Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नीलकांत on Wed, 04/21/2010 - 22:39
नमस्कार मिपाकरहो, एवढ्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासातील एक अशी माझी ओळख आज पर्यंत होती. तात्यांनी ही नवी जवाबदारी दिली आहे त्या जवाबदारीवर मी खरा उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. मिसळपाव उभं करतांना ज्या उद्येश्यांना सामोरे ठेवलेलं होतं त्याच दिशेने मिसळपावची वाटचाल व्हावी अशीच भूमिका असेन या कडेही जाणीवपुर्वक लक्ष देईल. सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय. तुम्ही दिलेल्या योगदानाची जाणीव मिपाला आहे/असणार आहे.आजच्या घटकेला तुम्ही परत येणे हीच मिपा व्यवस्थापनाची आद्य प्राथमिकता असणार आहे. मागच्या दोन वर्षात मिपाची वाटचाल अत्यंत दैदिप्यमान अशी आहे. सांख्यिकी द्यायची झाली तर भुरळ पाडणारे आकडे आहेत. हिच यशोगाथा पुढे चालु ठेवण्यासाठी आपण यापुढे प्रयत्नशील राहुयात. याच पायावर येणार्‍या वर्षात काही महत्वाकांक्षी योजना तडिस नेण्याचा बेत आहे, त्या वेळोवेळी जाहिर करण्यात येतिल. मिपा व्यवस्थापन जास्तित जास्त लोकाभिमुख कसे राहिल याबद्दलही काही योजना आहेत.या आणी अश्या बाबतीत सर्व सदस्यांच्या सुचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार आहे. ही समिती त्या त्या वेळच्या प्रकल्पानुसार बनविली जाईल आणी प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर विसर्जित केली जाईल. संपादक मंडळ ही स्वतंत्र रचना आधीसारखीच कार्यरत राहिल, निवेदनाच्या धाग्यावर तात्यांनी म्हणाल्या प्रमाणे त्यांचे योगदान शब्दातीत आहे. सध्याचे संपादक मंडळात कोणताही बदल होणार नाही. सर्व संपादकांना मी पुन्हा कार्यरत होण्याची मनापासुन विनंती करत आहे. आपल्या सर्व सुचनांचे स्वागत आहे. संस्थळाच्या धोरणात आमुलाग्र बदल करण्याचा मानस आहे. त्यातली एक लहानशी गोष्ट म्हणजे आणिबाणी. यापुढे आणिबाणी नामक गोष्ट मिपावर अस्तित्वात नसेल. तसेच कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद करण्याचा मार्ग अत्यंत निकडीच्या वेळेसच वापरण्यात येईल असे धोरण बनविण्याचा विचार आहे. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की आता शिस्तभंगाची कार्यवाही होणार नाही. मात्र आधी तात्या एकहाती हे काम पुर्ण करायचे आता ते कामात असल्यामुळे शासनकर्ता [ ;) ] नाहीये. ते येई पर्यंत सर्व संपादकांना हे काम करावे लागेल. यावरून संपादकांच्या वाढत्या जवाबदारीची जाणीव होईल. मी आधीसारखाच मिसळपावला अधीकाधीक सोई देण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे आधीसारखीच यापुढेही संपादनाची पुर्ण जवाबदारी संपादकांच्या खांद्यावर राहील. लवकरात लवकर या योजना घेउन मी आपल्यापुढे येईन. आपल्या विश्वासावरच त्यांचे यश अवलंबुन आहे याची मला पुर्ण जाणिव आहे. मिपावर पारदर्शकता हे सुत्र कसोशीने वापरण्याचा मी प्रयत्न करेन. आपलाच विश्वासु, नीलकांत
  • Log in or register to post comments
  • 19933 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Wed, 04/21/2010 - 23:13

