मुखपृष्ठ टाळून पुढे जाता येतेच. तसेच करावे.
राहिला प्रश्न, बाकी मुखपृष्ठाचा, तर तात्यांनी त्यावर उत्तमोत्तम गाण्यांवर तैलचित्रांवर, उत्तमोत्तम रसग्रहण करणारे लेखन केले आहे.. समृद्ध करणारे काही.. या सदरातही अतिशय सुरेख लेखन आणि गाणी वाचायला-ऐकायला मिळाली आहेत.. त्याबद्दल कोणचे दुमत नसावे.
प्रश्न आहे फक्त खादाडीचा, तर त्यावर सुवर्णमध्य काढता येईल. चित्रच टाकायचे एखाद्या नटीचे, तर देवदास मधे जसे, सालंकृत तरीही मादक आणि तितकीच पारंपारिक वाटणारी ऐश्वर्या राय जशी आहे तशी, किंवा, तत्सम, चित्रेही मिळू शकतील.. अधून मधून एखादी उत्तान नटी, चालू शकेल. कुठेतरी सुवर्णमध्य काढायला हवा हे खरे आहे. म्हणून हा प्रतिसाद टंकायचा खटाटोप केला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
खादाडी वर दाखवण्यात येणार्या स्रिया पैशासाठी त्यांची मादक व अल्पवस्त्रात छायाचित्रे काढुन घेतात व तीच लावण्यात येतात. जर तशी छायाचित्रे त्यानी काढुन घेतली नाहीत तर कोण कशाला त्याची छायाचित्रे इथे वापरेल.
पैशासाठी आपले हिणकस प्रदर्शन करणार्या स्त्रिया व पुरुष ह्याची तुलना आपल्या जवळच्या लोकांशी करणे चुकीचे आहे.ते करताना आपण नकळत कर्तुत्ववान स्त्रियांचा अपमान करत असतो.
टारुभाऊशी सहमत आहे.
वेताळ
अदितीची ही लेखमाला चालू करण्यामागील भूमिका अतिशय स्त्युत्य वाटली. सौम्य राखी रंगातील त्यांचे प्रकटन व त्यामागील एक स्त्री म्हणून त्यांना पुरुषप्रधान संस्कृतीची स्त्री कडे पाहण्याच्या दृष्टीबद्दल वाटणारी वेदना ही त्यांच्या या क्षेत्रातील अभ्यासाचे द्योतक आहे असे मी मानतो. कॅलेंडर आणि गुळगुळीत सिने साप्ताहिके, मासिके या वरील आकर्षक नव्हे तर मादक छबी हीच जणू काय भारतीय स्त्रीचे खरेखुरे चित्र वाटावे अशीच मिडीयाने प्रतिमा उभी केली आहे आणि ती आता इतकी रुजली रुळली आहे की जुलाबाच्या गोळ्यांची जाहिरात करतानाही ती गोळी क॓टरिना कैफने दिली असल्याचे दाखविले तरच "जुलाब" साफ होतील असे बजावण्यात येते. यात पुरुष संस्कृतीचा अहंपणा तर दिसून येतोच पण त्यावरील कडी म्हणजे रामायण महाभारत पासून चालत आलेली "स्त्री" ची प्रतिमा ही पुरुषाचे रंजन करण्याचे कार्य करण्यासाठीच आहे हे बेगुमानपणे मानण्यात येते. आज ६ आकडी वेतन घेणारे आय. टी. क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित युवकदेखील स्त्रियांनी वारसा हक्क वापरू नये अशी अपेक्षा करतात; एवढेच नव्हे तर घसघशीत हुंड्याचीही अपेक्षा करतात ! हे देखील पुरुष प्रधान व्यवस्थेचे पीडादायक लक्षण होय. असो. अदितीने ज्या राणी चेन्नामाचा उल्लेख केला आहे त्या ठिकाणी मी सहलीच्या निमित्ताने खूप फिरलो आहे आणि त्यामुळे राणीचे कार्य जाणून घेतले होते.
यापुढील मालिकेत "पंडिता रमाबाईंचे" नाव असेल अशी अपेक्षा करू काय? एका सुंदर धाग्याबद्दल अदितीचे मन:पूर्वक आभार !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
मिपा मुखपृष्ठावर केवळ कुठल्याही प्रकारच्या बाया आणि पुरुषच पाहिजेत का? मुखपृष्ठे एवढ्याच कल्पनांवर सिमीत असतील तर त्याला कल्पनादारिद्र्य म्हणायला हवे.
बाकी, अदितीचा आक्षेप योग्य आहे आणि त्याहीपेक्षा
अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे.
हे पटले.
अवांतरः
मिपावर काही नवी धोरणे येत असतील तर स्वसंपादनाची सोय काढून टाकायला हवी असे वाटते. लोक लेख टाकतात काय? काढतात काय? वाक्ये बदलतात काय? काय चालते काही कळेनासे झाले आहे. असो.
मिपा मुखपृष्ठावर केवळ कुठल्याही प्रकारच्या बाया आणि पुरुषच पाहिजेत का?
मानवी देहातील सौंदर्याचा शोध हा कालातीत आहे. ज्यांच्या सौंदर्यविषयक जाणिवा विकसित झालेल्या नाहीत त्यांना अशी चित्रे म्हणजे विटंबना वाटणे स्वाभाविक आहे. ÿ
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
मिपा हे काही केवळ मानवी सौंदर्य आणि खादाडीला वाहिलेले स्थळ नाही. जर मुखपृष्ठ दाखवायचेच झाले तर चालू घडामोडी, राजकारण, खेळ अशा अनेक गोष्टी दाखवता येतील. मानवी देह हा देखील त्यातील एक हिस्सा होऊ शकेलच.
