आमची प्रेरणा प्राजुतैची ही सुंदर कविता.
बसे रुतूनिया | चाकात मध्यात ||
लोहाचा तो खिळा | काळाकुट्ट||
बसलेले चाक | चढणाची वाट||
सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई||
घाटाच्या मार्गात| वाहने सहस्र ||
एकही ना मात्र| उपयोगी||
मेकॅनिक राजे | रापट मळके ||
दाढीचे खाजणे | मधेच ते ||
आळशी ती जात| औजारे भंगार ||
वेळ काढी फार| क्रोध येई ||
फिरवले नट| काढी भराभरा ||
मागतो स्पॅनरा | माझ्याकडे ||
बुडवी टबांत | रेखोनी ठेवत||
काढी फटाफट | पंक्चरास||
हात पसरुनी| दुपटीने मागे||
पब्लिक ते रंगे| भांडणात||
नडीची ती वेळ| चालू पोरखेळ ||
सोडेना तो काळ | पैशा विना||
-पुण्याचे पेशवे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4581
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास!
हाहाहा...! सह
चांगला प्रयत्न
ठॉ !
खेळ, खिळा आणि खीळ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हम्म्म!
In reply to खेळ, खिळा आणि खीळ by नंदन
जियो
In reply to खेळ, खिळा आणि खीळ by नंदन
माननीय
श्री रा.रा. पुपे
काय
खिळा
हा हा हा ....
असेच म्हणतो..
In reply to हा हा हा .... by छोटा डॉन
+ १ असेच
In reply to असेच म्हणतो.. by धमाल मुलगा
मस्त हं !
पेशव्यांची मजल
एकदम छान
मस्त