Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Sun, 04/18/2010 - 19:51
नमस्कार मिपाकर मायबापहो, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते. दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो. यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे. मिसळपावच्या ध्येय धोरणांचे तसेच संपादनाचे, संपादनाच्या धोरणांचे सर्वाधिकार नीलकांतकडेच असतील असेही मी इथे जाहीर करत आहे. नवीन सभासदांचे सभासदत्व मंजूर करण्याचे अधिकारही त्याच्याकडेच दिले आहेत. आजपर्यंत त्याची जबाबदारी तंत्रज्ञ एवढीच होती, परंतु आजपासून म्हणजेच दिनांक १८ एप्रिल २०१० पासून वरील सर्व जबाबदारीही मी त्याच्यावरच सोपवत आहे. आणि तो ही सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडेल याची मला खात्री आहे. पुढील काही काळाकरता, कधी वेळ मिळालाच तर माझा सहभाग फक्त मिपाच्या मुखपृष्ठापुरता, खादाडी सदराकरताच राहील.. आजपर्यंत मिपाकरता, मिपाच्या संवर्धनाकरता नीलकांतने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला हे निवेदन पूर्ण करता येणार नाही..! मिपा आपलेच आहे, असाच लोभ राहू द्यावा ही विनंती. आपलाच, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
  • 20489 views

प्रतिक्रिया

Submitted by दिपाली पाटिल on Tue, 04/20/2010 - 01:06

Permalink

निलकांत

निलकांत यांचे अभिनंदन... दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 04/20/2010 - 01:32

Permalink

तात्या.. सगळे प्रॉब्लेम्स लवकर सुटतील

आणि तू पुन्हा एकदा पूर्णपणे मिपावर येशील अशी आशा आहे. ऑल दि बेस्ट ! अभिनंदन नीलकांत ! तुला पूर्ण सहकार्य करूच. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 04/20/2010 - 09:34

Permalink

सदिच्छा

तात्याच्या अडचणी काळ सोडवेलच! नीलकांतला सदिच्छा! मिपाकरांनी स्वयंशिस्त बाळगली तर त्या कृतीशील सदिच्छाच ठरतील. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीराजे on Tue, 04/20/2010 - 10:35

Permalink

निलकांत तुझे अभिनंदन...

निलकांत तुझे अभिनंदन...!
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Tue, 04/20/2010 - 11:27

Permalink

निलकांतचे

निलकांतचे अभिनंदन !! तात्या लवकर परत या.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 04/20/2010 - 11:51

Permalink

नीलकांत

नीलकांत अभिनंदन रे!! :) तात्याला त्याचे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी शुभेच्छा!! लवकरच सर्व सुरळीत होइल..
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on गुरुवार, 04/22/2010 - 11:31

In reply to नीलकांत by झकासराव

Permalink

हम्म..

हम्म..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 05/10/2010 - 15:56

Permalink

नीलकान्त

नीलकान्त समर्थपणे सर्व जबाबदार्‍या सांभाळेल हा विश्वास आहे. तात्याच्या अडचणींचे लवकरात कवकर निवारण होवो ही सदीच्छा... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Mon, 05/10/2010 - 16:11

Permalink

तात्या

तात्या तुमच्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात आणि तुमचे अजूनाजून उत्तम लेखन आम्हाला वाचायला मिळावे अशी इच्छा व्यक्त करतो. निलकांत ह्यांना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by shweta on Mon, 05/10/2010 - 20:36

In reply to तात्या by दत्ता काळे

Permalink

ह्म्म्म

ह्म्म्म कोणावर विश्वास ठेवावा ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com