बेबेलप्लात्स : बर्लिनमधील पुस्तकांच्या होळीचे स्मारक
जर्मनीमध्ये खूप काही बघण्यासारखे आहे, तरी पहिल्या भेटीत विसाव्या शतकाच्या भयाण इतिहासाचे सावट चहूबाजूला जाणवल्यावाचून राहात नाही. माझ्या प्रथम जर्मनी-भेटीत "उंतर देन लिंदेन" या बर्लिनच्या राजपथावरून फिरताना मी बघितलेले पहिले स्मारक म्हणजे बेबेलप्लात्स.
दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे. मैदानाच्या मध्ये काचेची फरशी दिसते. १० मे १९३३ रोजी या ठिकाणी "जर्मन विद्यार्थी संघटनेने" पुस्तकांची प्रचंड होळी येथे जाळली होती. या दिवशी जर्मनीतल्या अनेक शहरांमध्ये संघटनेने योजना करून अशा होळ्यांचा कार्यक्रम केला होता. सर्व ठिकाणी कोणा-कोणा मान्यवरांची भाषणे आयोजित केलेली होती. पैकी विद्यार्थ्यांना योसेफ गबेल्स याने दिलेल्या भाषणाचा काही भाग असा.
भुयारी खोलीमध्ये पुस्तकांची रिकामीच रिकामी कपाटे आहेत. पुस्तके जाळली म्हणून जर्मनीच्या ग्रंथभांडारात ही पोकळी झाली, ती कधी भरून येणार नाही, हे पुढच्या पिढ्यांनी कधी विसरू नये. काचेत प्रतिबिंब दिसते आहे, ते माझ्याबरोबर फिरायला आलेल्या सहकार्याचे आहे. हे गृहस्थ ज्यू आहेत, आणि प्राध्यापक म्हणजे बहुधा गबेल्सच्या मते "ज्यू बुद्धिवादी" असावेत. गबेल्सचे भंपक (नव्हे क्रूर) "जर्मन नवचैतन्य" आता पुरते पराभूत झाले आहे, आणि त्याच्या लाजेचे स्मारक बघत एक ज्यू "बुद्धिवादी" आरामात भटकत बघतो आहे - हे न्यायाच्या पराकोटीचे प्रतिबिंब आहे, असे कोणाला वाटू शकेल. हे आशादायी रूपक मी नाकारत नाही. परंतु या न्यायाच्या पोटात कधीच न फिटणारा अन्यायही दडला आहे. माझा ज्यू सहकारी आरामात पर्यटन करायच्या आधी लाखो ज्यू लोक - बुद्धिवादीच नव्हे तर मजूर, व्यापारी, बायका, पोरे, म्हातारे, कोतारे - मेले. ते कोणी परत येणे नाही. त्यांची संतती जगातून नाहिशी झाली. दुसर्या महायुद्धाच्या शेवटी गबेल्सची छीथू झाली, पण पुस्तके जाळणार्या, "अतिरेकी" बुद्धिवादाचा भेद करून बलशाली कृत्ये करणार्या तरुणांचे काय झाले? त्यांच्यापैकी काही तरुण सैन्यात भरती होऊन मेले असतील. बहुतेक जिवंत राहिले त्यांना आपल्या "नवचैतन्या"ची राखरांगोळी बघायला मिळाली. "मी त्या होळीत आपल्या हाताने पुस्तके टाकली" असे आपल्या नातवांना कोण कसे सांगणार?
पण जर्मन अस्मितेच्या दृष्टीने बघायला गेले, तर या होळीत शोचनीय आणि अपत्यशून्य दहन झाले ते वाइमार प्रजासत्ताकाचे. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जन्मलेली ही प्रजासत्ताक राज्यघटना पूर्णपणे जर्मन होती. १९३० नंतर त्याच्या निवडणुकांमध्ये कोणालाच बहुमत मिळत नव्हते - आघाडी राजकारण... बर्लिनमध्ये कलेसाठी कला म्हणून "आचरट" प्रकार... काही का असेना, हे जे काय चालू होते, ते पूर्णपणे जर्मन होते, आणि ते या आगीत जळून खाक झाले.
ज्यू विचारवंत मेले. पुढे युद्धात नात्सी नवचैतन्याची लक्तरेही हास्यास्पद झाली. जर्मनी ही अमेरिकेची आणि रशियेची राज्यघटना-खेळाची प्रयोगशाळा झाली. जर्मनीची स्वतःची राज्यघटना बनवणारी स्वतंत्र अस्मिता दोन पिढ्यांसाठी नाहिशी झाली. त्या ज्यू "बुद्धिवाद्यांच्या" पुस्तकांबरोबर जळून गेलेल्या वाइमार राज्यघटनेबद्दलही थोडातरी शोक करणे योग्य आहे.
अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याकडून तोडफोड होत असताना "विचारवंत" ही शिवी म्हणून वापरली जाऊ लागली, तर या घटनेचे पडसाद मनात उमटल्यावाचून राहत नाहीत.

अतिरेकी ज्यू बुद्धिवादाच्या युगाचा आता शेवट झाला आहे. जर्मन क्रांतीने व्यूहभेद करून पुन्हा जर्मनीचा मार्ग मोकळा केला आहे... भविष्यातील जर्मन माणूस पुस्तकवीर नसेल तर चारित्र्यवीर असेल. हेच ध्येय ठेवून आम्हाला तुमचे शिक्षण करायचे आहे. तरुण व्यक्ती म्हणून दयाहीन झोतात साहसाने उभे राहायचे, मृत्यूच्या भयावर विजय मिळवायचा, आणि पुन्हा मृत्यूबद्दल आदर कमावायचा - हे नव्या पिढीचे कार्य आहे. या मध्यरात्रीच्या घटकेला भूतकाळाचे दुष्ट पिशाच्च आगीत टाकता, ते तुम्ही उत्तम करत आहात. हे एक बलशाली, महान आणि प्रतीकात्मक कृत्य आहे. हे कृत्य जगासाठी दस्तऐवज घडवून सांगते आहे - हल्लीच्या वाइमार प्रजासत्ताकाचा पाया भूमीत ढासळतो आहे, पण या भग्नावशेषांमधून नवचैतन्य फेनिक्स पक्ष्यासारखे विजयी होऊन उभारेल.(गबेल्स हा नात्सी सरकारात माहितीप्रसारणमंत्री होता. १९३३ मध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह-कॉम्युनिस्ट-सोशालिस्टांची युती फुटल्यामुळे नात्सी पक्षाचे अल्पमतातले सरकार सत्तेवर आले. हे सरकार चैतन्यपूर्ण आणि कृतिशील होते, हे गबेल्सने लवकरत लवकर युवकांमध्ये अस्मितेची स्फूर्ती भरून दाखवून दिले. पुस्तकांची होळी हा गबेल्सचा पहिल्या काही महिन्यांतलाच मोठा कार्यक्रम.) अशी ही होळी. या होळीचे स्मारक म्हणून मैदानात एक भुयारी खोली आहे. त्या खोलीमध्ये काचेच्या फरशीमधून बघता येते. हे त्या काचेचे जवळून घेतलेले चित्र :
भुयारी खोलीमध्ये पुस्तकांची रिकामीच रिकामी कपाटे आहेत. पुस्तके जाळली म्हणून जर्मनीच्या ग्रंथभांडारात ही पोकळी झाली, ती कधी भरून येणार नाही, हे पुढच्या पिढ्यांनी कधी विसरू नये. काचेत प्रतिबिंब दिसते आहे, ते माझ्याबरोबर फिरायला आलेल्या सहकार्याचे आहे. हे गृहस्थ ज्यू आहेत, आणि प्राध्यापक म्हणजे बहुधा गबेल्सच्या मते "ज्यू बुद्धिवादी" असावेत. गबेल्सचे भंपक (नव्हे क्रूर) "जर्मन नवचैतन्य" आता पुरते पराभूत झाले आहे, आणि त्याच्या लाजेचे स्मारक बघत एक ज्यू "बुद्धिवादी" आरामात भटकत बघतो आहे - हे न्यायाच्या पराकोटीचे प्रतिबिंब आहे, असे कोणाला वाटू शकेल. हे आशादायी रूपक मी नाकारत नाही. परंतु या न्यायाच्या पोटात कधीच न फिटणारा अन्यायही दडला आहे. माझा ज्यू सहकारी आरामात पर्यटन करायच्या आधी लाखो ज्यू लोक - बुद्धिवादीच नव्हे तर मजूर, व्यापारी, बायका, पोरे, म्हातारे, कोतारे - मेले. ते कोणी परत येणे नाही. त्यांची संतती जगातून नाहिशी झाली. दुसर्या महायुद्धाच्या शेवटी गबेल्सची छीथू झाली, पण पुस्तके जाळणार्या, "अतिरेकी" बुद्धिवादाचा भेद करून बलशाली कृत्ये करणार्या तरुणांचे काय झाले? त्यांच्यापैकी काही तरुण सैन्यात भरती होऊन मेले असतील. बहुतेक जिवंत राहिले त्यांना आपल्या "नवचैतन्या"ची राखरांगोळी बघायला मिळाली. "मी त्या होळीत आपल्या हाताने पुस्तके टाकली" असे आपल्या नातवांना कोण कसे सांगणार?
पण जर्मन अस्मितेच्या दृष्टीने बघायला गेले, तर या होळीत शोचनीय आणि अपत्यशून्य दहन झाले ते वाइमार प्रजासत्ताकाचे. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जन्मलेली ही प्रजासत्ताक राज्यघटना पूर्णपणे जर्मन होती. १९३० नंतर त्याच्या निवडणुकांमध्ये कोणालाच बहुमत मिळत नव्हते - आघाडी राजकारण... बर्लिनमध्ये कलेसाठी कला म्हणून "आचरट" प्रकार... काही का असेना, हे जे काय चालू होते, ते पूर्णपणे जर्मन होते, आणि ते या आगीत जळून खाक झाले.
ज्यू विचारवंत मेले. पुढे युद्धात नात्सी नवचैतन्याची लक्तरेही हास्यास्पद झाली. जर्मनी ही अमेरिकेची आणि रशियेची राज्यघटना-खेळाची प्रयोगशाळा झाली. जर्मनीची स्वतःची राज्यघटना बनवणारी स्वतंत्र अस्मिता दोन पिढ्यांसाठी नाहिशी झाली. त्या ज्यू "बुद्धिवाद्यांच्या" पुस्तकांबरोबर जळून गेलेल्या वाइमार राज्यघटनेबद्दलही थोडातरी शोक करणे योग्य आहे.
अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याकडून तोडफोड होत असताना "विचारवंत" ही शिवी म्हणून वापरली जाऊ लागली, तर या घटनेचे पडसाद मनात उमटल्यावाचून राहत नाहीत.
वाचने
10365
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
अस्मितेच्
उत्तम प्रकटन
अभ्यासपूर
In reply to अभ्यासपूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि त्याची
In reply to आणि त्याची by निमीत्त मात्र
कारण ह्या
In reply to अभ्यासपूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हल्लीचे जर्मन नागरिक
सुंदर लेख
धनंजय
सुंदर
अगदी नेमका
लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to लेख by नंदन
हेच म्हणतो
In reply to लेख by नंदन
+ १
In reply to + १ by प्रसन्न केसकर
प्रसनदांश
In reply to प्रसनदांश by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
" आयत्या
नेमका
स्वतंत्र
नवीन प्रवास आणि जुने अनुभव
लोकशाहीचे स्मारक
लेख
लेख आवडला.
अनोख्या
वेगळ्या धाटणीचा लेख.
विचारवंत असे कोणी वेगळे नसतात