✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झुरळे, पाली आम्हां सोयरी..

य
यशोधरा यांनी
Sat, 10/10/2009 - 13:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14729 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

आम्हाला

अवलिया
Sat, 10/10/2009 - 13:33 नवीन
आम्हाला पाली आवडतात. आम्ही पाली खातो. --नु चुंग *** मस्त लेख --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

ईsssss नाना!

यशोधरा
Sat, 10/10/2009 - 13:56 नवीन
ईsssss नाना! यक्क! यक्कक्क!! :&
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पाली

सोनम
Sat, 10/10/2009 - 13:42 नवीन
मला ही पाली दिसल्या की खुपच भीती वाटते, त्यापेक्षा तिला पाहून किळस जास्त वाटते. :( :( आम्हाला पाली आवडतात. आम्ही पाली खातो. काय नाना, आतापासून सुरवात केली काय पाली खायला. :? :?
  • Log in or register to post comments

हीहीही ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 10/10/2009 - 13:47 नवीन
हीहीही ... मस्तच लिहीलं आहेस.
पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे
हे बरं सांगितलंस. माझ्याही नव्या घरात पाल आहे, कहर म्हणजे रात्री सगळं शांत झालं की या मॅडमना आवाज काढण्याची लहर येते. सुरूवातीला दोन-तीनदा भिती वाटली पण नंतर सवय झाली. हल्ली घरात रातकिडे आहेत आणि ते दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता जीवाच्या आकांताने किंचाळत असतात. पण दिसत नाहीत, आता हळूहळू त्यांची सवय झाली आहे आणि आम्ही सरकारी लोकं आणि किडे सरकारी इतमामात मजेत एकाच सरकारी घरात रहातो! अदिती
  • Log in or register to post comments

हो गं

यशोधरा
Sat, 10/10/2009 - 14:04 नवीन
हो गं अदिती, अशाच असतात पाली, येडपट!
  • Log in or register to post comments

हाहाहा...

सुबक ठेंगणी
Sat, 10/10/2009 - 14:12 नवीन
सही लिहिलं आहेस. पाल्केस्ट्रा!!!! =)) अजून माझ्या घरातल्या पालींची धाव ओट्यापर्यंत नाहिये पोचली हे नशीब :D पण इथे येऊन नजर मेली आहे माझी. बाबा म्हणतात "घर पाळते ती पाल"घ्या! आणि आम्हाला वाटायचं आपणच पालींना पाळतो!!!
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sat, 10/10/2009 - 14:57 नवीन
हा हा हा. खर सांगतो एकदा एका बाबाजींनी मी हा प्रश्न विचारला होता काय हो, हे किडे, मुंग्या घरात आलेले पसंत नाही त्यांना मारले तर काही शाप, जन्ममरणाचा फेरा सुरु रहाणे. इ इ. मला उत्तर मिळाले "मार बिन्धास्त"! अवांतर - प्रोबेशनच्या काळात जे काही प्रश्न विचारले होते त्यातला एक तुला पाल, झुरळे वगैरे मारता येतात ना?
  • Log in or register to post comments

कोणते

यशोधरा
Sat, 10/10/2009 - 17:16 नवीन
कोणते बाबाजी? जालंदरबाबा की काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:)

श्रावण मोडक
Sat, 10/10/2009 - 16:11 नवीन
:) प्रतिसाद संपादित केला. आधी म्हटलं होतं, पेस्ट कंट्रोल करा. माधव गाडगीळ झिंदाबाद. या पालींना मारू नका. दोस्ती करा त्यांच्याशी.
  • Log in or register to post comments

माधव

भडकमकर मास्तर
Sat, 10/10/2009 - 16:25 नवीन
माधव गाडगीळ झिंदाबाद. या पालींना मारू नका. दोस्ती करा त्यांच्याशी. पाल मारा पाल मारा असं काम सांगणार्‍यांना सांगायला एक कारण झालं... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

