मी पण अशीच परदेशी येऊन मगच, जेव्हा मुलाला शाळेत जायचं तर गाडी चालवता आलीच पाहिजे अशी परिस्थिती आली तेव्हाच शिकले. परीक्षेच्या दिवशी फ्री-वे वर गाडी चालवली त्या नंतर आजतागायत त्या भानगडीत पडले नाहीये :)
तुमचा अनुभव वाचून माझ्या road test च्या आठवणी जाग्या झाल्या ... इथे प्रथम गाडी पार्क करण्याची परीक्षा होती आणि ती नीट पार पडली तरच पुढे कशी चालवता ते बघणार. नीट पार्क केली नाही तर तिथेच नापास :( Parallel Parking करताना परीक्षकाने ठेवलेले अडथळे पाडायचे नाहीत याची काळजी घेण अपेक्षित असताना मी मात्र चक्क त्या अडथल्याना पार गाडीखाली चिरडून टाकले होते. ती परीक्षिका त्या दिवशी चांगल्या मूड मध्ये असावी :) पुढे सर्व व्यवस्थित होऊन लायसन्स मिळाल आणि जीव भांड्यात पडला.
मेमांडू लायसेन्स मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन!
आमच्या अमेरिकन मेमांडूच्या तीन तीन फेर्या झाल्या!
इतरवेळी नीट ड्रायव्हिंग, पण तो सहाफुटापेक्षा उंच असलेला जाडजूड बुवा शेजारी बसल्यानंतर टेस्ट सुरु झाली की शक्य त्या सगळ्या चुका करून दाखवल्या होत्या! काही चुका तर त्याने पहिल्यांदाच (त्याच्या आयुष्यात) पाहिल्या असतील!;) तिसर्यांदा झाले बुवा पास!:)
रेवती
शुभच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्याशी सहमत आहे.
प्रॅक्टिस सेशनमध्ये आत्मविश्वासाने गाडी चालवता येते. पण आपल्या शेजारी परिक्षक बसलाय आणि आपल्या प्रत्येक हालचालीकडे त्याचे बारीक लक्ष आहे ह्या भीतीनेच आणखी चुका घडण्याची शक्यता असते.
फक्त आठ तासच प्रॅक्टिस? मी नक्कीच नापास झाले असते. देशात दोन वार्या करायला लागल्या होत्या. इथे परीक्षेला गेले तर पावसाची रिपरिप सुरु झाली. मग तो ऑफिसर म्हणाला एक चक्कर मारुन येऊ १० मिनिटात आणि दिलं लायसन्स.
अरे बाबा, कायको गडे मुर्दे उखाडता है...
लै मोठा काकू झालाय या विषयावर आधीच...
बाकी काथ्याकूट परत होणार असे वाटून टार्याचे डोळे पाणावले.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
माफ करा.महिला वर्ग हे कबूल करत आहे कि परराष्ट्रात गाडी शिकणे आणि ड्रायव्हींग टेस्टला सामोरे जाणे हा एक कधीही न विसरण्यासारखा अनुभव आहे.
तुमच्या माहितीकरिता सांगते इक मलेशियात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि महिला अतिशय व्यवस्थितपणे व सुरक्षितरित्या गाडी चालवतात. त्याउलट पुरुष हे स्पिडिंग व नियम न पाळण्यात सराईत आहेत.
मुद्दा एवढाच आहे --आम्हाला आलेल्या अनुभवांचा आस्वाद मिपाच्या वाचकांना घेता यावा हाच प्रयत्न!
मलेशियात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि महिला अतिशय व्यवस्थितपणे व सुरक्षितरित्या गाडी चालवतात
त्यांच्यासाठीच नियम असतात. (करावे लागले).
त्याउलट पुरुष हे स्पिडिंग व नियम न पाळण्यात सराईत आहेत.
नियम पुरुषांना लागू पडत नाहीत; ते नियम तयार करतात. ते जसे गाडी चालवतात ते पाहून नियम तयार केले जातात.
ड्रायविंग टेस्ट चांगलीच कठिण दिसते आहे.
इथे मॅसाच्यूसेट्समध्ये लेखी परीक्षा असते त्यात २१ प्रश्न विचारतात कमितकमी १४ बरोबर यायला लागतात. त्यात पास झाले तर ड्रायविंग टेस्ट. थ्री पॉइंट टर्न, पॅरलल पार्किंग (हे जास्त लोकवस्तीच्या टाऊनमध्ये हमखास विचारतात), रिवर्स, यील्ड, स्टॉप, फ्रीवे ड्रायविंग, रोटरी भोवती चक्कर, अशा सगळ्या कसरती करताना शेजारी कठोर चेहेर्याचा स्टेट ट्रूपर बसलेला असतो आणि तो त्याच्या नोटपॅडवर नोंदी घेत असतो. पास झालो की नापास हे 'रजिस्ट्री ऑफ मोटरवेईकल' (इथले आरटीओ) च्या आवारात आपण गाडी परत आणून पार्क केली की सांगतो. साधारण आठवड्यात (चिरीमिरी न देता किंवा विनाकारण हेलपाटे न घालायला लावता! ;) ) लायसन घरपोच येतं
(फर्स्ट अटेंप्ट क्लिअर)चतुरंग
इथे तर त्यांची चेकलिस्ट ही बहासामध्ये असते.ते एकानंतर एक असे त्यात खुणा करत जातात.ठराविक टेस्ट संपुष्टात आली कि ती चेकलिस्ट दुसर्या व्यक्तिकडे सुपूर्त करावी लागते आणि मग एका अशि़क्षितासारखे विचारावे लागते "पास" कि "फेल".
