✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझे खाद्य-पेय जीवन-२

स
सन्जोप राव यांनी
Fri, 10/30/2009 - 07:01  ·  लेख
लेख

Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-२

  • ‹ माझे खाद्य-पेय जीवन-१
  • Up
  • माझे खाद्य-पेय जीवन-३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30502 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

अजून एक चविष्ट लेख

संदीप चित्रे
Fri, 10/30/2009 - 19:42 नवीन
व्हिस्कीचे वाक्य, इडली म्हणजे कोण आणि दोन ओठ वेगवेगळ्या रंगांनी ... ही वाक्यं खूपच आवडली :) रतिक्लांतवरून आठवलं आमचा एक मित्र एखादा पदार्थ अगदी मनापासून आवडला की दाद देण्यासाठी इंग्रजीतून हाच शब्द वापरतो :)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Fri, 10/30/2009 - 19:46 नवीन
हेच म्हणतो. लेख आवडला. और आनेदो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

रोचक

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 10/30/2009 - 23:51 नवीन
श्री चित्रे, मित्राचा अभिप्राय रोचक वाटतो. एका 'खोल गळा' (शब्दशः मराठी भाषांतर. जिज्ञासूंनी आंतरजालावर स्वतः शोध घ्यावा. हापिसात असाल तर स्वतःच्या जोखमीने शोध घ्यावा.) नावाच्या चित्रपटात असाच काहीसा गोंधळ आहे, हे पाहील्याचे नाही पण ऐकल्याचे आठवते. ....................................... "If you can't annoy somebody with what you write, I think there's little point in writing." Kingsley Amis, British novelist, 1971
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

चांगला प्रयत्न

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 10/30/2009 - 20:32 नवीन
श्री राव चांगला प्रयत्न. काही न पटलेले मुद्दे: १. उपमांचा (उपम्यांचा नाही) भरमसाठ वापर २. 'खाण्यार्‍या' हे खाणार्‍या असे हवे होते. ३. "इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे." इडली-चटणी असे आवडणार्‍या लोकांनी काय करावे? ४. 'बिझनेस स्टँडर्ड' सोडून 'इकॉनॉमिक टाइम्स' सारखे घाणेरडे पीतपत्र वाचणे. ५. नाश्त्यात अंड्यांची अनुपस्थिती ६. 'टायचा सामोसा' काय हे? ....................................... "If you can't annoy somebody with what you write, I think there's little point in writing." Kingsley Amis, British novelist, 1971
  • Log in or register to post comments

आभार

सन्जोप राव
Sat, 10/31/2009 - 08:31 नवीन
पहिल्या आणि दुसर्‍या भागाला प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे आभार मानतो. सन्जोप राव Hemorrhoid is best irritated through neglect ....... Sabjop Raav 2009
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

बेष्ट !

मिसळभोक्ता
Sat, 10/31/2009 - 08:50 नवीन
Hemorrhoid is best irritated through neglect ....... रावसाहेब, दंडवत स्वीकारा.... (फक्त, इरिटेटेड च्या ऐवजी इरिगेटेड हवे. नीट धुतले की मोठे होते गळू. नाही का ? त्यापेक्षा धुवायलाच नको ! सडेल, आणि गळून पडेल.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

वा वा !

मिसळभोक्ता
Fri, 10/30/2009 - 21:46 नवीन
रावसाहेब ! मस्तच ! अस्सल कुलीन गायकाला जशी तानेगणिक दाद पाहिजे असते आणि मैफिलभर शांतता पाळून शेवटी फक्त 'कर्टन कॉल' करण्याने त्याचे समाधान होत नाही, तसे मिसळीला दाद घासागणिक आणि घसागणिक गेली पाहिजे. मिसळीच्या पहिल्या घासात पंचेद्रिये जागृत होत नसतील, तर त्यापेक्षा उकडलेला बटाटा खावा. असेच म्हणतो. (पूर्वाश्रमीचा "उकडलेला बटाटा" प्रेमी, आता केवळ मिसळभोक्ता.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

-१

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 10/30/2009 - 22:20 नवीन
श्री मिसळभोक्ता, मेक्सिकन मिसळ अंमळ सपक लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

