Skip to main content

वाचन

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
तू आणि तुझं वाचन.... टेबल-लॅम्पच्या प्रकाशात.. कॉम्पुटरच्या जगात नेटवर भटकणारा तू... एका हाताला थंड होत आलेलं जेवण.... दुसर्‍या हाताने पुस्तकाचा फडशा पाडणारा तू... शतपावली करताना मागे बांधलेल्या उजव्या हाताने डाव्या हातातल्या साप्ताहिकाशी सलगी करणारा तू... कधी उताणा तर कधी पोटावर झोपून हलत्या पायांच्या तालावर अंक चाळणारा तू... छातीवर उघडे मासिक वाचनखूण ठेवून वाचता-वाचता निद्रिस्त झालेला तू... प्रवासात मिळेल त्या जागेत अवघडून वर्तमानपत्र हाताळणारा तू....... जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून पानं उलटवणारा तू... .... ..... नाना तर्‍हा.... नाना सवयी.... सगळं कसं सवयीच झालयं... तू आणि तुझे वाचन..... ... ..... इतक्या वर्षात कधी मलाही वाचलं असतस तर.... तेही किती सोप्पय.... नुसती नजरेला नजर भिडवायची खोटी एकेक पान आपोआप उलटत गेलं असतं रे !!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3070
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कविता आवडली. शेवट मस्तच. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

शेवट छान :) गुलजारांची "मस्ती की पाठशाला" आठवली. "चेहरे की किताबें है, हम वो पढने आते है, ये सुरत तेरी मेरी, मोबाईल लायब्ररी!!!"

In reply to by सुबक ठेंगणी

+२ मस्त रे ! क्या बात है ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

मस्त रे .......................:-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

प्रेयसीची मांडलेली खंत आवडली.

श्री शिरोडकर, चांगली कविता. कवितेचे शीर्षक 'वाचक' असायला हवे होते असे वाटले.

शेवट वाचून "डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे" आठवलं! सुरेख कविता. क्रान्ति अग्निसखा

छान कविता. वेगळी असल्याने आवडली .. हार्डकोअर वाचनवेड्याचे वर्णन छान केले आहे. शेवट थोडा साचेबद्ध आहे खरा (खंत वैगेरे), पण उर्वरित ८०% कविता आवडली. अशीच साचेबद्ध नसणारी कविता येउद्या अजुन !!

प्रकाटाआ

त्याच्या वाचनाचे "कौतुक" सुरेख केलेले आहे , कौतुकने ! तू आणि तुझे वाचन..... नंतरच्या '.....' मुळे 'घाल चुलीत !' असेच शब्द तिच्या तोंडून आल्याचा भास झाला.

खुपच छान कविता. - अश्विनी