पालींशी मी

यशोधरा
Sat, 10/10/2009 - 17:20 नवीन
पालींशी मी दोस्ती करण्यापेक्षा त्या माधव गाडगीळांकडे सुपूर्द केल्या तर? महाराष्ट्रातील पाली व कन्नडदेशीय पाली ह्यांचा तौलनिक अभ्यास वगैरे करता येईल ना त्यांना? :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 10/10/2009 - 17:31 नवीन
हाहाहाहा... करा. काहीही करा. आमची कशालाही ना नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हॅहॅहॅ!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/10/2009 - 15:12 नवीन
तुम्हाला एक मैत्रिण आहे इथे... मस्त कलंदर ताईंकडे पण एक पाल आहे म्हणे. स्ट्रॅटेजीची देवाणघेवाण करा. मार्ग लवकर निघेल. बाकी लिहिलंय छान. @ नाना : नु चुंग पेक्षा 'नानु ली' हे नाव कसं वाटतंय? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

नको नको

अवलिया
Sat, 10/10/2009 - 19:14 नवीन
ली घराणे म्हटले की लै भय वाटत ब्बा! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

माझ्या घरातली पाल....

मस्त कलंदर
Sun, 10/11/2009 - 11:08 नवीन
माझ्या घरातली पाल??? ती पळाली एकदाची....!!!! सारखी चुकचुक करायची!!! स्ट्रॅटेजी वगैरे काही विशेष नाही हो... तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही.. जाते मग कंटाळून!!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपिनदा "आव ली" पण भारी

डावखुरा
Tue, 09/21/2010 - 23:55 नवीन
बिपिनदा "आव ली" पण भारी वाट्तंय.. पण लेख वाचुन बरेच काहे आठवले त्यातले काही... १) एका सर्पमित्राने पालींचे बिनविषारित्व पटवण्यासाठी केलेला प्रयोग आठवतो.. आपल्या घरी आलेल्या दोन मित्राना मस्त चहा पाजला... नंतर दोन महिन्यानी परत भेटल्यावर त्याना चहाची पाककृती सांगितली.. ईतर नेहमी सारखीच पण त्यात अ‍ॅडीशनल फक्त पाल उकळवली.... ते दोन्ही मित्र दोन महिन्यानंतर त्या चहाच्या कल्पनेने तिथेच ओकले... २) आमच्या सरांनी सांगितलेला एक किस्सा... उन्हाळ्याचे दिवस ...तो उन्हाळा जळ्गावचा....घरी होते ते... जरा शर्टचे दोन बटनं उघडुन कालर मागे केली आणि घरातच एका दारातुन दुसर्‍या दारात जायला लागले.. दारावरच दबा धरुन बसली होती पाल..तिने मस्तपैकी डाव साधला आणि सरळ सरांच्या सदर्‍यात सुर मारली..नेमकी शर्टची ईन केलेली होती...मस्त वळ्वळ गार मउ स्पर्ष..ई ईईई...ई ३) गेल्या वर्षीचा माझा स्वानुभव... मी एस. आय. जॉईंट ला गॅप गेल्यामुळे ट्रॅक्शन वर होतो...बेड्रेस्ट..नुकतेच ट्रॅक्शन काढुन मी बसलो होतो... माझा पलंग भिंतीला खेटुन आहे आणि त्यावर ट्युब त्यामुळे... मी तक्क्याला टेकुन आधाराने कसातरी बसलो होतो.. पप्पा बाजुलाच होते..ते थोडेसे हसले...मी कारण विचारले तर काही नाही म्हणुन त्यानी विषय बदलला.. पण समोरच काकु बसली होती..ती थोडीशी किंचाळलीच पाssss...ल त्या सेकंदाला मी माझे दुखणे विसरुन जवळ्पास २ फूट पुढे सरकलो एकदम झट्क्यात...आणि मीपण किंचाळलो..सिंहाचा सामना करेल एकवेळ पण पाल ईई...ई... ईतर वेळेला दुखण्यामुळे हसुही न शकणारा मी....त्या ट्रॅक्शन चे वजन फक्त वर घेउन ठेवले होते.. ते पण खाली सरकुन झट्का बसायचा तो बसलाच.. पण त्यावेळी टप्कण पडुन पाल निघुन गेलेली होती..आणि ती जाताना काकुला दिसली होती.. पण पप्पा का हसले कारण त्यानी ती पाल पड्ताना पाहीली होती... लोल.. ४) हे मात्र गम्भीर.. पप्पा असेच ईंडस्ट्रीयल विजीट साठी एका गुट्ख्याच्या कारखान्यात गेले होते... तिथे सगळी प्रोसेस पाहीली..पण तरीही तो गुट्खा आणि पुडीतला गुटखा यात साम्य वाटत नव्हत..मग त्यानी कारण विचारले..तर तेथील कामगारानी दिलेल्या माहीती नुसार सर्व प्रोसेस झाल्यावर एक ट्युब येते पण त्यातील घटक कोणालाच माहीत नसतो..ती त्या मसाला सुपारीला चोळुन त्या गुट्ख्याला अंतिम स्वरूप येते.. त्या ट्युब मधील घट्का संदर्भात तेथील एका अधिकार्‍यास खोदुन विचारले असता समोर आलेली माहीती.. त्यात पालीच्या पेस्ट्चा वापर केलेला असतो म्हणुन ती गुप्त टेवतात व शेवटी पॅकींग च्या आधी फक्त चोळ्तात.. हा प्रसंग आठवण्याचे कारण ईथे कोणीतरी उल्लेख केलेला आहे की पालीचा उपयोग नशीले पदार्थ निर्मितीत होतो तो असाही असेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बापरे! हे गंभीर म्हंजे भलतेच

यशोधरा
Wed, 09/22/2010 - 11:20 नवीन
बापरे! हे गंभीर म्हंजे भलतेच गंभीर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

लेख मजेदार

भडकमकर मास्तर
Sat, 10/10/2009 - 15:58 नवीन
लेख मजेदार आहे... पाल मारायच्या पुष्कळ आठवणी जागृत झाल्या... वृद्ध पाल जमिनीवरती रांगायला लागते , असे माझे एक निरीक्षण आहे. पाल... पाल विषारी नसते.... तो एक गैरसमज आहे, असे ठाम प्रतिपादन करणारा एक लेख गेल्या महिन्यात सकाळमध्ये वाचला. जालावर शोधला नाहीये अजून. लेखक गाडगीळ आडनावाचे ( वनस्पति(!!)शास्त्रज्ञ ) आहेत.... विषारी हो नाही वगैरे कल्पना नाही पण लेख मस्त होता.... ... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

सापडला सापडला... लेख सापडला..

भडकमकर मास्तर
Sat, 10/10/2009 - 16:02 नवीन
http://beta.esakal.com/2009/06/29224833/editorial-giant-lizard-yashwa.html लेखक माधव गाडगीळ (लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.) पालींमुळे अन्नात विषबाधा होते अशा अनेक चुकीच्या कल्पना लोकांच्या डोक्‍यात घट्ट बसलेल्या आहेत. म्हणून घरात नव्याने कामाला येणाऱ्या सगळ्यांना पटवून द्यायला लागते, की असे काही नाही. त्यांना सगळीकडे, विशेषतः स्वैपाकघरात, जेवणघरात बिनधास्त फिरू द्या. त्या मुंग्या-झुरळांना छान काबूत ठेवतील. याची फलश्रुती म्हणजे माझ्या घरात जन्मभर काहीही विषप्रयोग न करता कीटकसृष्टी मर्यादा सांभाळून आहे. वर मी पालींची मृगया खुषीत पाहत आलो आहे. विशेषतः पावसाळ्यात पंखाची वाळवी, मुंग्यांचे लोंढे आले, की पालींची धावाधाव पाहायला जी मजा असते ती माहीत नसणाऱ्याला म्हणावेसे वाटते ः "हाय कंबख्त! तूने पीही नहीं!' _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर

Pain
Tue, 09/21/2010 - 14:19 नवीन
पाली इतर किडे खाउन जगतात हे बरोबर आहे पण त्यांचा जर अन्नाशी प्रत्यक्ष संबंध आला तर ते वाईट. अन्न शिजवताना केवळ एक पाल त्यात पडल्याने (व ते अन्न तसेच खाल्याने) बिचार्‍या आश्रमशाळेतल्या अनेक मुलांना हॉस्पिटलमधे दाखल केल्याच्या घटना वाचनात आल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

प्रकाटाआ

टिउ
Wed, 09/22/2010 - 00:16 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

छान प्रकटन

घाटावरचे भट
Sat, 10/10/2009 - 16:39 नवीन
छान प्रकटन (असं लिहिलं की प्रतिसादाला मोल येतं असं कोणीतरी म्हणून ठेवलंय. बाकी प्रकटन/अदृष्यन वगैरे आपल्याला समजत नाय बॉ). बाकी पाली,झुरळं अन मुंग्या यांचा भरपूर अणुभव घेतल्यावर एवढेच म्हणावेसे वाटते कोन्यात मारला स्प्रे अन दिला रंग चढचढून माळे दुखू लागले अंग झाडले घराला अवघे वरती-खाली पण तरी न जाती झुरळे,मुंग्या,पाली...
  • Log in or register to post comments

पाल्केस्ट

स्वाती२
Sat, 10/10/2009 - 16:39 नवीन
पाल्केस्ट्रा मस्त!
  • Log in or register to post comments

पाल्केस्ट्रा!

क्रान्ति
Sat, 10/10/2009 - 18:26 नवीन
मस्त लेख! आणि भटांचा"पालिया" पण!;) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

एक राहिली!

पिवळा डांबिस
Sat, 10/10/2009 - 21:02 नवीन
एकूण ५ आहेत, आणि तुझ्या ऑफिसला नेतेस त्या बॅगेतली? काळी कुळकुळीत पाठ आणि करडं पोट असलेली.... ती विसरलीस का? :) आता पुढल्या वेळी बॅगेत हात घालतांना तिची आठवण ठेव!!!! :)
  • Log in or register to post comments

कायतरीच

यशोधरा
Sun, 10/11/2009 - 00:06 नवीन
कायतरीच हां पिंडाकाका तुमचा! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हे काय

१.५ शहाणा
Sat, 10/10/2009 - 20:57 नवीन
पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे शीव शीव..................
  • Log in or register to post comments

थ्यांक्यू

यशोधरा
Sun, 10/11/2009 - 00:09 नवीन
थ्यांक्यू सगळ्यांना :)
  • Log in or register to post comments

पुर्वी

चिरोटा
Sun, 10/11/2009 - 00:19 नवीन
पुण्यात असताना दूध तापवत ठेवले होते.थोड्या वेळाने येवून बघतो तर उकळत्या दुधात पालीची धडपड चालु होती.अजुनही पाल दिसली की तोच प्रसंग आठवतो. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

मस्त

अरुण मनोहर
Sun, 10/11/2009 - 14:56 नवीन
पाल्केस्ट्रा!!!! मस्त टाईमपास लेख!!! ----* बंगळुरुच्या पाली, पाली भाषेत बोलतात का? ----* आमच्याकडे आंब्याच्या झाडावर एक पाल रहायची. तिचे नाव मी आम्रपाली ठेवले होते.
  • Log in or register to post comments

पाल... ई ई ई!

हेरंब
Sun, 10/11/2009 - 06:18 नवीन
पालीची भीति फक्त बायकांनाच वाटते असे नाही. मी व माझ्या काही मित्रांनाही पालीची प्रचंड भीति व किळस वाटते. त्यात बायकोलाही भीति वाटत असल्यामुळे पाल कोणी मारायची वा हाकलायची हा मोठा यक्षप्रश्न होतो. कदाचित् दोनदा पाठीवरच पाल पडल्यामुळे ही भीति वाटत असेल!
  • Log in or register to post comments

तुमचं घर

विसोबा खेचर
Sun, 10/11/2009 - 08:02 नवीन
तुमचं घर पालींनी दुधो नाहो, पुतो फलो! :) तात्या.
  • Log in or register to post comments

आँ??

यशोधरा
Sun, 10/11/2009 - 18:02 नवीन
आँ?? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अवांतर माहिती

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 10/11/2009 - 20:45 नवीन
यशो, दुधाला तेलुगुमधे पालु म्हणतात. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चुरचुरीत

भोचक
Sun, 10/11/2009 - 16:01 नवीन
चुरचुरीत लेख. बाकी, आमच्या नाशिक परिसरात पाली चुकचुक आवाज करत नाहीत, आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पाली आवाज करतात. प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतल्यावर आश्चर्य वाटलं होतं. त्यात कुणीतरी स्पष्टीकरण दिलं. रामाने (म्हणे) नाशिककडच्या पालींना शाप दिला होता, तुम्ही चुकचुकणार नाही. त्यामुळे नाशकाकडच्या पाली म्हणे चुकचुकत नाहीत. ( त्या 'हे राम' म्हणतात असं ऐकतोय.) खरं खोटं तो एक 'राम जाने'. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

येस्स

श्रावण मोडक
Sun, 10/11/2009 - 16:34 नवीन
हे ऐकले होते मीदेखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

धन्यवाद

यशोधरा
Sun, 10/11/2009 - 18:04 नवीन
धन्यवाद सर्वांचे :)
  • Log in or register to post comments

हा हा हा!

चतुरंग
Mon, 10/12/2009 - 13:21 नवीन
मस्त चुरचुरीत लेखन! एकाच झुरळाच्या पाठीमागे लागून ते खाण्यासाठी लढाई चाललेल्या दोन पाली मी बघितल्या आहेत. ट्यूब किंवा बल्बजवळ उडणार्‍या किड्यांना हळूहळू सरकत जाऊन, डोके विशिष्ठ कोनात अ‍ॅडजस्ट करुन, एकाच झपाट्याच्या हालचालीसरशी मटकावणार्‍या पाली निरखत मी कित्येक तास काढलेत! काचेवर बसलेल्या पालीच्या पंजाचे खळगे, खालीवर होणारा गळा आणि किंचित पारदर्शक त्वचा असलेले पांढरट पोट ह्याचेही मी सूक्ष्म निरीक्षण केले आहे. मांजराने पकडायचा प्रयत्न केला तर पाल काय शिताफीने शेपूट तोडुन पळते हेही बघण्यासारखे असते! पाल हा एक विलक्षण प्राणी आहे. (बास इतकेच सांगतो -नाहीतर आता यशोधरा मला पालीच्या तोंडी देईल! ;) ) जाता जाता - पाली भाषेत पालीला काय म्हणतात बरं? :? चतुरंग(पालकर)
  • Log in or register to post comments

सहमत. एकदा आम्ही गच्चीत गप्पा

Pain
Tue, 09/21/2010 - 14:27 नवीन
सहमत. एकदा आम्ही गच्चीत गप्पा मारत होतो. पाल दिसली. मित्राकडून लेसर(?)ची कीचेन घेउन त्याचा लाल ठिपका एका भिंतीवरच्या पालीला दाखवून तिला त्यामागे इकडे तिकडे फिरवायला लावले होते. गप्पा मारण्यात ठिपका हलवायचा राहिला आणि पाल तिथपर्यंत पोचली तरी तिला काही केल्या तो खाता किंवा पकडता येत नव्हता आणि काय होत आहे ते तिला कळतही नव्हते. खूप मजा आली :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हा हा हा.. मस्त! "पालीच पाली

