✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आणि श्रावण..

प
प्राजु यांनी
Tue, 07/28/2009 - 20:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6964 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

आहाहा!!

लवंगी
Tue, 07/28/2009 - 22:34 नवीन
मन कसं प्रसन्न झाल हा लेख वाचुन. लहानपणी पाट्यावर वाटलेली मेहंदि आणी तो जीवाला वेड लावणारा सुगंध.. जीओ प्राजु..
  • Log in or register to post comments

काय सुंदर

अनामिक
Tue, 07/28/2009 - 22:34 नवीन
काय सुंदर लिहिलं आहेस गं प्राजु तै! माझी ताई खूप सुंदर मेहंदी काढायची कोन तयार करून... त्यामुळे त्यासाठी चाललेला तिचा खटाटोप, तिच्या जमलेल्या मैत्रीणी, त्यांच्या गप्पा/गोंधळ सगळं डोळ्यासमोर आलं. -अनामिक
  • Log in or register to post comments

मेंदी

क्रान्ति
Tue, 07/28/2009 - 23:24 नवीन
आवडली प्राजु. मला मेंदीचा वास अगदी वेड्यासारखा आवडतो. खूप छान आठवणी जागवल्यास. मंगळागौरीला, नागपंचमीला मेंदी, नव्या बांगड्या, आणखी काय काय! दुपारी देवळाच्या आवारात झिम्मा, फुगड्या, फेर,झोके खेळणं, मस्त मजा असायची. एरवी चार भिंतीत बंद असलेल्या, घरात कामानेच दमणार्‍या आई-आजीच्या वयाच्या बायका हे खेळ खेळताना पाहिल्या आणि त्यांची मजेदार थट्टामस्करी ऐकली, की इतकं आश्चर्य वाटायचं! उखाणे, गाणी अगदी चंगळ असायची. श्रावण आणि भाद्रपद हे लेकींचे महिने आहेत असं म्हणतात. आता लेकी जवळ नाहीत, त्यामुळे श्रावणातले सणवार सगळे सुनेसुने झालेत. गौरी-गणपतीला त्या आल्या की होईल मेंदीचा कार्यक्रम! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

भाग्यश्री
Tue, 07/28/2009 - 23:32 नवीन
मस्त लेख! मात्र जरास्सा निराश शेवट नाही आवडला.. सगळा लेख मस्त आनंदी असताना असे नको होते असे वाटले.. मेंदी हा प्रकारच भन्नाट आहे की त्याच्याशी जुळलेल्या लहानपणच्या आठवणी हे काही कळत नाही! परवा नागपंचमीला मी विसरले होते मेंदी काढायची.. तर रात्री झोपेतून उठून काढ्ली! तेव्हा कुठे बरं वाटलं.. :) तो वास, साखरपाणी लावणे, अधांतरी ठेवून झोपल्यामुळे सकाळी ठणकणारा हात, तरी तितक्याच उत्साहाने सकाळी पहीलं काम कुठलं? तर मेंदी खरवडायचे! :) मग नंतर तासातासाने बघायचे किती रंगली! आणि शेवती ती मरून काळी झाली की खुष व्हायचे! लहानपणापासूनचा आवडीचा कार्यक्रम! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

छान स्मरणरंजन

बेसनलाडू
Tue, 07/28/2009 - 23:54 नवीन
आवडले. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ह्हाह्हा !!

टारझन
Wed, 07/29/2009 - 00:28 नवीन
ह्हाह्हा !! मजेदार लेख !! मस्त गं प्राजुतै !!!!!! अवांतर : तसा "मी आणि श्रावण" , "मी आणि भाद्रपद", "मी आणि चैत्र" , "मी आणि वैषाख","मी आणि माघ" आणि इतर ... अशी बारा भागांची मालिका एकसारखीच लिहील .. मला तर सगळेच दिवस सारखे .. घरच्यांनी सांगनेही सोडून दिलंय .. -(सदासर्वदा चिकनचापी) टार्जु
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Wed, 07/29/2009 - 00:52 नवीन
छान वर्णन.. सख्खी बहिण नसल्याने बायकांच्या राज्यातले हे इतके बारकावे माहित नसले/लक्षात नसले तरी लहानपणापासून (खरंतर लहानपणीच. हल्ली कुठे दिसतंय हे सगळं) बघितलेली आई आणिआजुबाजूच्या काकवांची धावपळ, लगबग आठवली. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

+१

महेश हतोळकर
Wed, 07/29/2009 - 13:02 नवीन
सख्ख्या बहिणी सकट सगळ्याच बाबतीत सहमत. आता आमच्या खटल्या मुळे घरातपण हे सगळं सुरु झालं आहे. अवांतरः "मेहंदी" पेक्षा "मेंदी" बरं वाटलं असत. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

प्राजू,

विसोबा खेचर
Wed, 07/29/2009 - 01:14 नवीन
प्राजू, सुंदर लेख.. तात्या.
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिलंय..

