तेवढ्यापुरतीच राहील असे वाटते! मिपाच्या खादाडी सदरात रोजच्या खाद्यपदार्थासोबत आपल्या भाषेत सांगायचे तर 'फिगर दाखवणार्‍या' एखाद्या बाईचेच चित्र असेल असे तूर्तास तरी धोरण आहे..
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे.
छोटेखानी लेख छान.. चन्नम्मांना दंडवत..!
पण माझी खात्री आहे की माझ्यासारखाच विचार करणारे बरेच लोकं असतील आणि त्यांनी पुढे होऊन हे सदर सुरू ठेवावं ही विनंती.
हेच म्हणतो.. उत्तम सदर..शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments

त्यात्या, स

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 04/22/2010 - 15:45 नवीन
त्यात्या, सध्या तुमचे धोरण अशी चित्रे टाकणे हे आहे हे समजू शकते. एक गोष्ट समाधानाची आहे की "सध्यातरी" हा शब्द आशादायी आहे. मला वाटते की ज्या प्रमाणे एखाद्याने आपल्या धुम्रपानाविषयी आक्षेप घेतल्यावर आपण सुसंस्कृत माणसे धुम्रपान थांबवतो तोच विचार करून मला वाटते आपण धोरण ठरवावे. आणि या सर्व स्त्रिया मिपासाठी लिहीताएत, धडपडताएत, हे बघता मला वाटते....त्यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटते कुठ्ल्याही गोष्टीकडे स्त्रियांचा दॄष्टीकोन हा ही महत्वाचा आहे कारण आज त्या या समाजाचा महत्वाचा घटक आहेत. बघा पटते का..... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जयंतराव,

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 16:04 नवीन
जयंतराव, आपल्या प्रतिसादावर विचार करेन.. धन्यवाद, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अदिती, खरं

यशोधरा
गुरुवार, 04/22/2010 - 15:31 नवीन
अदिती, खरं आहे, मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत, पण सांगून उपयोग होईल असे वाटले नव्हते, सबब, काही बोलले नव्हते. आई, देवता असे मोठे शब्द वापरले नाहीत तरी चालेल, पण निदान प्रदर्शनीय वस्तू असल्यासारखी वागणूक मिळाली नाही, तरी खूप झाले!
  • Log in or register to post comments

मिपाच्या

Nile
गुरुवार, 04/22/2010 - 23:55 नवीन
मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत,
सहमत. मला तरी सुरुवातीपासुन हे अत्यंत बालीश वाटत आलेलं आहे. मुखपृष्ठावर तर मी कधीही जात नाही, ज्या लोकांनी आपल्या खरडवहीत 'हीच्यावर आमचा जीव' अशी चित्रं लावली आहेत ती मी ब्लॉक केली आहेत. असो. संपुर्ण चर्चा वाचली. मला वाटतं मुद्दा सरळ-साधा-सोपा आहे. मिपाच्या वृद्धीत अनेकांचा हातभार आहे हे कुणीही अमान्य करु शकत नाही. त्यामुळे या अनेकांचे मिपाशी नाते आहे. त्यांना जर मिपाचे मुखपृष्ठ हे एखाद्या आंबटशौकिन साईटच्या मुखपृष्ठासारखे भासत असेल आणि त्याबद्दल त्यांनी खंत्/आक्षेप्/विरोध व्यक्त केला तर तो योग्यच. अर्थात, जर मालकांना 'मिपा चा मालक मी,मला काय वाट्टेल ते करेन' अशी भुमिका घ्यायची असेल तर काय बोलणार? ज्यांना तसली चित्रं पहावयाची आहेत त्यांनी त्या प्रकारच्या साईटवर जावे. मिपा ही त्या प्रकारची साइट नाही (असल्यास कृपया तसा खुलासा करावा) म्हणुन हा विरोध आहे हे कळणे इतके का अवघड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

यशोधराशी

दिपाली पाटिल
Fri, 04/23/2010 - 20:31 नवीन
यशोधराशी अगदी सहमत...खादाडीचे फोटो ठीक आहेत...खरंतर जेव्हढी स्पेस नट्यांच्या फोटोंसाठी वाया जाते आहे तिथेच जर मिपाकरांच्या खादाडीचे फोटो छान मोठे टाकले तर...आणि या नट्या काही स्पेशल नाहीयेत की त्यांची ओळख करून देण्याने मिपाला काही फायदा होइल... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखिकेने

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 15:37 नवीन
लेखिकेने मूळ लेख संपादित केल्यामुळे हा माझा पुन्हा नवा प्रतिसाद -
पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं.
सहमत आहे.. आणि गंमत म्हणजे जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर आपले असे क्षणभंगूर रूप दिसेल अशी छायाचित्र/पोझेस देणार्‍याही स्त्रियाच असतात..!
पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात.
खरं आहे.. आज अश्या अनेक मोहिनी आपली छायाचित्रे निरनिराळ्या पोजेसमध्ये अगदी हौसेने किंवा व्यवसाय म्हणून किंवा संभाव्य व्यवसायाकरता स्वत:च्या खर्चिक पोर्टफोलियोमधून देत असतात..!
स्त्रियांचा केवळ शरीरापलिकडे विचार करणार बरेच लोकं असतील,
असतातही/नसतातही! मी व्यक्तिश: मुंबैच्या रेडलाईट विभागात अशी सर्व प्रकारची माणसं खूप जवळून पाहिली आहेत, तेथील स्रियाही पाहिल्या आहेत.. आणि त्यांच्या शरीरापलिकडच्या त्यांच्या आयुष्यात जवळून डोकावायचा प्रयत्न केला आहे..
त्यांनी पुढची पुष्पं गोवावीत असं आवाहन. त्यातला समान धागा जिवंत राहील ही आशा आहे.
हेच म्हणतो.. उत्तम सदर..शुभेच्छा!
बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे.
छोटेखानी लेख छान.. चन्नम्मांना दंडवत..! तात्या.
  • Log in or register to post comments

+१

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 04/22/2010 - 15:59 नवीन
+१ तात्यांशी सहमत. आजची खादाडी या सदराचा उगाचाच पराचा कावळा केला आहे. बाकी उपक्रम उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्यांशी

समंजस
Fri, 04/23/2010 - 12:21 नवीन
तात्यांशी बराचसा सहमत!!! मुखपृष्ठावर रोजच्या खादाडी सोबत असलेल्या नटींच्या छायाचित्राबांबत टोकाचा आक्षेप घेणे हे मला तरी तर्क संगत वाटत नाही. या नट्यांची सार्वजनीक असलेली आणि त्या नट्यांनी स्वतः हून दिलेली हि छायाचित्रे आहेत. त्यावर कोणी दुसर्‍यांनीच आक्षेप घेणे किंवा ह्या छायाचित्रांमुळे स्त्रीत्व धोक्यात येतं, स्त्रीची प्रतिमा डागाळते हे म्हणणे म्हणजे पुर्णपणे टोकाची भुमिका घेणे आहे. तसं तर ह्या वादाला/विषयाला अंत नाही आणि ह्या विषयाची व्याप्ती सुद्धा मोठी आहे पण फक्त मिपा संबंधीत बोलायचं झाल्यास, ह्या खादाडी+नटींची चित्रे मुखपृष्ठावर टाकण्यात काही वावगं नाही असं माझं स्वतःच मत आहे. मिपा हे संकेतस्थळ एखाद्या गंभीर/शैक्षणीक/विशिष्ट वय-वर्ग यांच्याकरता काढलेलं आहे असं मला तरी वाटत नाही (चु.भु.घे.दे.). कित्येक सदस्यांच्या प्रतिसादातून हे बघण्यात आलंय की, मिपावर येण्याचा त्यांचा उद्देश हा मनोरंजन करणे, वेळ घालवणे, कामाचा ताण हलका करणे आहे आणि तशीच मिपा ची प्रतिमा आहे (काही वेळेस एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होतात तो भाग वेगळा). तात्यांनी सुरु ठेवलेलं हे सदर सुद्धा अश्याच प्रकारात मोडतं असं माझं तरी मत आहे. हे सदर सुरू करण्यामागे, स्त्रीत्त्वाचा अपमान करणे किंवा स्त्रियांची प्रतिमा डागाळणे हा उद्देश आहे असं मला तरी वाटलेलं नाही. तात्यांना दक्षिणेतल्या नट्या आवडतात यात काय वाईट?? त्याबद्दल तात्या उघडपणे बोलतात यात काय वाईट?? आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे मिपा चं मन मोकळं स्वरूप लक्षात घेता असं एखादं सदर मिपा वर असल्यास त्यामुळे स्त्रीत्त्वाचा अपमान किंवा स्त्रियांची प्रतिमा डागाळणे(शोभेच्या बाहूल्या समजणे) वगैरे कसं काय होउ शकतं??? मराठी/हिंदी/इंग्रजी आणि इतर भाषिक वर्तमानपत्रे आणि त्यांच्या त्या रविवार पुरवण्या. गृहशोभिका, सोसायटी, फेमिना आणि तत्सम खास स्त्रीयांकरीता काढलेली मासिके, दिवाळी अंक(जी कुटुंबात सगळ्यांकडनं आवडीने वाचली जातात) त्या बद्दल काय म्हणणे आहे ??? अवांतरः (स्त्रिया फक्त शोभेच्या बाहुल्या नाहीत हे खरं आहे. हे सगळ्यांनाच मान्य आहे. तसंच हे सुद्धा खरं आहे की एखादी स्त्री ही कुठल्या व्यवसायात आहे यावर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असतो जसं की, सिनेमा/फॅशन/वेश्या/मॉडेलींग/निर्देशक/अंतराळवीर/राज्यकर्ता/गुहिणी/साध्वी. त्यामुळे कुठल्या स्त्री कडे कसं बघावं हा भेद नक्कीच राहणार....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखमालेमा

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/22/2010 - 15:37 नवीन
लेखमालेमागचे विचार उत्तम.. पहिले पुष्प सुद्धा छान... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

उत्तम

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 15:49 नवीन
उत्तम विचार... पटले. लेखमाला यावी असेच वाटते. कोणी एका/कीनेच लिहावे असे नाही. ज्याला जमेल त्याने लिहावे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

स्त्रीची

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 16:35 नवीन
स्त्रीची प्रतिमा केवळ खादाडी कॉलम पाहुन ठरते ? =)) =)) =)) किती घोर अपमान आहे स्त्री चा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हाय

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:48 नवीन
हाय कम्बख्त, तेरेकू समझ्याही नही.... असो. मोठे व्हा!!!© श्रावण मोडक. (ह. घेणे, आमचा विमा नाहिये.) ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

छान लेख

नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 15:50 नवीन
अतिशय उत्तम लेख. आणि उपक्रमही. काय आहे!!! एकदा देवतेचा दर्जा दिला आहे असे म्हटले की कुणी सामाजिक दर्जाविषयी बोलू लागलं की त्याला ते देवता वगैरे सांगून गप्प करता येतं. प्रॉब्लेमच कुठे आहे? इथे तर देवतेशी तुलना केली आहे असे म्हणता येते. अनेकदा 'त्या' ललनांचा स्वतंत्र म्हणून उदोउदो केला जातो. स्त्रीमुक्तीक्षेत्रात काम करणार्‍यांच्या दृष्टीने मात्र त्यांना मिळालेलं 'भोगवस्तू बनण्याचं स्वातंत्र्य' त्यांनी वापरलेलं असतं. ते स्वातंत्र्य तिला पूर्वीही होतंच. आणि ते काही माणूस म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे. अजून येऊद्या. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

अधिक भाष्य

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/23/2010 - 12:29 नवीन
ते स्वातंत्र्य तिला पूर्वीही होतंच. आणि ते काही माणूस म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे.
यावर अधिक भाष्याची गरज आहे. बाकी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आमच्या

