काल म.टा एक लेख आला वाचून खरच आनंद वाटला मिपा च्या सन्माननीय सदस्यांसाठी मुद्दाम येथे देत आहे
निरंजन वाहलेकर
भारतीयांची पोरे हुषार !
ग्लंडमधल्या 'डेली मेल' या अग्रगण्य वृत्तपत्रातली एक बातमी भारतीयांचा सुप्त अहंकार सुखावणारी आहे
बातमीत ब्रिटिश सरकारने बालक, विद्यालये आणि कुटुंबविभागाकरवी केलेल्या पाहणी अहवालाचा हवाला देत, इंग्लंडमध्ये शिकणारे भारतीय आणि चिनी विद्याथीर् हे ब्रिटिश विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात हुशार आहेत, असे म्हटले आहे. गेल्यावषीर्च्या माध्यमिक शाळांतील परीक्षांच्या निकालातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. यात उच्च श्ाेणी गाठणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण ३१ टक्के आहे. चिनी विद्याथीर् आपल्याही पुढे असून त्यांचे प्रमाण ५५ टक्के आहे. परंतु या देशाचे मूळ निवासी असलेल्या ब्रिटिश विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त १६ टक्के आहे. भारतीय व चिनी विद्याथीर् गणित, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायन व जीवशास्त्र अशा सर्वच विषयांत ब्रिटिश विद्यार्थ्यांहून सरस आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की, इंग्रजी विषयातही त्यांनी ब्रिटिशांना मागे टाकले आहे. इंग्रजीत अव्वल श्ाेणी गाठणाऱ्यांत २९ टक्के चिनी आहेत, २१ टक्के भारतीय आहेत आणि ब्रिटिश विद्याथीर् केवळ १५ टक्के आहेत. ब्रिटिशांना आपल्या भाषेचा आणि तिच्या शुद्धतेचा प्रचंड अभिमान होता. भारतावर त्यांनी अडीचशे वषेर् राज्य केले.
ईस्ट इंडिया कंपनीने पश्चिम बंगालमध्ये आपली वसाहत स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण देशात हातपाय पसरून इथल्या लोकांना मानसिक दृष्ट्याही गुलाम केले. त्यामुळे गोरे या देशातून गेले तरी त्यांच्या साहेबी परंपरेतून भारतीय बाहेर येऊ शकले नव्हते. कदाचित त्यामुळेही असेल, बहुसंख्य भारतीयांनी हिंदीपेक्षाही इंग्रजी लवकर आत्मसात केली. चिपळूणकर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत असत. ते भारतीयांनी पचवले. त्यामुळेच जागतिकीकरणाच्या कालखंडात इंग्रजी अवघ्या जगाच्या व्यवहाराची भाषा झालेली असताना ते आज ज्ञानक्षेत्रात अग्रेसर ठरताना दिसत आहेत. भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची एकेकाळी कुचेष्टा होत असे, पण आज त्याविषयी कोणी ब्र काढत नाही; कारण भारतीयांचे इंग्रजी ब्रिटिशच नव्हे तर सर्व युरोपियनांपेक्षाही उत्तम असल्याचे सिद्ध झालेले आहे. खरे कौतुक चिनी माणसांचे करायला हवे. त्यांची भाषा व तिची लिपी ही सर्वस्वी भिन्न असताना आणि कैक वषेर् ते इंग्रजीच्या संपर्कापासूनही दूर असताना केवळ महासत्ता बनण्याच्या ईषेर्ने त्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांनी आपल्या सांस्कृतिक अभिमानाचे अहंकारात रूपांतर होऊ न देता जागतिक स्तरावरचे बदल चटचट आत्मसात केले आहेत. म्हणूनच भारत आणि चीन शैक्षणिक पातळीवर सिद्ध करत असलेले आजचे हे यश त्यांच्या उद्याच्या जागतिक वर्चस्वाची ग्वाही देणारे ठरेल.
वाचने
2356
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
चिनि
ही
+१
In reply to ही by स्वाती२
कौटुंबीक
मार्क
ह्या बातमी फारसे हुरळून जाण्याचे कारण नाही असे वाटते.
चतुरंगभाऊ, लै भारी!
In reply to ह्या बातमी फारसे हुरळून जाण्याचे कारण नाही असे वाटते. by चतुरंग
भारतावर