काय सुंदर लिहिलं आहेस गं प्राजु तै! माझी ताई खूप सुंदर मेहंदी काढायची कोन तयार करून... त्यामुळे त्यासाठी चाललेला तिचा खटाटोप, तिच्या जमलेल्या मैत्रीणी, त्यांच्या गप्पा/गोंधळ सगळं डोळ्यासमोर आलं.
-अनामिक
आवडली प्राजु. मला मेंदीचा वास अगदी वेड्यासारखा आवडतो. खूप छान आठवणी जागवल्यास. मंगळागौरीला, नागपंचमीला मेंदी, नव्या बांगड्या, आणखी काय काय! दुपारी देवळाच्या आवारात झिम्मा, फुगड्या, फेर,झोके खेळणं, मस्त मजा असायची. एरवी चार भिंतीत बंद असलेल्या, घरात कामानेच दमणार्या आई-आजीच्या वयाच्या बायका हे खेळ खेळताना पाहिल्या आणि त्यांची मजेदार थट्टामस्करी ऐकली, की इतकं आश्चर्य वाटायचं! उखाणे, गाणी अगदी चंगळ असायची. श्रावण आणि भाद्रपद हे लेकींचे महिने आहेत असं म्हणतात. आता लेकी जवळ नाहीत, त्यामुळे श्रावणातले सणवार सगळे सुनेसुने झालेत. गौरी-गणपतीला त्या आल्या की होईल मेंदीचा कार्यक्रम! :)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
मस्त लेख! मात्र जरास्सा निराश शेवट नाही आवडला.. सगळा लेख मस्त आनंदी असताना असे नको होते असे वाटले..
मेंदी हा प्रकारच भन्नाट आहे की त्याच्याशी जुळलेल्या लहानपणच्या आठवणी हे काही कळत नाही! परवा नागपंचमीला मी विसरले होते मेंदी काढायची.. तर रात्री झोपेतून उठून काढ्ली! तेव्हा कुठे बरं वाटलं.. :)
तो वास, साखरपाणी लावणे, अधांतरी ठेवून झोपल्यामुळे सकाळी ठणकणारा हात, तरी तितक्याच उत्साहाने सकाळी पहीलं काम कुठलं? तर मेंदी खरवडायचे! :) मग नंतर तासातासाने बघायचे किती रंगली! आणि शेवती ती मरून काळी झाली की खुष व्हायचे!
लहानपणापासूनचा आवडीचा कार्यक्रम! :)
http://www.bhagyashree.co.cc/
ह्हाह्हा !! मजेदार लेख !! मस्त गं प्राजुतै !!!!!!
अवांतर :
तसा "मी आणि श्रावण" , "मी आणि भाद्रपद", "मी आणि चैत्र" , "मी आणि वैषाख","मी आणि माघ" आणि इतर ... अशी बारा भागांची मालिका एकसारखीच लिहील .. मला तर सगळेच दिवस सारखे .. घरच्यांनी सांगनेही सोडून दिलंय ..
-(सदासर्वदा चिकनचापी) टार्जु
छान वर्णन.. सख्खी बहिण नसल्याने बायकांच्या राज्यातले हे इतके बारकावे माहित नसले/लक्षात नसले तरी लहानपणापासून (खरंतर लहानपणीच. हल्ली कुठे दिसतंय हे सगळं) बघितलेली आई आणिआजुबाजूच्या काकवांची धावपळ, लगबग आठवली.
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
सख्ख्या बहिणी सकट सगळ्याच बाबतीत सहमत. आता आमच्या खटल्या मुळे घरातपण हे सगळं सुरु झालं आहे.
अवांतरः "मेहंदी" पेक्षा "मेंदी" बरं वाटलं असत.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
अगदी लहानपणी ची आठवण करुन दिलीत... आम्ही बहीणी ही असंच मेहंदी ची पाने आणायचो आणि वाटुन नेहमी एकच डिझाइन म्हणजे स्वस्तिक आणि कमळ काढायचो. :)
वाटायचं राजस्थानी मेहंदी आपल्यालाही मिळायला हवी आणि कोन बनवता यायला हवा.
असं नेहमी वाटायचं पण नेहमी च करायला जाय्चो एक आणि व्हायचं काही भलतंच. पण खुप मजा यायची श्रावणा...
दिपाली :)
हेच म्हणतो.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
एका बाजूला निशिगंध उन्मत्त , मदमस्त आपल्याच गुर्मित उभा असावा ..तर एका कोपर्यात थोडिशी ओशाळून उभी असलेली गुलाबी आणि जांभळ्या रंगाची कोरांटी काट्यातूनही उठून दिसावी..
चुचु
खुपच छान!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाचतांना अंगावर अक्षरशः श्रावणधारा बरसल्या..
अस वाटल की बोर्डवर फिरणारे हात थांबवून मेहंदी काढावी आणी ती सुकविणाच्या बहाण्याने दोन तास काही न करता टंगळमंगळ करत रहाव.
प्राजू खरच छान लिहतेस ग ..
सुरेख वर्णन! आमच्याकडे मात्र मेहंदीचा पाला वाटूनच ती लावत असत!!
कुंपणांवरील मेहंदीच्या झुडुपांना बहर येऊ लागे. बारीक पांढुरक्या फुलांचा मंद सुगंध जातायेता लक्ष वेधून घेई. पावसाला सुरू होताच कितीही पाला तोडला तरी नवी पालवी झपाट्याने येत असल्याने भरपूर पाला तोडला जाई. पाट्यावरवंट्यांनी वाटून लेपाची वाडगी भरत. कित्येकदा त्यात थोडी साखरही मिसळली जात असे. चिकटण्यासाठी.
लेख चांगला आहे. पावसासोबत येणार्या सणावारांच्या अनुशंगाने अनेक आठवणी रुंजी घालतात. तरारून उठणारी बाग आणि फुलणारी फुले मोह घालणारी.
मेहंदी असा उच्चार सर्व लेखात आणि प्रतिसादांत सुद्धा अनेकांनी केला आहे. अनेक मराठी लोक असा उच्चार करतात असे दिसते. मी तरी मेंदी असाच उच्चार करतो.
-- लिखाळ.
मराठी लँग्वेजचं फ्युचंर मध्ये काय होणार गॉड नोज !
हो बरोबर आहे.. मेंदी हाच शब्द जास्त जवळचा वाटतो.
मेंदी या शब्दाला जो आपलेपणा आहे तो मेहेंदी या शब्दाला नाही. \
असो पण लेख छान वाटला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
तात्या, हे खरंय. बाकी आमच्या उज्जैनास मेहंदी छानच मिळते होय. भरपूर दुकानं आहेत, मेहंदीची. प्राजूताई लेख छानच.
मेंदीने रंगविण्याइतके केसही नसलेला (भोचक)
सर्वांचे मनापासून आभार.
मेंदी आणि मेहंदी.. दोन्ही शब्द मला आवडतात. पण खरं सांगायचं तर मेंदी म्हणताना मला चिंधी म्हणल्यासारखं वाटतं.. आणि मी तरी लहानपणापासून मेहंदी असंच म्हणत आले आहे. त्यामुळे मेहंदी हा शब्द अमराठी आहे असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना मेंदी आवडतं त्यांनी 'ह' गाळून वाचावं. भावना महत्वाची असं माझं मत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
आहाहा!!
काय सुंदर
मेंदी
मस्त लेख!
छान स्मरणरंजन
ह्हाह्हा !!
छान
+१
प्राजू,
मस्तच लिहिलंय..
हेच
वा वा
छान
खुप छान लिहिले आहे
सुरेख!!!!!
मस्त..
अहाहा...
छान
लेख...
मस्त लेख
सुरेख वर्णन! आमच्याकडे मात्र मेहंदीचा पाला वाटूनच ती लावत असत!!
ऊत्तम लेख.
लेख चांगला
+१
छान
व्वा!!
हो बरोबर
मेहेंदी या
उज्जैनास मेहंदी
धन्यवाद.
खरंच खुप छान लेख
खुपच छान!!!!!!!!!!
व्वा !
सुरेख लेख
खरंच सुंदर