जर मुखपृष्ठ दाखवायचेच झाले तर चालू घडामोडी, राजकारण, खेळ अशा अनेक गोष्टी दाखवता येतील. मानवी देह हा देखील त्यातील एक हिस्सा होऊ शकेलच.
इतर फोटो टाकण्यात कॉपीराईट ची अड्चण येऊ शकते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
स्वयंसंपादन, नसलेलं 'ग्रे मॅटर' लोकांनी वाचणे याला (माझ्या मते निष्कारण) महत्त्व या धाग्यात दिलेलं आहे, म्हणून पुन्हा माझे ३१४ शब्द:
आधी लिहीलेली प्रस्तावना त्याच आणि तशाच शब्दांत, तशीच असावी असा माझा आग्रह नव्हता. माझा मुद्दा माझ्यापेक्षा खूपच चांगल्या आणि समजूतदार शब्दांत राजेश घासकडवी यांनी लिहून दिला, तो मला पटला म्हणून स्वयंसंपादन केलं गेलं. लेख प्रसिद्ध केल्यावर काही मिनीटांतच, एक प्रतिसाद आल्याआल्याच प्रस्तावना संपादित झाली आणि त्यासंदर्भात खरडही मी पहिल्या प्रतिसादकाला, तात्यांना, टाकली होती. (काही लोकांचा आपल्यामुळे बदल झाल्याचा समज असेल तर त्यांच्यासाठी: हा बदल राजेशमुळे झालेला आहे.) तात्यांना मी प्रतिसाद विसंगत 'झाल्याची' आठवणही करून दिली होती, त्यांनी तो तसाच ठेवला हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे.
स्वसंपादनाबाबत धोरण काय असावं हे सांगण्यात मला आत्तातरी रस नाही. पण खोडलेली, नव्हे उडवलेली, वाक्य पुन्हा माझ्या तोंडात कोंबून काही लोकांनी अर्थाचा अनर्थही केलेला दिसत आहे.
यापुढे मला या संदर्भात आत्तातरी काहीही लिहायचं नाही आहे. ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न!!
अदिती
अदिती,
स्वसंपादन रद्द व्हावे हे मुद्दाम अशासाठी वाटले की लेखक लेख लिहीतात, कवी कविता करून जातात, आणि बर्याचदा धुरळा उडून जातो, आणि मग ते सहन न होऊन एखादा लेखक किंवा लेखिका लेखच काढून घेते - गेल्याच आठवड्यांत हे निदान दोन वेळा झाले असे माझ्या निदर्शनाला आले आहे. मग दुसर्या दिवशी सकाळी उठलेले संपादक अरेच्चा हे काय झाले म्हणतात, कारण धुरळा उडल्याची चिन्हे तर दिसत असतात पण कशाने ते कळत नाही.
असे होऊ नये असे बरेच दिवस वाटत होते, ते प्रियाली यांनी सुचवले म्हणून त्याला दुजोरा दिला, बाकी काही नाही. (यावर विश्वास ठेवायचा का नाही हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न).
अजून एक -माझ्या मागे झालेल्या चर्चेचाच हा विषय असल्याने अधिक सहमती काय दाखवायची म्हणून अजून वेगळे काही लिहीले नाही. पण त्याचा दुवा दिला.
प्रत्येकाकडे स्वसंपादनाची चांगली-वाईट कारणे असतीलच. मुळातच स्वसंपादन बंद केले तर अशी कारणे राहणार नाहीत. स्वसंपादनापेक्षा कोणतेही लेखन (केवळ अदितीच्या लेखावर रोख नाही) काळजीपूर्वक टाकले तर स्वसंपादनाचा हा व्यवहार बंद करता येईल.
माझा आक्षेप मी या लेखानिमित्ताने दिलेला नाही तर गेले काही दिवस मिपावर जे बघण्यात आले ते आश्चर्यकारक वाटले आणि तेच या चर्चेत दिसले म्हणून येथे दिले आहे.
या चर्चेतही काही प्रतिसाद असे आहेत ज्यांचा अर्थ लागत नाही.
माझ्यामते स्वसंपादनाची ही सुविधा बंद व्हायला हवी. त्यापेक्षा लोकांनी आपण काय लिहितो, काय प्रकाशित करतो याविषयी अधिक जागरूक राहायला हवे.
माझे मत - मूलतः फक्त खादाडीची माहिती देण्यासाठी हे सदर सुरु करण्यामागची कल्पना खरोखरंच छान आहे. त्याबद्दल तात्याला पूर्ण मार्क्स!
परंतु सध्याच्या ह्या सदराबद्दल बोलायचे तर असे म्हणावे लागेल की सरळ सरळ बोट ठेवता येईल असे काही नसले तरी अतिशय अभिरुचीपूर्ण असेही काही नाही!
दरवेळी एखादी उन्मादक स्त्री आणि 'रसाळ आंबे' वगैरे द्व्यर्थी वाटावीत अशी विशेषणे लावून त्यासोबतचा मजकूर हे काही फार आवडावे असे नक्कीच नाही.
कधीकधी गमतीने मी तात्याला खरड टाकलीही असेल की 'आजची बायडी' छान आहे पण रोज रोज हा प्रकार टॅब्लॉइड सारखा वाटतो.
अनेक प्रकारांनी हे सदर अधिक उत्तम बनवता येऊ शकेल आणि तेवढी गुणवत्ता मिपावर नक्कीच आहे!
