Skip to main content

मृगजळ

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 05/11/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू नाहीस, की जसा पाउसही नाही चातकास मेघाचे दर्शनही नाही हुडकत होतो प्रेमाचा झरा मी नशीबास मंजुर मृगजळही नाही वेड्या मनास साथ असे सुरांची रडण्यास खांदा जवळ एकही नाही आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही मिळता न तु सांग काय करेन मी? "तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही" काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना
काव्यरस

वाचने 2672
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by धमाल मुलगा

+१ उगी उगी... शांत हो बघू.... ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by प्रसन्न केसकर

:) अरे कुणतरी ह्याला मदत करा रे... कविता वाचण्याची माझी हिंमत होत नाही आहे आजकाल ह्याची =)) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

चालु द्या !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो अरे हि कविता म्हणजे... (क्रमशः) प्रतिसादाचा हा भाग आवडल्यास पुढचा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

वरील सर्व समुपदेशकांचे आभार.....सांगितलेले उपाय ट्राय करेन :) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!