ऑफिसात नसलीस की हिरमुसतो मी
सध्या तर गम्मतच ऑनलाइन झुरतो मी
कधी तु बिझी, कधी तु अवे
तुझ्याभोवतीच ऑनलाइन पिंगा घालतो मी
असलीस ऑनलाइन की
तासनतास तुझ्याच फोटोकड़े बघतो मी
डेरिंग नाही होत पिंग करायची
नावावर उगाच माउस नेतो मी
तु नसतेस ऑनलाइन,
तरी उगाच तुला ऑफलाइन पिंगतो मी
कम्युनिकेटरवर गप्पांचा पाउस
समोर आलीस की मात्र गप्प बसतो मी
बीसीसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन
प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी
काय अन कसे सांगु मी
चॅटिंग करता करता ब्लशतो (लाजतो) मी
काहीतरी शोधायची ओढ आहे मनात
हजार वेळा जुनेच चॅट लॉग रिडतो (वाचतो) मी
सध्या कामात लक्ष कुठे आहे
आजकाल ऑनलाइन कविता पाडतो मी
ज़रा विचित्रच आहे ना मी
पण आजकाल असाच वागतो मी
सांगायचे आहे तुला मनीचे बिंग
सांगत काहीच नाही नुसताच पिंगतो मी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3476
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
डेरिंग
मस्तच रे
मालक,
हा हा हा....
In reply to मालक, by अवलिया
नाही असे
In reply to मालक, by अवलिया
फारंच
सिसी मध्ये
अरे
In reply to सिसी मध्ये by बकुळफुले
अरे
In reply to अरे by गणपा
अरे
In reply to अरे by गणपा
जबरा
हॅ हॅ !!
मराठीतील
पाषाणभेद
...
खुप मस्त