Skip to main content

भारतीयांची पोरे हुषार !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 31/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काल म.टा एक लेख आला वाचून खरच आनंद वाटला मिपा च्या सन्माननीय सदस्यांसाठी मुद्दाम येथे देत आहे निरंजन वाहलेकर भारतीयांची पोरे हुषार ! ग्लंडमधल्या 'डेली मेल' या अग्रगण्य वृत्तपत्रातली एक बातमी भारतीयांचा सुप्त अहंकार सुखावणारी आहे बातमीत ब्रिटिश सरकारने बालक, विद्यालये आणि कुटुंबविभागाकरवी केलेल्या पाहणी अहवालाचा हवाला देत, इंग्लंडमध्ये शिकणारे भारतीय आणि चिनी विद्याथीर् हे ब्रिटिश विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात हुशार आहेत, असे म्हटले आहे. गेल्यावषीर्च्या माध्यमिक शाळांतील परीक्षांच्या निकालातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. यात उच्च श्ाेणी गाठणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण ३१ टक्के आहे. चिनी विद्याथीर् आपल्याही पुढे असून त्यांचे प्रमाण ५५ टक्के आहे. परंतु या देशाचे मूळ निवासी असलेल्या ब्रिटिश विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त १६ टक्के आहे. भारतीय व चिनी विद्याथीर् गणित, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायन व जीवशास्त्र अशा सर्वच विषयांत ब्रिटिश विद्यार्थ्यांहून सरस आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की, इंग्रजी विषयातही त्यांनी ब्रिटिशांना मागे टाकले आहे. इंग्रजीत अव्वल श्ाेणी गाठणाऱ्यांत २९ टक्के चिनी आहेत, २१ टक्के भारतीय आहेत आणि ब्रिटिश विद्याथीर् केवळ १५ टक्के आहेत. ब्रिटिशांना आपल्या भाषेचा आणि तिच्या शुद्धतेचा प्रचंड अभिमान होता. भारतावर त्यांनी अडीचशे वषेर् राज्य केले. ईस्ट इंडिया कंपनीने पश्चिम बंगालमध्ये आपली वसाहत स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण देशात हातपाय पसरून इथल्या लोकांना मानसिक दृष्ट्याही गुलाम केले. त्यामुळे गोरे या देशातून गेले तरी त्यांच्या साहेबी परंपरेतून भारतीय बाहेर येऊ शकले नव्हते. कदाचित त्यामुळेही असेल, बहुसंख्य भारतीयांनी हिंदीपेक्षाही इंग्रजी लवकर आत्मसात केली. चिपळूणकर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत असत. ते भारतीयांनी पचवले. त्यामुळेच जागतिकीकरणाच्या कालखंडात इंग्रजी अवघ्या जगाच्या व्यवहाराची भाषा झालेली असताना ते आज ज्ञानक्षेत्रात अग्रेसर ठरताना दिसत आहेत. भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची एकेकाळी कुचेष्टा होत असे, पण आज त्याविषयी कोणी ब्र काढत नाही; कारण भारतीयांचे इंग्रजी ब्रिटिशच नव्हे तर सर्व युरोपियनांपेक्षाही उत्तम असल्याचे सिद्ध झालेले आहे. खरे कौतुक चिनी माणसांचे करायला हवे. त्यांची भाषा व तिची लिपी ही सर्वस्वी भिन्न असताना आणि कैक वषेर् ते इंग्रजीच्या संपर्कापासूनही दूर असताना केवळ महासत्ता बनण्याच्या ईषेर्ने त्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांनी आपल्या सांस्कृतिक अभिमानाचे अहंकारात रूपांतर होऊ न देता जागतिक स्तरावरचे बदल चटचट आत्मसात केले आहेत. म्हणूनच भारत आणि चीन शैक्षणिक पातळीवर सिद्ध करत असलेले आजचे हे यश त्यांच्या उद्याच्या जागतिक वर्चस्वाची ग्वाही देणारे ठरेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2356
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

गोड बातमी!!. डीटेल आकडेवारी भारतिय मिडियाला पाठ्वून द्या.राज्यानुसार आकडेवारी करुन ते आणखी काही अनुमान काढतील!! 'अहंकार' सुखावणार्‍या बातम्या अधुन मधुन येत असतात किंवा पेरल्या जातात.speling bee पासुन ते विद्यापीठांतल्या भारतिय पी.एच्.डींची संख्या ह्या सगळ्यांचा 'खोलवर'अभ्यास अमेरिकतली वृत्तपत्रे करत असतात.मग 'आमची पोरे मागे पडली,भारतिय/चिन्यांची पुढे गेली' अशी बातमी वाचली की आपल्यालाही बरे वाटते. भेंडी P = NP

चिनि मुलांच्या आपण मागे आहोत....

ही आकडेवारी कितीही सुखावणारी असली तरी जो पर्यंत आपल्या भारतात संपूर्ण साक्षरता होत नाही तो पर्यंत या आकडेवारीला काही अर्थ नाही. शिवाय जेव्हा तुम्ही परदेशात राहाणार्‍या भारतियांची मुले आणि तेथील सर्वसामान्य नागरिकांची मुले अशी तुलना करता तेव्हा मुळात एक ग्रुप(भारतिय) कंट्रोल्ड आहे. त्यापेक्षा उच्चशिक्षित पालक आणि त्यांच्या पाल्याचे अभ्यासातिल यश असे मोजमाप केले तर कुठलाही वंश असला तरी फारसा फरक पडत नाही.

In reply to by स्वाती२

असंच म्हणतो. अमेरिकेत तरी भारतीय हे उच्चशिक्षित, अभ्यासावर भर देणारे, मेहेनती म्हणून इथे आलेले असतात. अमेरिकेतल्या भारतीय व चीनी पालकांची 'अभ्यासासाठी पोरांच्या डोक्यावर बसणारे' अशी ख्याती आहे. कारण ते स्वत: मुळात तशा संस्कारांतून आलेले असतात. त्याच शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीवरच्या तुलना झाली तर वंशाने, देशाने काही फरक पडत नाही.

कौटुंबीक स्थैर्य, आई-बापांचा त्याग या गोष्टी तर आहेतच शिवाय जाल तिथे घाम गाळायची आपली वृत्ती. परत परदेशात जी पहीली पीढी जाते तिला अतोनात कष्ट उपसावे लागतात, तरी ग्रीन कार्ड, घर होइलच याची शाश्वती नसते. मुलं हे सर्व पहात असतात आणि त्यांच्यावर कष्टाळूपणाचे संस्कार होत असतात ही काही कारणं असावीतसं वाटतं. स्पेलींग बी वगैरे मधे भारतीय मुलं पुढे असतात हे खरय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

याचे बरेचसे श्रेय आपल्या पारंपरिक पाठांतरप्रधान अभ्यासपद्धतीला असावे. आपल्याकडे मार्क मिळवणारे ढिगाने असतात पण मूलभूत संशोधन करणारे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे क्वचितच निघतात. नितिन थत्ते (शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

एकतर सगळीकडे हुषार मुले असतात. त्यांना कशाप्रकारचे वातावरण मिळते त्यानुसार त्यांची बुद्धिमत्ता आकार घेते. भारतीय आणि चिनी मुले सरस ठरण्याचे एक कारण त्यांना/त्यांच्या आईबापांना मायदेशात ज्या प्रकारच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता हे असू शकेल. ही मुले भारतात आणि चीनमध्ये असती तर कुठे असती? एवढी चमकली असती का? हेही प्रश्न विचारात घेण्याजोगे आहेत. तौलनिक डाटा नसल्याने त्याचे महत्त्व हे मर्यादित राहते. स्वतंत्र विचार करणे, आपले निर्णय स्वतः घेणे आणि त्याची जबाबदारी निभावणे, एक उत्तम व्यक्ती म्हणून मोठे होणे ह्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित असलेल्या अनेक बाबी पुढच्या आयुष्यात उपयोगी पडत असतात किंबहुना त्या तुमची वाटचाल ठरवतात, मार्कांपेक्षा सुद्धा! त्या आघाडीवर आपण कोठे आहोत? ह्याचाही विचार व्हावा असे वाटते. हेच पहा ना आता हा सर्वे केला गेला, त्याचे विश्लेषण होईल, त्यातल्या मूलभूत गोष्टींवर विचार होईल की ही तफावत का आहे? त्यावर काय करता येईल? आणि काही वर्षातच हे सुधारण्यासाठी प्रयत्न झालेले दिसतील व कदाचित ही गॅप कमी/नाहीशी झालेली दिसेल! हा जो प्रश्नांचा मूलगामी विचार करण्याची पद्धत आहे ती आपण हरवून बसलो आहोत का? इतक्या प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही आपण म्हणावी तशी कर्तबगार लोकांची फौज का उभारू शकत नाही? चिनी लोकांनी त्यांची भाषा टिकवलीच आणि शिवाय इंग्रजीही आत्मसात केली. तसे आपण कितपत करु शकू? असे अनेक प्रश्न येत रहातात. तुम्हाला हतोत्साहित करण्याचा हेतू नाही परंतु डोळे उघडे ठेवून ह्याकडे बघायला हवे इतकेच! चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वतंत्रपणे काही संशोधन भारतीय करतील तेव्हा खरे! अन्यथा आम्ही जगाला केवळ कामगारच पुरवतो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

भारतावर त्यांनी अडीचशे वषेर् राज्य केले. तुम्ही हे वाक्य जरा बदलु शकता का??? ---नि३.