मला ही पाली दिसल्या की खुपच भीती वाटते, त्यापेक्षा तिला पाहून किळस जास्त वाटते. :( :(
आम्हाला पाली आवडतात. आम्ही पाली खातो.
काय नाना, आतापासून सुरवात केली काय पाली खायला. :? :?
पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे
हे बरं सांगितलंस. माझ्याही नव्या घरात पाल आहे, कहर म्हणजे रात्री सगळं शांत झालं की या मॅडमना आवाज काढण्याची लहर येते. सुरूवातीला दोन-तीनदा भिती वाटली पण नंतर सवय झाली.
हल्ली घरात रातकिडे आहेत आणि ते दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता जीवाच्या आकांताने किंचाळत असतात. पण दिसत नाहीत, आता हळूहळू त्यांची सवय झाली आहे आणि आम्ही सरकारी लोकं आणि किडे सरकारी इतमामात मजेत एकाच सरकारी घरात रहातो!
अदिती
सही लिहिलं आहेस. पाल्केस्ट्रा!!!! =))
अजून माझ्या घरातल्या पालींची धाव ओट्यापर्यंत नाहिये पोचली हे नशीब :D पण इथे येऊन नजर मेली आहे माझी.
बाबा म्हणतात "घर पाळते ती पाल"घ्या! आणि आम्हाला वाटायचं आपणच पालींना पाळतो!!!
हा हा हा.
खर सांगतो एकदा एका बाबाजींनी मी हा प्रश्न विचारला होता काय हो, हे किडे, मुंग्या घरात आलेले पसंत नाही त्यांना मारले तर काही शाप, जन्ममरणाचा फेरा सुरु रहाणे. इ इ. मला उत्तर मिळाले "मार बिन्धास्त"!
अवांतर - प्रोबेशनच्या काळात जे काही प्रश्न विचारले होते त्यातला एक तुला पाल, झुरळे वगैरे मारता येतात ना?
पालींशी मी दोस्ती करण्यापेक्षा त्या माधव गाडगीळांकडे सुपूर्द केल्या तर? महाराष्ट्रातील पाली व कन्नडदेशीय पाली ह्यांचा तौलनिक अभ्यास वगैरे करता येईल ना त्यांना? :P :D
तुम्हाला एक मैत्रिण आहे इथे... मस्त कलंदर ताईंकडे पण एक पाल आहे म्हणे. स्ट्रॅटेजीची देवाणघेवाण करा. मार्ग लवकर निघेल. बाकी लिहिलंय छान.
@ नाना : नु चुंग पेक्षा 'नानु ली' हे नाव कसं वाटतंय?
बिपिन कार्यकर्ते
माझ्या घरातली पाल??? ती पळाली एकदाची....!!!! सारखी चुकचुक करायची!!!
स्ट्रॅटेजी वगैरे काही विशेष नाही हो... तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही.. जाते मग कंटाळून!!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
बिपिनदा "आव ली" पण भारी वाट्तंय..
पण लेख वाचुन बरेच काहे आठवले त्यातले काही...
१) एका सर्पमित्राने पालींचे बिनविषारित्व पटवण्यासाठी केलेला प्रयोग आठवतो..
आपल्या घरी आलेल्या दोन मित्राना मस्त चहा पाजला...
नंतर दोन महिन्यानी परत भेटल्यावर त्याना चहाची पाककृती सांगितली..
ईतर नेहमी सारखीच पण त्यात अॅडीशनल फक्त पाल उकळवली....
ते दोन्ही मित्र दोन महिन्यानंतर त्या चहाच्या कल्पनेने तिथेच ओकले...
२) आमच्या सरांनी सांगितलेला एक किस्सा...
उन्हाळ्याचे दिवस ...तो उन्हाळा जळ्गावचा....घरी होते ते...
जरा शर्टचे दोन बटनं उघडुन कालर मागे केली आणि घरातच एका दारातुन दुसर्या दारात जायला लागले.. दारावरच दबा धरुन बसली होती पाल..तिने मस्तपैकी डाव साधला आणि सरळ सरांच्या सदर्यात सुर मारली..नेमकी शर्टची ईन केलेली होती...मस्त वळ्वळ गार मउ स्पर्ष..ई ईईई...ई
३) गेल्या वर्षीचा माझा स्वानुभव...