दिपाली पाटिल
Wed, 07/29/2009 - 01:44 नवीन
अगदी लहानपणी ची आठवण करुन दिलीत... आम्ही बहीणी ही असंच मेहंदी ची पाने आणायचो आणि वाटुन नेहमी एकच डिझाइन म्हणजे स्वस्तिक आणि कमळ काढायचो. :) वाटायचं राजस्थानी मेहंदी आपल्यालाही मिळायला हवी आणि कोन बनवता यायला हवा. असं नेहमी वाटायचं पण नेहमी च करायला जाय्चो एक आणि व्हायचं काही भलतंच. पण खुप मजा यायची श्रावणा... दिपाली :)
  • Log in or register to post comments

हेच

पाषाणभेद
Wed, 07/29/2009 - 08:49 नवीन
हेच म्हणतो. झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments

वा वा

श्रीयुत संतोष जोशी
Wed, 07/29/2009 - 10:33 नवीन
फारच छान लेख. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

छान

आशिष सुर्वे
Wed, 07/29/2009 - 10:37 नवीन
प्राजु ताई, भन्नाट लिहिलेय आपण!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिले आहे

पूजादीप
Wed, 07/29/2009 - 12:26 नवीन
मला श्रावण म्हटल कि आजही आठवण येते ति दुसर्याच्या बागेतुन चोरुन आणलेल्या फुलांची. रोज आईने वाचलेल्या कहाण्यांची. मेंदी तर आहेच. सुंदर लेख प्राजु.
  • Log in or register to post comments

सुरेख!!!!!

पर्नल नेने मराठे
Wed, 07/29/2009 - 12:29 नवीन
एका बाजूला निशिगंध उन्मत्त , मदमस्त आपल्याच गुर्मित उभा असावा ..तर एका कोपर्‍यात थोडिशी ओशाळून उभी असलेली गुलाबी आणि जांभळ्या रंगाची कोरांटी काट्यातूनही उठून दिसावी.. चुचु
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 07/29/2009 - 12:33 नवीन
प्राजु, श्रावण उभा केलास डोळ्यांसमोर.. स्वाती
  • Log in or register to post comments

अहाहा...

दिपक
Wed, 07/29/2009 - 12:39 नवीन
काय सुंदर लिहिले आहे.. तिसरा पॅराग्राफ भयंकर आवडला परत परत वाचला. :)
  • Log in or register to post comments

छान

इनोबा म्हणे
Wed, 07/29/2009 - 12:45 नवीन
लेख आवडला. -चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
  • Log in or register to post comments

लेख...

नम्रता राणे
Wed, 07/29/2009 - 12:58 नवीन
खुपच छान!!!!!!!!!! अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!! सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! वाचतांना अंगावर अक्षरशः श्रावणधारा बरसल्या.. अस वाटल की बोर्डवर फिरणारे हात थांबवून मेहंदी काढावी आणी ती सुकविणाच्या बहाण्याने दोन तास काही न करता टंगळमंगळ करत रहाव. प्राजू खरच छान लिहतेस ग ..
  • Log in or register to post comments

मस्त लेख

शाल्मली
Wed, 07/29/2009 - 13:25 नवीन
मस्त लेख लिहिला आहेस! शेवट एव्हढा निराश का गं केलास? बाकी एकदम झकास लेख. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन! आमच्याकडे मात्र मेहंदीचा पाला वाटूनच ती लावत असत!!

नरेंद्र गोळे
Wed, 07/29/2009 - 13:55 नवीन
सुरेख वर्णन! आमच्याकडे मात्र मेहंदीचा पाला वाटूनच ती लावत असत!! कुंपणांवरील मेहंदीच्या झुडुपांना बहर येऊ लागे. बारीक पांढुरक्या फुलांचा मंद सुगंध जातायेता लक्ष वेधून घेई. पावसाला सुरू होताच कितीही पाला तोडला तरी नवी पालवी झपाट्याने येत असल्याने भरपूर पाला तोडला जाई. पाट्यावरवंट्यांनी वाटून लेपाची वाडगी भरत. कित्येकदा त्यात थोडी साखरही मिसळली जात असे. चिकटण्यासाठी.
  • Log in or register to post comments

ऊत्तम लेख.

