Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on Sat, 11/28/2009 - 05:18
  • Log in or register to post comments
  • 15737 views

Book traversal links for भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन(भाग २/२)

  • ‹ भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन (भाग १/२)
  • Up

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 11/28/2009 - 06:16

Permalink

सहकारी

सहकारी चळवळ राजकिय व्यक्तिंच्या हातात न जावू देणे, चांगल्या धोरणास सरकारचा पाठींबा, थकित कर्जवसूली, लोकशिक्षण, धडाडी आदी काही धोरणे प्रभावीपणे अवलंबली नाहीत तर सहकारी चळवळीची स्वाहकारी चळवळ लवकरच बनेल. अगदी हेच म्हणतो... राजकीय लांडगे जिथे शिरतात तिथे वाट लागतेच लागते!!! दुसर्‍या राज्यातल्या सहकारी उत्पादना पेक्षा महाराष्ट्रातल्या सहकारी उत्पादनातल्या खरेदीला प्राधान्य द्या. मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 11/28/2009 - 09:12

Permalink

+१

एक पणती पेटली की त्या पणतीने आपण इतर सर्व पणत्या पेटवू शकतो. उत्तम --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 11/28/2009 - 20:49

In reply to +१ by अवलिया

Permalink

+१

लेख छान झाला आहे. शेवटचे वाक्य पटण्यासारखे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sun, 11/29/2009 - 21:35

In reply to +१ by धनंजय

Permalink

+२

शेवटचे वाक्य पटण्यासारखे. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sat, 11/28/2009 - 19:42

Permalink

छान झालाय

छान झालाय हा भागही. सहकारातले राजकारण, १००% कर्ज वसुली ते बुडित संस्था हा प्रवास हे सर्व खूप जवळून पाहिले. काही अपवाद वगळता सहकार म्हणजे स्वाहाकार हे गृहित धरुनच संस्था सुरु होते. एका पणतीने दुसरी पणती पेटायच्या आत पेटलेली पणती विझवली जाते. तरीही बचतगटांचे यश पाहाता पुन्हा एकदा आशा वाटायला लागते. इथे मात्र माझे सर्व आर्थीक व्यवहार पतपेढीमार्फत होतात. गावातील पैसा गावातच ठेवण्याकडे लोकांचा कल त्यामुळे गावातील चेसच्या मोठ्या ऑफिसमधे शुकशुकाट आणि क्रेडिट युनियनच्या ऑफिसमधे गर्दी हे नेहमीचे दृश्य. conservative banking मुळे इथल्या ढासळलेल्या आर्थीक व्यवस्थेचा फटका या पटपेढ्यांना फारसा बसला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 11/30/2009 - 09:10

In reply to छान झालाय by स्वाती२

Permalink

स्वातीताई

स्वातीताईंशी सहमत आहे. गणेश बॅ़क ऑफ कुरुंदवाड जेव्हा आजारी ठरवून रिझर्व्ह बँकेने विकली (केरळातील कोणत्यातरी बँकेला) तेव्हा या संदर्भातील एक लेख वाचला होता. भुदरगड सारखी प्रचंड जोरात चाललेली संस्था ही अशाच भ्रष्टाचारामुळे बुडली. सांगली बँक आजारी पडून आयसीआयसीआयने विकत घेतली. सहकारात नफा देखील वाटून खाण्याची वृत्ती पाहीजे. ही जोपर्यंत येत नाही सगळा फायदा माझाच झाला पाहीजे ही वृत्ती जोवर आहे तोवर सहकार यशस्वी होणार नाही. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 11/29/2009 - 00:01

Permalink

उत्तम!!!

उत्तम लेख. मात्र सहकारचळवळीसंदर्भात राजकारण्यांविषयी व्यक्त केलेला आशावाद फोल ठरण्याचीच शक्यता जास्त आहे असे वाटते. असो. लेख आवडला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 11/29/2009 - 05:15

Permalink

उत्तम

चांगली लेखमाला. मुंबईतील अपना बाजार हीदेखिल सहकारीच. कित्येक सहकारी बॅकादेखिल उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 11/29/2009 - 23:01

Permalink

विना सहकार...

हा लेख ही उत्तम! "विना सहकार नाही उद्धार" हा मंत्र जपत महाराष्ट्रातील चळवळ फोफावत गेली. मात्र त्यात इतरांच्या (सामान्यांच्या) सहकाराने स्वतःचा (अल्टीमेट) उद्धार करण्यावर भर दिला गेला. अर्थात हे मानवी स्वभावास साजेसेच झाले त्यात खेद वाटला तरी आश्चर्य काहीच नाही. सहकारी चळवळ राजकिय व्यक्तिंच्या हातात न जावू देणे, चांगल्या धोरणास सरकारचा पाठींबा, थकित कर्जवसूली, लोकशिक्षण, धडाडी आदी काही धोरणे प्रभावीपणे अवलंबली नाहीत तर सहकारी चळवळीची स्वाहकारी चळवळ लवकरच बनेल. बर्‍याचदा सहकारी चळवळ ही राजकीय व्यक्तींच्या हातात सुरवातीस नसते तर ते (सहकार) राजकारणात नसलेल्या पण पुढील राजकारण नामक कायमस्वरूपी व्यवसायासाठी इच्छकांकडून लाँचपॅड म्हणून वापरले जाते. किमान महाराष्ट्रात यातून अनेक राजकारणी तयार झाले. आपल्या सहकार क्षेत्रातील सभासदांना आणि त्यांच्या करवी परीसराला "मॅनेज" करत ह्यांनी मतदार संघ ताब्यात घेतले असे दिसू शकेल. जेंव्हा नको तितका सतत उस लावून आणि कारखान्यांवर कुठल्याही अधुनिकीकरणासाठी तसेच तुम्ही वर म्हणल्याप्रमाणे लोकशिक्षण आदी बाबींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आणि मग तेथील भांडवल हे आधी अभियांत्रिकी आणि मग वैद्यकीय, दंतवैद्य करत आता अगदी कम्युनिटी कॉलेजच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात पसरवले... त्याचे चांगले परीणाम काही ठिकाणी झाले तर इतर ठिकाणी काय झाले ते तेथे अडकलेलेच सांगू शकतील*. असो... ________________ * एक ऐकीव गोष्ट ("उद्यमशिलतेची:!) : अशाच एका सहकारक्षेत्रात एक अभियांत्रिकी विद्यालय काढण्यात आले. त्यात अशा प्रकारच्या विद्यालयास लागणारी सर्व व्यवस्था आहे का हे पाहण्यासाठी म्हणून ज्या केंद्र सरकारच्या समित्या असतात त्यातील सभासद तपासणी करण्यासाठी आले. सर्व बघून झाल्यावर त्या महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या अध्यक्षाशी (या उदा मधे माहीत नाही, पण बर्‍याचदा हे स्वतःला "सहकार महर्षी" वगैरे म्हणवून घेतात!) भेटायला गेले. जरा प्रेमाने विचारपूस झाल्यावर, तपासणी अधिकार्‍याने विचारले की तसं बरं दिसततयं पण इमारतीची रचना जरा महाविद्यालयापेक्षा वेगळी वाटली. त्यावर लगेच उत्तर मिळाले, "द्या टाळी! कसं बरोबर बघून राहीलात तुम्ही! अहो आपल्याला कुठे माहीत हे कॉलेज चालेला का नाही ते? चालले तो पर्यंत त्यातून पैसे करायचे नंतर बंद करून तेथेच हॉस्पिटल अथवा हॉटेल काढायचे! " :-)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com