दूर दूर दारी दाटली गोधूळ
पाडसा पाजाया परतल्या गाई
चोचीतला चारा चिमण्याशी द्याया
पक्षीणी पंखाना पसरूनी येई
वेणूचे वाजती वाऱ्यावर सूर
विरही वेडी व्याकुळ मी होई
साद साजणाची संगतीला आज
कशी कानावर किंचीतही नाही?
उंबऱ्यात उभी उदास एकाकी
पहात परकी पसरली राई
ओसाड उजाड अंधारला रस्ता
सावल्या सांडत सुस्तावला राही
अंधाऱ्या आकाशी एकला तारा
साथ सजणाची सुचवून जाई
नभी निसटता निखळला कोणी
अपशकूनाची उगा बोच देई
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2286
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्र नाव
वा...
दूर दूर
काय हे चुचु
In reply to दूर दूर by पर्नल नेने मराठे
चुचु
In reply to काय हे चुचु by लवंगी
लै भारी
डोअरबेल
चुचुतै
In reply to डोअरबेल by पर्नल नेने मराठे
कठीण आहे
In reply to डोअरबेल by पर्नल नेने मराठे