Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नीलकांत on Wed, 04/21/2010 - 22:39
नमस्कार मिपाकरहो, एवढ्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासातील एक अशी माझी ओळख आज पर्यंत होती. तात्यांनी ही नवी जवाबदारी दिली आहे त्या जवाबदारीवर मी खरा उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. मिसळपाव उभं करतांना ज्या उद्येश्यांना सामोरे ठेवलेलं होतं त्याच दिशेने मिसळपावची वाटचाल व्हावी अशीच भूमिका असेन या कडेही जाणीवपुर्वक लक्ष देईल. सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय. तुम्ही दिलेल्या योगदानाची जाणीव मिपाला आहे/असणार आहे.आजच्या घटकेला तुम्ही परत येणे हीच मिपा व्यवस्थापनाची आद्य प्राथमिकता असणार आहे. मागच्या दोन वर्षात मिपाची वाटचाल अत्यंत दैदिप्यमान अशी आहे. सांख्यिकी द्यायची झाली तर भुरळ पाडणारे आकडे आहेत. हिच यशोगाथा पुढे चालु ठेवण्यासाठी आपण यापुढे प्रयत्नशील राहुयात. याच पायावर येणार्‍या वर्षात काही महत्वाकांक्षी योजना तडिस नेण्याचा बेत आहे, त्या वेळोवेळी जाहिर करण्यात येतिल. मिपा व्यवस्थापन जास्तित जास्त लोकाभिमुख कसे राहिल याबद्दलही काही योजना आहेत.या आणी अश्या बाबतीत सर्व सदस्यांच्या सुचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार आहे. ही समिती त्या त्या वेळच्या प्रकल्पानुसार बनविली जाईल आणी प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर विसर्जित केली जाईल. संपादक मंडळ ही स्वतंत्र रचना आधीसारखीच कार्यरत राहिल, निवेदनाच्या धाग्यावर तात्यांनी म्हणाल्या प्रमाणे त्यांचे योगदान शब्दातीत आहे. सध्याचे संपादक मंडळात कोणताही बदल होणार नाही. सर्व संपादकांना मी पुन्हा कार्यरत होण्याची मनापासुन विनंती करत आहे. आपल्या सर्व सुचनांचे स्वागत आहे. संस्थळाच्या धोरणात आमुलाग्र बदल करण्याचा मानस आहे. त्यातली एक लहानशी गोष्ट म्हणजे आणिबाणी. यापुढे आणिबाणी नामक गोष्ट मिपावर अस्तित्वात नसेल. तसेच कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद करण्याचा मार्ग अत्यंत निकडीच्या वेळेसच वापरण्यात येईल असे धोरण बनविण्याचा विचार आहे. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की आता शिस्तभंगाची कार्यवाही होणार नाही. मात्र आधी तात्या एकहाती हे काम पुर्ण करायचे आता ते कामात असल्यामुळे शासनकर्ता [ ;) ] नाहीये. ते येई पर्यंत सर्व संपादकांना हे काम करावे लागेल. यावरून संपादकांच्या वाढत्या जवाबदारीची जाणीव होईल. मी आधीसारखाच मिसळपावला अधीकाधीक सोई देण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे आधीसारखीच यापुढेही संपादनाची पुर्ण जवाबदारी संपादकांच्या खांद्यावर राहील. लवकरात लवकर या योजना घेउन मी आपल्यापुढे येईन. आपल्या विश्वासावरच त्यांचे यश अवलंबुन आहे याची मला पुर्ण जाणिव आहे. मिपावर पारदर्शकता हे सुत्र कसोशीने वापरण्याचा मी प्रयत्न करेन. आपलाच विश्वासु, नीलकांत
  • Log in or register to post comments
  • 19933 views

प्रतिक्रिया

Submitted by नीलकांत on गुरुवार, 04/22/2010 - 23:18

In reply to अगदी... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

गफलत होतेय...