मी एस. आय. जॉईंट ला गॅप गेल्यामुळे ट्रॅक्शन वर होतो...बेड्रेस्ट..नुकतेच ट्रॅक्शन काढुन मी बसलो होतो... माझा पलंग भिंतीला खेटुन आहे आणि त्यावर ट्युब त्यामुळे...
मी तक्क्याला टेकुन आधाराने कसातरी बसलो होतो..
पप्पा बाजुलाच होते..ते थोडेसे हसले...मी कारण विचारले तर काही नाही म्हणुन त्यानी विषय बदलला..
पण समोरच काकु बसली होती..ती थोडीशी किंचाळलीच पाssss...ल
त्या सेकंदाला मी माझे दुखणे विसरुन जवळ्पास २ फूट पुढे सरकलो एकदम झट्क्यात...आणि मीपण किंचाळलो..सिंहाचा सामना करेल एकवेळ पण पाल ईई...ई...
ईतर वेळेला दुखण्यामुळे हसुही न शकणारा मी....त्या ट्रॅक्शन चे वजन फक्त वर घेउन ठेवले होते.. ते पण खाली सरकुन झट्का बसायचा तो बसलाच..
पण त्यावेळी टप्कण पडुन पाल निघुन गेलेली होती..आणि ती जाताना काकुला दिसली होती..
पण पप्पा का हसले कारण त्यानी ती पाल पड्ताना पाहीली होती... लोल..
४) हे मात्र गम्भीर..
पप्पा असेच ईंडस्ट्रीयल विजीट साठी एका गुट्ख्याच्या कारखान्यात गेले होते...
तिथे सगळी प्रोसेस पाहीली..पण तरीही तो गुट्खा आणि पुडीतला गुटखा यात साम्य वाटत नव्हत..मग त्यानी कारण विचारले..तर तेथील कामगारानी दिलेल्या माहीती नुसार सर्व प्रोसेस झाल्यावर एक ट्युब येते पण त्यातील घटक कोणालाच माहीत नसतो..ती त्या मसाला सुपारीला चोळुन त्या गुट्ख्याला अंतिम स्वरूप येते..
त्या ट्युब मधील घट्का संदर्भात तेथील एका अधिकार्यास खोदुन विचारले असता समोर आलेली माहीती..
त्यात पालीच्या पेस्ट्चा वापर केलेला असतो म्हणुन ती गुप्त टेवतात व शेवटी पॅकींग च्या आधी फक्त चोळ्तात..
हा प्रसंग आठवण्याचे कारण ईथे कोणीतरी उल्लेख केलेला आहे की पालीचा उपयोग नशीले पदार्थ निर्मितीत होतो तो असाही असेल...
लेख मजेदार आहे...
पाल मारायच्या पुष्कळ आठवणी जागृत झाल्या...
वृद्ध पाल जमिनीवरती रांगायला लागते , असे माझे एक निरीक्षण आहे.
पाल...
पाल विषारी नसते.... तो एक गैरसमज आहे, असे ठाम प्रतिपादन करणारा एक लेख गेल्या महिन्यात सकाळमध्ये वाचला.
जालावर शोधला नाहीये अजून.
लेखक गाडगीळ आडनावाचे ( वनस्पति(!!)शास्त्रज्ञ ) आहेत....
विषारी हो नाही वगैरे कल्पना नाही पण लेख मस्त होता....
