मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लावणी: मोबाईल चार्ज करा तुमचा

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
मोबाईल चार्ज करा तुमचा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा काय काम करायचं तुमाला तर मग नुसता मिस कॉल का हो देता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||धृ||
कोरस: हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा ओ आम्दार उगा मिशीवर मारू नगा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा
कालच्याच दिशी आली वाड्यावर इस्कोट झाला तुमी असल्यावर पैकं द्या म्हनलं तर निसतं एटीएम कार्ड काय दावता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||१||
गुलूगुलू बोलायच आसंल फोटू बिटू काढायाचा आसलं तर लांबून हात काय हालवता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||२||
आत्ता ग बाई काय करू तरी काही गोड गुलाबी पत्र न देता नुसता ऐशेमेस काय पाठवता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||३||
कोरस: हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा ओ खास्दार उगा मिशीवर मारू नगा ओ टोपीवाले उगा मिशीवर मारू नगा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा
-पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०४/२०१०

वाचने 1567 वाचनखूण प्रतिक्रिया 2