Skip to main content

'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/08/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर 'वर' अनावर। देशोदेशी 'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला आपुल्या देहाचा। मांडसी बाजार कैसा हा आजार। राखी तुझा भारतीय नार। आहेस तू राखी संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा एकाशीच 'नांदा। सौख्यभरे' -अविनाश ओगले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1979
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

राखीला आशिर्वाद :O ? कविता राखीसाठी लिहीली असल्याने "बांधा " हा शब्दच जरा वेगळ्या नजरेनेच वाचला गेला. 'वर' अनावर। देशोदेशी - हे ही तसेच.

हा हा .. मजेदार. आवडली कविता :) -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

अनावर वर , राखी व बांधा वरचे ष्लेश अप्रतिम.

दिवसांनी आलात... पण असे आलात की अगदी साजेसेच. :)

भारीच आवडली कविता (भिकंभट्ट)बेसनलाडू