Permalink

सर्वप्रथम

सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय. तुम्ही दिलेल्या योगदानाची जाणीव मिपाला आहे/असणार आहे.आजच्या घटकेला तुम्ही परत येणे हीच मिपा व्यवस्थापनाची आद्य प्राथमिकता असणार आहे.
आज मी पुणरागमणाची घोषणा करतो :) फक्त निलकांता तुझ्याच साठी आणि मिपासाठी :) पण खरंच .. निलकांत आहे खरा संतुलित माणुस .. आपला फुल सपोर्ट रे तुला - निळकंठ
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 04/23/2010 - 13:16

In reply to सर्वप्रथम by टारझन

Permalink

+१

मी खरं तर कामाच्या व्यापामुळे दुर झालो होतो .. पण आय एम बॅक टु, जरी खारीचा वाटा असला तरी ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Wed, 04/21/2010 - 23:20

Permalink

'स्वागतार्ह निर्णय'

'टिकून राहील' अशी आशा आणि सदिच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/21/2010 - 23:26

Permalink

ऒल द बेस्ट

ऒल द बेस्ट रे.. सर्वांनी मिपाला मोठं करा.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 04/22/2010 - 23:19

In reply to ऒल द बेस्ट by विसोबा खेचर

Permalink

धन्यवाद तात्या

मिसळपाव पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेन. ते आजतागायत करतच आलोय. काळजी नसावी. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 04/21/2010 - 23:38

Permalink

नीलकांत,

नीलकांत, छान लिहिलंस की :) तुला अनेकानेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/21/2010 - 23:41

Permalink

यापुढे

यापुढे आणिबाणी नामक गोष्ट मिपावर अस्तित्वात नसेल.
हम्म..पुन्हा एकदा ऑल बेस्ट! :)
तसेच कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद करण्याचा मार्ग अत्यंत निकडीच्या वेळेसच वापरण्यात येईल असे धोरण बनविण्याचा विचार आहे.
यापूर्वीही असेच घोरण होते..
मात्र आधी तात्या एकहाती हे काम पुर्ण करायचे आता ते कामात असल्यामुळे शासनकर्ता [ Wink ] नाहीये. ते येई पर्यंत सर्व संपादकांना हे काम करावे लागेल.
लौकरच परत येतो.. तोपर्यंत सांभाळ रे मिपाला... आपला, (सक्रीय नसलेला आणिबाणीचा शसनकर्ता) तात्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 04/21/2010 - 23:55

Permalink

दुरस्थ

दुरस्थ मिपाकरांनी परत यावे हे आवाहन फार महत्वाचे. आणी आणिबाणी हटवली ही सुद्धा उत्तम गोष्ट .. यासाठी अभिनंदन !! प्रकटन आवडले. योजना लवकर येउ द्या. - (एखाद्या समितीत जागा घेण्यासाठी आतुर) आंद्या मिपाकर
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 04/22/2010 - 23:37

In reply to दुरस्थ by आनंदयात्री

Permalink

+१

नीलकांत, आनंदयात्री सारखेच म्हणतो प्रकटन व विचार आवडले.. आणिबाणि हटविल्याबद्दल विषेश अभिनंदन!!! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 04/21/2010 - 23:45

Permalink

प्रेमी

प्रेमी ब्लॉग ला तात्या गप्प असल्या पासुन काही खाद्य मिळत नाहीये बहुतेक .. जसे तात्या निष्क्रिय झाले तसा तो ब्लॉगही ... किमान त्या प्रेमी ब्लॉग साठी तरी तात्या लवकरात लवकर परतावेत ... अशीच देवाकडे प्रार्थणा करतो :) - ट्विट्टर चालक , तात्याप्रेमी.ब्लॉगस्पॉट.कॉम
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Wed, 04/21/2010 - 23:51

