तू आणि तुझं वाचन....
टेबल-लॅम्पच्या प्रकाशात.. कॉम्पुटरच्या जगात
नेटवर भटकणारा तू...
एका हाताला थंड होत आलेलं जेवण.... दुसर्या हाताने
पुस्तकाचा फडशा पाडणारा तू...
शतपावली करताना मागे बांधलेल्या उजव्या हाताने
डाव्या हातातल्या साप्ताहिकाशी सलगी करणारा तू...
कधी उताणा तर कधी पोटावर झोपून
हलत्या पायांच्या तालावर अंक चाळणारा तू...
छातीवर उघडे मासिक वाचनखूण ठेवून
वाचता-वाचता निद्रिस्त झालेला तू...
प्रवासात मिळेल त्या जागेत
अवघडून वर्तमानपत्र हाताळणारा तू.......
जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून
पानं उलटवणारा तू...
....
.....
नाना तर्हा.... नाना सवयी.... सगळं कसं सवयीच झालयं...
तू आणि तुझे वाचन.....
...
.....
इतक्या वर्षात कधी मलाही वाचलं असतस तर....
तेही किती सोप्पय....
नुसती नजरेला नजर भिडवायची खोटी
एकेक पान आपोआप उलटत गेलं असतं रे !!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3070
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
+१
+२ मस्त रे
In reply to +१ by सुबक ठेंगणी
+३
In reply to +२ मस्त रे by दशानन
मस्त
छान
सुरेख!
छान
.
वाचन-
खुपच छान
असेच म्हणतो
In reply to खुपच छान by अश्विनीका