(स्त्रियांचा अनादर होतो का? तर हे स्त्रीसापेक्ष मत असू शकते. परंतु एक स्त्री म्हणून उपभोग्य वस्तू सारखे प्रदर्शन सतत होणे हे खचितच मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण करणारे आहे. अदितीने हा धागा उघडून त्या विचारांना वाट करुन दिली त्याबद्दल तिथे अभिनंदन. संस्थळ प्रसिद्ध होताना अशा गोष्टीत योग्य ते बदल घडत गेले तर ते प्रसिद्ध बरोबरच प्रगल्भही होते!)
चतुरंग
एखादी स्त्री पैशासाठी अंगप्रदर्शन करत असेल वा नसेल तो मुद्दा वेगळा. इथल्या स्त्री सदस्यांना (मालकांच्या भाषेत मिसळपावच्या लेकी-सुना) जर अशी छायाचित्रे अप्रस्तुत वाटत असतील तर त्यावर काही विचार करणार आहात की नाही?
@टारझन
२. मुखपृष्ठावर जी चित्र लावली जातात , ती लावणार्यांनी त्या स्त्री ला धमकावुन फोटो काढुन इथे लावली आहेत काय ?
तिने तरी तुम्हाला धमकावून फोटो इथे लावण्याबद्दल सक्ती केली काय?
अन्न ही आहे आणि शेण ही. काय खायचे हे जसे आपण ठरवतो. तसेच काय दाखवायचे हे सुद्धा आपणच ठरवायला हवे नाही का?
चांगला मुद्दा मांडला आहे आदिती ताईंनी. व्हरायटी असावी मुखपृष्ठात. आता झालं ते झालं , ते उगाळण्यात अर्थ नाही. पुढे बदल आणू यात. लेट्स लुक फॉरवर्ड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
>> आता झालं ते झालं , ते उगाळण्यात अर्थ नाही.
सहमत! एका सुंदर उपक्रमावरील चर्चा भरकटून निराळ्याच दिशेने चाललेली पाहून वाईट वाटले.
>> पुढे बदल आणू यात. लेट्स लुक फॉरवर्ड.
+१
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
राणी चन्नमाची ओळख आवडली....!
मिपाच्या मुखपृष्ठावर इतकी का चर्चा होत आहे ? काही आक्षेपार्ह फोटो असतील, आवडत नसतील, हे मान्य. वर काही प्रतिसादात उल्लेख आले आहेत. त्याप्रमाणे 'नवे लेखनावर' क्लीक करावे. चर्चेत त्याला 'फ्रंट न्युज' बनवण्याचे कारण मला अजूनही समजत नाही. याचा अर्थ तसे चित्र टाकण्याचे, टाकणार्यांचे मी समर्थन करतोय असे मुळीच समजू नका. आता या क्षणी माझ्या हातात 'गृहशोभिका' चा अंक आहे. [पुरुषांनी तो कशाला वाचायचा असे कृपया कोणी म्हणू नका. या अंकासोबत कथासंग्रह मोफत होता म्हणून तो अंक घेतला. खुलासा संपला :) ] याची सुरुवात 'कटरीना' च्या कमळावर बसलेल्या खास अदेपासून होत आहे. त्याचबरोबर पृ.क्र. ६७, ६८, वर झगमग 'लावण्य' असलेल्या स्त्रियांच्या अदा आहेत. मग इथेच अशी का ओरड होत आहे, पाहावे आणि सोडून द्यावे असे वाटले....!
लेखमालिकेतील भागांमुळे स्त्रीयांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल, विसंगती लक्षात येतील असे मला वाटत नाही. मात्र इतिहासातील थोर, कर्तबगार स्त्रियांची ओळख या निमित्ताने होणार असेल तर ती मला वाचायला आवडेल. लेखिकेस पुढील भाग लिहिण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
अदिती, सर्वप्रथम तू अगदी माझ्या मनातील भावना मांडल्याबद्दल धन्यवाद.. मलाही हे खादाडी प्रकरण खूप आधीपासून खटकत होते, पण बोलले नव्हते इतकेच..
इथे सगळ्यांनी आपापली मते मांडली आहेतच...तरीही..
@ बिका, अशा प्रकाराच्या फोटोंना सरसकट विरोध नसून नेहमी नेहमी असेच फोटो बघावे लागणे याला विरोध आहे ---- अगदी सहमत!!
@ टारझन... इनोबाने म्हटले आहेच की त्या स्त्रिया तुमच्याकडे आल्या नाहीत आमचे फोटो लावा म्हणून... तसेच, इथेच बहुधा मटावरच्या गॅलरीबद्दल लेख आला होता..इथले फोटो अगदीच तसले नसले तरी त्याच कॅटेगरीतले असतात... नि जरी आमची अस्मिता एवढ्याशा कारणांनी न दुखावण्याचा समंजसपणा आम्ही दाखवला... तशी तुम्हा लोकांनीही आपल्या विचारांची प्रगल्भता दाखवली तर हरकत नसावी, नाही का? (हा माझा प्रश्न एकट्या टारझनला नाही)
शेवटी हे एका चांगल्या साईटचे मुखपृष्ठ आहे.. पिक्चरमध्ये दाखवली जाणारी बॅचलर रूम नाही..
असो!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
राणी चेन्नम्माची कथा छान व प्रेरणादायी!
अशीच समाजात स्त्रीची अनेक प्रेरक, स्फूर्ती देणारी रूपे दिसत असतात.
कधी ती पोराला उन्हाच्या तावापासून वाचवण्यासाठी पदराआड करणारी आई असते, कधी ती यशस्वी व्यावसायिक/ क्रीडापटू/ राजकारणी/ वैज्ञानिक असते, कधी भावा-बहिणीला सांभाळणारी बहीण असते, कधी लढवय्यी - वीरांगना असते....
कधी ती मूकपणे प्रियतमाच्या आठवणीने अश्रू गाळणारी प्रेयसी असते, कधी अकाली संसाराची जबाबदारी अंगावर कोसळल्यावर हिंमतीने सारा डोलारा सांभाळणारी स्त्री असते..... कधी लेखिका, साहित्यिक, कवयित्री असते, कधी उत्कृष्ट चित्रकार/ नर्तकी/ गायिका असते. कधी कुशल तंत्रज्ञ असते तर कधी सार्या समाजाला आपलेसे करणारी समाजसेविका असते.
स्त्रीच्या अशा अनेक रूपांची या साईटच्या मुखपृष्ठावर दखल घेतली गेलेली बघायला मला नक्की आवडेल व त्या त्या स्त्रीरूपाविषयी वाचायलाही. [जमेल तसे मी देखील लिहीन!]
आदिती, स्तुत्य उपक्रम :-)!!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
विसोबा खेचर: मिपाच्या खादाडी सदरात रोजच्या खाद्यपदार्थासोबत आपल्या भाषेत सांगायचे तर 'फिगर दाखवणार्या' एखाद्या बाईचेच चित्र असेल असे तूर्तास तरी धोरण आहे..
याला काय म्हणायचे? उद्दामपणा, फाट्यावर मारण्याची वृत्ती? ठरवा तुमचे तुम्हीच.
यशोधरा: मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत, पण सांगून उपयोग होईल असे वाटले नव्हते, सबब, काही बोलले नव्हते.
संस्थळचालकांची पत ही अशी आहे. या मताशी सहमत व्हावे लागू नये असे वाटणे हा केवळ आदर्शाचा भाग झाला. वास्तव सहमतीकडंच नेणारे आहे. आजचा नित्यानंदस्वामीविषयक धागा अशा सहमतीला मस्त पुष्टी देतो.
विसोबा खेचर: मी व्यक्तिश: मुंबैच्या रेडलाईट विभागात अशी सर्व प्रकारची माणसं खूप जवळून पाहिली आहेत, तेथील स्रियाही पाहिल्या आहेत.. आणि त्यांच्या शरीरापलिकडच्या त्यांच्या आयुष्यात जवळून डोकावायचा प्रयत्न केला आहे..
हे जर खरे असेल, तर तुमच्या त्या जाणिवा व्यक्त होणाऱ्या गोष्टी इथं तुमच्या वर्तनातून दिसल्या असत्या. दुर्दैवाने (कृपा करून मी दैव वगैरे मानतो का याकडे कोणी जाऊ नये) तसं होत नाही. हे तुमचं विसंगत वर्तन आहे. त्यावरून कोणी तुमच्या या खादाडीविषयक भूमिकेवर शंका घेतली तर त्यांना दोष देऊ नका. ती तुमचीच जबाबदारी आहे. अर्थातच, फाट्यावर मारण्याची चॉईस तुम्हाला आहे आणि तुम्ही तसेच वागता म्हणून आम्हालाही असेलच.
टारझन: स्त्रीची प्रतिमा केवळ खादाडी कॉलम पाहुन ठरते ?
असं थोडंच आहे. आणि एखाद्यानं खादाडी हा प्रतिमेसाठीचा एक मापदंड ठरवला असेल तर त्या मताची नोंद घेता येते. इतकं तरी आपण करू शकतोच. मग ते मत 'बालवाडी'तलं असलं तरी, त्यासाठी ते निकालात काढण्याची गरज नाहीच.
नितीन थत्ते: अनेकदा 'त्या' ललनांचा स्वतंत्र म्हणून उदोउदो केला जातो. स्त्रीमुक्तीक्षेत्रात काम करणार्यांच्या दृष्टीने मात्र त्यांना मिळालेलं 'भोगवस्तू बनण्याचं स्वातंत्र्य' त्यांनी वापरलेलं असतं. ते स्वातंत्र्य तिला पूर्वीही होतंच. आणि ते काही माणूस म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे.
नेमकं. सहमत. पुढे बोलण्याची गरज नाहीच.
वाहिदा: एक समजत नाही असे फालतू फोटो लावायची मिपा व्यवस्थापनाला गरज च काय ?
हाहाहाहा... अशा गोष्टींमुळंच साईट हॅपनिंग राहते असा गैरसमज असावा. त्याला इलाज नसतो. ज्याची-त्याची कुवत, बुद्धी वगैरे...
मेघना भुस्कुटे: 'स्त्री' असण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आयुष्यात न मागता येतात - यांत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर मात कशी करतो / त्यांच्याशी जमवून कसं घेतो या आणि अशा गोष्टींवरही लिहिलं जावं, असं वाटतं.
+१. लिहाच.
असे धागे अधिकाधिक निघाले तरी आपली रेष मोठ्ठी होईल. आणि ती प्रगल्भता आली तर मग स्वामी, महाराज, साधू वगैरेचे मुखवटे धारण करण्याची भिक्कार वेळही येणार नाही इथल्या अभाग्यांवर.
प्रकाश घाटपांडे: ज्या उत्त्तान स्त्रियांचे फोटो मुखपृष्ठावर असतात त्यांना स्वतःला या विषयी काय वाटत? हे जाणुन घ्यायला अधिक आवडेल एवढेच म्हणतो.
त्यांना काय वाटतं यावर आपली अभिरुची, मूल्ये अवलंबून आहेत? नक्कीच नाहीत हे तुमच्या परिचयावरून सांगू शकतो. तरीही असं लिहिलंत कारण या विषयाकडं तुम्ही त्या गंभीरतेने पहात नाही. त्यांना काय वाटतं हे जाणून घेणं हे चक्क बायदवे प्रकारातलं असू शकेल. म्हणूनच ती तुमची मुख्य प्रतिक्रिया असू नये. ती तशी वाटते हे लगेचच खाली आलेल्या प्रतिक्रियेवरून दिसतं.
धनंजय बोरगावकर: च्यामारी खायच्या डीश कडेबघा की!!!
काय सांगता मित्रवर्य? खायची डिशच महत्त्वाची नक्की? तसं असेल तर ती छायाचित्रं टाकण्याची, त्याला जोडून द्वयर्थी टिपण्या करण्याची गरज रहातच नाही.
मुक्तसुनीत: खाद्यपदार्थ नि नटी यांच्यातल्या उपभोग्यतेचे असोसिएशन बालिश किंवा बुरसटलेले वाटते. त्याची मांडणीमधे कलात्मक सौंदर्य वाटत नाही. विनोद म्हणून हा प्रकार मौजेचा वाटू शकतो. पण मिपा केवळ विनोदी साईट नाही आणि तोच तो विनोद कंटाळवाणा होतो.
बालीशपणा आहेच. पण मिपा केवळ विनोदी साईट नाही हे भान कधी येणार इतकाच प्रश्न आहे. वैयक्तिक नाही, पण तुम्ही, चतुरंग, बिका, चित्रा, विकास यांच्यासारख्या मंडळींकडून हीच अपेक्षा आहे. करण्याजोग्या अगणीत गोष्टींची यादी तुम्हीच मांडली आहे. त्यात ही एक भर मी टाकतोय - या असल्या गोष्टींना चाप लावणं हे संपादकांचंच काम आहे. मालक काहीही सांगेल.
इंद्रराज पवार: रामायण महाभारत पासून चालत आलेली "स्त्री" ची प्रतिमा ही पुरुषाचे रंजन करण्याचे कार्य करण्यासाठीच आहे हे बेगुमानपणे मानण्यात येते.
हो. तेच तोडण्यासाठी जोर लावला पाहिजे.
प्रियाली: मिपा मुखपृष्ठावर केवळ कुठल्याही प्रकारच्या बाया आणि पुरुषच पाहिजेत का? मुखपृष्ठे एवढ्याच कल्पनांवर सिमीत असतील तर त्याला कल्पनादारिद्र्य म्हणायला हवे.
प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे. कल्पनादारिद्र्याविषयी शंभर टक्के सहमत.
युयुत्सु: मानवी देहातील सौंदर्याचा शोध हा कालातीत आहे. ज्यांच्या सौंदर्यविषयक जाणिवा विकसित झालेल्या नाहीत त्यांना अशी चित्रे म्हणजे विटंबना वाटणे स्वाभाविक आहे.
हाहाहाहा... इथं जे काही चालतं ते या उदात्त हेतूतूंनच चालतंय असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला? सौंदर्याचा शोध? अनावृत्त किंवा अर्धअनावृत्त स्त्रीदेह म्हणजेच सौंदर्य ही कल्पना त्यामागे दिसते आणि त्याला तुम्ही विकसीत जाणीवा वगैरे म्हणत असाल तर बोलती बंद. तुमच्याकडून या स्तराची अपेक्षा खचितच नाही.
चतुरंग: संस्थळ प्रसिद्ध होताना अशा गोष्टीत योग्य ते बदल घडत गेले तर ते प्रसिद्ध बरोबरच प्रगल्भही होते!
ही बदलाची सुरवात करायला काय हरकत आहे?
इनोबा म्हणे: इथल्या स्त्री सदस्यांना (मालकांच्या भाषेत मिसळपावच्या लेकी-सुना) जर अशी छायाचित्रे अप्रस्तुत वाटत असतील तर त्यावर काही विचार करणार आहात की नाही?
या प्रश्नाचे उत्तर मलाही अपेक्षीत आहेच. पण फाट्यावर मारणं ही भूमिकाही असू शकते. लेकीसुना ही उक्ती आहे. कृती मात्र तशी दिसत नाही. आणि त्याचे स्वतःविषयीचे कौतुकही दिसते.
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे: मिपाच्या मुखपृष्ठावर इतकी का चर्चा होत आहे?
मुखपृष्ठाचा हेतू तोच तर आहे ना? तो सफल झाला याचं समाधान मानता येईल की. 'गृहशोभिका'शी तुलना मिपाची? कैच्याकैच... मालक चाळणीत पाणी घालून जीव देतील राव.
मस्त कलंदर: मलाही हे खादाडी प्रकरण खूप आधीपासून खटकत होते, पण बोलले नव्हते इतकेच..
तेच, संस्थळचालकांची पत ही अशी.
अरुंधती: स्त्रीच्या अशा अनेक रूपांची या साईटच्या मुखपृष्ठावर दखल घेतली गेलेली बघायला मला नक्की आवडेल व त्या त्या स्त्रीरूपाविषयी वाचायलाही.
युयुत्सु, तुमच्या सौंदर्यशोधाच्या मुद्यावर हे एक उत्तर आहे.
>>'गृहशोभिका'शी तुलना मिपाची?
अरारा......!
स्त्रीया वाचत असलेल्या काही मासिकांमधून सर्रास 'स्त्री सौदर्य' असलेली अनेक छायाचित्र असतात. तिथे मात्र कोणी भगिनी तक्रार करतांना दिसत नाही. असा तो मुद्दा. तिथे कसे पुढील पानावर गेले की, मागचे पान विसरले जाते. तसेच इथेही करायचे. जालावरही वावरतांना बर्याच गोष्टी आपल्याला दिसतात. आपण क्षणभर तिथे थबकतो आणि पुढे जातो..तोच मुद्दा इथे.
-दिलीप बिरुटे
तिथे कसे पुढील पानावर गेले की, मागचे पान विसरले जाते. तसेच इथेही करायचे.
ऑं? चला, नवी मोहीम हाती घ्यावी, मिपाला गृहशोभिकासदृष्य क्षणैक पान पहात ते उलटून पुढं सरकणारं संस्थळ बनवूया!!! :)
नीलकांता, तुझे दोन शब्द वेगळेच सांगतात, इथं वेगळंच सुचवलं जातंय. नेमकं काय रे बाबा? :)
>>>नीलकांता, तुझे दोन शब्द वेगळेच सांगतात, इथं वेगळंच सुचवलं जातंय. नेमकं काय रे बाबा?
मुख्यपृष्ठाबाबत नीलकांत ठरवेल ते धोरण मान्यच असेल. मी मांडले ते माझे वयक्तीक मत होते. मुख्यपृष्ठाबाबत सुचवणी नव्हती. उन्हाळा आहे, कृपया आग लावू नये, जंगल पेट घेईल. धन्यवाद...! :)
-दिलीप बिरुटे
ओके.
उन्हाळा आहे, कृपया आग लावू नये, जंगल पेट घेईल. धन्यवाद...!
हेहेहेहेहे... चिंता नको. पाण्याचे बरेच बंब आहेत तयार. आणि अर्थातच आग लावण्यात रस नाही. चर्चा करण्यात आहे. त्यातून चार चांगल्या गोष्टी होऊ शकतातच.
>>स्त्रीया वाचत असलेल्या काही मासिकांमधून सर्रास 'स्त्री सौदर्य' असलेली अनेक छायाचित्र असतात. >> स्त्री सौंदर्य आणि उत्तान चित्रं ह्यातला फरक प्रा. डॉ. तुम्हांला कळत असणारच. तेवढे सुज्ञ तुम्ही नक्कीच आहात. मिपावर केवळ भगिनीवर्ग किंवा बंधूवर्ग येत नाही, दोघेही येतात, सबब मासिके आणि मिपा ही तुलनाच चुकीची!
तुमच्या प्रतिसादातली विसंगती तुम्हांला खरच कळत नाही की तुम्ही डोळे मुद्दाम झाकून बोटचेपे धोरण स्वीकारले आहे?
>>स्त्री सौंदर्य आणि उत्तान चित्रं ह्यातला फरक प्रा. डॉ. तुम्हांला कळत असणारच.
मुख्यपृष्ठावर लावलेले एखादं चित्र 'उत्तान' आहे की त्यात 'स्त्री सौंदर्य' आहे, मी त्याचं सुक्ष्म निरिक्षण करीत बसत नाही. मात्र मला 'उत्तान' आणि 'उत्तम सौंदर्य' असलेली छायाचित्रे पाहणे आवडते. स्त्रियांच्या मासिकांमधे स्त्रीयांची 'उत्तान' छायाचित्रे नसतात काय ? [शोध घेऊन प्रतिसाद टंकीन] काय चुकीचे आणि काय बरोबर याची सुजाण जाण आमच्याकडे आहे. मुख्यपृष्ठ काय असावे, काय नसावे, ठरविणारी मंडळी वेगळी आहेत. त्यात आमचे काहीच योगदान नसते. त्यामुळे बोटचेपे धोरण वगैरे मुद्दे गैरलागू आहेत.
-दिलीप बिरुटे
>>>वैयक्तिक तुम्हाला काय आवडते ह्याच्याशी कसलेही देणेघेणे नाही.
बरं बरं...! तुम्हाला काय आवडत नाही, त्याच्याशीही आम्हाला काही देणे घेणे नाही.
>>'सुजाण' फार मोठा शब्द आहे प्रा डॉ! इतक्या सवंगपणे वापरु नये.
बरं हं...! मार्गदर्शनाबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
तुम्हाला काय आवडत नाही, त्याच्याशीही आम्हाला काही देणे घेणे नाही.
हाहाहाहा... त्यांनी थोडंच त्यांचं वैयक्तिक मत वगैरे मांडलंय की त्याच्याशी तुम्हाला देणे-घेणे असावे. सरजी, ट्रॅक सोडू नका इतकंच सांगायचं होतं. कारण तुमच्या बाकी भूमिकांवरून चर्चा - वाद चांगला होतोय. :)
असो. बाकी चालू द्या...
>>>यशोधरा: मिपाच्या मुखपृष्ठावरचे हे प्रकार मला सुरुवातीपासूनच खटकले आहेत, पण सांगून उपयोग होईल असे वाटले नव्हते, सबब, काही बोलले नव्हते.
हे काय आहे ? याला मत नाही तर काय सुविचार म्हणायचा का ?
>>कारण तुमच्या बाकी भूमिकांवरून चर्चा - वाद चांगला होतोय. असो. बाकी चालू द्या...:)
आता कंटाळा आलाय. :)
-दिलीप बिरुटे
'विसंगती'चा अभ्यास करायला चांगलं खाद्य दिलंत बिरूटेसेठ!
बाकी "आग लागणे", "व्यक्तीगत मतं स्वतःकडेच ठेवा" वगैरे भाषा संपादकांच्या आयडीतून झरते आहे याचं आश्चर्य वाटलं.
अदिती
'विसंगती'चा अभ्यास करायला चांगलं खाद्य दिलंत बिरूटेसेठ!
बाकी "आग लागणे", "व्यक्तीगत मतं स्वतःकडेच ठेवा" वगैरे भाषा संपादकांच्या आयडीतून झरते आहे याचं आश्चर्य वाटलं.
अदिती
ह्या... ते मत धरून बोलताय होय तुम्ही. मी आपला इथंच पाहतोय, इथं तर काही दिसलं नाही. मला वाटलं ते मागल्या पानावर गेलं म्हणजे पान उलटल्यानं पुढं सरकलं असेल सारं काही. पण... असो.
आणि ते वैयक्तिक मत तुम्ही संपादक म्हणून नाकारताहात की प्रा. डॉ. दिलीप बिरुटे म्हणून? हा फरक करावा लागेल. संपादक म्हणून नाकारत असाल तर अशी मते मांडण्याचे प्रयोजन राहणार नाही.
मासिकातून उत्तान चित्रे असतात म्हणून मिपावरही असली तर कोठे बिघडले??
अहो हेच तर नकोय ना!!
मासिकाबद्दल तक्रारी करणार्या भगिनीसुद्धा असतील त्या इथे आपल्याला दिसणार नाहीत. इथे जे चालायला नको असे वाटते त्याचीच तक्रार इथे दिसणे अपेक्षित नाही का?
का उगाच आपलं विरोधाला विरोध असं चालू आहे?
चतुरंग
>>अहो हेच तर नकोय ना !!
च्यायला, चतुरंग म्हणताय ना. मिपावर उत्तान चित्र नको तर नको..!
विषय संपला.
>>आपलं विरोधाला विरोध असं चालू आहे ?
रंगासेठ विरोधाला विरोध नाही. आज अशी चित्र नको म्हणतील. उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...
असो, आमच्यासाठी विषय संपला.
-दिलीप बिरुटे
[रंगाशेठच्या विचाराला मान देणारा]
आज अशी चित्र नको म्हणतील. उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...
या धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धिंगाणाका तिंगाणाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड
एका वाक्यात सगळ्यांची मुंडकी कापली .. व्वा प्रा.डॉ.... जियो .. आज पासनं ताजमहाल तुमच्या नावाव केला...
मला एकंच कळत नाय च्यायला ... आम्हाला कधी ती चित्र नजरेत यावं एवढं त्यांच्याकडे लक्षंच गेलं नाही .. ह्याचाच अर्थ ती काही एवढी एक्स्लोझिव नव्हती .. आणि हॅहॅहॅ .. भडक चित्र पहायला मिपावर कशाला यायला पायचे ? एक से एक डेडिकेटेड साईट्स आहेत की राव ... =))
सांगण्याचा मुद्दा पुण्हा फक्त इतकाच की ही चित्रंच मुळी गौण होती.... आणि जर खरोखर कोणाला एखादा चांगला उपक्रम सुरू करायचा असेल तर गुपचाप केला असता .. हे असले धागे लाईमलाईट साठी काढले जातात. धाग्यावर "वा छाण उपक्रम चालु केला आहेत " असे प्रतिसाद कमी ... आणि "मिपावर बायांच्या प्रतिमेची धिंड काढली जाते .. यावर टिपण्णी करणारे प्रतिसाद अधिक !!
(प्रा.डाँचा फॅन) टार्या भयंकर
श्री बिरुटे यांच्या प्रतिसादात मला काही वावगे दिसत नाही. आणि हा धागा का टाकला गेला हे त्यातील करड्या रंगावरुन लगेच समजते. राहुन राहुन असे वाटते की राणी चन्नमाला ह्याच धाग्यात टाकायला नको होते. कुठे ती थोर राणी आणि कुठे आजकालच्या रेडवाईन पिऊन शिव्या देत माज दाखवणार्या मुली !!!. अशा मुली अजुनतरी जास्त नाहीत, पण एक सहज वाक्य निघुन गेले. असो.
बाकी राणी चन्नमाची माहीती आवडली, पुढील लेखमालेस शुभेच्छा. आम्ही नक्की वाचु.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
श्री बिरुटे यांचा प्रतिसाद अत्यंत आक्षेपार्ह आहे असे माझे मत आहे. त्यांच्या मतानुसार संपादन वेळोवेळी होऊन कुठलेही नवीन लिखाण होऊ शकणार नाही. आणि हे सर्व ते खुद्द संपादक असतांना आणि 'कात्रीने कापणे' वगैरेंसारखे शब्दप्रयोग वारंवार करत असतांना. मुख्यत: संपादक म्हणून त्यांनी त्यांची भुमिका जराही प्रगल्भपणे न दाखवल्याने आणि रास्त आक्षेपांचा असा विपर्यास केल्याने अतिशय दु:ख झाले. सद्सद्विविवेकबुद्धी वापरुन त्यांनी स्वत:च तो प्रतिसाद संपादीत केल्यास आनंद होईल.
राहुन राहुन असे वाटते की राणी चन्नमाला ह्याच धाग्यात टाकायला नको होते. कुठे ती थोर राणी आणि कुठे आजकालच्या रेडवाईन पिऊन शिव्या देत माज दाखवणार्या मुली !!!.
हा काय प्रकार आहे? रेड वाइनचा संबंध कळला नाही. राणी चेन्नम्मांच्या माहितीवरून त्यांचे मद्यप्राशनाविषयीचे विचार स्पष्ट होत नाही. कैच्या कै संबंध जोडू नये. शक्य असल्यास मुद्द्याला धरून उपप्रतिसाद लिहावा.
तुमचा वाद दिलीपरावाच्या प्रतिसादाबद्दल आहे.
दिलीपराव हे संपादक आहेत आणि सदस्यही आहेत. संपादक असले म्हणजे सदस्य म्हणुन प्रतिसाद देता येत नाहीत का? त्यांनी त्यांची व्यक्तीगत मते ठेउ नयेत का?
जो पर्यंत चर्चा ही अगदी व्यक्तीगत होत नाही, तो पर्यंत कोणतीही चर्चा ठिक असते.
आणि सगळे संपादक हे स्वतःचे काम संभाळुन, मिपावर संपादनाचे काम कोणत्याही मानधनशिवाय करत असतात. हाही मुद्दा लक्षात घ्यायला हवा.
आणि दिलीपरावांनी प्रतिकिया ही सदस्य म्हणुन आणि लेखाचा असलेला (बुरख्याआडचा)मुळ उद्देश लक्षात घेउन दिली असेल.
आणिबाणी उठवल्याचा धागा नुकताच नीलकांतने टाकला, त्यात त्याने म्हटले आहे. सदस्यांची समिती नेमली जाईल. कोणतीही गोष्ट करण्याचा सनदशीर मार्ग उपलब्ध होत असताना, हा धागा टाकुन लोकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न आहे. आणि हा धागा काही मौजमजा म्हणुन ही टाकला नाही.
नीलकांत माझ्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे, तेव्हा बर्याचश्या गोष्टी(संपादकांची जबाबदारी वैगरे.) स्पष्ट होतीलच. तो पर्यंत वादग्रस्त गोष्टींना हात घालुन उगाच त्याचा त्रास वाढवु नये.
तुम्हाला जसे मत आहे, आदितीला जसे मत आहे, तसेच मला, बिरुटेसरांना ही मत आहे. कदाचित ती मते नेहमीच एक येतील असे नाही. त्यावेळी होणारे मतभेद सनदशीर मार्गाने व्यक्तीगत टिका न होता मांडता आले म्हणजे झाले.
दिलीपरावांनी प्रतिक्रिया देताना,मिपावर कसे आपलीच धोरणे जोर जबरदस्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न झाला होता हा इतिहाससुध्दा लक्षात ठेवला असेल.
उदा. तुम्हाला एक उदाहरण देतो, पुर्वी सांमतकाका मिपावर लिहायचे. ते ओबामाचे चाहते होते, काही लोकांना ते पटले नाही. मग एकाने त्यांना उत्तर म्हणुन मुद्दाम धागा लिहीला. बहुतेक तो लेखक कर्क असावा. मी तो धागा शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. त्यानंतर सांमतकाका मिपावर लिहीत नाहीत.
असे प्रकार मिपावर पुन्हा होउ नयेत असे वाटते. तुमचे लिखाण पहाता, तुम्हीही सहमत असलाच.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
काड्याघालू विकास, आत्तापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार होता. पण आपल्याला न झेपणार्या गोष्टींबद्दल आणि इतर सभासदांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बरळ बंद करा!
रेड वाईन पिणार्यांनी चन्नम्मेबद्दल लिहू नये असे जर तुमचे विचार असतील तर आता व्यवस्थापक नीलकांत यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे, की माझे धागे काड्यामुक्त करता येतील का? अर्थात तुम्हाला (आणि इतर काही लोकांनाही) माझे विचार झेपत नाहीत तेव्हा माझ्या धाग्यांवर तुम्ही प्रतिसाद लिहू नयेत याची काळजी घेता येईल का?
अदिती
हा उपक्रम आवडला. राणी चन्नमेची कहाणी 'गोष्ट' स्वरूपात बर्याच वर्षांपूर्वी ऐकली होती त्याची आठवण झाली.
आता मुखपृष्ठाबद्दल बोलायचे झाल्यास्........मला ते फोटो आवडत नाहीत, कुठल्या नट्यांनी त्यांचे अंग किती दाखवावे हा त्यांचा प्रश्न आहे पण आपण काय नी किती बघावे किंवा बघायला लावावे हा आपला प्रश्न आहे. कर्त्रूत्ववान स्रियांचे फोटो (जुन्या वा नव्या काळातल्या) लावायला काय हरकत आहे?
रेवती
>>कर्त्रूत्ववान स्रियांचे फोटो (जुन्या वा नव्या काळातल्या) लावायला काय हरकत आहे?
एक सुधारणा.
कर्त्रूत्ववान स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचेही फोटो असावेत. तेवढीच नवीन माहीती मिळेल.
----
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
प्रतिक्रिया
सहमत आहे..
त्तात्या
हास्यास्पद वाटते.......
एका सुंदर धाग्याबद्दल.....!!!
योग्य प्रतिसाद !!
वैविध्य
मिपा
जाणिवा वगैरे
जर
बरोबर
ज्याच्या त्याच्या 'ग्रे मॅटर'चा प्रश्न!
स्वसंपादन
कारणे अनेक असतील
गरजच काय ?
आजची खादाडी
एखादी
चांगला
>> आता झालं
राणी
अदिती,
हम्म्म...........
स्त्रीचीही अनेक रूपे
काही मोती, मुक्ताफळे वगैरे...
>>'गृहशोभिक
ऑं?
>>>नीलकांता,
ओके...
>>स्त्रीया
व्यक्तिगत माझे मत..
वैयक्तिक
>>>वैयक्तिक
हाहाहा
हे काय आहे ?
'विसंगती'चा
'विसंगती'चा
ह्या...
अहो काय प्राडॉ?
वोक्के...!
हॅ हॅ हॅ!
है ... जबरा हो प्रा.डॉ.
उद्या कशाला आजच
श्री
वावगेच वावगे
तुमचा वाद
काड्याघाल
मस्त...
श्रामोंशी
हा उपक्रम
सहमत आहे
>>कर्त्रूत्