मेघवेडा
Tue, 09/21/2010 - 14:26 नवीन
हा हा हा.. मस्त! "पालीच पाली चहूकडे, गं बाई करू मी रांधप कुणीकडे?" असं एखादं विडंबन पाड! ;) बाकी आम्हालाही आवडतात पाली लैच! आम्ही बार्बेक्यू करून खातो! ;)
  • Log in or register to post comments

>>पालीच पाली चहूकडे, गं बाई

यशोधरा
Tue, 09/21/2010 - 14:54 नवीन
>>पालीच पाली चहूकडे, गं बाई करू मी रांधप कुणीकडे?>>>> LOL! :D त्याला आता लय उशीर झाला! :)
  • Log in or register to post comments

पण विडंबन पाडायला काय जातंय!

मेघवेडा
Tue, 09/21/2010 - 15:31 नवीन
पण विडंबन पाडायला काय जातंय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो, आजकाल ते अगदी सोप्पं झालय

यशोधरा
Tue, 09/21/2010 - 15:40 नवीन
हो, आजकाल ते अगदी सोप्पं झालय म्हणे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हे घ्या!

मेघवेडा
Tue, 09/21/2010 - 16:44 नवीन
किरकिर उंदिर करे सारखा ओट्यावरही झुरळ चढे पालीच पाली चहूकडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे घरभर फिरले मारण्या पाली गोणी, पिंपं, ओट्याखाली चमकून बघता वरती दिसली दचकून माझा ऊर उडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे.. काप काढली असती तळुनि (पण) कढई भरली मधमाशांनी खुणाविते मज फळीवरूनि घसरत झुरळच दुग्धि पडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे बाकी कडवी सवडीने. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

क...ह......र............ विडं

सविता
Tue, 09/21/2010 - 22:39 नवीन
क...ह......र............ विडंबन म्हटले की लोक कसे पेटून ऊठतात जणू... सगळी प्रतिभा उफाळून येते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

पुन्हा लेख वाचला ! मस्तच !!

अवलिया
Tue, 09/21/2010 - 14:55 नवीन
पुन्हा लेख वाचला ! मस्तच !!
  • Log in or register to post comments

मस्तच !!

अब् क
Tue, 09/21/2010 - 15:24 नवीन
मस्तच !!
  • Log in or register to post comments

मला पाली खूप आवडतात. पाली

पुष्करिणी
Tue, 09/21/2010 - 15:43 नवीन
मला पाली खूप आवडतात. पाली असल्या की झुरळं, ते दिव्याभोवती संध्याकाळी येणार्‍या किड्यांचा आपोआप बंदोबस्त होतो. पाल अंगावर पडली की म्हणे अंघोळ करावी लागते , परत डाव्या की उजव्या साइडला पडली ह्याचं पण काहीतरी महत्व आहे. माझ्या अंगावर बर्‍याचदा पाली पडल्यात, मी त्यांना हातात घेउन फेकून दिलय्...फार गार गार लागतात. पालीला मारल्यावर म्हणे काहीतरे प्रयश्चित्त करावं लागतं रामेश्वरला जाउन ! काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.
  • Log in or register to post comments

हे मी पण ऐकलंय

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/21/2010 - 22:29 नवीन
काही लोकं पालीपासून काहीतरी नशीले पदार्थ तयार करतात असं ऐकलय.
माझ्या एका मित्रानेच मला पाल सिग्रेटमधे घालण्याबद्दल सांगितलं आहे; म्हणजे त्याने पाल ओढल्याचं सांगितलं आहे. सध्या माझ्या घरातल्या/घराबाहेरच्या पालीने चुकचुकणं बंद केलंय म्हणून मला ती फार आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

एक

सविता
Tue, 09/21/2010 - 15:59 नवीन
एक नंबर.....................................
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा