रविवार.....मस्त सुट्टीचा वार ..सकाळचे दहा-अकरावाजले होते. उनं उंडारायला चालू झाली होती.
बेडरूमची खिडकी उघडीच राहिली होती बहुतेक काल रात्री. त्यातूनच उनाचे कवडसे मला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत होते.
पडदाही फडफडत होता. हलकिशी हवा पडली होती.
माझ्या कानाजवळचं गजराचं घड्याळही (तिच्यायचं ते घड्याळ...बारावी पास झलो नसतो तर ते पण नसतं मिळालं) टिक-टिक-टिक-टिक-टिक करून माझ्या साखरझोपेचं (सकाळी दहा-अकरा वाजता ????...आणी ही सकाळ होय???) खोबरं (ओलं का सुकं ..माहीत नाही बुआ) करण्याच्या प्रयत्नात होते.
अचानक खनSSSSSन असा आवाज झाला. एका क्षणात झोप होत्याची नव्हती झाली.
काय नाय हो...काहीच झाल नव्हतं...आमच्या मातोश्रींनी माझ्या कानाखाली जाळ कढला होता..
"उठतोस का नाही रे मेल्या....उठ की...काल रात्री एक तर उशिरा आलास...उशिरा येणार म्हणून फोन पण केला नाही काही नाही..कुठं तोंड काळं करायला गेलं होतं कार्ट देव जाणे...उठतोयस का नाही आता???? "
आई स्वगत : " काय ही आजकालची पोरं..काही कशाचं भान नाही. इथं आई-बापाच्या जिवाला चिंता वाटते त्याचं काहीच नाही. "
तरीही आमची स्वारी ढिम्मच..शेवटचा उपाय म्हणून आईनी माठातल्या थंड पाण्याचा तांब्या माझ्या तोंडावर रिकामा केला.
झक मारून उठावच लागलं.
जागा तर झालो होतो पण आंथरूणातून उठायच मनच होईना. चादर दिली एका कोपर्यात फेकून आणी आंथरूणातच लोळत पडलो.
आई : "उठ रे आता, आवर आणी ये नास्टा करायला. दडपे पोहे करतेय मी"
दडपे पोहे तर मी दात न घासताच खाण्याच्या तयारीत होतो...आपले जीव की प्राण हो...
आई : "आधी तोंड धूवून ये , त्याशिवाय काही मिळणार नाही."
स्वरी गेली बेसिन वर...ब्रशवर पेस्ट लावली.....मान वर केली आरशात बघायला...
तर दिसतय काय????
स्वताचं प्रतिबिंब
(आरशात मग काय डोंबलं कतरीना दिसणारे का मंडळी??)
(आरशात कतरीना पाहण्यासाठी मंडळी ईथे टिचका.)
वाचने
4639
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
खण्ण
चालूद्या ----
नशीब, नाना नाहि दिसले आरश्यात!
!
In reply to नशीब, नाना नाहि दिसले आरश्यात! by लवंगी
वा!
प्रेरणा
सटकला आहेस
प्रभ्या, ले
काय करणार रे???
In reply to प्रभ्या, ले by धमाल मुलगा
अंमळ?
In reply to काय करणार रे??? by प्रभो
खव
In reply to अंमळ? by श्रावण मोडक
काय पाणचट
In reply to खव by प्रभो
आवडला...