Skip to main content

आठवतात का ते क्षण तुला?

लेखक झंडुबाम यांनी मंगळवार, 03/11/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतात का ते क्षण तुला? किती सहज विचारले होतेस आवडते का मी तुला? खूप विश्वासाने दिला होता होकार तुला..... कारण वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला. आठवतात का ते क्षण तुला? किनार्‍यावर वाळूत खेळताना,वाळूत आपली नावे लिहिताना, आलेल्या लाटेने फक्त माझेच नाव पुसल्याचे जाणवले होते मला. वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला आठवतात का ते क्षण तुला? एकत्र प्रेमाच्या आणाभाका खाताना ,शेवट पर्यंत साथ देण्याचं वचन देताना का कुणास ठावूक पण आभाळ भरुन आल्याचं आठवय मला. वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला आठवतात का ते क्षण तुला? किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना, पण तेव्हा मात्र धुसर दिसत होतं सगळचं मला.... वाटले नव्ह्ते.............. मिपा वर लिहिण्याची पहिलीच वेळ ,कविता कशी वाटली ते सांगा.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2724
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

प्रेमभंगाची छान कविता.. (अधिक माहीतीसाठी राजेंना भेटा..) सू हा स...

मिपा वर लिहिण्याची पहिलीच वेळ ,कविता कशी वाटली ते सांगा.
आठवतात का ते क्षण तुला ? लिहीलेलं तू छाण आवडतं मला :) -- आयोडेक्स सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच ,अशावेळेस "आयोडेक्स मलिये , काम पे चलिये"

In reply to by टारझन

सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच . खरे आहे, नव्याने सुरुवात करायची. :D चुचु

सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच ,अशावेळेस "आयोडेक्स मलिये , काम पे चलिये" काय बोललात टारझन..! लाखांत एक..! झंडुबाम, तुम्ही केलेली कविता छान आहे.. :) पण जर खरेच तसे काही असेल तर टारझनांचा सल्ला माना.. --सुहास

कवितेतील प्रश्नकर्ता नेमका कोण आहे ? स्त्री की पुरूष? १ल्या कडव्यात 'खूप विश्वासाने दिला होता रे होकार तुला.....' असे लिहीले आहे आणि शेवटी 'किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना,' असे लिहिले आहे.