नमस्कार,
दंगलींच्या आगीत सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे होरपळत असताना कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाबद्द्लची दूरदर्शनवरची बातमी आठवली. मिरजेपासून २०-२५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेली ६० वर्षे पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे जे सण (मोहरम, रमजान ईद) या काळात येतात ते या मंडळांतर्फे साजरे केले जातात. इथल्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त जात असतील..!
आंतरजालावर चित्रफित शोधली, पण मिळाली नाही.. हा "डेक्कन क्रोनिकल" चा दुवा देतोय...
http://www.deccanchronicle.com/bengaluru/border-meeting-faiths-503
आता कुणी म्हणेल, इथे हिंदू-मुस्लिम लफडा होत नाही का? होतो ना, पण प्रमाण खूपच कमी आहे. तसं दंग्याच्या बाबतीत जिल्ह्यात इचलकरंजीनंतरचे संवेदनशील गाव (पोलिसांच्या माहीतीनुसार) हिंदू-मुस्लिम दंग्याबाबतीत खूप मागे आहे . अजूनही चित्रफित/फोटो शोधतोय, मिळाल्यास नक्की अपलोड करेन..
--सुहास
वाचने
1793
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
***
हेच अंतिम
सुहास ! वाह