Permalink

नीलकांतने

नीलकांतने लिहीले हे बरे झाले. अजुन काही गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले तर बर होईल. ह्या काही प्रामाणिक शंका आहेत. काही तिरकस पणा किंवा जुने हिशोब वैगरे असे काही नाही. १. मिपावरील बनावट आयडी: मिपावर बर्‍याच प्रमाणावर बनावट आय डी आहेत असे बर्‍याच जणांकडुन ऐकले आहे. त्याबद्दल काय धोरण आहे? बनावट आय डी असतील तर ते उडवले जाणार का? २. कधी कधी वेगवेगळ्या सदस्यावर बनावट आय डी आरोप होतात. त्याची शहानिशा करण्यासाठी काय उपाय करणार आहात? ३. मध्यंतरी मिपावर एका कंपुचे काही प्रकार चालु होते. काही सदस्यानी जाहीर धागेही टाकले होते. तशी कंपुबाजी वर काय उपाय करणार? भविष्यात होउ नये म्हणुन काय नियम ठरवणार का? ३. एकच गोष्ट कोणाला खुप आवडत असेल आणि कोणाला आवडत नसेल तर सदस्यांमध्ये वाद होउ नये म्हणुन काय करणार? उदा. खरडफळ्यावरील २-३ पाने पहा. ४. 'आहे हे असे आहे, चपला घाला आणि चालु पडा', 'फाट्यावर मारतो', 'मिपा हे खाजगी संकेतस्थळ आहे', 'मिपाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तुम्ही काळजी करु नका' असे वाक्ये पुन्हा वाचायला मिळणार का? ५. मालक आहे म्हणुन मालकांच्या शिव्या/तत्सम विनोद चालतात, पण सभासदांचे चालत नाहीत. म्हणजे आपला तो बाब्या, त्यांचे ते कार्ट असे प्रकार पुन्हा होणार का? उदा. चिंतातुर जंतुचा विनोदाचा धागा ६. संपादक नियुक्ती कशाच्या आधारावर होणार? मालकाची मर्जी आहे म्हणुन की खरोखरच राजकारण, निष्पक्ष, कंपुबाजीरहीत माणुस आहे म्हणुन होणार? काही सदस्य्/संपादक कंपुबाजांना आतुन सहाय्य करत होते अशा बर्‍याच लोकांना संशय होता. त्या संपादकांना हटवणार का? संपादकांच्या निवड्णुका होणार का? ७. संपादक हे कोणाला उत्तरदायी असणार का? त्यांनी केलेल्या निर्णयावर अपील असे काही प्रकार ठेवायचा विचार आहे का? ८ . बरेचदा एका संपादकाला एखादी गोष्ट चुकीचे वाटत नाही आणि दुसर्‍याला वाटते ह्यात लेखकाची वाट लागते, ह्यावर काही उपाय योजना करण्याचा विचार आहे का? ९. नुकत्याच निघालेल्या काही संकेतस्थळांनी तांत्रिक बाबतीत बरीच प्रगती केली आहे. त्यांच्याशी संपर्क साधुन मिपावर तात्रिक सुधारणा होणार का? १०. शुध्दलेखनाचे धोरण बदलण्याचा विचार आहे का? मला वाटते, आपण आंतरजालावर १ वर्ष झालेल्या सदस्याकडुन जास्तीत जास्त शुध्द मराठीची अपेक्षा करु शकतो. माझेही मराठी इतके शुध्द नसते, मी अधिक अधिक सुधारणा करण्याचा यत्न करत आहे. ११. मिपाचा आर्थीक भार मिपा मालकावर पडु नये म्हणुन काही उपाय करण्याचा विचार आहे का? काही जाहीराती वैगरे. १२. मिपाची ध्येय-धोरणे जाहीर होणार का? १३. मिपावरील दुर्बल घटकाचे/अकंपु सद्स्यांचे हितरक्षण कसे होणार? ह्या प्रतिसादावर जरुर विचार व्हावा. उडवला तरी काही हरकत नाही. प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करायची गरज आहे. उगाच अरे ला कारे करण्यात काही अर्थ नाही. असो. उत्तराची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/21/2010 - 23:52

In reply to नीलकांतने by II विकास II

Permalink

हा हा हा!