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 16:09 नवीन
आमच्या मनात (जनरलीसुद्धा) स्त्रीयांविषयी खुप आदर आहेच .. म्हणुनच की काय कुठल्या मुखपृष्ठावर जर मादक-वगैरे स्त्रीचं चित्र लावलं म्हणजे आदर कमी होतो किंवा स्त्री ची "सरसकट" विटंबणा होते इत्यादी विचार हस्यास्पद वाटतात (हसुन घेतो =)) ) फक्त करडी वाक्यच वाचुन पुढचा लेख वाचण्याची गरज नाही हे लक्षात आल्याने तेवढंच वाचुन प्रतिसाद दिला आहे :) लेख केवळ पुर्वग्रहदुषीत वाटला आणि केवळ कोणाला दोष देणे आणि त्या दोषांचं उदात्तीकरण करणारा वाटला आता काही प्रश्न : १. राखी सावंत , कश्मिरा शाह , किंवा अजुन कोण स्वतःहुन एक्स्पोज करुन प्रसिद्धीची हाव असणार्‍या स्त्रींना बहिणीच्या किंवा अजुन कोणत्या आदरार्थी भावनेने पाहिलं आहे ? किंवा त्यांची तशी लायकी आहे असे आपणास वाटते का ? २. मुखपृष्ठावर जी चित्र लावली जातात , ती लावणार्‍यांनी त्या स्त्री ला धमकावुन फोटो काढुन इथे लावली आहेत काय ? किंवा त्या स्त्रीला आपली पोस्टर्स अशी प्रसिद्ध होण्यापासुन कोणतं ऑब्जेक्शन आहे काय ? ३. एवढंच ऑबजेक्शन असणार्‍यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकला आहे काय ? तिकडे तर फुल्ल व्हिडिओ असतो :) नसेल तर मग उगाच वांझोटी चर्चा करण्यात काही पाईंट वाटत नाही. दोन क्षण साईट वर येऊन आम्ही जे काय चाल्लय त्याची मजा घेतो. आणि खरंच सांगायचं झालं तर त्या सो कॉलड आयटम ऐवजी फक्त खादाडीकडे आमचं लक्ष जातं ... उगाच कोणत्याही संबंध नसलेल्या स्त्रीयांना आपुन ज्यास महत्व देत नाही. :) असो .. वेळात वेळ काढुन प्रतिसाद दिल्याबद्दल मी स्वतःचे आभार मानतो आणि माझे वैयक्तिक भाषण "संपवतो" अर्थात शेवटचा प्रतिसाद. :) -(आई वर मनापासुन प्रेम करणारा) टारझन
  • Log in or register to post comments

फक्त करडी

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 16:15 नवीन
फक्त करडी वाक्यच वाचुन पुढचा लेख वाचण्याची गरज नाही हे लक्षात आल्याने तेवढंच वाचुन प्रतिसाद दिला आहे लेख केवळ पुर्वग्रहदुषीत वाटला आणि केवळ कोणाला दोष देणे आणि त्या दोषांचं उदात्तीकरण करणारा वाटला
असो.. ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काही तरी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:15 नवीन
काही तरी गल्लत होते आहे शेठ... मला वाटते अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. स्त्री कडे केवळ याच प्रकारे बघणे हे नामंजूर आहे असे काहीसे वाटले लेख वाचून. असो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:17 नवीन
असेच म्हणतो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 16:24 नवीन
बिपीन आणि नितिन काकांशी सहमत आहे. -(असेच म्हणतो) बेचैनलाडू ( हा प्रतिसाद लिहीण्यामागचं प्रयोजन योग्य वेळ आली की स्पष्ट करु :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बिपिन भौंशी सहमत.

कुंदन
गुरुवार, 04/22/2010 - 16:27 नवीन
बिपिन भौंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कुन्द्या

पर्नल नेने मराठे
Fri, 04/23/2010 - 21:22 नवीन
कुन्द्या भौंशी सहमत. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

>> मला वाटते

II विकास II
गुरुवार, 04/22/2010 - 16:30 नवीन
>> मला वाटते अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. फायरफॉक्स मध्ये काही अ‍ॅडऑन आहेत, ज्याच्या सहाय्याने फोटो प्रतोबधित करता येतात. आम्ही मटा वाचताना तेच करतो. सार्वजनिक संकेतस्थळ असल्याने कोणाला आवडणार, कोणाला नाही. आपला मात्र तात्याला पाठींबा. >>लेख केवळ पुर्वग्रहदुषीत वाटला आणि केवळ कोणाला दोष देणे आणि त्या दोषांचं उदात्तीकरण करणारा वाटला मलाही असेच काही वाटते आहे, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

यशोधरा
गुरुवार, 04/22/2010 - 16:40 नवीन
मला वाटते अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. +१. पतेकी बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेच

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/22/2010 - 16:46 नवीन
अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे. स्त्री कडे केवळ याच प्रकारे बघणे हे नामंजूर आहे असे काहीसे वाटले लेख वाचून, हेच म्हणायचे आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लिफाफा देख कर ही मजमून भाप लेते हैं लोग ...