बिपिन दा.. मिसळपाव हे तात्याच्या मालकीचे संकेतस्थळ आहे. निवेदन किंवा दोन शब्द मध्ये मालकी हक्कांबाबत कसलाही उल्लेख नाहीये. त्यामुळे मला असे संबोधने चुकीचे आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मिसळपावचे मालक श्री तात्या अभ्यंकर हे आहेत यात शंका नाही. तुझे आणि सर्व मिपाकरांचे सहकार्य आहे यामुळेच मिपा एवढी प्रगती करू शकले आहे यावर माझी सुध्दा श्रध्दा आहेच. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/22/2010 - 23:29

In reply to गफलत होतेय... by नीलकांत

Permalink

धन्यवाद

धन्यवाद नीलकांता, हाती कुठलीही ऑथेन्टिक/ऑथोराईज्ड माहिती नसताना बिपिनरावांचे असे धडधडीत विधान हे पूर्वग्रहदुषित अथवा निव्वळ खोडसाळपणाचे मलाही वाटले! असो, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 04/23/2010 - 13:07

In reply to धन्यवाद by विसोबा खेचर

Permalink

तात्या,

तात्या, माझा प्रतिसाद आल्या आल्या आपण मला फोन केला होता आणि तुमची बाजू मांडली. ती ग्राह्य धरून मी माझा प्रतिसाद नुसता मागेच घेणे नाही तर तुमची सपशेल आणि बिनशर्त माफी मागतो असे सांगितले. पण तुम्ही फोन केलात वगैरे लोकांना कळेल असे वाटल्याने तुम्हीच तसे करू नकोस असे सांगितले. शिवाय सध्या आता हे असेच राहू दे वगैरे पण आपले बोलणे झाले. फोनवर बोलताना मी माझीही बाजू मांडली होतीच. कोणतीही गोष्ट आधी कानावर येते आणि मग ती खरी आहे हे कळते, असेच घडले आहे नेहमी. काही गोष्टी कानावर आल्या त्या मी खर्‍या धरून त्याप्रमाणे लिहिले. नंतर तुमचा फोन आल्यावर बिनशर्त माफी मागायची पण तयारी दाखवली. 'पुर्वग्रहदुषित' आणि 'खोडसाळ' असतो तर शब्दाला शब्द वाढवला नसता? नीलकांतने स्पष्टीकरण दिले ते उत्तमच पण त्यावर, तो विषय संपवायचा सोडून तुम्ही काहीही खास गरज नसताना माझ्याबद्दल असे शब्द तेही केवळ स्वतःच्याच समजुतीवर आधारित राहून वापरले म्हणून हे लिहितो आहे. अन्यथा तुम्हाला आणि नीलकांतला दिलेला 'गप्प राहण्याचा' शब्द मोडला नसता. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 13:26

In reply to तात्या, by बिपिन कार्यकर्ते

Permalink

मी

मी तुझ्याशी फोनवर बोलल्याप्रमाणे किंवा इथे लिहिण्याप्रमाणे, मुळात हाती कोणतीही ऑथेन्टिक/ऑथोराईज्ड माहिती नसताना, केवळ ऐकीव माहितीच्या आधारे असे धडधडीत विधान करणे हे मला अत्यंत चुकीचे वाटते.. असे काही लिहिण्यापूर्वी तुझ्यासारख्या एका जबाबदार संपादक-सभासदाने निदान मला किंवा नीलकांतला व्य नि अथवा विरोप करून खातरजमा करून घ्यायला हवी होती. तुला निश्चितच करेक्ट माहिती मिळाली असती.. पण तसे काहीही न करताना तू केवळ ऐकीव माहितीच्या आधारे मिपाच्या एका महत्वाच्या विषयासंबंधी जाहीरपणे बिनदिक्कत विधान करून मोकळा झालास हा मला निश्चितच खोडसाळपणा वाटतो..किंबा बेजबाबदारपणा वाटतो.. तुझ्या संदर्भात ह्याला 'चूक' किंवा 'अज्ञानमूलकता' मला तरी नक्कीच म्हणता येणार नाही.. असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on गुरुवार, 04/22/2010 - 12:03

In reply to ४ शब्द ... by छोटा डॉन

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on गुरुवार, 04/22/2010 - 11:50

Permalink

घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे ! ...

देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे ! - विंदा अनुभव हा नेहमीच सगळ्यात मोठ्ठा गुरु असतो. देण्यार्याचा हात कायमचा सुटू देऊ नये हे महत्वाचे . मिसळपाव हे एक सुसंकृत संकेतस्थळ आहे इथे स्वतःचे frustration काढुन अर्वाच्य शिवीगाळ करणार्या सभासदांवरही योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी ही नविन धोरणात सामील होइल ही अपेक्षा ... उगाच विसंवाद वाढवणारे व गोंधळ निर्माण करणार्या सभासदांमुळे चांगल्या धाग्यांचा बळी जातो असे धागे, अवांतरा कडे भरकटू देऊ नये . मिपावर पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न यशस्वी होवो :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on गुरुवार, 04/22/2010 - 12:16

Permalink

छान.

नीलकांतला शुभेच्छा, आणि संपूर्ण सहकार्य. नव्या निर्णयांनाही पाठिंबा !
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on गुरुवार, 04/22/2010 - 12:20

In reply to छान. by ज्ञानेश...

Permalink

+१

असेच म्हणतो भावश्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 04/22/2010 - 12:35

Permalink

शुभेच्छा.

नीलकांतला त्याच्या कार्यात सुयश चिंतितो. तात्या,मी मालक आहे,मी मालक आहे...हे सांगण्यामागचा उद्देश कळला नाही...कारण तू मालक आहेस हे इथल्या जवळपास ९५% सदस्यांना माहित आहे...मग तीच गोष्ट पुन्हा सांगण्यात काय हंशील आहे? हे संकेतस्थळ पूर्वीसारखं पुन्हा भरभराटीला यावं असं खरोखरच वाटत असेल तर सर्वात आधी तुझा हा बालीशपणा बंद कर. नीलकांतला पूर्णपणे सूट दे...उगाच मध्येमध्ये लूडबूड करू नकोस. तुझ्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित कर म्हणजे तुझ्या अडचणी...ज्या काही असतील त्या जास्त चांगल्या प्रकारे सुटतील. आणखी एक सल्ला...तू तो मानणार नाहीस...हे माहीत असूनही देतोय...तुझं वागणं...इथलं...संकेतस्थळावरचं...जितकं मर्यादशील ठेवशील तेवढं हे संकेतस्थळ जास्त सुरळित चालेल. यथा राजा,तथा प्रजा...ह्या उक्तीप्रमाणे...तुझ्या इथल्या लिखाणात,प्रतिसादात येणार्‍या शिव्या,अपशब्द वाचल्यावर जर त्याचे कुणी अनुकरण केले तर मग त्यांना कोण गप्प बसवू शकेल. तुझ्या अशा वागण्यामुळे संपादक मात्र अडचणीत येतात. कोणाकोणावर,किती आणि कशी कारवाई करायची त्यांनी? तेव्हा तुझ्या लेखणीवर ताबा ठेव. बाकी खाजगी आयुष्यात आपण कसे वागावे हे ज्याचे त्याने ठरवावे...पण सार्वजनिक आयुष्यात मात्र काही किमान नितीनियम पाळायलाच हवेत.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on गुरुवार, 04/22/2010 - 12:49

Permalink

मार्गदर्शन ....!!!

नीलकांत जी .... मिसळपाव वरील हा माझा दुसरा आठवडा, आणि याच काळात श्री. तात्यासाहेबांनी विश्रांतीचा प्रस्ताव मांडणे आणि संपादकपदाची धुरा तुमच्याकडे सोपवावी हा एक योगायोग. हे अशासाठी मी म्हणत आहे की, या निमित्ताने तुम्हा दोघांवर इथले सदस्य किती प्रेम करतात याचे आनंददायी प्रत्यंतर आले. तुमच्यावरील नूतन जबाबदारीसाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा. या निमित्ताने "अनंतफंदी" चा एक उपदेशपर फटका आठवतो : "बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको, आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहू नको...." फटक्याचा शेवटचा भाग आमच्यासारख्या नव्या सदस्यांना जास्त लागू होतो, कारण तुमच्याकडून आम्हास येथील वाटचालीसाठी "मुठभर" मार्गदर्शन नेहमीच मिळत राहील. धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 04/22/2010 - 13:00

In reply to मार्गदर्शन ....!!! by इन्द्र्राज पवार

Permalink

नम्रता

>>अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको, हे सगळ्यांनाच लागू असते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on गुरुवार, 04/22/2010 - 13:47

In reply to नम्रता by नितिन थत्ते

Permalink

अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको

हा भाग संस्काराचा असतो मिपावरील मुखप्रुष्टावर Plunging Neckline असलेल्या बायकांचे, मुलींचे फोटो लावू नयेत . खुदा की कायनात (निसर्ग) में औरभी बहोत खुबसुरती है जो सादगी से बयान होती है (वर्णिली जाते) :-) (वरील मजकूर आदिती ला समर्पीत. ' Aditi' is the one who has taken STRONG INITIATE TO DISCARD PUBLISHING ANY SUCH PHOTOS OF WOMAN WEARING PLUNGING NECKLINE and we do Support) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 04/22/2010 - 15:29

In reply to अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको by वाहीदा

Permalink

फारच complicated..... गुंतागुंतीचे

त्यात्यांचे निवेदन वाचले, निलकांतचेही वाचले. त्या दोन्हीखालच्या प्रतिक्रियाही वाचल्या. एकंदरीत, मिपा ही फार गुंतागुंतीची भानगड आहे हे लक्षात आले. एखादे सोपे आणि साधे, सरळ स्थळ नाही आहे का हो मराठीत लिहायला ? जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 04/22/2010 - 15:32

Permalink

नीलकांत

नीलकांत - अभिनंदन आणि शुभेच्छा! :) तुझ्या संयमित आणी संतुलित वागण्यावर नक्कीच विश्वास आहे! लोकशाही पद्धती कितीही आदर्श दिसत असली तरी अशा मोकळ्या संस्थळांवळर तो एक उपद्रवच ठरतो. कितीही मोकळे वातावरण उपलब्ध करायचे मनात असले तरी मग आभासी जगात हा प्रवास अपरिहार्यपणे "प्रशासकिय अनुमती"कडून "प्रशासकीय कात्री"कडे जातो, आणि त्यात कटूता येऊ शकते. त्यापेक्षा काही धोरणे आणि नियम जर ठरवून कायमस्वरुपात प्रसिध्द केलेत, तर ते काटेकोरपणे सगळ्यांसाठीच अमलात आणता येतील. नव्या/जुन्या सदस्यांना ह्या नियमांना "मान्य आहे" असे दाखवुनच प्रवेश देण्यात यावा. जर कधी काही प्रतिसाद/धागे उडवण्यात आले तर नेमक्या कुठल्या धोरणामुळे/नियमामुळे ते उडले हे सांगता येईल. अश्लिलतेविषयीही काही ठोस/निसंदिग्ध भुमिका घ्यावी - माझ्या मते लज्जागौरीचे चित्र तितके आक्षेपार्ह नव्ह्ते (शिवाय त्याला सांस्कृतिक संदर्भही आहे) जितकी काही मुखपॄष्ठावरील चित्र किंवा सुरुवातीच्या काळातले काही विनोदाचे धागे होते.त्यासाठी सदस्य रेटींग सुद्धा अमलात आणता येईल. त्यासाठी काही तांत्रिक मदत हवी असल्यास मी (आणि कित्येक इतर मिपामित्र) तयार आहे. मिपा च्या अतिशय मोकळ्या आणि उमद्या वातावरणामुळे इतर कुठेही आढळणार नाहीत असे काही लेख इथे प्रसिद्ध झालेत (उदा. घाटपांडे काकांचा "होळकर आणि दांडेकर", धनंजयचा "कोणार्कची शिल्पे") आणि ते तसेच रहावे अशी इच्छा आहे. त्याच बरोबर धोरणे/आणि नियम एकत्रितपणे प्रसिद्ध करून अमलात आणल्यास खूप फायदा होईल असे वाटते. काही काळ असे नियमीतपणे केल्यास आपोआपच जी स्वयंशिस्त आणि विवेक अपेक्षित आहे तो दिसायला लागेल असे वाटते. काही प्रकारचा थिल्लरपणा इथे खपवून घेतलाच जात नाही म्हटल्यावर तसे प्रकार कमी होतात. पण धोरणातल्या आणि त्याच्यातल्या अंमलबजावणीतल्या सातत्याची आणि पारदर्शीपणाची मात्र नितांत गरज आहे. मिपाची भरभराट होवो आणि तात्यांची त्यांच्या अडचणींमधून लवकर सुटका हिच सदिच्छा! - (जुना-जाणता, पण क्वचितच तोंड उघडणारा खर्राखुर्रा हितचिंतक) मनिष
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on गुरुवार, 04/22/2010 - 18:26

In reply to नीलकांत by मनिष

Permalink

नवा प्रारंभबिंदू

मनिष, डॉन्या, देवकाका, घाटपांडेकाका, बिका, अदिती या आणि इतर मिपाकरांनी मांडलेल्या मतांशी सहमती आहे. जुन्या सदस्यांना परत येण्याचे आवाहन हा मिपाच्या भरभराटीचा नवा प्रारंभबिंदू ठरू शकेल. आणीबाणी उठवली ते चांगलेच केलेत. काही वाहावत जाणार्‍या चर्चांना आणि अवांतर प्रतिसादांना आळा घालण्यासाठी मानवी संपादनापेक्षा तांत्रिक संपादनाची सोय केलीत तर त्यामुळे कटूताही टळू शकेल. शिवाय 'बहूमताचा जोरही' अशा गोष्टी धिक्कारून लावू शकेल. त्याशिवाय काही 'मानलेले' त्याज्य विषय (उदा. महात्मा गांधी, गांधीवाद वगैरे) यांच्यावर बंदी नसली तरी त्याविषयीची वक्र नजर बदलेल अशी आशा व्यक्त करतो. बाकी नीलकांता, तुला संपूर्ण सहकार्य असेलच रे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/22/2010 - 21:28

Permalink

बरं झालं

बरं झालं रे बाबा तू हे दोन शब्द लिहिलेस! मिपापासून लांब गेलेल्या सदस्यांनी खरच परत यावं अशी इच्छा आहे. ते कधी/का लांब गेले याच्या कहाण्या असतील, मला माहित नाही इतकेच! पण त्यांनी परत यावे असे वाटते आहे. (अवांतरः माझा संगणक बंद आहे त्यामुळे मिपावर फारच कमी वेळ असते. महिनाभराने पुन्हा नियमीतपणे येइन. मी मिपापासून लांब गेले असा अर्थ कृपया घेउ नये.) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by सुरेखा पुणेकर on गुरुवार, 04/22/2010 - 22:21

Permalink

फौजदार

फौजदार दादांचं जंक्शन अभिनंदन बर्का!! श्या द्यायचं नविन धोरन काय? -- सुरेखा कारभारी दमानं.....
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on Fri, 04/23/2010 - 00:29

In reply to फौजदार by सुरेखा पुणेकर

Permalink

हमम्म्म.... फ

हमम्म्म.... फौजदार ... हा हा हा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Fri, 04/23/2010 - 07:58

Permalink

नीलकांतला

नीलकांतला (आणि तात्यांनाही) शुभेच्छा! नीलकांत हा बॅलन्स्ड आहेच त्यामुळे तात्यांची निवड अचूकच आहे. तात्या लवकर रिकव्हर व्हा आणि पुन्हा लिहिते व्हा! तात्यांच्या लिखाणाचा फॅन
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com