क्या बात है!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/30/2009 - 21:52 नवीन
दोन्ही लेख एकदमच वाचले. मजा आली. चौफेर फटके... पुढच्या भागांची वाट बघत आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त लेख

आनंद घारे
Fri, 10/30/2009 - 22:07 नवीन
याचे भाषांतर करून कोणीतरी त्या किंग्स्ली अमिसला वाचून दाखवला पाहिजे. म्हणे, "If you can't annoy somebody with what you write, I think there's little point in writing." Kingsley Amis, British novelist, 1971 कोणालाही न डिवचता किती छान लिहिता येते हे आमच्या संजोपरावांकडून शिकून घे म्हणावं. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ड्रॉपआउट

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 10/30/2009 - 22:26 नवीन
श्री घारे, किंग्स्ली अमिस नाहीत. तुम्ही ईहलोकातील सत्यावरच विश्वास ठेवत असल्याने पलिकडच्या जगात गेले असे म्हणत नाही. त्यांचे पुत्र 'मार्टीन अमिस' हे अत्यंत आवडते लेखक आहेत. जमल्यास त्यांना श्री राव यांचा लेख पाठवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

अरेरे...च् च च ..

आनंद घारे
Sat, 10/31/2009 - 08:33 नवीन
दिवंगत किंग्स्ली यांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे त्याला शांती लाभो. मी प्रतिसादात दिलेले वाक्य तुमच्याच प्रतिसादातून उचलले होते. नाहीतर माझ्यासारख्या मिसळपाव, सामोसा आणि इडलीदोसा खाणार्‍याला हे पितापुत्र कुठून ठाऊक असणार? पण कशी कुणास ठाऊक, टायची गाठ मारतांना सामोसा बनवायला मात्र जमतो, त्यामुळे लग्नाला उभा राहणार्‍या नवरदेवाला सजवतांना मला बोलावले जाते! आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

मी बापडा पोळी भाजीवाला

रामदास
Fri, 10/30/2009 - 23:43 नवीन
उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. झालं.एका नविन दंगलीची सुरुवात करणार वाट्टे तुम्ही. पोहे रतलामच्या पुढे सकाळी रस्त्याकडेला असणार्‍या अड्ड्यावर समोसे आणि कचोरी खाऊन झाल्यावर ,अचानक भूक लागली तर पंचाईत नको व्हायला असे म्हणत खाऊन घ्यावे. पोह्यातले शेंगदाणे कच्चे असावेत की भाजलेले हा फार मोठा प्रश्न आहे बॉ. थोडं दक्षीणेकडे कुरमुरे भिजवून सुसला करतात तोही अधूनमधून खावा. पोह्यावर डाळींबाचे दाणे टाकणार्‍यांचा निषेध असो. मांजर(बोका) जसं प्रत्येक उघड्या खिडकून डोकावून बघतं तसा मी प्रत्येक शहराची न्याहारी खाल्ली आहे. पण आताशा रोजचा नाश्ता पोळीभाजीचा बरा वाटतो. सगळे प्रकार करून झाल्यावर मिशनरी हेच खरे सोयीचे सुख.
  • Log in or register to post comments

सगळे

निमीत्त मात्र
Fri, 10/30/2009 - 23:46 नवीन
सगळे प्रकार करून झाल्यावर मिशनरी हेच खरे सोयीचे सुख.
हाहाहाहाहाहा..ये लगा सिक्सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

सांकेतिकता!

सन्जोप राव
Sat, 10/31/2009 - 06:51 नवीन
सगळे प्रकार करून झाल्यावर मिशनरी हेच खरे सोयीचे सुख. व्वा! याला म्हणावी सांकेतिकता! हिंदी चित्रपटसृष्टीत लैंगिक विषयांवरचे सिनेमे का निघत नाहीत या प्रश्नाला कुणीतरी 'इषारा' काफी है असे उत्तर दिले होते, ते आठवले.... सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

फाफडी

आनंद घारे
Sat, 10/31/2009 - 08:13 नवीन
मी प्रत्येक शहराची न्याहारी खाल्ली आहे. अहमदाबादच्या रस्त्यांरस्त्यावर हातगाडीवर सकाळी मिळणार्‍या फाफडीच्या तलवारी मोडून चाखल्या असतीलच. मला तर त्यांना पाहूनच चाखल्याशिवाय राहवले गेले नाही. उत्तरेकडे जिलबी हे (ल्ग्नाच्या) जेवणातले पक्वान्न नसते, सकाळी सकाळी नाश्त्याला दूध जलेबीवर ताव मारायचा असतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अवांतरः फाफडा

