✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाडी भविष्य - एक चिकित्सा

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sat, 09/20/2008 - 12:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
61299 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sat, 09/20/2008 - 12:50 नवीन

बरोबर आहे

बरोबर आहे तुमचे म्हणणे. भारतातील लोक समस्यांमुळे भाबडे बनतात त्यामुळे विचार न करता कुठुन तरी समस्या सुटावी म्हणुन अशांच्या नादी लागतात. भविष्य काय देवदेवस्की काय तसेच अनेक इतर गोष्टी काय..... मुळ हेतु दुर राहुन भलतेच लोक त्याचा गैरफायदा घेतात अन श्रद्धेला विकृत रुप प्राप्त होते. आपण आपल्याकडुन होईल तितके समजावण्याचे प्रयत्न करायचे. पण आभाळच फाटले तर काही करु शकत नाही तसेच हे आहे. असो. नाना
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/20/2008 - 14:38 नवीन

एक नाडी सगळे अनाडी

बरे झाले नाडी ही लोकाना अनाडी कशी बनवते सांगितले ते. धन्यवाद . http://www.misalpav.com/node/3494 या इथे पहा नाडी वाल्या बाबानी त्यांच्या नाडी बद्दल दिलेली उपयुक्त(?) माहिती. धादांत थोतांड लोकांच्या गळी कसे उतरावे याचा वस्तुपाठ आहे तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/20/2008 - 12:56 नवीन

एकच प्रश्न

काका, नाना आणि इतर भविष्य बघणारे, विचारायला जाणारे लोक्स, माझा एकच प्रश्नः काय गंमत आहे उद्या काय होणार ते आजच कळलं तर? इफेक्टिव्हली आपण उद्याचा दिवस आजच जगलो. मग उद्यापर्यंत वाट का बघायची? तसंच आपल्या आयुष्यात पुढे काय काय होणार आहे हे कळलं तर पुढचं आयुष्य निरस नाही का होत? उदाहरणार्थ: मी ती एलियनायटीसेलिया कथा लिहित आहे (आज चौथा भाग येणार), त्यात अनेकांना औत्सुक्य आहे पुढे काय ते वाचायचं, मला नाही आहे कारण मला माहित आहे पुढे काय लिहिणार आहे ते! (शंकासूर) अदिती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/20/2008 - 13:19 नवीन

उत्सुकता

भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही.त्याला काडीचा आधार पुरतो. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धनंजय Sat, 09/20/2008 - 16:18 नवीन

भविष्याविषयी उत्कंठा

ही अत्यंत खोलवर रुजलेली मानव्य उर्मी आहे. खरे आहे. विज्ञानाच्या प्रगतीचा पाया भाकिते करणे आणि ती तपसणे हाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अमोल केळकर Sat, 09/20/2008 - 13:13 नवीन

माहिती छान

विस्तृत माहिती आवडली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2008 - 13:58 नवीन

उद्बोधक विवेचन...

अत्यंत मुद्देसूद, उद्बोधक विवेचन. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 09/20/2008 - 14:01 नवीन

वा! घाटपांड

वा! घाटपांडे काका मुद्देसुद लिहिल आहात. अगदि हेच मला वाटत होत की इतक्या वर्षापुर्वी जर पट्ट्या बनवल्या असतील तर किती बनवाव्या लागतील. आजची फक्त भारतातीलच लोकसंख्या आहे १२० कोटी. मग एखादा अभारतीय असेल त्याची पट्टी असेल की नाही?? जर असेल (असणारच डॉलरमधला लाभ कोण सोडेल?? :)) तर मग आजच्या घडीला पृथ्वीवर जीवीत असलेल्या सगळ्या देशांची लोकसंख्या इतक्या पट्ट्ञा असायलाच हव्यात ना??? बर समजा मी पुण्यात राहतो म्हणून मी पुण्यातल्याच केंद्रात जाइन आणि माझी पट्टी तिथेच असेल का?? हे का???????? समजा माझ्या डोक्यात किडा उठला आणि मी साउथ इन्डीयात जावुन पट्टी बघणार असच म्हणालो तर?? तिथेही असणार का माझी पट्टी?? जर हो अस उत्तर असेल तर ह्याच्या अर्थ पट्ट्यांच्या अनेक प्रती (झेरॉक्स हो)असायला हव्यात ना?? मग आता करा विचार आणि मांडा गणीत. आजच्या घडीला जीवीत असणारे लोक तेवढ्याच पट्ट्या गुणिले नाडीकेंद्राची संख्या म्हणजे तेवढ्या टोटल पट्ट्या झाल्या की. :) लयीच भारी हा ते पट्ट्ञा बनवणारे कारागीर. कुठे मिळतील हो. आम्ही आमच्या कारखाण्यात कामाला ठेवतो की. :) माझ्या एका मित्राने तिकडे जावुन अनुभव घेतला आहे. आता त्यालाच विचारेन नेमक काय काय असत तिथे आणि त्याला जी कॅसेट मिळाली आहे त्यात काय आहे ते. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Sat, 09/20/2008 - 14:44 नवीन

अगदि हेच

अगदि हेच मला वाटत होत की इतक्या वर्षापुर्वी जर पट्ट्या बनवल्या असतील तर किती बनवाव्या लागतील. आजची फक्त भारतातीलच लोकसंख्या आहे १२० कोटी. मग एखादा अभारतीय असेल त्याची पट्टी असेल की नाही?? जर असेल (असणारच डॉलरमधला लाभ कोण सोडेल?? ) तर मग आजच्या घडीला पृथ्वीवर जीवीत असलेल्या सगळ्या देशांची लोकसंख्या इतक्या पट्ट्ञा असायलाच हव्यात ना??? बर समजा मी पुण्यात राहतो म्हणून मी पुण्यातल्याच केंद्रात जाइन आणि माझी पट्टी तिथेच असेल का?? हे का???????? समजा माझ्या डोक्यात किडा उठला आणि मी साउथ इन्डीयात जावुन पट्टी बघणार असच म्हणालो तर?? असाच प्रश्न मी एका नाडीपट्टीची बाजू घेवून भांडणार्याला विचारला होता त्याने मला सांगितले की पट्टी वर भविष्य लिहिणार्‍याना हे पण दिसले होते की कोणकोण लोक पट्ट्या बघायला येतील आणि त्यानी फक्त त्यांच्याच पट्ट्या लिहिल्या. तसेच कोण कुठे जाउन भविष्य पहाणार आहे हे पण माहित असल्याने त्या त्या पट्ट्या त्या त्या गावच्या केंद्रात पोचवल्या.(अश्या तर्हेने त्यानी जगाचा नसला तरी वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आपल्या पुरता सोडवला. :> ) अवांतर : मी नाडीपट्टीच्या बाजुने बोलतोय असा (गैर)समज कृपया करुन घेउ नये. पुराव्यादाखल इतर धाग्यात मी याची बरिच टवाळी केली आहे. माझ्या कडे असलेली माहिती फक्त दिली. आंबोळी
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 09/20/2008 - 15:50 नवीन

