Skip to main content

(ती)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/01/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;) ती समीप माझ्या येते, खेटुन जाते मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची, ती कविता, आराधना, साधना त्यांची, 'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2643
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

घरी फेटा नव्हता म्हणुन टावेल ४ वेळा हावेत उडवला. लै भारी, लै भारी (टाळ्या आणि शिट्या) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मूळ कविते इतकेच विडंबनही मस्त जमलंय. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

नाद करायचा नै !! इतक्या लवकर कस काय सुचत तुम्हाला विडंबण, भुतकाळातले लै अनुभव असे पटापट बाहेर येतात कि काय? विडंबण झक्कास झाल हे. वे. सा. न. ला. --टुकुल

जबरा रंगाशेठ..
मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते
गणपा मामा

तरी म्या सांगत व्हतो, की आप्ली घरची मिठभाकरच ग्वाड आस्ती, भायेरच्या इटलीनी प्वाट तर भरतच नाय पन खिसाबी खाली व्हतो. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

रंगाशेठ, एकदम फरमास विडंबन.. चालू दे.. केशवसुमार

पहिल्या तीन कडव्यांमध्ये अगदी मानवी चित्र समोर येते, शेवटाकडे कवीकल्पना ठरते...