Skip to main content

नेटकर

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 13/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा माझा संसार, तसा 'वेल सेट' आहे इथे 'मी', तिथे 'ती'... मध्ये 'इंटरनेट' आहे जग कुठच्या कुठे गेलय ? म्हणून तर... घराच्याच कोपर्‍यात, मांडलं युग 'जेट' आहे कोण म्हणतो आहे इथे, फक्त 'खिडाक्यां'चे राज्य आमच्यासाठी 'विन्डो' , आख्खं इंडीया 'गेट' आहे माणसांचा वावर... असतोच अवती भवती 'ऑनलाईन' दोघांच, मात्र खाजगी 'बेट' आहे दरम्यानच्या अंतराचा प्रश्न येतोच कुठे ? नुसत्या एका 'क्लिक'वर आमची 'गाठभेट' आहे माझ्या कवितांचे सडे तिच्या देही मोहरतात तिचं ते फुलणं...बहरणं, वेबकॅममध्ये 'थेट' आहे आठवणींचा तो अलबम असतो नेहमीच सोबत तिच्या माझ्या गळा, 'पेनड्राईव्हचं लॉकेट' आहे 'वाट्टेल तेव्हा भेटणे', जरी दररोज असलं तरी रोज नव्याने आमची 'ब्लाईंड डेट' आहे बाफ, ब्लॉग, फेसबुक तर कधी ऑर्कुटवरही काळ म्हणे, चालू द्या, मीही थोडा 'लेट' आहे प्रेमाचा हा निर्झर क्षणी धबधब्याला लाजवतो चार क्षणांच्या खेळात, सांगा कुठे 'हेट' आहे ? किती सहज टाळल्यात संहवासातील त्रुटी आजही आमच्या नात्यात पुर्वीइतके 'वेट' आहे अशाश्वत या देहाला स्पर्शगंध नकोच काही हे 'मनाचे मीलन' अन 'आत्म्यांचे प्लँचेट' आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3120
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

हे बाफ काये :-? चुचु

बाफ म्हणजे बातमीफलक.

ओहोहो रचना छान! कौतुकसाहेब तुम्ही पुरुष नाही महापुरुष आहात ;-)

:( ........... माझे सध्या असेच सुरु आहे... मी इथे ती तिथे सागराचा अंतरपाट आहे. दो टकियों की नोकरी से सारा श्रावण सपाट आहे *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

कौतुकराव असेही काही लिहितात! छान छान. "Great Power Comes With Great Responsibilities"

रचना आवडली कौतुकराव. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

२१व्या शतकातली नाती!! कलियुग आहे बाबा कलियुग!!

संदीप खरेची 'लव लेटर' ही कविता आठवली. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

कौतुक करण्यासारखं लिहीलत...कौतुकराव !! :-) अभिनंदन !!! बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)