सुहास ! वाह ! आपने तो गाव का नाम रोशन कर दिया !
कुरुन्दवाड हे गाव संवेदन्शील मानले जाते, ते मुस्लिमान्च्या मोठ्या लोक सन्ख्येमुळे... बाकी भावनिक दृष्ट्या किंवा दंगलीच्या बाबतीत आपले गाव अ-संवेदनशील आहे.. :)
हिन्दु मुस्लीम ऐक्याची कुरुन्दवाडची परम्परा जुनी आहे... गावातील आणि शेजारच्या गावातील पीर/ ताबूत कुरुन्दवाडच्या पटवर्धन सरकारान्च्या कडे गूळ खोबरे घ्यायला येतात. त्यावेळी इतर अनेक हिन्दुन्च्या घरी देखील ते जातात.. मुस्लीम लोक /मशिदी गणेशोत्सवातदेखील उत्साहाने भाग घेतात.
भूगन्धर्व रहिमत खाँ याना व्यसनाच्या गर्तेतून रिन्ग मास्टर छत्रे ( आशिया खन्डातील पहिल्या सर्कसचे निर्माते) यानी बाहेर काढले आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीला चान्गले वळण दिले.. रहिमत खॉं त्यानन्तर काही काळ आणखी एका हिन्दु-ब्राम्हण कुटुम्बाकडे रहात होते.. नन्तर त्याना कुरुन्दवाडच्या पटवर्धन सरकारनी आश्रय दिला... हिन्दु मुस्लीम एकतेची ही कुरुन्दवाडची गौरवशाली परम्परा आहे.... आशा भोसले जेंव्हा कुरुन्दवाडमध्ये आल्या होत्या, तेंव्हा त्यानी भूगन्धर्वान्च्या कबरीचे भक्तीभावाने दर्शन घेतले होते...
प्रतिक्रिया
***
हेच अंतिम
सुहास ! वाह