प्रदीप
Sat, 10/31/2009 - 17:42 नवीन
अहमदाबादेत रहात असतांना जवळच्या वस्तीत एक नवे हलवायाचे दुकान उघडले. त्यावरील 'फाफडानो दर्यो' हा ठळक बोर्ड अजून आठवतो! दर्या कशाकशाचा असू शकतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

सकाळची

स्वप्निल..
Sat, 10/31/2009 - 00:12 नवीन
सुरुवात मस्त झालीय :) >>खरे थालीपीठ ज्याचे होते ती नुसती भाजणी तशीच खावी इतकी खमंग असते. ......... असे एकच थालीपीठ खावे आणि त्याच्या आठवणीवर सहा महिने काढावेत. काय आठवण .. मी याच आठवणीवर गेले २ वर्ष काढतोय :( स्वप्निल
  • Log in or register to post comments

उत्तम

भडकमकर मास्तर
Sat, 10/31/2009 - 00:14 नवीन
उत्तम लेख मजा आली _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Sat, 10/31/2009 - 01:38 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

नागपूरला

अमोल नागपूरकर
Sat, 10/31/2009 - 09:43 नवीन
नागपूरला भाजलेल्या गव्हाच्या कणकेची उकडपेन्ढी करतात. तीही मस्त असते. किंवा उन्हाळ्यात सातूचे पीठ तेल तिखत मीठ लावऊन खाल्ल्या जाते.
  • Log in or register to post comments

फार भारी

फ्रॅक्चर बंड्या
Sat, 10/31/2009 - 10:03 नवीन
फार भारी लेख... पु.ल. सारखे लिहले आहे...
  • Log in or register to post comments

ए़क अतिशय "चविष्ट " लेख...

नाखु
Sat, 10/31/2009 - 10:05 नवीन
खुप आवडला.. आणि हे वाक्य विशेष.. उत्साही सकाळची उदात्त परीपूर्ती म्हणजे नाश्ता. नाश्ता असा असावा, की जो करुन झाला की त्या इंग्रजी कवीप्रमाणे 'स्वर्गात देव आहेत, आणि एकंदरीत जगाचं बरं चाललं आहे' असं वाटायला लागावं! आपल्या लेखा मुळे वाचकांच्या "खाद्य स्मृती" नक्की जागवल्या आहेत. लेखामध्ये या खाद्य तीर्थक्षेत्राची (जवळील खुणेसह) नावे द्यावीत हि विनंती.. "विरंगुळा" बाबत आपले निरिक्षण १०००% बरोबर... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

'कॉटिनेंटल नाश्ता'

वाचक
Sun, 11/01/2009 - 01:44 नवीन
राहीला की - बेगल्स, क्रीम चीझ, एखादे फळ आणि काळी कॉफी :) आणि रावसाहेब: 'नरक चतुर्थी' चा फराळ ? उसंडु :)
  • Log in or register to post comments

अगदी फर्मास खमंग लेख

लवंगी
Sun, 11/01/2009 - 02:02 नवीन
परत परत वाचावासा असा.
  • Log in or register to post comments

लय भारी...

स्वाती दिनेश
Sun, 11/01/2009 - 12:01 नवीन
हा भागही मस्तच... लवकर टाका ३रा भाग.. स्वाती
  • Log in or register to post comments

वाहवा...

मन१
Sun, 09/02/2012 - 17:49 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments

मस्त लेख

रश्मि दाते
Sun, 09/02/2012 - 19:38 नवीन
पहिला भागा ची लिंक द्या ना
  • Log in or register to post comments

थालीपीठ

सदानंद ठाकूर
Mon, 09/03/2012 - 19:32 नवीन
थालीपीठ फक्त आजीलाच करता येते (सॉरी बायको).
  • Log in or register to post comments

वा!!!

शुचि
Sat, 02/09/2013 - 06:27 नवीन
परत वाचला. फार मजा आली.अप्रतिम लेखनशैली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा