✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझे खाद्य-पेय जीवन-२

स
सन्जोप राव यांनी
Fri, 10/30/2009 - 07:01  ·  लेख
लेख

Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-२

  • ‹ माझे खाद्य-पेय जीवन-१
  • Up
  • माझे खाद्य-पेय जीवन-३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30502 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

झकास!! >>इडली

घाटावरचे भट
Fri, 10/30/2009 - 07:51 नवीन
झकास!! >>इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे. सांबारस्वरुपी नवरा कायम संतापी, पण त्याच्याशिवाय इडलीला अस्तित्व नाही. हे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Sat, 10/31/2009 - 01:05 नवीन
लै भारी लेख! म्हणुनच आम्ही म्हणतो की संजोपरावसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

:)

एकलव्य
Sat, 10/31/2009 - 07:12 नवीन
लै भारी लेख! म्हणुनच आम्हीही म्हणतो की संजोपरावसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

हा ही भाग

मदनबाण
Fri, 10/30/2009 - 08:13 नवीन
हा ही भाग मस्त... :) सकाळी सकाळी एव्हढ सर्व खाद्यमय वाचुन आता खरचं भुक लागली... (१ नंबरी खादाड) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

क्या बात

प्राजु
Fri, 10/30/2009 - 08:18 नवीन
क्या बात है!! हा भागही दृष्ट लागण्यासारखा उत्तम जमून आला आहे. बर्‍याच ठिकाणी खुदकन हसू आले.. अतिशय खुसखुशीत आणि मिसळी इतकाच चमचमीत झाला आहे. :) पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगदी सहमत !!

अनिल हटेला
Fri, 10/30/2009 - 22:15 नवीन
क्या बात है... वाकई क्या बात है.... हा भागही दृष्ट लागण्यासारखा उत्तम जमून आला आहे. अगदी सहमत ....:-) बर्‍याच ठिकाणी खुदकन हसू आले.. अतिशय खुसखुशीत आणि मिसळी इतकाच चमचमीत झाला आहे. बिल्कूल..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत. आम्हीही........पू भा प्र....... :-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

छान लेख.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/30/2009 - 08:27 नवीन
छान लेख. मिसळीचे खरे यश मात्र शँपल मधेच आहे असे मी मानतो. शँपल छप्परतोड असेल सेंपलखाली पोहे, बटाटे, चिवडा काहीही चालून जाते. रावांचा लेख अपेक्षेप्रमाणे खुसखुशीत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

रावसाहेब,

Nile
Fri, 10/30/2009 - 09:04 नवीन
रावसाहेब, दिल खुश केलंत! वाचताना सगळी नेहमीची ठिकाणं आठवली अन वाटलं, लेका दे सोडुन हे सारं अन जा परत कर मजा! जाउद्या शब्दात का सांगता येणार हे. येउद्या राव, सगळ्याची तहान वाचुन भागवावी लागणार.
  • Log in or register to post comments

हा भागही

बेसनलाडू
Fri, 10/30/2009 - 10:38 नवीन
खूपच चविष्ट! आणखी येऊ देत. (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सांजा ?

विष्णुसूत
Fri, 10/30/2009 - 10:51 नवीन
उपमा जाति मधे "सांजा" हा प्रकार विसरलात का वगळलात?
  • Log in or register to post comments

असेच

अमोल नागपूरकर
Sat, 10/31/2009 - 09:38 नवीन
असेच म्हणतो. उपमा आणि सान्जा ह्यातील फरक काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत

सांज्या चा

विष्णुसूत
Sun, 11/01/2009 - 06:31 नवीन
सांज्या चा ओझरता का होईना पण उल्लेख हवा होता असे वाटले. त्या शिवाय उपमा हि 'जात' पुर्ण वाटत नाहि. असो. पुर्वी सांजा हा प्रकार एखाद्या लग्नात पहाटे /सकाळी अगदि हमखास असायचा. त्यावरुन लग्नातल्या आचारी लोकांचा अंदाज येयचा. हमखास हा सांजा लवकर संपायचा. आता बहुदा अशी लग्न होत नसावीत ! जुन्या लोकांना अशा लग्नांची आठवण जरुर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर

मिसळीत

विजुभाऊ
Fri, 10/30/2009 - 10:55 नवीन
मिसळीत सांबार ? #:S :O ऑ ! मिसळीवर झणझणीत रस्सा असतो. श्री ची मिसळ खाल्ली नाही वाटते कधी बापरे उद्या रसगुल्ल्यावर चहा ओतून प्याल :SS पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मस्त...वाचतोय...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/31/2009 - 10:56 नवीन
मिसळीत सांबर म्हणाले, नशिब आपलं ! गरमागरम भोकं पाडलेले थालपीठ चहात बूडून खाण्याच्या आनंदाचे वर्णन नाही आले, आले तरी म्हणायचं, क्या बात है ! तसेही अजून ठरावीक पट्टीतले लेखन आले नाही. जसे, हिवाळ्यातली उबदार गोधडीतील सकाळ असावी. आपल्याच परसातल्या जाईच्या फुलांचा सुगंध दरवळलेला असावा. वाफाळत्या उपम्याची प्लेट हातात घेऊन घरभर फिरण्याचा मूड व्हावा. खय्याम साहेबांनी बांधलेली चाल आणि आशाताईंचा थेट हृदयाला भिडणा-या 'दिल चीझ क्या है...च्या आलापात सकाळ मोहरुन जावी. बायडीनं लाडात येऊन उपम्यावर खोबरं पेरावं. नाजूक हातातल्या बांगड्यांच्या किणकिणण्याचा आवाज मनभर गुंजत राहावा. आता पुरे, आता पुरे, असे म्हणत असतांना हात तसाच गळून पडावा......इ.इ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

धुंधुर्मास (धनुर्मास)

आनंद घारे
Sun, 11/01/2009 - 07:54 नवीन
हिवाळ्यातली उबदार गोधडीतील सकाळ असावी यावरून आठवले. संक्रांतीच्या आधी धनुर्मास येत असे. त्या दिवसात निदान भोगीच्या सकाळी तरी गरमागरम आनि नरम मुगाची खिचडी, त्यावर खोवलेले खोबरे, बाजरीच्या भाकरीवर लोण्याचा गोळा, सोबतीला भरली वांगी असा मस्त बेत असायचा. डॉक्टरसाहेबांनी सुचवलेल्या इतर गोष्टी माझ्या लहानपणी एकत्र कुटुंबात शक्य नव्हत्या, आता त्या जोडायला हरकत नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/02/2012 - 22:13 नवीन
च्यायला, काय भारी प्रतिसाद लिहायचो राव मी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्च..पूर्वीचे प्राडॉ राहिले

बॅटमॅन
Mon, 09/03/2012 - 18:15 नवीन
च्च..पूर्वीचे प्राडॉ राहिले नाहीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

मितभाषी
गुरुवार, 09/06/2012 - 10:54 नवीन
:D असेच म्हणतो. अवांतर : लेख फक्कड जमलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>पण नाश्ता

शिप्रा
Fri, 10/30/2009 - 10:55 नवीन
>>पण नाश्ता कोणताही असो, त्याने 'अन्नादाता सुखी भवः' असे म्हणावेसे वाटले पाहिजे. एकदम पटले ..एकुणच लेख चमचमीत झाला आहे :)
  • Log in or register to post comments

मस्त

चेतन
Fri, 10/30/2009 - 11:15 नवीन
रावसाहेब मस्त लेख झालाय. चेतन अवांतरः हे नक्की बल्लवाचार्य आहेत कि खवय्ये ( की नुसतेच कवी जे न देखे रवी)
  • Log in or register to post comments

लई भारी!

सनविवि
Fri, 10/30/2009 - 11:16 नवीन
आहाहा! तोंडाला पाणी आणलंत! इथे बेंगळूरात रोज इडली-डोसा खाऊन कंटाळा आलाय! पोहे हा प्रकार इथे अस्तित्वातच नाही हे कळल्यावर कीव वाटली इथल्या पामरांची! // उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. // याची मात्र काही गरज नव्हती! ;)
  • Log in or register to post comments

अवलक्की

चिरोटा
Sat, 10/31/2009 - 20:02 नवीन
पोहे अस्तिवात आहेत साहेब इकडे.पोहे पाहिजे असतील तर 'अवलक्की भात' म्हणून सांगा.पोह्यांत शेंगदाणे घालतात.बटाटे घालत नाहीत.कुठच्याही शांतिसागरमध्ये मिळतील. लेख मस्तच. क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनविवि

फर्मास!

विसुनाना
Fri, 10/30/2009 - 11:24 नवीन
फर्मास! येऊ द्या.
पणशीकर-घाणेकर ,भट, दुभाषी, लागू, गोखले
-हा,हा. रंगमंच म्हणजे एक थाळी आहे. आम्ही "एक पणशीकर घे रे","दोन लागू पाठव जरा" ऑर्डर सोडतो आहोत. काऊंटरचा टकल्या शेट्टी "साहेब, भक्ती बर्वे एकदम गरमागरम आहे बघा."असा आग्रह करतो आहे. पोर्‍या काऊंटरला "तीन नंबर टेबल... दोन भट, तीन तोरडमल,दोन आगाशे" असे बिल ओरडून सांगतो आहे. असे दृश्य दिसले.
पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे.
-आम्ही तर बुवा पोटातलेही जंतू मारण्यासाठी घेतो. तुम्ही कशासाठी घेता? ;)
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Fri, 10/30/2009 - 11:27 नवीन
लेख चांगला, खमंग झाला आहे. पण खरे पोहे दोनच असहमत! तुम्ही कोळाचे पोहे चाखले नाहीत, हे उघड आहे! बाकी इडली-सांबार जोडी ही तात्या-अनुष्का जोडीसारखीच अविलगनीय! पण इडलीचा चुरा करून, त्यावर आले-हिरवी मिरची-मीठ यांचे मिश्रण कुस्करून खाण्याची मजा काही औरच! सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची! १०१% सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

फक्त दोसे-

अमोल केळकर
Fri, 10/30/2009 - 11:27 नवीन
फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी 'उठाव लुंगी-बजाव पुंगी' म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्‍यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा =D> =D> रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. =D> =D> =D> (डोसा प्रिय ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त..

ज्ञानेश...
Fri, 10/30/2009 - 11:28 नवीन
सुंदर लेख. =D> 'नाश्ता' या नावाखाली कालच्या भाताला तेल्-तिखटाची फोडणी देऊन नुसता खाण्यात किंवा शिळ्या चपात्यांचा काला मोडून त्यात तिखट- कांदे-शेंगदाणे घालून गरम तेलाची फोडणी देऊन खाण्यातली मजा.. हा पण एक वेगळाच अनुभव असतो. या 'डिशेस' सुट्टीच्या दिवशी उशीरा उठून खाल्ल्या तर अधिक चवदार लागतात, हा स्वानुभव आहे! ;) "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

झक्कास...

राधा१
Fri, 10/30/2009 - 11:29 नवीन
लेख खुपच छान आहे...काही वाक्य तर एकदम झक्कासच...जसे :-)) उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. हे खासच...स्पेशल टाळ्या =D> या वाक्यासाठी... :-) :P 8-}
  • Log in or register to post comments

ओsssssब!!!

श्रावण मोडक
Fri, 10/30/2009 - 11:44 नवीन
ओsssssब!!! यापलीकडे ढेकरीचा उच्चार लिहिता येत नाही... जिज्ञासूंनी दुर्लक्ष करावे. या लेखात 'पु.ल. प्रभाव' अधिक जाणवला.
  • Log in or register to post comments

लेख मस्तंच

दत्ता काळे
Fri, 10/30/2009 - 11:48 नवीन
उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. - हे खरं असावं. पण खमंग आणि खुशखशीत (कि खुटखुटकीत ?)ओरिजिनल थालिपीठ हा त्यांचाच शोध, नाहीतर कोकणात एवढं तेल कुठुन मिळायला ?
  • Log in or register to post comments

सुंदर लेख..

sneharani
Fri, 10/30/2009 - 11:57 नवीन
छान आवडला लेख... सुट्टीच्या दिवशी शिळ्या भाताला फोडणी देऊन समोर येणारी "फोडणीच्या भाताची प्लेट " आठवली.
  • Log in or register to post comments

सुंदर

महेश हतोळकर
Fri, 10/30/2009 - 12:00 नवीन
वाक्या वाक्याला दाद द्यावी असा सुरेख लेख. मजा आली. हावरटपणा: चहा झाला, नाष्टा झाला. जेवणाची वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments

हापिसात

Dhananjay Borgaonkar
Fri, 10/30/2009 - 12:35 नवीन
हापिसात आलो तेव्हा ब्रेकफास्ट करुन आलेलो. लेख वाचला आणी क्यांटीन मधे नाश्ता करायला गेलो. एक नंबर मिसळ जमली आहे. अजुन येउद्यात तर्री....
  • Log in or register to post comments

__/\__ भन्नाट

टारझन
Fri, 10/30/2009 - 13:01 नवीन
__/\__ भन्नाट लेखण शैली. !! -- खाद्योप राव बकासुरांच्या ताटातलं आपल्या कर्तुत्वाने स्वत: खाणारा भिम हा आमचा नवीन आदर्श आहे!
  • Log in or register to post comments

क आणि ड आणि क

गणपा
Fri, 10/30/2009 - 13:37 नवीन
रावसाहेब एकदम रवाडोश्या सारखा कुरकुरीत लेख.
  • Log in or register to post comments

मस्तच.

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 10/30/2009 - 13:43 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

स्वादिष्ट लेख

ऋषिकेश
Fri, 10/30/2009 - 13:44 नवीन
मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!
सोळा आणे पटलं हा लेख वाचून तृप्तीचा (कि ची?) ढेकर देत आहोत.. चहा झाला, नाश्ता झाला. आता मुख्य जेवणाकडे वळाल त्याची वाट पाहतोय (खवय्या)ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सुपर्ब

दिपक
Fri, 10/30/2009 - 14:00 नवीन
वा! शिंगणापुरला खाल्लेल्या मिसळीची आठवण झाली. चेंबूरच्या गीताभवनची उगाच आठवण काढलीत आता परत तिकडं जाऊन डोसा हाणावा लागल. एकुण फर्मास लेख.
  • Log in or register to post comments

मस्त!!! मजा

प्रभो
Fri, 10/30/2009 - 14:21 नवीन
मस्त!!! मजा आली... :) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

आयला! आमचा

विसोबा खेचर
Fri, 10/30/2009 - 14:44 नवीन
आयला! आमचा संजोप हल्ली फुल्ल फॉर्मात आहे.. :) खाद्ययात्रा झकासच चालली आहे. भाईकाकांच्या माझे खाद्यजीवनची आठवण झाली...:) संजोप, डिसेंबरात पिरंगुटात मिसळपावचा जोरदार कट्टा करू रे. दारूबिरू पिऊ, मटणबिटण खाऊ! :) तात्या.
  • Log in or register to post comments

डिसेंबरात

टारझन
Fri, 10/30/2009 - 15:03 नवीन
डिसेंबरात पिरंगुटात मिसळपावचा जोरदार कट्टा करू रे. दारूबिरू पिऊ, मटणबिटण खाऊ
आणखी काही सुविधा असतील का तात्या ? :) :) :) आवडीनुसार ? आपला, टारझन_पार्टीत_दंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

पिरंगुटला

विसोबा खेचर
Fri, 10/30/2009 - 16:28 नवीन
पिरंगुटला मिपाकरांचा फक्त खाण्यापिण्याचा, गाणी गोष्टी गप्पांचा कट्टा होईल..
आणखी काही सुविधा असतील का तात्या ? आवडीनुसार ?
नाही! त्या दिवशी स्त्री पासून दूर रहावे लागेल. कारण बंगला संजोपचा नसून त्याच्या बहिणीचा आहे. तिथे काही अन्य चाळे केल्यास तुला मला तर हाकलून दिले जाईलच, शिवाय संजोपकरताही त्या बंगल्याची दारे कयमची बंद होतील! आपला, (सावध) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खुलाशाबद्

अवलिया
Fri, 10/30/2009 - 18:59 नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद तात्या. चला, अशा काही जागा आहेत जिथे तात्या सज्जन आहे असे समजले जाते. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नान्या

llपुण्याचे पेशवेll
Sat, 10/31/2009 - 09:18 नवीन
नान्या अजून एक.. चंची एक्सचेंजसाठी चंची घेऊन येणे. आगाऊ खुलाशासाठी स्वतःलाच धन्यवाद. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मस्त!

स्वाती२
Fri, 10/30/2009 - 14:50 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 10/30/2009 - 16:25 नवीन
वाचतो आहे. साबुदाण्याच्या खिचडीवर अजून लिहायला हवे होते. बाकी कोळाचे पोहे आणि खापरोळ्या हा अस्सल तळकोकणी नाश्तासुद्धा 'ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' प्रकारातला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

खुसखुशीत आणि खमंग

आंबोळी
Fri, 10/30/2009 - 16:49 नवीन
लेख अगदी फर्मास झालाय... वाचुन झाल्यावर नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी ७ वाजता दही पोहे हाणल्यासारखे वाटले. आंबोळी
  • Log in or register to post comments

मस्तच....

किट्टु
Fri, 10/30/2009 - 17:32 नवीन
=D> सुरेख लेख..... :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

नंदू
Fri, 10/30/2009 - 17:50 नवीन
अप्रतिम लेख. अलिकडे मझ्या वाचनात आलेला एक सर्वोत्तम लेख. अजुन येउद्या. नंदू
  • Log in or register to post comments

सुरेख चुचु

पर्नल नेने मराठे
Fri, 10/30/2009 - 17:54 नवीन
:D सुरेख चुचु
  • Log in or register to post comments

छान, खुसखुशीत लेख

प्रदीप
Fri, 10/30/2009 - 18:28 नवीन
लेखात व्यक्त केलेली काही मते पटली नाहीत, पण ते जाऊ दे. एकंदरीत झक्कास लेख. तुमची इमेजरी इतकी फॅब्युलस आहे की कुणालातरी तातू सामंताचे डोके उघडून आत काय आहे असे बघावेसे वाटले होते, तसे आता मला तुमच्याबद्दद्ल वाटत आहे. अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा