नमस्कार,
मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com).
मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे.
पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.
या प्रकल्पाच्या वेळी अनेक नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.
आज हा प्रकल्प घोषीत करतोय तो निर्मीती अवस्थेत आहे म्हणजेच BETA 1.0 या टप्प्यावर संकेतस्थळ किमान तयार आहे आणि आता ते वापरून सर्व सोयी योग्य चालतात की नाही हे तपासण्याची गरज आहे. ओळखीच्या लोकांना मेल टाकण्याचा विचार आहेच मात्र येथे सुध्दा एक मदतीचे आवाहन आहे की ज्यांना या चाचणी टप्प्यावर या प्रकल्पात सहभागी व्हायचे आहे त्यांनी admin@pustakvishwa.com येथे संपर्क साधावा. मागचा अनुभव पाठीशी असल्यामुळे यावेळी चाचणीच्या टप्प्यावर जरा जास्त भर आहे. :)
सध्या संकेतस्थळावर सदस्य नोंदणी ही आमंत्रीतांसाठीच आहे( Invite only) त्याला कारण हेच की चाचणी आटोपल्यावर निर्दोष संकेतस्थळ लोकांना सादर करावे हा प्रयत्न आहे.
या प्रकल्पाबाबत काही सूचना किंवा काही अपेक्षा असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
- नीलकांत
वाचने
4813
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली योजना आहे.
+१
In reply to चांगली योजना आहे. by प्रमोद देव
अभिनंदन
ह्येच
In reply to अभिनंदन by श्रावण मोडक
अभिनंदन.
वा रे
अभिनंदन /
मधे
उत्तम योजना.
अरे वा...
आधीच होते ना हे ?
हो आधी होते...
In reply to आधीच होते ना हे ? by वाचक
प्रकल्पाल
मला सहभागी
>>मला
In reply to मला सहभागी by शानबा५१२
मलाही
आपल्या