नंतर ती चेकलिस्ट निरखून पाहिल्यावर बहासा भाषेतले दोन नविन शब्द समजले.गगल(म्हणजे "फेल" ) आणि लुलुस (म्हणजे "पास")
मा़झ्या चेकलिस्ट मध्ये सगळे " लुलुस" होते.ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला.
स्वप्ना तुझे अभिनंदन! बाकी मायदेशात नवर्याच्या शेजारी बसून त्याच्या उत्तम ड्रायव्हींगवर टीका करणे व ए तू गाडी नीट चालव बरं का रे. मी जरा डुलकी काढतेय असे सांगून आयमीन थोडे दमात घेऊनच झोपून टाकणे. इथे आल्यावर मात्र पर्याय राहीलाच नाही.
अनुभव मस्त लिहलाय. :)
ह्म्म... माझ्या नवर्याला आलेला अनुभव...
परिक्शक एक लोकल(अरबी)
१. तो हाताने लेफ्ट दाखवुन तोन्डाने राईट म्हणाला 8| आम्चे हे बावरले :S . नापास
२. तो म्हणाला, सिगारेट घेतो, थाम्ब, ह्याने घाइघाइने दुकानासमोर
थांबवली ...नो पार्कीग झोन्...हे परत नापास.
असे असन्ख्य अनुभव......
चुचु
बाप रे. हे म्हणजे कठीणच झाले. अशा परिक्षकांमुळे शिकाऊ ड्रायव्हर गोंधळून नक्कीच आणखी चुका करेल आणि लायसन्स मिळायचा तो कधी?
कुतूहल म्हणून विचारते ...... तुमचे पति नंतर परिक्षा पास कधी झाले?
हॅ हॅ हॅ, हे त्या हलकटांचे पैसे कमवायचे धंदे आहेत ग.
एकदा नापस झाल कि परत ५ते ७ दिवस क्लास घ्यावा लागतो.
भरा पैसे परत.
(दुबै ला पहिल्या फटल्यात परवाना मिळालेला) -गण्या.
-माझी खादाडी.
माझ्याबरोबर ८० जणांची ड्रायव्हींग टेस्ट झाली.त्यातील ४०% परिक्षार्थी एका न दुसर्या टेस्टमध्ये अनुत्तीर्ण. नापास झालेल्यांना १ तासाची प्रॅक्टीस देवून सात दिवसांनी ६५ रिंगेट्स भरुन पुन्हा तीच परिक्षा.
(मलशियात 1st attemptमध्ये लेसन मिळवणारी मी स्वप्ना)
स्वप्नाताई,
तुमचा अनुभव वाचून मला मलेशियातला लायसेन्स मिळविण्याचा माझा अनुभव आठवला. ते "सातूरिबू सातू, सातूरिबू दुवा, सातूरिबू तिगा व सातूरिबू एंपात" सुद्धा आठवलं. (कुणी पाळत नाहींत, पण एक कायदा असा आहे की पुढच्या गाडीपासून आपली गाडी चार सेकंदापेक्षा जास्त अंतरावर असली पाहिजे व आमचा इन्स्ट्रक्टर चार सेकंद कसे मोजायचे ते सांगत होता.)
मजा आली वाचायला! एक तर्हेचा पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला!
बाकीचे 'व्यनि'वर.
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
इथले काही नियम आत्मसात करणे तसे कठीण आहे आणि तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. ४ seconds rule आणि १२ seconds rule हे दोन्ही चमत्कारिक नियम आहेत. वास्त्विक पाहता ते theoricallyच अस्तित्वात आहेत.
तुमचाही अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
भडकमकर-जी,
अरेच्चा! तुम्हालाही ही भाषा येते तर! कारण लुलूस म्हणजे पाssssस!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
प्रतिक्रिया
अभिणंदण
वा! छान!
तरिमा कासे
माझाही अनुभव
मेमांडू
हॅ हॅ
सहमत
अभिनंदन!
अभिनंदन
धन्यवाद
महिला वर्ग
अरे बाबा,
मुद्दा अनुभवाचा....
तरिमा कासे उन्टुक पेन्जेलासन..
समा समा
मलेशियात
मेमांडूचा अनुभव मस्तच!
इथे तर
अभिनंदन
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
अभिनंदन!
आभार
अनुभव कथन
धन्यवाद
ह्म्म...
निकालाचे काय?
खरड किंवा व्य.नि. वापरावा
हॅ हॅ हॅ, हे
नापास ---> पास
सातूरिबू सातू, सातूरिबू दुवा.....
सहमत
लुलुस
धन्यवाद
अरेच्चा! तुम्हालाही ही भाषा येते तर!
आहे काय न नाही काय
अभिनंदन स्वप्ना तै......