हा हा हा! सगळे प्रश्न छान.. नीककांता, उत्तरं दे रे बाबा आता.. मीही वाचायला उत्सुक आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/21/2010 - 23:57

In reply to हा हा हा! by विसोबा खेचर

Permalink

स्वगत :

स्वगत : एकंदरीत वरील सर्व प्रश्न वाचता एक तर पुन्हा एकदा मिपाचा संपूर्ण ताबा घ्यायला हवा अन्यथा येथून चपला घालून चालू पडून दुसरं एखादं संस्थळ तरी काढावं असं म्हणतो.. ;) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 04/22/2010 - 00:08

In reply to स्वगत : by विसोबा खेचर

Permalink

घ्या!!

Image removed. गरज लागली तर तयारी असावी नै तात्या? तसा मी प्रोअ‍ॅक्टिव आहे हं! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/22/2010 - 00:11

In reply to घ्या!! by चतुरंग

Permalink

येस्स..गरज

येस्स..गरज पडलीच तर या चपला मला नक्कीच उपयोगाच्या आहेत! तात्या सलामत तर संस्थळं पचास..! मिपाला जन्म देऊन मोठं केलं तसं दुसर्‍या एखाद्या संस्थळाला मोठं करेन.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 04/22/2010 - 00:15

In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर

Permalink

माझा आयडी

तात्या माझा आयडी 'आनंदयात्री' माझ्यासाठी राखुन ठेवा हं ! - आपलाच (चपला लपवणारा) आंद्या मिपाकर
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 04/22/2010 - 00:21

In reply to माझा आयडी by आनंदयात्री

Permalink

हो .. आणि

हो .. आणि मला "विसोबा खेचर" हा आयडी हवा :) - बालहनुमान
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 04/22/2010 - 01:48

In reply to हो .. आणि by टारझन

Permalink

तू

तू केलेल्या हजारो विडंबणांपैकी एखादा घे की!! 'हळूच गाजरहलवी' ब्येश्ट होता! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 04/22/2010 - 03:51

In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर

Permalink

तात्या सलामत

तात्या सलामत तर संस्थळं पचास..!
नाहीतर ब्लॉग आहेच. ;) असो. मिपापासून दूर गेलेल्यांना परत बोलावण्याबद्दल सहमती आहे. निलकांतला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/22/2010 - 07:56

In reply to तात्या सलामत by प्रियाली

Permalink

नाहीतर

नाहीतर ब्लॉग आहेच.
हो, तो तर आहेच.. आता तिथेही मी आजची बाई, आजची बाटली, आजची खादाडी ही सदरं सुरू केली आहेत.. ;) तरीही नव-नवीन संस्थळं काढायची अद्याप हौस आहेच.. :) तूर्तास खिशात पैसा नाही आणि वेळही नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on गुरुवार, 04/22/2010 - 12:08

In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर

Permalink

नवे संस्थळ

नवे संस्थळ कधी चालु होणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on गुरुवार, 04/22/2010 - 20:01

In reply to येस्स..गरज by विसोबा खेचर

Permalink

हम्म...

हम्म... :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 04/22/2010 - 00:13

In reply to घ्या!! by चतुरंग

Permalink

हा हा हा

हा हा हा !! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 04/22/2010 - 23:18

In reply to नीलकांतने by II विकास II

Permalink

सविस्तर पण सवडीने...

नमस्कार विकास, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांपैकी शक्य तेवढ्या प्रश्नांना उत्तरे देईल. मात्र मला थोडा वेळ लागेल. कारण सध्या मी खुप कामात आहे. तात्यांनी मिसळपावचे सर्व अधिकार देण्यामागे सुध्दा हाच विचार होता की मिसळपाव नवीन लोकांच्या हातात देऊन त्याची प्रगती बघत स्वत:समोरील इतर प्रश्नांना वेळ द्यावा. दिरंगाई बद्दल दिलगीर आहे. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on गुरुवार, 04/22/2010 - 00:01

Permalink

एक

एक राहीलाच १४. अवांतराबद्दल काय धोरण राहील?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 04/22/2010 - 00:29

Permalink

नीलकांता, दोन शब्द आवडले!

आणीबाणी उठवणे आणि गेलेल्या सदस्यांना पुन्हा आवाहन ही दोन्ही चांगली धोरणे आहेत, यशस्वी ठरतील अशी आशा आहे. माझ्याकडून संपूर्ण सहकार्य असेल. (मिपाप्रेमी)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 04/22/2010 - 00:32

Permalink

चांगले पाऊल

पारदर्शकतेच्या दिशेने प्रवास होत आहे, हे पाहून आनंद वाटला. सहकार्य आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on गुरुवार, 04/22/2010 - 00:45

Permalink

नीलकांत

नीलकांत नवीन जबाबदारीसाठी भरपूर शुभेच्छा! दोन शब्द आवडले !
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 04/22/2010 - 01:54

Permalink

शुभेच्छा

प्रकटन सुयोग्य आहे. मोठे मन दाखवणारे आहे. पुढे कधी तात्यांना नवीन स्थळचालकांचा कार्यपद्धतीचा एखादा तपशील पटला नाही, म्हणा. तर त्यांनीही मोठ्या मनाने थेट मालक-संपादकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करावे, उघड हट्ट किंवा रुसवा धरू नये. मिसळपावाबद्दल जनक म्हणून असे प्रेम आणि समंजस विवेक त्यांच्यापाशी आहेच. वेळ आल्यास आणखी एखादे संकेतस्थळ ते उभारू शकतील याबाबत कोणाला संदेह नाही. त्यांनी उभारून घरट्यातून उडू दिलेली संकेतस्थळे एकमेकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतील अशी माझी खात्री आहे. - - - "आणीबाणी असणे" आणि "उठणे" हे काय प्रकार आहेत ते मला माहीत नाही, पण कालांतराने आपोआप दिसेलच. संपादनाशिवाय काही खोडसाळ प्रकार बोकाळतील, हे जाणून संपादन चालूच ठेवले आहे, ही बाब उत्तम. संपादन मंडळाला संपादनाबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील, अशी योजना मालक-संपादकांनी मिळून करावी. त्यानंतर "संपादन पटले नाही" अशी तक्रार करणार्‍याच्या निदर्शनास ती तत्त्वे आणून देता येतील. - - - पुनश्च, सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/22/2010 - 07:53

In reply to शुभेच्छा by धनंजय

Permalink

तर

तर त्यांनीही मोठ्या मनाने थेट मालक-संपादकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करावे, उघड हट्ट किंवा रुसवा धरू नये.
मालक? अहो धन्याशेठ, माझ्या माहितीप्रमाणे मालक अजूनही मीच आहे! :) अर्थात, नीलकांतच्या धोरणांत आणि संपादकांच्या कार्यपद्धतीत माझी लुडबुड असणार नाही..मागे एकदा म्हटल्याप्रमाणे तूर्तास मिपाचं मुखपृष्ठ आणि खादाडीसदर येथेच माझा वावर राहील.. एरवी जी काही नवी धोरणं राबवायची आहेत, ज्या काही नव्या समित्या नेमायच्या आहेत, आणीबाणी उठवायची आहे, जुन्या लोकांना जाहीरपणे परत बोलावायचं आहे, इत्यादी नीलकांतला जे काही करायचं आहे ते सर्व करू द्यायचं ठरवलं आहे..नीलकांतने आजपर्यंत मिपाकरता खूप काही केलं आहे.. अगदी जीव लावून!
मिसळपावाबद्दल जनक म्हणून असे प्रेम आणि समंजस विवेक त्यांच्यापाशी आहेच.
नक्कीच.. मिपाचं भलं व्हावं, मिपाबद्दल प्रेम आहे म्हणूनच नीलकांतवर पूर्ण विश्वास ठेवून त्याला मिपा जसं चालवायचं आहे तसं चालवू द्यायचं काही दिवस ठरवलं आहे..तूर्तास तरी मी अनेक कटकटींमधून जात आहे. सध्या काही दिवस जालावर आहे, पुन्हा कधी गायब होईन ते सांगता येत नाही..
वेळ आल्यास आणखी एखादे संकेतस्थळ ते उभारू शकतील याबाबत कोणाला संदेह नाही.
अगदी निश्चित.. ओपन चायलेन्ज देऊन! :) (नव्या संस्थळाचं नांवही मनाशी योजून ठेवलं आहे!) :) कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत! ;) तंत्रविभाग अर्थातच नीलकांतकडे असेल.. :) असो, एकंदरीत छान प्रतिसाद रे धन्याशेठ.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on गुरुवार, 04/22/2010 - 08:02

In reply to तर by विसोबा खेचर

Permalink

>>कुठे

>>कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत! माझे ही २-३ आय डी राखुन ठेवले तर बरे होइल. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 04/22/2010 - 09:58

In reply to तर by विसोबा खेचर

Permalink

तात्या रिटायर व्हा

माझ्या वरच्या प्रतिसादाचा अर्थ थोडासा वेगळा घेतला गेलेला आहे. >>कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत! माझा प्रतिसाद हा तुमच्या येउ घातलेल्या घातलेल्या संकेतस्थळावर आयडी हवाय असा असला तरी त्याच्या मागे तुम्ही आता नविन संकेतस्थळाच्या उभारणीत तुमची उर्जा खर्च करा असे सांगणे हा अर्थ होता. सारखे सारखे मी मालक आहे .. मी मालक आहे याचा धोषा लावणे, त्याने सुरु केलेल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन न देणे; इत्यादी गोष्टी पहाता "तात्या आता तुम्ही रिटायर व्हा" असा अनाहुत सल्ला द्यावासा वाटतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on गुरुवार, 04/22/2010 - 10:02

In reply to तात्या रिटायर व्हा by आनंदयात्री

Permalink

>>सारखे

>>सारखे सारखे मी मालक आहे .. मी मालक आहे याचा धोषा लावणे मी मालक आहे हा सुर, व्यक्तीगत कामाचा ताण, सदस्यांनी द्यायचा म्हणुन दिलेला त्रास, लोकशाहीचा घेतलेला गैरफायदा, काही सदस्याचे सतत अवांतर लिहीणे ह्या सगळ्यांचा परीपाक असावा असे वाटते. हा प्रतिसाद कोणाला एकाला उद्देशुन अथवा तिरकस नाही. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/22/2010 - 10:03

In reply to तात्या रिटायर व्हा by आनंदयात्री

Permalink

वेल सेड

वेल सेड!! (अवांतरः मुख्य पानावरचा धागाही पाहून हेच वाटलं!) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/22/2010 - 10:13

In reply to तात्या रिटायर व्हा by आनंदयात्री

Permalink

अनाहूत

अनाहूत सल्ल्याबद्दल धन्यवाद...:) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 04/22/2010 - 03:17

Permalink

प्रकटन

प्रकटन आवडले.. जमेल तितके नक्कीच सहकार्य करू. शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 04/22/2010 - 08:42

In reply to प्रकटन by प्राजु

Permalink

+१

असेच म्हणते. सहकार्य करूच.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर काळे on गुरुवार, 04/22/2010 - 03:53

Permalink

नाही की काय ?

४. 'आहे हे असे आहे, चपला घाला आणि चालु पडा', 'फाट्यावर मारतो', 'मिपा हे खाजगी संकेतस्थळ आहे', 'मिपाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तुम्ही काळजी करु नका' असे वाक्ये पुन्हा वाचायला मिळणार का? अरेरे .. चांगल्या करमणुकीला मुकलो !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 04/22/2010 - 05:34

Permalink

मस्त रे

मस्त रे नीलकांता... तुझ्या हाताखाली मिपा वाढेल अशीच आशा करतो....
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 04/22/2010 - 08:09

Permalink

शुभेच्छा

जीयो नीलकांत. हा काटेरी मुकुट तुम्ही समर्थपणे पेलाल ह्याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/22/2010 - 08:17