...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
http://beta.esakal.com/2009/06/29224833/editorial-giant-lizard-yashwa.html
लेखक माधव गाडगीळ
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
पालींमुळे अन्नात विषबाधा होते अशा अनेक चुकीच्या कल्पना लोकांच्या डोक्यात घट्ट बसलेल्या आहेत. म्हणून घरात नव्याने कामाला येणाऱ्या सगळ्यांना पटवून द्यायला लागते, की असे काही नाही. त्यांना सगळीकडे, विशेषतः स्वैपाकघरात, जेवणघरात बिनधास्त फिरू द्या. त्या मुंग्या-झुरळांना छान काबूत ठेवतील. याची फलश्रुती म्हणजे माझ्या घरात जन्मभर काहीही विषप्रयोग न करता कीटकसृष्टी मर्यादा सांभाळून आहे. वर मी पालींची मृगया खुषीत पाहत आलो आहे. विशेषतः पावसाळ्यात पंखाची वाळवी, मुंग्यांचे लोंढे आले, की पालींची धावाधाव पाहायला जी मजा असते ती माहीत नसणाऱ्याला म्हणावेसे वाटते ः "हाय कंबख्त! तूने पीही नहीं!'
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
पाली इतर किडे खाउन जगतात हे बरोबर आहे पण त्यांचा जर अन्नाशी प्रत्यक्ष संबंध आला तर ते वाईट.
अन्न शिजवताना केवळ एक पाल त्यात पडल्याने (व ते अन्न तसेच खाल्याने) बिचार्या आश्रमशाळेतल्या अनेक मुलांना हॉस्पिटलमधे दाखल केल्याच्या घटना वाचनात आल्या आहेत.
छान प्रकटन (असं लिहिलं की प्रतिसादाला मोल येतं असं कोणीतरी म्हणून ठेवलंय. बाकी प्रकटन/अदृष्यन वगैरे आपल्याला समजत नाय बॉ). बाकी पाली,झुरळं अन मुंग्या यांचा भरपूर अणुभव घेतल्यावर एवढेच म्हणावेसे वाटते
कोन्यात मारला स्प्रे अन दिला रंग
चढचढून माळे दुखू लागले अंग
झाडले घराला अवघे वरती-खाली
पण तरी न जाती झुरळे,मुंग्या,पाली...
एकूण ५ आहेत,
आणि तुझ्या ऑफिसला नेतेस त्या बॅगेतली? काळी कुळकुळीत पाठ आणि करडं पोट असलेली....
ती विसरलीस का?
:)
आता पुढल्या वेळी बॅगेत हात घालतांना तिची आठवण ठेव!!!!
:)
पुण्यात असताना दूध तापवत ठेवले होते.थोड्या वेळाने येवून बघतो तर उकळत्या दुधात पालीची धडपड चालु होती.अजुनही पाल दिसली की तोच प्रसंग आठवतो.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
पाल्केस्ट्रा!!!! मस्त टाईमपास लेख!!!
----* बंगळुरुच्या पाली, पाली भाषेत बोलतात का?
----* आमच्याकडे आंब्याच्या झाडावर एक पाल रहायची. तिचे नाव मी आम्रपाली ठेवले होते.
पालीची भीति फक्त बायकांनाच वाटते असे नाही. मी व माझ्या काही मित्रांनाही पालीची प्रचंड भीति व किळस वाटते. त्यात बायकोलाही भीति वाटत असल्यामुळे पाल कोणी मारायची वा हाकलायची हा मोठा यक्षप्रश्न होतो. कदाचित् दोनदा पाठीवरच पाल पडल्यामुळे ही भीति वाटत असेल!
चुरचुरीत लेख. बाकी, आमच्या नाशिक परिसरात पाली चुकचुक आवाज करत नाहीत, आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पाली आवाज करतात. प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतल्यावर आश्चर्य वाटलं होतं. त्यात कुणीतरी स्पष्टीकरण दिलं. रामाने (म्हणे) नाशिककडच्या पालींना शाप दिला होता, तुम्ही चुकचुकणार नाही. त्यामुळे नाशकाकडच्या पाली म्हणे चुकचुकत नाहीत. ( त्या 'हे राम' म्हणतात असं ऐकतोय.) खरं खोटं तो एक 'राम जाने'.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
मस्त चुरचुरीत लेखन!
एकाच झुरळाच्या पाठीमागे लागून ते खाण्यासाठी लढाई चाललेल्या दोन पाली मी बघितल्या आहेत. ट्यूब किंवा बल्बजवळ उडणार्या किड्यांना हळूहळू सरकत जाऊन, डोके विशिष्ठ कोनात अॅडजस्ट करुन, एकाच झपाट्याच्या हालचालीसरशी मटकावणार्या पाली निरखत मी कित्येक तास काढलेत! काचेवर बसलेल्या पालीच्या पंजाचे खळगे, खालीवर होणारा गळा आणि किंचित पारदर्शक त्वचा असलेले पांढरट पोट ह्याचेही मी सूक्ष्म निरीक्षण केले आहे. मांजराने पकडायचा प्रयत्न केला तर पाल काय शिताफीने शेपूट तोडुन पळते हेही बघण्यासारखे असते! पाल हा एक विलक्षण प्राणी आहे. (बास इतकेच सांगतो -नाहीतर आता यशोधरा मला पालीच्या तोंडी देईल! ;) )
जाता जाता - पाली भाषेत पालीला काय म्हणतात बरं? :?
चतुरंग(पालकर)
सहमत.
एकदा आम्ही गच्चीत गप्पा मारत होतो. पाल दिसली. मित्राकडून लेसर(?)ची कीचेन घेउन त्याचा लाल ठिपका एका भिंतीवरच्या पालीला दाखवून तिला त्यामागे इकडे तिकडे फिरवायला लावले होते. गप्पा मारण्यात ठिपका हलवायचा राहिला आणि पाल तिथपर्यंत पोचली तरी तिला काही केल्या तो खाता किंवा पकडता येत नव्हता आणि काय होत आहे ते तिला कळतही नव्हते. खूप मजा आली :D
हा हा हा.. मस्त! "पालीच पाली चहूकडे, गं बाई करू मी रांधप कुणीकडे?" असं एखादं विडंबन पाड! ;)
बाकी आम्हालाही आवडतात पाली लैच! आम्ही बार्बेक्यू करून खातो! ;)
मला पाली खूप आवडतात. पाली असल्या की झुरळं, ते दिव्याभोवती संध्याकाळी येणार्या किड्यांचा आपोआप बंदोबस्त होतो.
पाल अंगावर पडली की म्हणे अंघोळ करावी लागते , परत डाव्या की उजव्या साइडला पडली ह्याचं पण काहीतरी महत्व आहे. माझ्या अंगावर बर्याचदा पाली पडल्यात, मी त्यांना हातात घेउन फेकून दिलय्...फार गार गार लागतात.
पालीला मारल्यावर म्हणे काहीतरे प्रयश्चित्त करावं लागतं रामेश्वरला जाउन ! काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.
काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.
माझ्या एका मित्रानेच मला पाल सिग्रेटमधे घालण्याबद्दल सांगितलं आहे; म्हणजे त्याने पाल ओढल्याचं सांगितलं आहे.
सध्या माझ्या घरातल्या/घराबाहेरच्या पालीने चुकचुकणं बंद केलंय म्हणून मला ती फार आवडते.
प्रतिक्रिया
आम्हाला
ईsssss नाना!
पाली
हीहीही ...
हो गं
हाहाहा...
:-)
कोणते
:)
माधव
पालींशी मी
हाहाहाहा
हॅहॅहॅ!!!
नको नको
माझ्या घरातली पाल....
बिपिनदा "आव ली" पण भारी
बापरे! हे गंभीर म्हंजे भलतेच
लेख मजेदार
सापडला सापडला... लेख सापडला..
भडकमकर मास्तर
प्रकाटाआ
छान प्रकटन
पाल्केस्ट
पाल्केस्ट्रा!
एक राहिली!
कायतरीच
हे काय
थ्यांक्यू
पुर्वी
मस्त
पाल... ई ई ई!
तुमचं घर
आँ??
अवांतर माहिती
चुरचुरीत
येस्स
धन्यवाद
हा हा हा!
सहमत. एकदा आम्ही गच्चीत गप्पा
हा हा हा.. मस्त! "पालीच पाली
>>पालीच पाली चहूकडे, गं बाई
पण विडंबन पाडायला काय जातंय!
हो, आजकाल ते अगदी सोप्पं झालय
हे घ्या!
क...ह......र............ विडं
पुन्हा लेख वाचला ! मस्तच !!
मस्तच !!
मला पाली खूप आवडतात. पाली
हे मी पण ऐकलंय
एक