Skip to main content

बोच

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 12/10/2009 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर दारी दाटली गोधूळ पाडसा पाजाया परतल्या गाई चोचीतला चारा चिमण्याशी द्याया पक्षीणी पंखाना पसरूनी येई वेणूचे वाजती वाऱ्यावर सूर विरही वेडी व्याकुळ मी होई साद साजणाची संगतीला आज कशी कानावर किंचीतही नाही? उंबऱ्यात उभी उदास एकाकी पहात परकी पसरली राई ओसाड उजाड अंधारला रस्ता सावल्या सांडत सुस्तावला राही अंधाऱ्या आकाशी एकला तारा साथ सजणाची सुचवून जाई नभी निसटता निखळला कोणी अपशकूनाची उगा बोच देई
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2289
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अर्र नाव वाचून फसलो. मला वाटले की माज लाज खाज या सोबत "बोच " आले असावे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अंधाऱ्या आकाशी एकला तारा साथ सजणाची सुचवून जाई नभी निसटता निखळला कोणी अपशकूनाची उगा बोच देई
खासच!!!

दूर दूर लोकल दाटली गर्दी पाडसा भेटाया परतली आई पिझाहटचा पिझ्झा चिमण्याशी द्याया पक्षीणी ढकलुनी लेडीजमधे येई चुचु

डोअरबेल वाजती कानाला बेसूर कामाने वेडी ठार मी होई साथ साजणाची कशी नाही आज किंचीतही नाही ह्याचा उपयोग गॅलरीत उभी उदास एकाकी पहात बाहेर पसरली भारी आला नाही हा अंधारला रस्ता पिउन कुठे सुस्तावला राही अंधाऱ्या आकाशी घरात पसारा मदत सजणाची अजिबात नाही घरी पाहुणे उपटता कोणी आराम नाही मना उगा बोच देई चुचु