Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 11/12/2009 - 00:03
  • Log in or register to post comments
  • 32484 views

Book traversal links for परवशता पाश दैवे... ३

  • ‹ परवशता पाश दैवे... २
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by तात्या विंचु on Fri, 11/13/2009 - 01:37

Permalink

फार क्रुरता आहे

मानसंच मानसाशी असा का वागतात हेच कळत नाही. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by नाटक्या on Fri, 11/13/2009 - 01:45

Permalink

बिका साहेब!!!

फक्त मोठ्याने रडायचा बाकी होतो. संगणकाचा पडदा दिसेनासा झाला तेव्हा लक्षात आले की डोळे भरून आलेत. बराच वेळ काही न बोलता शुन्यात बघत बसून होतो. बिका साहेब काळजात हात घालून ओढून काढलेत आपण. असेच लिहीत रहा असा म्हणण्याचा मोह टाळू शकत नाही पण असे लिहू नका. - नाटक्या
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 11/13/2009 - 01:58

Permalink

प्रतिक्रिया

एका ऐतिहासिक घटनाक्रमाचा आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या स्थळाचा इतका उत्तम शैलीत वेध घेतल्याबद्दल बिपिनदा तुझे प्रथमतः अभिनंदन! मिसळपावच्या साहित्यसंपदेला एक अमूल्य भेट असं मी ह्या लेखमालेचं वर्णन करेन! एकतर अशा स्थळांच्या भेटीत आपण सुन्न होऊन दु:खी होतो आणि काही दिवसात ते विसरुन जातो पण तू तुझा अनुभव इथे मांडल्यामुळे त्याला सहसंवेदनेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. करोडो अभागी जीवांनी शेकडो वर्षे जे अत्याचार भोगले त्यातून संपूर्ण जागतिक समाजाचा एक मोठा भाग कायमचा बदलून गेला ह्याच्या एवढी भीषण शोकांतिका असूच शकत नाही! ह्यातून आपण काय शिकणार हे प्रत्येकाने आपापल्या मनाशी ताडून ठरवावे असे वाटते. (अंतर्मुख)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 11/13/2009 - 04:18

In reply to प्रतिक्रिया by चतुरंग

Permalink

सहमत

एका ऐतिहासिक घटनाक्रमाचा आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या स्थळाचा इतका उत्तम शैलीत वेध घेतल्याबद्दल बिपिनदा तुझे प्रथमतः अभिनंदन! बिका, सुंदर लिहिलंयस .....वाचता वाचता वाचणारा मनाने पोहोचतोय तिथे....लेखनासोबत फोटो असल्याने लेखास अजूनच बहार आलीय......लिहित रहा (वाचक)प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 11/13/2009 - 19:02

In reply to प्रतिक्रिया by चतुरंग

Permalink

खरोखरच

मिसळपावच्या साहित्यसंपदेला एक अमूल्य भेट असं मी ह्या लेखमालेचं वर्णन करेन! अगदी बरोबर. अतिशय हेलावून टाकणारा अनुभव. नुसत्या फोटोंवरून काहीच कळले नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 11/13/2009 - 02:11

Permalink

......................^^..........................

नो कॉमेंट्स... वरील सर्वाशी सहमत...................:-( बैलोबा चायनीजकर !!!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 11/13/2009 - 02:23

Permalink

बिपिन

बिपिन गुलामांच्या व्यापरा बद्दल खुप वरवरची माहीती होती. हा काळा इतिहास खुप प्रभावी पण मांडला आहेस. तुझ शब्द सामर्थ्य तर आहेच पण जोडीला प्रकाश चित्रांची संगत असल्याने फार परिणामकारक झालाय संपुर्ण लेख. हा मिपावरच्या आजवरच्या लेखांमध्ये एक उत्कृष्ट लेख गणला जाईल यात तिळमात्र शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Fri, 11/13/2009 - 02:53

In reply to बिपिन by गणपा

Permalink

+१

सहमत.... मिपा सदाबहार राहण्याचे एकमेव कारण म्हणजे तुमच्या सारखे सिद्धहस्त लेखक...
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 11/13/2009 - 03:27

Permalink

फोटो आणि

फोटो आणि माहिती आवडली. हे एल्मिना घाना मधे आहे का? पूर्वी कुठेतरी वाचलेले हे वर्णन आठवले.. गुलामांना बोटीतुन नेताना कमीत कमी खर्चात जास्तित जास्त नेता यावेत म्हणून जहाजात एकमेकावर रचून नेत असत. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त. एकमेकावर रचलेले मानवी देह सर्व शरीरधर्म तिथेच उरकत असल्याने ते कमी व्हावेत म्हणून अन्नपाणी मिळत नसे. त्यातुन काहीजण तिथेच भुकेने दगावले तरी बाकिचा 'माल' सुखरुप पोहचत असे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 11/13/2009 - 03:34

In reply to फोटो आणि by निमीत्त मात्र

Permalink

>>हे

>>हे एल्मिना घाना मधे आहे का? बरोबर!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 11/13/2009 - 03:29

Permalink

प्रभावी

लेखमाला. पहिला आणि शेवटचा भाग विशेष.
राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल, पण इथे तसे नाही.
-- सहमत आहे, अशी भीषण उदाहरणं मुळापासून हादरवतात. दुर्दैवाने रेड इंडियन्स असोत वा पश्चिम आफ्रिकेतले हे शोषित देश; गेल्या पाचशे वर्षांत त्यांचं इतकं खच्चीकरण झालं आहे, प्रगतीचे इतके कमी पर्याय उपलब्ध आहेत की अजूनही गाईड बनून आपल्या इतिहासाबद्दल लोकांना माहिती देणे हे काम मोजक्या भरवशाच्या उत्पन्न देणार्‍या कामांत मोडते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 11/13/2009 - 03:41

Permalink

बिपिनदा, '

बिपिनदा, ' अनुभव' अगदी काळजात रुतला.
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on Fri, 11/13/2009 - 03:56

Permalink

नि:शब्द

नि:शब्द !!! _/\_ सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Fri, 11/13/2009 - 04:35

Permalink

एकदम सुन्न

एकदम सुन्न करनार लेखन. जस तु अनुभवल तसच लिखाणात उतरवल आहेस. मानल ब्वा !! --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 11/13/2009 - 06:13

Permalink

अगदी

अगदी खरंय!! नुसतेच फोटो टाकून वर्णन लिहिलं असतंस तर भावनांची तितकी तीव्रता जाणवली नसती. पण आधीचे दोन भाग टाकल्यामुळे एकप्रकारे त्या घटनांमध्ये गुंतायला झालं होतं. या भागांत फोटो सहीत वर्णन टाकून तू तुझ्या अनुभवांतून आम्हाला जायला भाग पाडलंस... हे नक्कीच तुझ्या लेखणीचे श्रेय आहे. जे लिहिलं आहेस ते विलक्षण आहे. या लेख मालेमुळे मिपाला एका वेगळ्याच उंचीवर तू नेऊन ठेवलं आहेस. अभिनंदन!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Fri, 11/13/2009 - 07:03

Permalink

निशब्द करुन टाकलंत

राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले वाचता वाचता मनाने कधी शेवटच्या खोलीत पोचलो कळलेच नाही. त्या असंख्य पीडीतांना श्रध्दांजली मनोमन वाहिली गेली. अत्यंत नीच पध्दतीचा व्यापार \ व्यवहार गोर्‍या माकडांनी मनापासुन केला, त्याचा कुठलाही प्रकारचा पश्चात्ताप ह्यांना झालेला दिसत नाही. आपल्या भारतात सुध्दा अश्या प्रकारचा व्यापार चांगला फोफावला होता. बिपिनदा, तोडलंत तुम्ही. तुम्ही ती जागा फक्त प्रेक्षणीय स्थळ म्हणून न बघता, ती जागा जगलात, अनुभवलीत. फार कमी लोकांना हे जमतं.. तुम्हाला सलाम. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 11/13/2009 - 07:07

Permalink

उत्तम!!

एल मिना चे फक्त फोटो टाकून विशेष परिणाम झाला नसता जितक्या ह्या तीन भागाच्या मालीकेमुळे झाला आहे. आता हे एक साधारण प्रवासवर्णन न रहाता भावविश्व समृद्ध करणारे अनुभववर्णन झाले आहे. आपले आयुष्य किती सुखी आहे व समाजासाठी आपण अजुन काही तरी भरीव कार्य करावे असे वाटायला लावणारे लेखन. बिका बोलतात जितके उत्तम, त्यांचे लेखन देखील तितकेच कसदार. खरोखर एक सिद्धहस्त लेखक आहेत. बिकांशी ओळख असल्याचा आता अतिशय "गर्व" वाटतो आहे :-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 11/13/2009 - 16:58

In reply to उत्तम!! by सहज

Permalink

आता हे एक

आता हे एक साधारण प्रवासवर्णन न रहाता भावविश्व समृद्ध करणारे अनुभववर्णन झाले आहे. अगदी हेच म्हणतो बिका. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 11/13/2009 - 07:14

Permalink

दोनवेळा

दोनवेळा धाग्यावर येऊन प्रतिक्रिया न देताच गेले. तुझ्याबरोबर वाचकही म्हणून मीही वेदनेच्या प्रांतातून फिरून आले. लेखनशैली अप्रतीम! तुझ्या लेखनानुसार पहायचे झाले तर 'तुटलेपण', 'नाकारले जाणे '(मानवजातीकडून) हा अमानुषपणाचा कळस होता. जे जहाजातून वाहून नेले गेले ते जर परत मूळ भूमीवर काही काळानंतर आले असते तरी त्यांचा अंत हा ठरलेलाच होता असे वाटले. स्वतःच्याच भूमीत काही काळानंतर बस्तान बसवताना नाकारले जाण्याची प्रथा अजूनही आहे.......वेगळ्याप्रकारे असेल, वेगळ्या नावाने असेल्.....पण आहे..... असे बर्‍याच वेळा मनात येऊन जाते. त्यासाठी एखाद्या घरकाम करणार्‍या मोलकरणीचे उदाहरण द्यायची गरज नाही तर घरातील एखादी व्यक्ती नोकरीसाठी परदेशी/परगावी असताना बाकीचे सदस्य त्याच्या/तिच्याशिवाय जगणे शिकतात इतकेच नाही तर अशीही उदाहरणे वाचनात आलेली आहेत की वीसेक वर्षांनी परत आल्यावर घरातून तेव्हढा स्विकार होत नाही आणि ते साहजिक वाटते. मानसिक गुलामी हा विषय अवांतर होइल म्हणून इथेच थांबते. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 11/13/2009 - 08:13

Permalink

म हा न!!

म हा न!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 11/13/2009 - 13:35

Permalink

एक वेगळीच

एक वेगळीच लेख माला... पहिला भाग वाचुन मला कथेचा नीट अंदाज आला नव्हता... असं काही वाचलं की मन अतिशय सुन्न होऊन जातं... :( मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
  • Log in or register to post comments

Submitted by नितीनमहाजन on Fri, 11/13/2009 - 09:44

Permalink

सुन्न

माणसा कधी होणार तू माणूस?? नितीन
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 11/13/2009 - 09:59

Permalink

बिपिनदा

बिपिनदा लेखमाला विशेष आहे... राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल सहमत आहे... बिका संदर लिहिले आहे... तुमच्या सोबत त्या शेवटच्या खोलीत कधी पोहचलो कळलेच नाही. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बकुळफुले on Fri, 11/13/2009 - 10:01

Permalink

नि:शब्द

नि:शब्द .......... नरेची केला नर किती हीन...... गुलामांचा व्यापार ही अरबांची ची देणगी. असेच एक वर्णन संभाजीच्या चरित्रात आहे. मराठी तरुणाना गुलाम म्हणून विक्रीसाठी एका जहाजात पकडून ठेवले होते. संभाजीने त्यांच्या सोडवणुकीसाठी दिलेरखानाकडे दरखास्त केली तेंव्हा त्या सर्व तरुणांचे हात तोडून त्याना स्वतंत्र करण्यात आले
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Fri, 11/13/2009 - 10:32

Permalink

सुन्न-------

वाचून सुन्न व्हायला झाले.'नरेचि केला हीन नरे किती बरे'असेच म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 11/13/2009 - 11:42

Permalink

बिकाभौ

बिकाभौ रडवलत आज . :-( असाच सुन्न करणारा अनुभव अंदमानचे सेल्युलर जेल पाहताना आला होता. आठ दिवस अंदमान अंदमानमधे होतो कंपनीच्या कामासाठी. शेवटचे तीन दिवस मिळाले होते फिरायला. पण सेल्युलर जेल पाहील्यावर बाकी कुठे फिरायची इच्छाच राहीली नव्हती. :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Fri, 11/13/2009 - 12:00

Permalink

प्रतिक्रिया

प्रतिक्रियेसाठी खरतर शब्द नाहीत. तरीपण एक अत्युच्च लेखमालेबद्दल तुमचं अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Fri, 11/13/2009 - 12:09

Permalink

मिपाच्या लेखनातील एक वैभव....

खरचं समानुभुतीचा दाखला मिळाला तुमच्या लेखातुन. असं म्हणतात, एखाद्याच्या वेदना 'समजल्या' की मनात सहानभुती निर्माण होते, अन् त्या वेदना 'जाणवल्या' की समानुभुती. खरचं, लेखन इतकं प्रभावी झालयं, कशा सहन केल्या असतील त्या मरणाच्या यातना..... साधा विचार आला तरी सुन्न होतं आधीच्या दोन भागांमुळे लेखमाला जबरदस्त... झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 11/13/2009 - 12:56

Permalink

बिका

_\/_
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Fri, 11/13/2009 - 13:00

Permalink

काय

काय प्रतिक्रिया द्यायची तेच सुचत नाहीये...ज्या लोकांना पकडून नेलं त्यांना तर अतिशय क्रुर-निष्ठूर जीवन जगावं लागलं पण त्यांच्या मागल्यांचंही तेच झालं... :( दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 11/13/2009 - 13:06

Permalink

डेडली !!

डेडली !!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 11/13/2009 - 13:17

Permalink

बिपिनदा,

बिपिनदा, अतिशय उत्तम लिहिलं आहेत, पण तितकच सुन्न करणारं हे कथन आहे... वाचणं कठीण होत जात...
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 11/13/2009 - 13:20

Permalink

प्रभावी

प्रभावी लिखाण.. सुन्न करणारा अनुभव.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Fri, 11/13/2009 - 13:27

Permalink

अक्षरशः टाईममशीन...

मधे बसल्याचा अनुभव दिलास बिपिनदा. वेगळ्या काळात, वेगळ्या खंडात, वेगळ्या देशात नेऊन आणलंस अन तेव्हाच्या त्या माणसांच्या वेदना काळजाला भिडवल्यास. _/\_ गुलामी ही नेहमीच वाईट मग ती अफ्रिकेतल्या लोकांची असो वा भारतातली दासी, बटकिणी, कुळंबिणी अश्या नावांनी झाकलेली असो. अन गुलामांच आयुष्यही तसंच - अमानवीय अत्याचारांनी भरलेलं. हे जिणं कुणाच्याही नशीबी कधीही न येवो.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Fri, 11/13/2009 - 14:08

Permalink

....

अंगावर सरसरून काटा आलाय, आणि डोळे पाणावलेत. बिपिनदा...अनुभव जिवंत करण्याच्या शैलीबद्द्ल तुला सलाम!!!
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Sat, 11/14/2009 - 08:02

In reply to .... by मनिष

Permalink

अगदि अशीच अवस्था

फार प्रभाविपणे मांडलय सारं..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 11/13/2009 - 14:13

Permalink

चांगली

असे कसे म्हणू? तरीही म्हणतो. लेखमाला अजून प्रभावी झाली असती का? अर्थातच, यातच असलेल्या एक प्रकारच्या जंपकट्स तंत्राच्या आधारे ती अजून प्रभावी करता आली असती का? हे आणि असे प्रश्न ज्या अर्थी डोक्यात निर्माण होताहेत, त्या अर्थी लेखमाला पोचली.
  • Log in or register to post comments

Submitted by शुभान्कर on Fri, 11/13/2009 - 15:25

Permalink

हा सर्व

हा सर्व परिसर फिरताना मी सतत अस्वस्थ होतो. लहानपणापासून या विषयावर वाचलेली सगळी माहिती सतत आठवत होती. गाईड कडून नविन तपशिल कळत होते. अस्वस्थतेत भर पडत होती. 'शेवटच्या खोलीत' मात्र क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो, त्या असंख्य अनाम आत्म्यांना श्रध्दांजली वाहिली. राक्षसी अत्याचारांच्या, जिवंत माणसांना पशूंना डागतात तसे डागण्याच्या कथा ऐकल्या. राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. नि:शब्द .....
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Fri, 11/13/2009 - 15:50

Permalink

जबरदस्त

जबरदस्त लेखन.... सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 11/13/2009 - 16:02

Permalink

आता काय

आता काय लिहावे सुचत नाही. पण आधी दिलेल्या कथांमुळे हे सगळे पोचले. हे अफ्रिकन्स तिथे अमेरिकेत नंतर कसे एस्टाब्लिश झाले हे वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 11/13/2009 - 19:14

Permalink

काय बोलु?

काय बोलु? बोलण्यासारख काहि नाहिये भाउ. :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 11/13/2009 - 19:25

Permalink

सुंदर!

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 11/14/2009 - 06:34

Permalink

अंगावर काटा आला

लेखन प्रभावी झाले आहे. आणखी काही लिहावेसे वाटत नाही. १९ व्या शतकात भारतातूनही वेस्ट इंडिज बेटांपर्यंत भारतीयांना अगदी गुलाम म्हणून नाही पण मजूर म्हणून (म्हणजे तेच ते ) नेण्यात आले होते. हे कार्य डचांचे होते असे वाटते. त्यांच्याविषयी विशेष वाचायला मिळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sat, 11/14/2009 - 09:01

Permalink

दंडवत!!!!!

बिपिनदा, तुझ्या अप्रतिम लेखनशैलीला दंडवत! इतका विलक्षण अनुभव अगदी जीवंत केलास, एकेका पात्रात गुंतून गेलं होतं मन. खरंच नुसतं प्रवासवर्णन किंवा फोटो टाकून हे साधलं नसतं. कमालीचं लिखाण आहे! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 06/16/2011 - 19:07

Permalink

सुन्न... खिन्न...

बाप रे!! काय वाचलं मी हे, असं झालंय. पहिला भाग वाचून काही अंदाजच नाही आला म्हणून पुढे वाचलं तर वाचवतही नव्हतं आणि सोडूनही देता येत नव्हतं. हे सर्व अंगावर काटा, डोळ्यात पाणी याच्या पलिकडचं आहे. स्वतःच्या शिष्टाचार-सभ्यतेची शेखि मिरवणार्‍या या गोर्‍यांना त्यांच्यातच असलेला रानटी पशू कधी दिसलाच नसेल का? :( बिकांनी असा विषयही इतक्या प्रभावीपणे आणि संयत शब्दात मांडलाय हे विशेष. तिन्ही भाग झपाटल्यासारखे वाचून १० मिनीट शांत बसूनही काही लिहायला शब्दच सुचत नाहित.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 06/16/2011 - 23:16

Permalink

पुन्हा वाचले

पुन्हा वाचले आणि सुन्न पुन्हा झालो ..
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Fri, 06/17/2011 - 10:57

Permalink

लेखनात जबरदस्त ताकद आहे...

बिका, तुझ्या लेखनात जबरदस्त ताकद आहे. लेखणीला शांत बसू देऊ नकोस.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 06/17/2011 - 11:37

Permalink

धन्यवाद! धागा अवचित वर आला

धन्यवाद! धागा अवचित वर आला आणि मी पण त्या आठवणीत हरवलो... परत.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 06/17/2011 - 11:41

Permalink

अतिशय उत्कृष्ट लिखाण, अप्रतिम

अतिशय उत्कृष्ट लिखाण, अप्रतिम लेखनशैलीला दंडवत. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 06/17/2011 - 11:53

Permalink

.

.. .... .............
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com