आज अचानक कातरवेळी,
मनी दाटती काजळरेषा
वाट चालुनि थकली पाऊले
चल साजणा अपुल्या देशा
गर्भरेशमी यौवन सरले,
शैशव आता स्वप्नचि उरले
आठवणींचा खेळ चालला
संध्याछाया झाकोळती दिशा
सखेसोबती वाट पाहती
समांतर वाटा जरी चालती
मधुर क्षणांची बकुलपुष्पे
अजुनि जागविती मनी आशा
पैलतीरी नेत्र लागले
स्वप्नांचे आभासही नुरले
नको येथले भास मखमली
अन परतीची फसवी भाषा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1998
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
!!!
भाव खास.. कविता ठिक
छान कविता
खरंच इतकी निराशा?
हम्म!
आवडली.