वाहीदा
गुरुवार, 04/22/2010 - 19:01 नवीन
लिफाफा अगर इतना घटीया होगा, तो मजमून क्या होगा ?? अशी समजूत नाही का होत ?? माननिय तात्या, आता असे म्हणू नका की अश्या लोकांना मी फाट्यावर मारतो :-( एक समजत नाही असे फालतू फोटो लावायची मिपा व्यवस्थापनाला गरज च काय ? :/ कित्ती तरी छान सुबक सुसंकृत लेख मालिका मिपा वर येतात गणपा सारखेच सुंदर खादाडी लिहणारे मिपावर कितीतरी आहेत खादाडी ला साजेशी अशी चित्रे ही नेट वर उपलब्ध नाहीत का ?? ती खादाडी ज्या प्रदेशातून आहेत त्या प्रदेशाची निसर्ग रम्य चित्रे ही व्यवस्थापन जर मनावर घेइल तर टाकू शकतो. :) जर कोणी आपल्या आईवर जिवापाड प्रेम करतो याचा अर्थ तो प्रत्येक स्त्री ला आदरानेच वागवितो असे नाही होत. 8} Is there any need to remind people you need to have respectable outlook towards woman ?? That is part of Cultural Upbringing Sir. It is Part of a Basic Ethics. Tatya , That does not mean you are not Ethical But you need to show it in your action that you do understand our concern We expect you to take take right action else wrong peole will follow your footstep which will lead to take un-due advantage of the Policy. @ आदीती - सुंदर लेख ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

हम्म्म......

shweta
गुरुवार, 04/22/2010 - 20:47 नवीन
हम्म्म...... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत...

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 04/22/2010 - 16:21 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टार्‍या....भ

डावखुरा
Sat, 04/24/2010 - 02:14 नवीन
टार्‍या....भारीच टोला हाण्लास रे.... आपुन तर टारुचे ,तात्याचे समर्थक हाये भॉ..."राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तात्यांशी

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 04/22/2010 - 16:18 नवीन
तात्यांशी सहमत.
  • Log in or register to post comments

उत्तम

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 04/22/2010 - 16:18 नवीन
उत्तम उपक्रम. भर घालण्याचा प्रयत्न करीन. --- एक सुचवणी: कर्तृत्ववान स्त्रियांचा आणि त्यांच्या कामाचा परिचय करून देणे ही उत्तम कल्पना. पण हा उपक्रम तेवढ्यावरच थांबू नये. 'स्त्री' असण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आयुष्यात न मागता येतात - यांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर मात कशी करतो / त्यांच्याशी जमवून कसं घेतो या आणि अशा गोष्टींवरही लिहिलं जावं, असं वाटतं
  • Log in or register to post comments

हे कराच...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 16:22 नवीन
एक सुचवणी: कर्तृत्ववान स्त्रियांचा आणि त्यांच्या कामाचा परिचय करून देणे ही उत्तम कल्पना. पण हा उपक्रम तेवढ्यावरच थांबू नये. 'स्त्री' असण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आयुष्यात न मागता येतात - यांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर मात कशी करतो / त्यांच्याशी जमवून कसं घेतो या आणि अशा गोष्टींवरही लिहिलं जावं, असं वाटतं हे कराच... अदिती, मध्यंतरी एकदा आपलं या अनुषंगाने बोलणं झालं होतं... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

निश्चितच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/22/2010 - 16:41 नवीन
मेघना निश्चितच! सध्या मला उपलब्ध असलेला वेळ पहाता मला कितपत शक्य होईल हे माहित नाही. पण माझ्या डोक्यात आधीपासून हेच आहे की समविचारी लोकांनी मिळून हा उपक्रम सुरू ठेवावा. त्यात तूही आहेसच. ज्याला/जिला जसा वेळ मिळतो त्यांनी लिहावं. अदिती (फक्त करडी अक्षरं वाचणारे चेन्नम्मांचे वारस नसावेत किंवा या वारशाची त्यांना जाणीव नसावी. असो, बदललेली करडी अक्षरंही एकदा नजरेखालून घालून पहावीत अशी विनंती, ज्यायोगे आपले प्रतिसाद विसंगत होणार नाहीत याची काळजी घेता येईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१ चांगला उपक्रम

धनंजय
गुरुवार, 04/22/2010 - 20:00 नवीन
राणी चन्नम्मा यांची ओळख आवडली. ("कोल्हापूर-बेंगळुरु - पूर्वी मिरज-बेंगळुरु - कित्तूर चन्नम्मा एक्स्प्रेस" मुळे नाव माहीत होते, पण कीर्ती माहीत नव्हती.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

लेखाकडे लक्ष

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/22/2010 - 16:31 नवीन
आमचे लक्ष लेखाकडे गेले. त्या निमित्तानी राणी चेन्नमाची ओळख झाली. निजलिंगाप्पा व शिवलिंगाप्पा यात आमचा नेहमी गोंधळ होतो. असो. करड्या रंगातील मजकुरा विषयी. ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत? हे जाणुन घ्यायला अधिक आवडेल एवढेच म्हणतो. बाकी मिपावर स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून अनादर होतो असे वाटत नाही. एक जुनी चर्चा आठवली प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

ज्या

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 16:38 नवीन
ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत? हे जाणुन घ्यायला अधिक आवडेल एवढेच म्हणतो.
मलाही ते जाणून घ्यायला आवडेल! ;)
बाकी मिपावर स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून अनादर होतो असे वाटत नाही.
धन्यवाद प्रकाशशेठ.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एक दुरुस्ती

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/22/2010 - 16:51 नवीन
या निमित्तानी एक जुनी चर्चा आठवली. यात दुवा चुकला होता. नवीन दुवा केवळ स्त्रीत्वाचा अपमान असा वाचावा. हे केवळ अनावधानानी झाले आहे. यात अन्य कुणाचा बेजबाबदार पणा वा अपश्रेय नाही प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बाकी

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 16:52 नवीन
बाकी मिपावर स्त्रियांचा केवळ स्त्री म्हणून अनादर होतो असे वाटत नाही.
तुम्हाला इथे इन्डायरेक्टली तसं दाखवायचा प्रयत्न लेखातुन होतोय असं तर नाही म्हणायचं ना ? -(वकिल) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

कोण कोणता

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 17:54 नवीन
कोण कोणता उपक्रम करतो ? तो चांगला किंवा वाईट आहे ह्यावर मी कोणतेही भाष्य करायचं की नाही ते माणसं पाहुन ठरवतो. आमच्या सारख्यांकडे एवढं लक्ष देऊन करडी वाक्य बदलल्याचे पाहुन गंमतच वाटली. त्यातुन एक गोष्ट मात्र सिद्ध झाली , की लेख पाडला तेंव्हा कोणता उपक्रम चालु करण्यापेक्षा उगाचच संस्थळावर स्त्री-प्रतिमा डागाळलेली आहे हे कारण नसतांना हायलाईट करणे असा सुर होता. आणि फक्त तेवढ्यावरंच आमची टिपण्णी होती. अर्थात हे समजण्यासाठी कशाची गरज असते ? ते सांगितलंच पाहिजे का ? नुसताच विरोध करायला तसंही काही डोकं लागत नाही .. आता आमचंच बघा ना .. आज डोक्याचा वापर करायची गरजंच पडली नाही. योग्य तिथेच आम्ही त्याच्या उपेग करतो. - अल्ताफ टार्‍या कव्वालीसाठी काही बिणडोक टाळ्या वाजवणार्‍यांची गरज आहे. कारण नसताना टाळ्या वाजवने जमणार असल्यास व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तात्या

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 04/22/2010 - 17:02 नवीन
तात्या आपला फुल टु पाठींबा आहे तुम्हाला खादाडीसाठी.. यावर कोणी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवलीतरी बेहत्तर... च्यामारी खायच्या डीश कडेबघा की!!! त्यवर कोणी नाही बोलत ते.....
  • Log in or register to post comments

यावर कोणी

विसोबा खेचर
गुरुवार, 04/22/2010 - 17:20 नवीन
यावर कोणी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवलीतरी बेहत्तर...
तक्रार नोंदवायचा प्रश्नच येत नाही.. १) आजपर्यंत या सदरात मी ज्या नट्यांची चित्रे प्रसिद्ध केली ती अनेकविध संस्थळांवर सर्रास उपलब्ध आहेत/असतात, २) ती नग्न/अश्लील इत्यादी पोर्नो सदरातही मोडत नाहीत..तश्या प्रकारची चित्रे टाकायची नाहीत याची काळजी मी मुद्दाम घेत असतो. आता प्रश्न उरला त्या नट्यांच्या उत्तानतेचा/मादकतेचा/मधाळतेचा! त्याला माझा इलाज नाही.. कोणतीही 'नटी' म्हटलं की तिच्यात या गोष्टी सहसा आढळतातच.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

चांगला प्रकल्प

चित्रा
गुरुवार, 04/22/2010 - 17:24 नवीन
जमेल तशी भर घालीनच. प्रकल्प आवडला. बाकी या विषयावरून मी मागे एक चर्चा सुरू केली होती त्याची यानिमित्ताने आठवण झाली- http://www.misalpav.com/node/9855 आणि हा आमचा प्रतिसाद .. http://www.misalpav.com/node/9855#comment-157496
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
गुरुवार, 04/22/2010 - 18:08 नवीन
प्रश्नांची माझ्यापुरती उत्तरे : १. आजची खादाडी मधल्या चित्रांबद्दलचे मत : हा प्रकार बटबटीत वाटत आलेला आहे. खाद्यपदार्थ नि नटी यांच्यातल्या उपभोग्यतेचे असोसिएशन बालिश किंवा बुरसटलेले वाटते. त्याची मांडणीमधे कलात्मक सौंदर्य वाटत नाही. विनोद म्हणून हा प्रकार मौजेचा वाटू शकतो. पण मिपा केवळ विनोदी साईट नाही आणि तोच तो विनोद कंटाळवाणा होतो. २. हा प्रकार ऑफेन्सिव्ह आहे काय ? एरवी ऑफेन्सिव्ह वाटत नाही. पण आजचे चित्र अत्यंत अभिरुचिहीन वाटते. बाकी या प्रकाराबद्दलची मते वर आलेली आहेत. ३. याऐवजी काय करता येईल ? अगणित गोष्टी करता येतील. आपल्यामधे चिंतातूर जंतूंसारखे दृष्यकलांबद्दल आस्था असणारे आणि आपल्याला चार गोष्टी शिकवण्याची इच्छा असणारे लोक आहेत. वैज्ञानिक आहेत. नंदन सारखे कुठून कुठून काय काय आणणारे लोक आहेत. संकल्पनांची कमतरता नाही. ४. शेवटचा मुद्दा : माझी मते वरीलप्रमाणे आहेत. आज धागा आला म्हणून माण्डली. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार माझ्यापाशी कधी नव्हते. आजही नाहीत. आहे हीच स्थिती चालू राहिली तरी मुखपृष्ठ टाळून पुढे जाता येतेच.
  • Log in or register to post comments

+१

इनोबा म्हणे
गुरुवार, 04/22/2010 - 18:15 नवीन
हा प्रकार बटबटीत वाटत आलेला आहे. खाद्यपदार्थ नि नटी यांच्यातल्या उपभोग्यतेचे असोसिएशन बालिश किंवा बुरसटलेले वाटते. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१

नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 18:42 नवीन
>>मुखपृष्ठ टाळून पुढे जाता येतेच हे खरेच. माझ्या आय ई च्या फेवरीटमध्ये /newtracker हेच आहे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१ उत्तम उपक्रम

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 18:46 नवीन
श्री सुनीत यांच्याशी सहमत. वारंवार नट्यांची चित्रे मुखपृष्ठावर लावण्याने कळत-नकळत स्त्रीचे वस्तुकरण केले जात आहे असे वाटते. अदितीतैंचा उपक्रम उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

>>कळत-नकळत

पक्या
Fri, 04/23/2010 - 13:04 नवीन
>>कळत-नकळत स्त्रीचे वस्तुकरण केले जात आहे असे वाटते>>. ह्या गोष्टीला जे जे जबाबदार आहेत त्यात स्त्रिया ही आल्या. कारण वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून , तर्‍हेतर्‍हेच्या पोझेस देऊन फोटो काढून घेणार्‍या स्त्रियाच आहेत ना. परिस्थितीमुळे असे करावे लागणार्‍या काही स्त्रिया असल्या तरी सिनेमात , जाहिरातीत काम करणार्‍या बहुतांश स्त्रिया पैशासाठी आणि प्रसिध्दि साठी च हे करत असतात. आपणच आपले वस्तुकरण करतोय हे त्यांना समजत नाहित तर इतरांना दोष देऊन काय फायदा? जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

कोण म्हणतो?

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/23/2010 - 13:14 नवीन
जाहिरातीत काम करणार्‍या बहुतांश स्त्रिया पैशासाठी आणि प्रसिध्दि साठी च हे करत असतात. आपणच आपले वस्तुकरण करतोय हे त्यांना समजत नाहित तर इतरांना दोष देऊन काय फायदा?
कोण म्हणतो त्यांना हे समजत नाही? आपण आपल्या क्षमता काही सेवामुल्य घेउन वापरण्यास देतो. कौशल्य, कला ,बुद्धीमत्ता, शारिरिक ताकद रुपी क्षमता कुणी बाजारमुल्यात रुपांतरीत करतो तर कुणी त्यात सौंदर्य, कामुकता. शरीर याची भर घालून विक्रय करतो. अनेक विद्वान, पत्रकार, संपादक, लेखक आपल्या बुद्धीमत्तेचा विक्रय करतातच की! मागणी व पुरवठा या निकषांवर ही मुल्ये ठरतात. योग्य अयोग्य हा भाग सापेक्ष व अलाहिदा! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

सबब

प्रदीप
Fri, 04/23/2010 - 15:20 नवीन
ह्या गोष्टीला जे जे जबाबदार आहेत त्यात स्त्रिया ही आल्या. कारण वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून , तर्‍हेतर्‍हेच्या पोझेस देऊन फोटो काढून घेणार्‍या स्त्रियाच आहेत ना. परिस्थितीमुळे असे करावे लागणार्‍या काही स्त्रिया असल्या तरी सिनेमात , जाहिरातीत काम करणार्‍या बहुतांश स्त्रिया पैशासाठी आणि प्रसिध्दि साठी च हे करत असतात.
बाकी ह्या चर्चेत खरे तर भाग घ्यायची इच्छा नाही, पण ही सबब अत्यंत दुर्दैवी आहे असे वाटते. स्त्रीच्या होलपटीबद्दल साहिर जे लिहून गेलाय, त्यापेक्षा अधिक भेदक, अचूक असे काही नाही, तेव्हा त्याची 'औरत' इथे लिहून काढतो: औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया जब जी चाहा कुचला मसला, जब जी चाहा दुत्कार दिया तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में ये वो बेइज़्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज़्ज़तदारों में मर्दों के लिये हर ज़ुल्म रवाँ, औरत के लिये रोना भी खता मर्दों के लिये लाखों सेजें, औरत के लिये बस एक चिता मर्दों के लिये हर ऐश का हक़, औरत के लिये जीना भी सज़ा जिन होठों ने इनको प्यार किया, उन होठों का व्यापार किया जिस कोख में इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया जिस तन से उगे कोपल बन कर, उस तन को ज़लीलो खा़र किया मर्दों ने बनायी जो रस्में, उनको हक़ का फ़रमान कहा औरत के ज़िन्दा जल जाने को, कुर्बानी और बलिदान कहा क़िस्मत के बदले रोटी दी, उसको भी एहसान कहा संसार की हर एक बेशर्मी, गुर्बत की गोद में पलती है चकलों में ही आ के रुकती है, फ़ाकों में जो राह निकलती है मर्दों की हवस है जो अक्सर, औरत के पाप में ढलती है औरत संसार की क़िस्मत है, फ़िर भी तक़दीर की होती है अवतार पयम्बर जनती है, फिर भी शैतान की बेटी है ये वो बदक़िस्मत माँ है जो, बेटों की सेज़ पे लेटी है [लताच्या 'पी पी' सुरांत हे गीत येथे ऐकता येईल] बाकी तुमचे चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

सहमत

नंदन
Fri, 04/23/2010 - 04:32 नवीन
मुक्तसुनीत आणि श्रावण मोडक यांच्या प्रतिक्रियांशी सहमत आहे. अर्थात वैयक्तिक मालकीचे संकेतस्थळ असल्याने, नितिन थत्त्यांप्रमाणे '\newtracker' ही वाचनखूण साठवून मिपावर येण्याचा मार्ग चोखाळत आलो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा