पुन्हा एकदा लढत ६४ घरांच्या विश्वविजेतेपदाची!
तारीख २० एप्रिल २०१०. तब्बल ४० तासांचा थकवणारा प्रवास करुन विश्वनाथन आनंद बायको अरुणा समवेत अखेर एकदाचा बल्गेरियाची राजधानी सोफियाला पोचला आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला! आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तो फ्रँकफर्टला चार दिवस अडकून पडला होता आणि शेवटी त्याला गाडीने जावे लागले. तो आणि त्याचा आव्हानवीर बल्गेरियाचा वेसेलीन टोपालोव ह्यांच्यातला विश्वविजेतेपदाचा सामना २३ एप्रिलला सुरु होतोय. माझ्यासारख्या लाखो बुद्धिबळ रसिकांचे लक्ष आता १३ मे पर्यंत सोफियाला लागलेले असेल. निसर्गप्रकोपाने चार दिवस वाया गेले आणि अडनिडा प्रवास करावा लागला म्हणून आनंदने स्पर्धा तीन दिवस पुढे ढकलता येईल का अशी विचारणा केली परंतु बल्गेरिअन संयोजकांनी त्याला नकार दिला. ह्या सगळ्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच आनंदवर ताण येईल की काय अशी शंका व्यक्त होते आहे. टोपालोवला ह्या सगळ्याचा कसा फायदा उठवता येईल ह्या दृष्टीने त्याच्या गोटाची आखणी चालू झाली आहे. अशा रीतीने प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वीच ही लढत एका वेगळ्याच प्रकारे मानसिक स्तरावर सुरु झाली आहे.
१९८७ साली ज्यूनिअर विश्वविजेतेपद आणि ग्रँडमास्टरपद अशी दोन्ही एकाच वर्षी पटकावून भारताच्या बुद्धीबळविश्वाला आनंदने एक सर्वस्वी नवा आयाम दिला. 'एक भारतीय सुद्धा हे करु शकतो तर', अशी एक वेगळीच आत्मविश्वासाची भावना त्याने अनेकांच्या मनात जागवली. एकेकाळी सोविएत रशियाला जणू काही आंदण मिळाल्यासारखा असणारा हा खेळ हळूहळू संपूर्ण जगात विजेते निर्माण करु लागला आणि रशियन सद्दी संपुष्टात येऊ लागली. २००७ ला जगज्जेतेपद मिळवून आणि लगोलग दुसर्या वर्षीच २००८ ला व्लादिमीर क्रामनिकला पराभूत करुन ते टिकवून आनंदने इतिहास निर्माण केला.
ह्या दुव्यावर आनंदची छोटेखानी मुलाखत आहे. ती जरुर पहा. महान खेळाडू किती साधे असतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे (त्या बाबतीत फक्त सचिनचीच तुलना त्याच्याशी होऊ शकेल). अतिशय निगर्वी, नम्र आणि मृदुभाषी असा हा जगज्जेता पटावर वाघ बनून धुमाकूळ घालतो ह्यावर विश्वास ठेवणे कठिण जाते! मिखाईल ताल हा आनंदचा आवडता खेळाडू. आनंद त्याच्याप्रमाणेच आक्रमक खेळतो. धोका पत्करुन नवीन पर्याय खेळून बघणे त्याला आवडते. कास्पारोव आणि कार्पोव सारख्या महारथींशी तो प्रत्येकी शंभरापेक्षा जास्त डाव खेळलेला आहे! वेगवान बुद्धीबळाचा तर तो बादशहाच आहे.
ग्रँ.मा.प्रवीण ठिपसेने त्याची एक आठवण सांगितली आहे. मे १९८३ मधे मुंबईत राष्टॄय बुद्धीबळ स्पर्धा होत्या. चेन्नैचा नामवंत खेळाडू दिलावरने मुख्य सामन्याधिकार्यांकडे तक्रार केली की त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे चेस क्लॉक चालत नाहीये! घडाळ्याच्या तपासणीत काही दोष आढळला नाही. ती मॅच संपली तेव्हा दिलावरने ९५ मिनिटे खर्च करुन तो सामना गमावला होता आणि आनंदच्या घड्याळात फक्त २ मिनिटे झालेली होती!! :T
त्याचा आव्हानवीर टोपालोव सुद्धा काही साधा खेळाडू नाहीये. सध्या जगातला दोन नंबरचा इलो रेटिंग (गुणांकन) असलेला खेळाडू आहे तो!
अनेकवेळा धोके पत्करुन तो खेळत जातो आणि प्रतिस्पर्ध्याला चकित करायचं अशा इराद्याने खेळतो. कास्पारोव सारख्या तगड्या शिलेदारालाही घाम फोडणारा खेळ त्याने केलेला आहे!
विरुद्ध
ह्या दोन तुल्यबळ खेळाडूंमधला सामना कसा रंगतो हे बघायला सगळे जग उत्सुक आहे. ह्या दुव्यावर जिज्ञासूंना आणखीन माहिती मिळेल!
विशी आनंदला शुभेच्छा देऊन हा लेख आवरता घेतो!
सोफियातला 'सेंट्रल मिलिटरी क्लब' जिथे ही स्पर्धा होणार आहे.
(सर्व चित्रे जालावरुन साभार)
विरुद्ध 
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मनःपूर्वक शुभेच्छा
+१
+१
आनंदला या
६४ घरांतलं नाट्य
आनंदला
आनंदला माझ्याही शुभेच्छा.
ह्या दोन
क्लासिक
मस्त लेख.
हे ईलो
एलो रेटिंग
सामना
रंगाशेठ
हा हा!
हां...
मोडकांच्य
ताज्या बातमीनुसार
विजयी
ताजी बातमी
पहिल्या डावात आनंद अपेशी.
हो. दुसर्या डावात जिंकून लगेच बरोबरी केलीन!
धन्यवाद रंगाशेठ.
बर झाले दुसर्या डावात आनंद जिंकला .
मस्त दुवा आहे रे
साला आत्ता
तात्या तुमची खेळी
आनंद एक गुणाने आघाडीवर.
ताजी बातमी इथे दिल्याबद्दल धन्यवाद प्रमोदकाका!
पाचवा सामना बरोबरीत सुटला!
सहाव्या डावातही बरोबरी.
व्वा...
हुश्श!!
हरला आनंद!!
१० वा सामनाही बरोबरीत सुटला.