Permalink

काटेरी मुकुट

हा काटेरी मुकुट आहे. सर्वांना सदैव खुश ठेवणे हे अशक्य गोष्ट असते. वेगवेगळ्या संस्कारातुन आलेल्या व्यक्ती, त्यातुन जालावरील लेखनाची बलस्थाने व मर्यादा, समुह मानसिकतेतुन आलेली वर्तन विसंगती,उन्माद,प्रेरणा,उत्साह देखील महत्वाच्या बाबी आहेत. सर्व काही गुडी गुडी असणे अशक्यच असते. म्हणुनच म्हणतो कि स्वयंशिस्त व विवेक बाळगला तर व्यवस्थापनास अडचण येणार नाही. वाटचालीस शुभेच्छा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on गुरुवार, 04/22/2010 - 08:25

In reply to काटेरी मुकुट by प्रकाश घाटपांडे

Permalink

>>हा काटेरी

>>हा काटेरी मुकुट आहे. >>सर्वांना सदैव खुश ठेवणे हे अशक्य गोष्ट असते. हे तर आहेतच. पण ह्यात तुझ्यावर असलेल्या लोकांच्या विश्वासाला धक्का लागु देउ नकोस म्हणजे झाले. एक तुझा हितचिंतक म्हणुन माझा पाठींबा नेहमीच राहील. असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 04/22/2010 - 09:27

Permalink

नीलकांत,

नीलकांत, तू आपणहून 'दोन शब्द' लिहीलेस हे उत्तम! तुला आणि मिपाला मनापासून शुभेच्छा. "आणिबाणी" (जी काय होतं) ती हटवली हे उत्तम. तुला सहकार्य नेहेमीच राहिल. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on गुरुवार, 04/22/2010 - 14:07

In reply to नीलकांत, by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

असेच

असेच म्हणते. नीलकांतला मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 04/22/2010 - 10:14

Permalink

नीलकांत

नीलकांत शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीराजे on गुरुवार, 04/22/2010 - 10:23

Permalink

नीलकांत मी तुझ्याशी सहमत आहे...!

नीलकांत मी तुझ्याशी सहमत आहे...! मिपा हे छान आहेच.. पण तु त्याला अजुन छान बनवशिल यात काही शंका नाही. त्याचबरोबर (II विकास II) ने विचारलेल्या प्रश्नांचे काय? सर्व प्रश्न रास्त वाटतात त्यांची उत्तरे मिळाली तर बर्‍याच मिपाकरांच्या शंकेचे निरसन होईल असे वाटते. नवीन जबाबदारीसाठी भरपूर शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 04/22/2010 - 10:48

Permalink

निलकांत हे

निलकांत हे "दोन शब्द" उत्तम लिहिलेस.. आणिबाणी आणि दुर गेलेल्या सदस्यांबद्दलचे निर्णय उत्तम पुढील वाटचालीस शुभेच्छा!!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 04/22/2010 - 11:06

Permalink

४ शब्द ...

वास्तविक पाहता ह्या धाग्यावर आम्हाला काहीच लिहायची तशी अजिबातच गरज नव्हती, नीलकांतला सहकार्य आणि खच्चुन पाठिंबा आहेच म्हणुन तर आम्ही परत आलो हे सत्य आहे ... असो. आता आलो आहेच तर ’मिपाला समॄद्ध बनवण्यासाठी व ते अजुन यशस्वीरित्या चालवण्यासाठी आमचा नीलकांतला नेहमीच पाठिंबा आणि सहकार्य राहिल’ असे इथे नमुद करतो ... आता असेच इतर काही .... संकेतस्थळ चालणे म्हणजे तिथे असलेल्या सदस्यांच्या योगदानातुन आणि त्यांच्या व्यवस्थापनावरील विश्वासावर असलेल्या विश्वासातुन संकेतस्थळाचा विकास होणे अशी आमची समज आहे, आमच्या अल्प बुद्धीला ती पटेल अशीही आहे. उगाच उठुन काही टेक्निकल बाबी व १ मालक ह्यांनी संतेकस्थळ बनत नसते, बनलेच तर ते चालत नसते. असे ’बसल्या बसल्या १ संकेतस्थळ बनवले’ ह्या वार्ता करणारे काही ’मालक’ आमच्या पाहण्यात आहेत. संकेतस्थळ चालवण्यासाठी विश्वासात घेतलेल्या सदस्यांची व बर्‍याच अंशी पारदर्शकतेची आवश्यकता असते ही मुलभुत बाब विसरुन १ नाही तर १० संकेतस्थळे बनवली तरी चालणार नाहीत असे आमचे वैयक्तिक मत आहे. असे बरेच हौशे-गवशे-नवशे आमच्या पाहण्यात आहेत. असो, तो मुद्दा वेगळा आहे. तसेच सध्या इथे असलेल्या सदस्यांनी इथे प्रामाणिकपणे 'भरिव योगदान देणे' ह्या तत्वाला मनात ठेऊनच व्यवहार करावा ही अपेक्षा, हा मुळ उद्देशच हरवणार असेल तर १ काय तर १० संकेतस्थळे कामाची नाहीत. संकेतस्थळे आणि त्यांची नावे व कमेट्या बदलल्या तरी 'अ‍ॅक्युअली ते संकेतस्थळ चालवणारे व वर आणणारे लोक हे सामान्य सदस्य असतात व त्यांचे भरिव योगदान हेच संकेतस्थळाला वर आणते' हा कॉमन सेन्स आहे, अर्थात ह्यात पुन्हा ज्याची त्याची जाण समज वगैरे बाबी आहेतच. बाकी इतर फालतु शंकांना आमचे मित्र रंगाशेठ व यात्री ह्यांनी योग्य उत्तर दिले आहेच, त्यावर काही लिहण्याची आमचे अजिबात इच्छा नाही, योग्य काय ते समजुन घ्यावे, उगाच कोणी गैरसमजात व अंधारात राहु नये ही सदिच्छा ! बाकी अजुन एक कळकळीने सांगावेसे वाटते ते असे का नीलकांत त्याच्या कामातुन वेळ काढुन मिसळपावसाठी काम करत असताना उगाच विसंवाद वाढवणारे व गोंधळ निर्माण करणारे 'सारखे सारखे मी मालक आहे .. मी मालक आहे याचा धोषा लावणे, त्याने सुरु केलेल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन न देणे' ह्या बाबी थांबल्या तर आनंद होईल. प्रतेकच वेळी 'मी मालक आहे' अशी गोष्ट स्पष्ट लिहावी लागणे हे माझ्या मते कोणत्याच अनुषंगाने सुयोग्य नाही आणि कोणाच्याच कल्याणाचे नाही. अशा फालतु गोष्टीमध्ये कशाला एनर्जी घालवता ? राहता राहिला मुद्दा तो काही शंका आणि प्रश्नांचा, नीलला वेळ मिळेल तेव्हा तो ह्याची समाधानकारक उत्तरे देईलच पण 'तोवर आपण प्रामाणिकपणे भरिव योगदान द्यायला काय घ्याल ? ' असे विचारतो. उगाच एखाद्याला त्रास देण्यासाठी ह्या गोष्टी असु नयेत असे मनापसुन वाटते. बाकी ह्या धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद आहे म्हणुन हे शांतपणे समजुतदारपणाचे ४ शब्द, बाकी आपण सर्वजण सुज्ञ आहातच. धन्यवाद ... ------ ( चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करणारा ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 04/22/2010 - 11:16

In reply to ४ शब्द ... by छोटा डॉन

Permalink

अगदी...

डान्या नेहमी माझ्याच मनातलं लिहितो. नविन मालकांचे अभिनंदन आणि संपूर्ण सहकार्याचे आश्वासन आहेच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on गुरुवार, 04/22/2010 - 11:31

In reply to अगदी... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ह्म्म...

ह्म्म...
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com