आंबोळी हे

आंबोळी हे मीच लिहिणार होतो डोळा मारलेली स्मायली टाकुन पण म्हणल बघाव एखाद्या नाडीभक्ताकडून हेच उत्तर येत का ते. जल्ला ते तर तुच दिलस की. :) बाय द वे तुला तस उत्तर दिलेली व्यक्ती महान आहे आणि ती इतकी हुकलेली आहे की परत नॉर्मल होण्यासाठी परिस्थितीचे चटके हाच उपाय. सांगुन उप्योग नाही. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
व
विजुभाऊ Sat, 09/20/2008 - 14:48 नवीन

प्रश्नः

प्रश्नः पायजम्याच्या शिवणीच्या आत हरवलेली नाडी शोधण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत याचे २१ अपेक्षीत कोठे मिळेल? तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/20/2008 - 15:00 नवीन

तोडगा

यावर तोडगा आहे. पायजम्याच्या नाडीच्या दोन टोकांची अगोदरच गाठ मारावी. म्हणजे हरवली तरी प्रोग्राम लूप मध्ये जातो. गाठी सकट शिवणीच्या आत जाते पण आयत्यावेळी घोटाळा करत नाही. ;) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Sat, 09/20/2008 - 15:48 नवीन

काही शंका

एखादा माणूस त्याच्या मागच्या जन्मात माणूस चा का असतो? गेल्या जन्मात कोणी माणुस देवीचा ब्याक्टेरीया किंवा मलेरीया चा व्हायरस कधीच नसतो का? जर आत्मे निर्माण होत नसतील नष्ट /होत नसतील तर जगाची लोकसंख्या का वाढते आहे? नव्या आत्म्यांचा पुरवठा कोठुन होतो? ( कदाचित येथील आत्मे बदलीवर दुसर्‍या गॅलेक्सीतल्या पृथ्वीवर सारख्या ग्रहावर जात असतील) तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 09/20/2008 - 23:02 नवीन

एकदम सही घाटपांडे साहेब.

मी नाडी वाचनाचा अनुभव घेतला आहे.भराभर प्रश्न विचारत जातात व हो का नाही हे उत्तर तुम्ही देत जाता. ह्यात भुतकाळ १००% कळतो कारण तो आपण अगोदर हो नाही प्रशोन्नतरात सांगितला असतो. बाकी फ्युचर इझ अंधेरा. वेताळ
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 09/21/2008 - 00:36 नवीन

अतिशय

:) अतिशय मस्त! आधी तुमच्या लेखात यातील बराचसा भाग वाचला होताच. तेव्हा प्रमाणे आताही पटला :) बाकी ओकबुआ,आता इथे मुद्याचे बोलाल का? का फक्त ट्राय करा ट्राय करा सांगत राहणार? बोला बोला!? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 09/21/2008 - 07:28 नवीन

मित्रवर्य

मित्रवर्य श्री प्रकाशराव घाटपांडे यांस, उत्तम लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन. विषय नीट मुद्देसूदपणे मांडला आहात. सर्व मुद्दे त्यात आलेले आहेत असे वाटते. ज्या कोण्या ऋषिमुनींनी या पट्ट्या लिहिल्या असे म्हणतात, त्या सर्वांनाच तामिळ येत होते का? हा पहिला प्रश्न या नाडीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह आहे. साधारण ओळखीचा माणूस त्या केंद्रात जातकाला घेऊन जातो. त्याने सर्व डेटा आधी दिलेला असतो. आमचे गुरूवर्य श्री. के. एस. कृष्णमूर्ती यांनी या नाडीपद्धतीतील तद्दन खोटारडेपणावर प्रचंड ताशेरे ओढले आहेत. ज्योतिषशास्त्राला बदनाम करणार्‍या या लोकांकडे जातांना जातकांनी नीट विचार करावा. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/21/2008 - 09:03 नवीन

करमणूक

अभिरुची ,संस्कृती अशा करमणुक केंद्रात कळसुत्री बाहुल्या, जादुगार आणि आता ज्योतिषी सुद्धा बसतात. उत्सुकतेपोटी गंमत म्हणुन आपली पट्टी पहाणे यात मज्जा येते. नंदी बैलवाल्याचा बैल शंभराची नोट ज्याच्या खिशात असेल त्याच्या ठिकाणी उभा राहतो. होस्टेल मधे वा कुटुंबात नातेवाईकांच्या गप्पात मजा म्हणून प्लँचेट केले जाते. त्यात कुणाच्या तरी मनातल्या गोष्टी आत्म्याला कळल्याप्रमाणे उत्तरे ही मिळतात. मित्रांच्यात काही " किरो "इतरांचे हात पाहुन भविष्यही सांगतात व हिरो बनतात. मोबाईलवर ही भविष्य ही सेवा झाली आहे. रेल्वे बस स्थानकांवर वजनाच्या तिकीटावर ही भविष्या येतेच की. हा सर्व करमणुकीचा भाग असतो . मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी करमणुक आवश्यक आहेच. फक्त त्याला किती महत्व द्यायचे हा खरा मुद्दा आहे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2008 - 09:14 नवीन

सहमत...