तर्री
Wed, 07/29/2009 - 20:08 नवीन
ऊत्कट...
  • Log in or register to post comments

लेख चांगला

लिखाळ
Wed, 07/29/2009 - 22:29 नवीन
लेख चांगला आहे. पावसासोबत येणार्‍या सणावारांच्या अनुशंगाने अनेक आठवणी रुंजी घालतात. तरारून उठणारी बाग आणि फुलणारी फुले मोह घालणारी. मेहंदी असा उच्चार सर्व लेखात आणि प्रतिसादांत सुद्धा अनेकांनी केला आहे. अनेक मराठी लोक असा उच्चार करतात असे दिसते. मी तरी मेंदी असाच उच्चार करतो. -- लिखाळ. मराठी लँग्वेजचं फ्युचंर मध्ये काय होणार गॉड नोज !
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 07/30/2009 - 07:11 नवीन
हेच म्हणतो. (मेंदी) लेख छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

छान

स्वाती२
गुरुवार, 07/30/2009 - 00:01 नवीन
छान लिहीलयस प्राजु. >>मेहंदी अशी जिवाभाची सखी तितक्याच जिवाभावाच्या सख्यांमध्ये बसून चहाच्या सोबतीने आणि हास्याचे तुषार उडवतच रेखाटली.. रंगली पाहिजे. अगदी मनातलं.
  • Log in or register to post comments

व्वा!!

आपला अभिजित
गुरुवार, 07/30/2009 - 00:31 नवीन
मस्त गं प्राजु!! पण `मेहंदी' हा हिंद्याळलेला उल्लेख खटकला. निदान तुझ्याकडून तरी!!!
  • Log in or register to post comments

हो बरोबर

llपुण्याचे पेशवेll
Mon, 08/03/2009 - 09:40 नवीन
हो बरोबर आहे.. मेंदी हाच शब्द जास्त जवळचा वाटतो. मेंदी या शब्दाला जो आपलेपणा आहे तो मेहेंदी या शब्दाला नाही. \ असो पण लेख छान वाटला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

मेहेंदी या

विसोबा खेचर
गुरुवार, 07/30/2009 - 08:40 नवीन
मेहेंदी या शब्दाला जो छान लहेजा आहे तो मेंदी या शब्दाला नाही असं माझं मत आहे.. आपला, (हिंदीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

उज्जैनास मेहंदी

भोचक
गुरुवार, 07/30/2009 - 12:14 नवीन
तात्या, हे खरंय. बाकी आमच्या उज्जैनास मेहंदी छानच मिळते होय. भरपूर दुकानं आहेत, मेहंदीची. प्राजूताई लेख छानच. मेंदीने रंगविण्याइतके केसही नसलेला (भोचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

धन्यवाद.

प्राजु
गुरुवार, 07/30/2009 - 08:54 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. मेंदी आणि मेहंदी.. दोन्ही शब्द मला आवडतात. पण खरं सांगायचं तर मेंदी म्हणताना मला चिंधी म्हणल्यासारखं वाटतं.. आणि मी तरी लहानपणापासून मेहंदी असंच म्हणत आले आहे. त्यामुळे मेहंदी हा शब्द अमराठी आहे असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना मेंदी आवडतं त्यांनी 'ह' गाळून वाचावं. भावना महत्वाची असं माझं मत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरंच खुप छान लेख

अश्विनि३३७९
गुरुवार, 07/30/2009 - 12:20 नवीन
लहानपणी मावस बहीणी च्या लग्नात मेहेंदी चा केलेला हट्ट आठवला..
  • Log in or register to post comments

खुपच छान!!!!!!!!!!

विजय नाणेकर
Fri, 07/31/2009 - 10:11 नवीन
खुपच छान छान लिहीतेस प्राजु ताई.
  • Log in or register to post comments

व्वा !

दत्ता काळे
Mon, 08/03/2009 - 18:53 नवीन
फार छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

यशोधरा
Mon, 08/03/2009 - 20:09 नवीन
सुरेख लेख प्राजू! खूपच आवडला!
  • Log in or register to post comments

खरंच सुंदर

अन्वय
Mon, 08/03/2009 - 23:05 नवीन
प्राजू, खरंच सुंदर लिहलंय गं. त्या मेहेंदीचा ओलावा तुझ्या लेखनातून जाणवला अगदी. तुझ्या शैलीदार लेखनामुळे. असंच लिहित राहा. खरंच मलाही असंच ओघवतं लिहिता यायलाच हवं.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा