तिचा माझा संसार, तसा 'वेल सेट' आहे
इथे 'मी', तिथे 'ती'... मध्ये 'इंटरनेट' आहे
जग कुठच्या कुठे गेलय ? म्हणून तर...
घराच्याच कोपर्यात, मांडलं युग 'जेट' आहे
कोण म्हणतो आहे इथे, फक्त 'खिडाक्यां'चे राज्य
आमच्यासाठी 'विन्डो' , आख्खं इंडीया 'गेट' आहे
माणसांचा वावर... असतोच अवती भवती
'ऑनलाईन' दोघांच, मात्र खाजगी 'बेट' आहे
दरम्यानच्या अंतराचा प्रश्न येतोच कुठे ?
नुसत्या एका 'क्लिक'वर आमची 'गाठभेट' आहे
माझ्या कवितांचे सडे तिच्या देही मोहरतात
तिचं ते फुलणं...बहरणं, वेबकॅममध्ये 'थेट' आहे
आठवणींचा तो अलबम असतो नेहमीच सोबत
तिच्या माझ्या गळा, 'पेनड्राईव्हचं लॉकेट' आहे
'वाट्टेल तेव्हा भेटणे', जरी दररोज असलं
तरी रोज नव्याने आमची 'ब्लाईंड डेट' आहे
बाफ, ब्लॉग, फेसबुक तर कधी ऑर्कुटवरही
काळ म्हणे, चालू द्या, मीही थोडा 'लेट' आहे
प्रेमाचा हा निर्झर क्षणी धबधब्याला लाजवतो
चार क्षणांच्या खेळात, सांगा कुठे 'हेट' आहे ?
किती सहज टाळल्यात संहवासातील त्रुटी
आजही आमच्या नात्यात पुर्वीइतके 'वेट' आहे
अशाश्वत या देहाला स्पर्शगंध नकोच काही
हे 'मनाचे मीलन' अन 'आत्म्यांचे प्लँचेट' आहे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3120
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे बाफ
बाफ
कौशि, मस्त
कौतुक आहे
........... माझे
........... माझे
मस्त.
रचना
मस्त!! तुझी
हम्म्म
लव लेटर
वाहवा,
मस्त रे..
छान!
छान कविता
मस्तच !!