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी करमणुक आवश्यक आहेच. फक्त त्याला किती महत्व द्यायचे हा खरा मुद्दा आहे. लाखाची गोष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/21/2008 - 09:22 नवीन

महत्व

अभिरुचीत जादुगाराने इतरांच्या करमणुकीत खंड पडू नये म्हणुन पेठकर काकांना खुपच महत्व दिले होते . त्याचा एक डोळा सतत पेठकर काकांवर बारीक नजर ठेउन होता. ;) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 09:10 नवीन

लेख मस्तच आहे.

नाडी भविष्याच्या समजांबद्दल प्रबोधन करणार्‍या लेखाबद्दल आभार. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी करमणुक आवश्यक आहेच. फक्त त्याला किती महत्व द्यायचे हा खरा मुद्दा आहे १००% सहमत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 09/21/2008 - 13:40 नवीन

मुद्देसूद

लेख आवडला. नाडीभविष्यामागच्या मानसिकतेची नाडीपरीक्षा अगदी अचूक केली आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ज
जीएस Sun, 09/21/2008 - 16:01 नवीन

माझा प्रयोग

उत्तम लेख लिहिला आहे. अनेकांचे अचाट अनुभव ऐकुनही, माझे मात्र असेच मत बनले होते कि हा विलक्षण चलाखीचा प्रकार आहे, त्यामुळे मी चार वर्षापूर्वी कल्याणीनगर येथील अतिशय प्रसिद्ध अशा नाडीजोतिषवाल्याकडे गेलो, जातांना छोटा डिजिटल रे़कॉर्डर घेउन गेलो, सुरूवातीचे संपूर्ण संभाषण ध्वनिमुद्रित केले, नंतर पट्टी सापडल्यावर काय काय सांगितले जाते त्याची तेच आपल्याला कॅसेट देतात. घरी जाउन सावकाश दोन्ही गोष्टि ऐकल्या आणि त्यांच्या चातुर्याला दाद दिली. तेंव्हाच एक लेख लिहायचा होता, पण ते राहूनच गेले आणि मग त्या कॅसेटही काळाच्या ओघात कुठेतरी गेल्या. ही इतकी बेमालूम फसवणूक आहे की पाच सात वर्षे परिश्रमपूर्वक शिकल्याशिवाय कोणाला जमू शकेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/22/2008 - 09:19 नवीन

ओंकार पाटील यांचा अनुभव

सातार्‍याचे बीएसएनएल चे एक अधिकारी श्री ओंकार पाटील हे मद्रास प्रांतात १९९६ साली गेले होते. त्यावेळी नाडी भविष्य हा विषय मिडियात चघळला जात होता. त्यांनी असाच पॉकेट रेकॉर्डर खिशात ठेउन अगस्ती नाडी केंद्राच अनुभव घेतला. एकूण प्रश्न २६० झाले. या स्वानुभवावर किस्त्रीम दिवाळी १९९६ मध्ये त्यावर "नाडी परिक्षा" हा खळबळजनक व सविस्तर लेख लिहिला होता. अंधश्रद्धा निर्मुलन समिति (अंनिस) ने संपादित केलेल्या "प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा "या पुस्तकात त्याचा समावेश आहे. सदर लेख अतिशय वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जीएस
स
सखाराम_गटणे™ Sun, 09/21/2008 - 19:48 नवीन

सगळे

सगळे मुद्दे व्यवस्थीत सागिंतले आहेत. जोतीष्यचे समर्थेक कधी असल्या मुद्द्याची उत्तरे देत नाहीत. जोतीष पुर्वग्रहीत द्रुष्टी असणार्यावर चालत नाही - पुल ;) बाकी काय बोलायचे? * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 09/21/2008 - 21:53 नवीन

उत्तम लेख

काका नाडी ज्योतिषाबाबत अतिशय छान माहिती दिलीत. खरे तर कधी कधी आपण आयुष्याबाबतचे निर्णय घेतो तर कधी कधी आयुष्य आपल्या बाबतीत निर्णय घेते. (आपला लकडी पुलावर पोपट ज्योतिषाकडे भविष्य बघुन त्यांच्य पोटापाण्याची सोय करणारा) - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 03:12 नवीन

छान लेख

ओकसाहेबांचा लेख वाचल्यावर आपला लेख वाचला. आपण चांगल्या तर्‍हेने नाडी ज्योतीषाचे खंडन केले आहे. आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे. हा प्रकार करमणूकी खातर तरी जाउन पहावा असे आता वाटत आहे. पण ते भौगोलिक अंतर लक्षात घेता इतक्यात शक्य नाही. आपल्या अनुदिनीवरचा डेरेन ब्राउनचा विडिओ पुरेसा बोलका आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Mon, 09/22/2008 - 04:37 नवीन

चांगला लेख

माहितीपूर्ण लेख. मी तर नाडी ज्योतिष हे नाव प्रथमच ऐकले/ वाचले आहे इथे मिपावर.
नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो.
म्हणजे कुंडली बनवून भाकिते वर्तवता येतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/22/2008 - 06:45 नवीन

मस्त..

नाडी ज्योतिषाच्या नाड्या मस्त आवळल्या आहेत. अतिशय माहीतीपूर्ण आणि उद्बोधक लेख. आवडला. हा तुमचा लेख एखाद्या वतमान पत्रात दिलात तर खळबळ उडेल.. कोणत्याही पट्टीला माझं भविष्य ठरवण्याचा अधिकार नाही. आवांतर : सर, तुमचे नाव करमचंद ठेवावे असे वाटू लागले आहे - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2008 - 16:06 नवीन

किल्ला लढवणारे

यातल्या एकाही गोष्टीवर किल्ला लढवणारे बोलले नाहीत. ते बहुतेक बालेकिल्ल्यात बसले असावेत. एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत म्हणे. तात्पर्य लग्न होण्यासाठे पायजम्यात किमान दोन नाड्या असाव्यात
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 17:42 नवीन

>> ते बहुतेक

>> ते बहुतेक बालेकिल्ल्यात बसले असावेत. =)) >> एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत म्हणे. तात्पर्य लग्न होण्यासाठे पायजम्यात किमान दोन नाड्या असाव्यात कोणाच्या पायजम्यात दोन नाड्या असाव्यात? तुम्ही किती ठेवल्या होत्या? काही लोकांना या मार्गदर्शनाची गरज असणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 01:27 नवीन

विजूभाऊंनी नाड्या ठेवल्या नव्हत्या

त्यांनी गटणे म्हणतो तसे इलास्टिक वापरले होते (पण ते लेंग्याच्या खिशात नाडी ठेवून गेले होते असे ऐकून आहे!) ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शशिकांत ओक Mon, 09/22/2008 - 23:59 नवीन

आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे

आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे. मित्र हो, आत्ता पर्यंत आपण नाडी ग्रंथ भविष्याच्या विरोधातील एका बाजूचे विचार वाचलेत वा ऐकलेत असतील. मात्र त्याविरोधी विचारांच्या संदर्भात समर्पक उत्त्तरे मी आणि प्राचार्य गळतगे व अन्य लोकांनी कित्येक वर्षापूर्वी लेखातून व पुस्तकातून सडेतोडपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच त्याच पोकळ आक्षेपांना उत्तरे देण्यात आम्हाला काही स्वारस्य उरलेले नाही. म्हणून मी त्याविषयी लिहायचे टाळतो. त्याचा अर्थ नाडीवर पुरावे देऊन लिहिण्यासारखे काही राहिले नाही वा नसेल म्हणून ओकबुवांची (एकांनी मला दिलेले नाव) दातखीळ बसली असावी व आता तरी त्यांच्या भूलथापांना खंड पडेल असे वाटले असावे. त्यांचा असा ग्रह होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांना तसे वाटले तर मला काही वाटणार नाही. कारण आत्ता पर्यंतच्या लिखाणामुळे या मंडळीची मानसिकता नाडी ग्रंथ भविष्याकडे कुत्सितपणे पहाण्याची व मानण्याची असल्याने त्यांना कितीही तर्कपूर्ण पुराव्यांनिशी दाखवून दिले तरी मीच काय कोणीही त्यांना पटवून - समजाऊन सांगून मान्य करायला लावणे शक्य नाही. हे वेगळे सांगायला नाडी पट्टया पहायची गरज नाही. अशा बुद्धिवादी लोकांनी मी, विंग कमांडर ओक, सांगतो म्हणून नाडी भविष्य मानावे असा माझाही मुळीच आग्रह नाही. पण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्यापैकी ही एक बाब आहे. काहींचा असा दावा आहे की मी अनुभव घेणार नाही. आम्ही नाडी भविष्याचा अनुभव घेतला आहे असे जे दावा येथे करतात त्यांनीही प्रत्यक्ष त्यांच्या संदर्भात नाडीपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. तुम्ही सादर केलेले पुरावे ही पहाणार नाही. तुमच्या पुराव्याचे खंडनही करणार नाही. तरीही नाडी भविष्याला मान्यताही देणार नाही. कारण आमची विचारधारा अशा प्रकारांना मान्यता देत नाही. मग ते डॉ.जयंत नारळीकर असोत किंवा डॉ नी. र. वऱ्हाडपांडे असोत किंवा महान स्वर्गीय डॉ. अब्राहम कोऊर असोत वा पालघाटच्या भागातील श्री. बी.प्रेमानंद असोत. या सर्व लोकांच्या नाडी भविष्यावरील विचारांना अत्यंत तर्कपूर्ण आणि पुराव्यानिशी उत्तरे गेलेली आहेत. तरीही ‘अजून माझे वैयक्तिकरित्या जोवर समाधान होत नाही तोवर मी कसे मानू’ असा प्रत्येकाचा प्रश्न असल्याने मी कोणा कोणाचे समाधान करत फिरणार? शिवाय, ‘ओक, हे पुरावे ठीक आहेत हो. पण आणखी पुरावा आणा. मग मानायचे की नाही ते पाहू. असे प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे व आपली वैचारिक हार मान्य न करणाऱ्यांची भूक भागवणे कोणाला तरी शक्य आहे काय? असो. असे जरी असले तरीही मी असा प्रस्ताव मांडू इच्छितो की जर मिसळपावचे आणि उपक्रमींचे संपादकमंडळ माझ्या विचारांची गळचेपी करणार नसतील तर मी त्यांना अशी विनंती करू इच्छितो की माझ्या आत्ता पर्यंतच्या लिखाणाला त्यांच्या त्यांनी माध्यामातून समाविष्ट करायला मान्यता द्यावी. तसे असेल तर मी त्यांना ‘बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकाची एक प्रत सप्रेम भेट पाठवू इच्छितो. त्यावरून त्यांनी ते पुस्तक आपल्या माध्यामातून जगाच्या पाठीवरील कोणाही मराठी वाचकाला वाचायला मिळण्याची आयती सोय होईल. सध्या माझ्य़ाजवळ अशी यंत्रणा वा तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही की मी आपल्या बळावर हे काम करू शकेन. अर्थात ही मी घर बसल्या नाडी भविष्याची फुकटात जाहिरातबाजी करायला मागत आहे, असे वाटत असेत तर माझा काही आग्रह नाही. माझा असा पुर्व अनुभव आहे की नाडी भविष्याविरुद्ध जरा खुट्ट झाले की पुरोगामी विचारांचा मुखवटा चढवलेल्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या अक्षरात छापून येते पण त्याचा प्रत्यावाद केलेल्या लिखाणाची साधी दखलही घेतली जात नाही. सध्या त्य़ांची ती गरज असल्याने मी त्यांची कुचंबणा समजू शकतो. असो.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 09:43 नवीन

अहो एक तरी

अहो एक तरी पुरावा द्या की , पुर्ण आयुश्यात आम्ही नाडी हा शब्द बाबाच्या ईजारीला बांधण्यासाठी लावलेल्या धाग्यासाठी वापरताना पाहीले होते व आज येथे मिपावर... नाडी भविष्य आहे काय ? वर काकांनी काही मुद्दे दिले आहेत त्या बद्द्ल तुमचे मत काय ? तुम्ही वर किती जणांचे समाधान करु असा सुर लावलेला आहे, मिपा वर सध्या दोन एक हजार सदस्य आहेत तुम्ही दोन एक व्यवस्थीत पुरावे द्या... ! जास्त गरज असेल तर मी तुम्हाला माझी जन्म कुंडली देतो माझेच नाडीभविष्य सांगा... माझा भुतकाळ येथेच मिपावर मुद्रित आहे .. तो पाहून देखील अजून काही माहीतीची गरज असेल तर ते सांगा... जसे जन्मवेळ / दिनांक / स्थळ सर्व माहीती येथे ओपन मध्ये देण्यात येईल.. माझे भुतकाळ व भविष्य काळ ह्यातील फक्त तीन गोष्टी सांगा, तुमची जी फी असेल ती तुमच्या बँक मध्ये आम्ही आगाऊ जमा करु ह्याची खात्री असु दे ! बघा जमत असेल तर ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 10:42 नवीन

आमचा प्रयोग - साल २००१

नाडी ज्योतिषावर आम्ही १३ एप्रिल २००१ रोजी पडताळा घेण्याचा प्रयोग केला. त्यासाठी फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या वतीने (म्हणजे आम्हीच) १० एप्रिल २००१ रोजी पत्रकार परिषद घेतली. त्याचा वृत्तांत खालील प्रमाणे पाच हजार वर्षापूर्वी अगस्त्य ऋषिंनी लिहिले आहे असे सांगितले जाणाऱ्या नाडी भविष्याचा पडताळा घेण्याचा प्रयोग फलज्योतिष चिकित्सा मंडळ हे फलज्योतिषाची चिकित्सा करणाऱ्या मंडळींचा एक अनौपचारिक ग्रुप आहे. मंडळातर्फे नाडी भविष्य या ज्योतिष पध्दतीचा अभ्यासप्रकल्प जनहितार्थ हाती घेण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सर्व वाचन साहित्य मंडळाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.या विषयावरील लोकांचे विविध अनुभव व मते जाणून घेण्याकरिता मंडळाने दि. १-४-२००१ रोजी खुल्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात पूर्वदूषितग्रह न बाळगता सत्यासत्यता तपासावी असा सूर होता. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी चार केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे तेथे सांगितले जाते. त्यावरुन ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पटटया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्राने अगोदरच सांगितले आहे. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात. आम्ही असे म्हणतो की, पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. चोर सोडून संन्याशाला फाशी बसली असती. मग व्यक्तीचे नांव आणि ठसा हे दोन्ही पॅरामीटर्स अन्य कुणातरी व्यक्तीचे बाबत जुळतील अशी शक्यताच नाही हे ठामपणे म्हणता येते. मग या दोन पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना व्यक्तीची पट्टी निश्चित करण्यासाठी कुठलीच अडचण येता कामा नये. तरीही पटटी हुडकून काढण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे दोन घटक कमी आहेत असे घटकाभर मानू. जन्मसाल व पित्याचे नांव हे अजून क्ल्यू देउ. स्वत:चे नांव व ठसा या 'नेसेसरी कण्डीशन` झाल्या. अंगठयाचा ठसा, स्वत:चे नांव, पित्याचे नांव व जन्मसाल या 'सफिशंट कण्डीशन` झाल्या. असे करत करत व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती तयार देउ व मोअर दॅन सफिशंट या कण्डीशनपाशी येवून ठेपू. याआधारे आम्ही नाडी केन्द्राला खालील प्रयोग सुचवला आहे. मंडळाचे सदस्य मा. श्री. रिसबूड यांनी नाडी केन्द्राला एक रजिस्टर्ड पत्र पाठविले असून त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून वरील सर्व माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. पत्राला त्यांनी लेखी उत्तर दिले नाही. परंतु रिसबूडांनी फोनवर विचारणा केली असता आपण हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी पाच वाजता करु असे तोंडी सांगितले आहे. या पत्रकाद्वारे मंडळ पत्रकारांना असे आवाहन करिते की, त्यांनी सदर प्रयोगाचे वेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे प्रसंगी स्वत:च्या अंगठयाचा ठसा देउन कुंडली शोधण्यास नाडी केन्द्रास उद्युक्त करावे व नाडी भविष्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणावी. त्यासाठी पत्रकारांना पत्रकार भवन येथून नाडीकेंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी दि.१३.४.२००१ रोजी सायं. ५.०० वा. पत्रकार भवन, नवी पेठ, या ठिकाणी उपस्थित रहावे. =========================================================== प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
म
महेश हतोळकर Tue, 09/23/2008 - 11:00 नवीन

पुढे काय झाले?

या प्रयोगाचे पुढे काय झाले? का प्रयोग झालाच नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 11:21 नवीन

काय होणार?

आमचा अगोदर त्या नाडी केंद्राशी पत्रव्यवहार झाला होताच. पत्रकार परिषदेतच सविस्तर माहिती व शंकांना उत्तरे दिल्यानेपत्रकार नाडी केंद्रात आले नाहीत. पण आम्हाला जाणे क्रमप्राप्त होते. रिसबुड ,मी व अन्य काही हौशी लोक गेलो .कागदावर ठसे दिले. जन्मतारीख व नाव सागितले. त्याने आतमध्ये जाउन आमच्या व आमच्या सोबत आलेल्या काही हौशी लोकांच्या पट्ट्या इथल्या स्टॉक मध्ये नाहीत असे सांगितले. त्या तांबारम मधील मेन स्टॉक मधुन आणाव्या लागतील. आमचे लोक तिथे जात येत असतात त्यामुळे तुम्ही दहा दिवसांनी फोन करा. आम्ही त्यानंतर तीन वेळा फोन केले पण पट्ट्या मिळाल्या नाहीत हेच उत्तर. आमच्या सारख्या लोकांच्या दुप्पट फी पेक्षा इतर लोकांना दिलेला सवलतीचा रेट परवडतो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
अ
अभिज्ञ Tue, 09/23/2008 - 01:18 नवीन

ओकसाहेब.

ह्या विषयावरिल संयत प्रतिसाद वाचला. सर्वप्रथम आपण एखाद्या गोष्टीचे समर्थन करताय व त्याची कोणी टिंगल टवाळि केली/करत असेल तर समस्त मिपाकरांतर्फे मी आपली माफि मागतो. आपल्या प्रतिसादातून आपण फक्त "अनुभव घेउन पहावा" एवढेच ध्वनित करत आहात. श्री.घाटपांडे ह्यांनी मांडलेल्या एकाहि मुद्याचा आपण प्रतिवाद करताना दिसत नाहि. त्याबद्दल आपण काहि लिहिलेत तर खुली व पोषक चर्चा करता येइल. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 09/23/2008 - 12:35 नवीन

वरील चर्चा

वरील चर्चा पाहुन १ गोश्ट येथे नमूद करावीशी वाटते, की योग्य वेळ आणि परिस्थिती आल्याशिवाय, कोणत्याही व्यक्तीची पट्टी मिळत नाही... किन्वा मिळाली, तरी वाचली जात नाही. वरकरणी पाहता कोणालाही हे थोडं विचित्र वाटणं साहजिक आहे. परन्तु ही १ सत्यघटना आहे: पुण्यातील एका नाडी-जोतिषाच्या केंद्रात १ माणुस त्याची "पट्टी"पाहण्यासाठी गेला. त्याच्या उजव्या अंगठ्याचा ठसा आणि जन्मवेळ, तारीख, जन्मठिकाण इ. नोंदवुन घेऊन केंद्रातील लोकांनी त्या माणसाचा फोन नम्बर घेतला. आणि "आम्ही तुमची पट्टी सापडल्यावर बोलावु" असे सांगितले. काही दिवसांनी त्या माणसाला फोन आला, की "तुम्ही पट्टी पाहण्यासाठी आज केंद्रात यावे." त्याप्रमाणे तो माणुस गेला. पद्धतीप्रमाणे त्याच्या अंगठ्याच्या ठशाशी मिळत्या-जुळत्या १०-१२ पट्ट्या तेथे काढल्या होत्या. त्या माणसाला विविध प्रश्न विचारुन "फिल्टर" झालेली १ पट्टी, मिळाली, जी त्या माणसाची होती. (फिल्टर : जेव्हा नाडी ज्योतिशी प्रश्न विचारतात, तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे "हो" किन्वा 'नाही' अश्या स्वरुपातच आनि जे सत्य उत्तर आहे, तेच देणे गरजेचे असते. जेव्हा त्यांनी वाचलेली एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नसेल्...तेव्हा त्याचे उत्तर 'नाही' असेच देणे गरजेचे असते. कारण त्यामुळे १ च पट्टी अशी मिळते, जी फक्त तुमचीच असते.) असो... त्या पट्टीत नमूद केल्याप्रमाणे सर्व गोष्टी, त्या माणसाच्या बरोबर मॅच झाल्या..... फक्त १ सोडुन.. ती म्हणजे.. पट्टीत नमुद केल्याप्रमाणे पट्टी वाचते वेळी त्या माणसाच्या हयात असलेल्या भावांची संख्या २ असली पाहिजे. परंतु 'त्या' माणसाला मात्र प्रत्यक्षात ३ भाऊ होते. त्यामुळे तो कन्फ्युज झाला. पण तेवढाच १ फरक सोडला, तर बाकीच्या इतर बारीक-सारीक गोष्टीसुद्धा त्याच्या आयुष्याशी मिळत्या-जुळत्या होत्या. त्यामुळे ती पट्टी पुर्णपणे वाचली गेली. ती परत वाचुन ऑडिओ-केसेट्मध्ये रे़कॉर्ड ही केली गेली. त्या माणसाला उपायही सांगितले गेले. आणि तो माणुस घरी गेला. परन्तु, घरी गेल्यावर त्याला समजले, की त्याच्या एका भावाचा अपघाती मृत्यू झालेला होता. आणि ज्यावेळी अपघात झाला, ती वेळ आणि नाडी-भविष्य बघण्याची वेळ ही जवळ-पास एकच होती. म्हणजेच त्या पट्टी-मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या माणसाचे जेव्हा २ च भाऊ जिवंत होते.... जेव्हा त्याची पट्टी वाचली गेली. !!! या घटनेला नास्तिक, "योगायोग" ही म्हणु शकतात... परन्तु ज्यांचा विश्वास आहे.... त्यांना मात्र या घटनेवरुन योग्य तो अर्थबोध नक्की होईल. _________________________________________________________ अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.... शेवटी श्रद्धा हीच महत्वाची असते. परन्तु ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची, ती व्यक्ती ही तितक्या योग्यतेची असावी लागते. नाडी-भविष्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. केवळ टिंगल करण्याच्या किन्वा खरं खोटं करण्याच्या उद्देशाने गेलेल्यांना पट्टी कधीच मिळत नाही. परन्तु आयुष्यातील महत्वाचे... अगदी जन्म-मरणाचा प्रश्न असणारे निर्णय घेण्याची वेळ आलेली व्यक्ती जेव्हा श्रद्धेने नाडी-जोतिष बघण्यसाठी येते, तेव्हा पट्टी नक्की सापडते.. आणि उचित दिशा ही मिळते. :)
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 12:40 नवीन

तो महाशय

तो महाशय कोण आहे ? त्यांचे नाव-गाव काय आहे ! तुम्ही वर लिहले आहे की रेकॉर्डींग केले गेले आहे , ते उपलब्ध होऊ शकेल का ? जन्मवेळ, तारीख, जन्मठिकाण इ. नाडी साठी ह्या सर्व माहीतीची गरज असतेच असे नाही हे ओक साहबांनी लिहून ठेवले आहे मग का दिली माहीती ? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 13:02 नवीन

प्रश्नच मिटला

म्हणजेच त्या पट्टी-मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या माणसाचे जेव्हा २ च भाऊ जिवंत होते.... जेव्हा त्याची पट्टी वाचली गेली. !!! पट्टी काळाप्रमाणे बदलते का? त्या माणसाची पट्टी एक दिवस (आठवडा, महिना, वर्ष) आधी वाचली गेली असती तरीही दोनच भाऊ लिहिलेले सापडले असते का? आणि "तो" माणूस कायम "सर्वनाम" स्वरुपातच का समोर येतो? केवळ टिंगल करण्याच्या किन्वा खरं खोटं करण्याच्या उद्देशाने गेलेल्यांना पट्टी कधीच मिळत नाही. परन्तु आयुष्यातील महत्वाचे... अगदी जन्म-मरणाचा प्रश्न असणारे निर्णय घेण्याची वेळ आलेली व्यक्ती जेव्हा श्रद्धेने नाडी-जोतिष बघण्यसाठी येते, तेव्हा पट्टी नक्की सापडते.. आणि उचित दिशा ही मिळते. ज्यांचा विश्वास नाही किंवा सत्यासत्यता पडताळून विश्वास ठेवायचा असेल त्यांना काही सापडणारच नाही! तेव्हा विश्वास न ठेवणार्‍या कुदळ-फावड्यांनो, तुमच्या हातात डोंगर पोखरून उंदीरही पडणार नाही. किंवा, महर्षी ज्ञानी असल्यामुळे त्यांनी आपणा पाखंड्यांसाठी नाड्या बनवल्याच नाहीत (तेव्हा दुकानात जा आणि स्वतःच्या विजारी/पायजमे/सलवारसाठी स्वतःच नाडी घेऊन या) ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
महेश हतोळकर Tue, 09/23/2008 - 12:54 नवीन

मिळत्या जुळत्या १०-१२???

काही दिवसांनी त्या माणसाला फोन आला, की "तुम्ही पट्टी पाहण्यासाठी आज केंद्रात यावे." त्याप्रमाणे तो माणुस गेला. पद्धतीप्रमाणे त्याच्या अंगठ्याच्या ठशाशी मिळत्या-जुळत्या १०-१२ पट्ट्या तेथे काढल्या होत्या. त्या माणसाला विविध प्रश्न विचारुन "फिल्टर" झालेली १ पट्टी, मिळाली, जी त्या माणसाची होती. कसे शक्य आहे? अंगठ्याचा ठसा एकमेव असतो. कृपया ही बाब स्पष्ट करा. इतरही बर्‍याच जणांनी हाच प्रश्न विचारला आहे. पण उत्तर मिळालेले नाही. दुसरा मुद्दा. टिंगल करणार्‍यांची गोष्ट एक वेळ समजू शकते पण खरं खोटं करणार्‍यांचा उद्देश्य तर नक्कीच गंभीर आहे. मग त्यांची पट्टी का नाही मिळत? माझा तर्क: खरं खोटं करणारे आणि जीवन मरणाचा प्रश्न असणारे यांच्यात एक मूलभूत फरक असतो. खरं खोटं करणारे त्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबत सावध असतात. जर एखादा प्रश्न पुढची माहिती उघड करेल असे वाटले तर ते स्पष्ट नकार देतील. जीवन मरणाचा प्रश्न असणारे अशी सावधानता दाखवत नाहीत. अर्थात हा माझा केवळ तर्क आहे. कारण मी आजून अनुभव घेतलेला नाही. पण अनुभव घ्यायला गेलो तर नक्की असाच वागेन. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 12:58 नवीन

खरं खोटं

खरं खोटं करणारे त्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबत सावध असतात. जर एखादा प्रश्न पुढची माहिती उघड करेल असे वाटले तर ते स्पष्ट नकार देतील. जीवन मरणाचा प्रश्न असणारे अशी सावधानता दाखवत नाहीत. १००% सहमत. कोणी मृगनयनी म्हणते आहे म्हणून आम्ही वरील घटना का सत्य मानावी ? योग्य पुरावा द्या ! वर मी लिहलेच आहे ओक साहेबांसाठी तेच नयनी तुझ्या साठी देखील जी हवी ती माहीती देतो माझा भुतकाळ व भविष्यकाळ ह्यातील तीन घटना सागाव्यात... पुर्ण भवीष्य जाऊ दे उडत ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 12:51 नवीन

>>केवळ

>>केवळ टिंगल करण्याच्या किन्वा खरं खोटं करण्याच्या उद्देशाने गेलेल्यांना पट्टी कधीच मिळत नाही. परन्तु आयुष्यातील महत्वाचे... अगदी जन्म-मरणाचा प्रश्न असणारे निर्णय घेण्याची वेळ आलेली व्यक्ती जेव्हा श्रद्धेने नाडी-जोतिष बघण्यसाठी येते, तेव्हा पट्टी नक्की सापडते.. आणि उचित दिशा ही मिळते. =)) आपलं पाप (खोटेपणा) कसं लपवावे ह्या नाडि वाल्याकडून शिकावे ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 13:02 नवीन

पाखंडी लोकांचे प्रश्न

ज्या लोकांच्या मनात खालील प्रश्न येतात त्यांना खुशाल पाखंडी म्हणावे १) या नाडी केन्द्रात नाडी बंडलांची संख्या किती आहे? एका बंडलात किती नाडी पट्टया असतात? २) आपण महाराष्ट्रात जी नाडी बंडले आणलीत ती महाराष्ट्राचे संबंधाने सॉर्टिंग करुन आणलीत का? हे सॉर्टिंग कसे केले? ३) आजतागायत अगस्त्य नाडी केन्द्रात जे लोक नाडी पटटी पाहून गेले व आज हयात नाहीत ( उदा. १९ व्या शतकाच्या आधी जन्मलेले) अशा लोकांच्या नाडी पट्टया आपण जपून ठेवता की टाकून देता? ४) आपल्या पत्रकात जी नोट दिली आहे त्या नुसार असे दिसते की जनरल कांडम व्यतिरिक्त ११ कांडम विशिष्ट प्रकारचे भविष्य सांगण्या करिता आहेत. तसेच आणखी चार ही स्पेशल कांडे आहेत. या प्रत्येक कांडाकरिता स्वतंत्र पट्टी आहे का? ५) पट्टीत जन्मकुंडली असते की जन्मकुंडलीचा तपशील असतो? ६) भविष्य जन्मकुंडलीचे आधारे लिहिलेले असते की अंतर्ज्ञानाने? ७) अंतर्ज्ञानाने असेल तर कुंडली पट्टीत कशासाठी असते? ८) अंगठयाचा ठसा घेतल्यावर विवक्षित पट्टी ही त्याच व्यक्तिची आहे हे निश्चित करण्यासाठी आपण अनेक प्रश्न विचारता. ९) आंगठयाचा ठसा तर एकाचा दुसऱ्या सारखा कधीच नसतो मग एवढे प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय? १०) आजमितीस भारताची लोकसंख्या ११०कोटीं आहे. प्रत्येक व्यक्तीची पट्टी महर्षींनी लिहिली आहे काय? ११) वर्षभरात सुमारे अंदाजे एक हजार माणसांच्या पट्टया आपल्याकडे पाहून झाल्या असतील का? १२) मग एक व्यक्ती बरोबर सोळा पट्टया या हिशोबान या वर्षात १६ हजार पट्टया आपल्या संग्रही आहेत का? १३) माणसांची संख्या पहाता पट्टयांची संख्या आम्हाला अपूरी वाटते मग या पट्टया एवढया माणसांना कशा पुरतात? १४) ज्या व्यक्तींच्या पट्टया वाचून झाल्या आहेत त्या पट्टयांचा नंतर तुम्हाला काय उपयोग होतो? १५) आपल्याला जर त्याचा उपयोग होत नसेल तर त्या व्यक्तिने ती पट्टी मागितली तर त्याला आपण द्याल का? १६) हयात नसलेल्या माणसांच्या पट्टया तुमच्या संग्रहात असणारच त्यातील काही पट्टया आम्हाला अभ्यासासाठी द्याल का? १७) पट्टयात व्यक्तींची नांवे असतात असे आपण म्हणता, आम्हाला ती वाचता येत नाहीत. ती नांवे तिथे आहेत याची खात्री आम्हाला करता यावी यासाठी तुम्ही देवनागरी असलेली ही अक्षरे कूट लिपीत कशी असतात हे तुम्ही लिहून द्याल का? १८) मनुष्य ज्या दिवशी तुमच्या कडे येतो त्या दिवसाच्या आधीच्या घटना पट्टीत लिहिलेल्या असतात की नसतात? (६_६ पाखंडी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 09/23/2008 - 13:08 नवीन

वर मी

वर मी लिहलेच आहे ओक साहेबांसाठी तेच नयनी तुझ्या साठी देखील जी हवी ती माहीती देतो माझा भुतकाळ व भविष्यकाळ ह्यातील तीन घटना सागाव्यात... पुर्ण भवीष्य जाऊ दे उडत ! राजे.. आपण जेव्हा पुण्यात याल, तेव्हा नाडी-जोतिष कार्यालयात जाऊन तुमच्या उजव्या अंगठ्याचा ठसा, जन्म्वेळ, तारीख देऊ.. तुमची पट्टी सापडल्यावर तुम्हाला अभिप्रेत गोष्टी नक्की कळतीलच! इतकेच नव्हे, तर कोणत्या उद्देशाने नाडि-जोतिष बघायला आलेले आहेत, हे ही त्या पट्टीत नमूद केलेले असते. उदा. काही जण शिक्षणासाठी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, यासाठी पट्टी पाहायला जातात. काही लोक "कोर्टाच्या केसचा निकाल" काय लागेल.. ते बघायला जातात.. काही जण लग्न कधी होईल... हे विचारायला जातात. राजे.. तुमची पट्टी लवकर सापडो... ही शुभकामना..... (चांगले कर्म करताना मी कोणालाही घाबरत नाही.... :) )
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 13:15 नवीन

तुमची

तुमची पट्टी सापडल्यावर तुम्हाला अभिप्रेत गोष्टी नक्की कळतीलच! पण नाय सापडली तर मात्र हातात येईल त्या पट्टीने त्या पट्टी वाल्याला ठोकुन काढू ! सापडत कशी नाही हेच पाहतो ना पट्टी ! >>>तर कोणत्या उद्देशाने नाडि-जोतिष बघायला आलेले आहेत, हे ही त्या पट्टीत नमूद केलेले असते. =)) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 14:12 नवीन

भृगुनयनी

भृगुनयनी ला अनुभव येतो आन मंग बाकीच्या लोकांनी डोळ्यावं काय पट्ट्या बांधुन घेतल्या का? संशय का नयनी आला? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 09/23/2008 - 14:56 नवीन

लाय डिटेक्टर, नार्को बिर्को

च्यायला ते लाय डिटेक्टर, नार्को बिर्को सगळ्या चाचण्या बंद केल्या पाहिजे. सरकारने दहशतवाद्यांच्या नाड्या आवळायला या नाडीवाल्यांना बोलवले पाहिजे. म्हणजे मग देशात कुठेच बॉम्बस्फोट, दहशतवादी घटना होणार नाहीत आणि झाल्या तरी संशयितांना पकडले की त्यांना या नाडीवाल्यांकडे घेऊन जायचे. मग त्यांचा भूतकाळ तरी स्पष्टपणे कळेल. अगदीच कळला तर भविष्यकाळही कळेल. म्हणजे आणखी कुठे बॉम्बस्फोट होतील तेही आधीच समजेल. एकुणात काय सरकारने आता ही नाडीपरीक्षा गांभीर्याने घ्यावी बुवा.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/23/2008 - 15:30 नवीन

आत्ताच

आत्ताच वाचली चर्चा !! जोरात आहे अगदी !!! तरी म्हणतोये जो तो नाड्या आणी इलॅस्टीकच्या का गप्पा मारतोये !! असो ..... चालू देत ......... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 09/23/2008 - 15:58 नवीन

ह्म्म !

चर्चा छान चालू आहे. अनुभव घेतल्याशीवाय बोलणे कठीण आहे पण तर्क करुन जे पटत नाही त्याचा अनुभव घ्यायला लोक जाणे सुद्धा मुष्किल आहे. त्यामुळे वर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची समाधानकारक नसली तरी चांगली उत्तरे मिळावीतच. जुळ्या मुलांची कुंडली दोन मिनिटांचा फरक असला तरी वेगळी असते. असे सांगणारे ज्योतिषी, माझी जन्मवेळ मला साधारण लक्षात असली तरी माझी कुंडली मांडतात. या सारख्या अश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा मला अजून झाला नसताना नाडी-ज्योतीषावर विचार करण्याची माझी कुवत नाही. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा