Skip to main content

अंतराळशास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 24/07/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळातील कचरा ही समस्या आता लांबून मजा बघण्याच्या पलिकडे गेलेली असल्यामुळे मला राहवले नाही. मी बराच विचार केला व मला दोन मार्ग दिसले ते येणे प्रमाणे- १. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी. २. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी. आपल्यालाही जर काही अभिनव उपाय सुचत असतील तर जरुर येथे द्यावेत. मिपावर अंतराळविज्ञानातील शास्त्रज्ञ असतील तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला हा लेख वाचायला द्यावा व ह्याची दखल घेण्यास भाग पाडावे. कळावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15577
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by अमृतांजन

हा अवांतर प्रतिसाद आहे.. मला चांदणी मिळालीच पाहीजे. (चांदणीला चटावलेला) अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by अमृतांजन

नाईल, पिडाकाका, लिखाळ, कर्क, अवलिया, मास्तर, बिटी, व ई मिपाकर मित्रांनो, काल रात्रीच्या ह्या विनोद-विरंगुळ्यात सहभागी होऊन मजा आणलीत. धन्यु. स्वतः धागा चालु करणार्‍या सदस्याची हि प्रतिक्रीया वाचुन अतिशय संताप आला. आधी स्वतः धागा उघडुन गंभीर धागा, गंभीर चर्चा करा असे सदस्यांना सुचवायचे आणी स्वतःचा वेळ मजेत गेला की मग अगदी समंजसपणे त्या धाग्याला विनोद विरंगुळा म्हणुन मोकळे व्हायचे. ह्या सर्व गोष्टींची नोंद घेउन अशा सदस्यावर कारवाई व्हायला पाहिजे. असा धागा निघाला आहे कळल्याबरोबर मी काल रात्री ४ च्या ऐवजी ६ पेग मारुन 'रॉयल स्टॅग रॉकेटलाईन्सने' चंद्राकडे प्रयाण केले. तेथील कचर्‍याचा आढावा घेतला. मंगळावरील मंगळुवासीयांशी चर्चा करुन मंगळ हद्दीत एखादा कचरा डेपो उभा करायची परवानगी मिळेल का ? ह्याची चौकशी केली. सलग साडे बत्तीस मिनीटे मी मंगळुंना 'कन्व्हीन्स' करायचा प्रयत्न करत होतो. उपग्रह वाहिनीवरुन आमचे हिरवट विप्र पण समुपदेशन करतच होते, शेवटी पुढच्या वेळी टार्‍याला घेउन येतो म्हणालो तेंव्हा कुठे यशस्वी सुद्धा झालो ! आणी आता पृथ्वीवर येउन बघतो तो इथे हा धागा विनोद विरंगुळा म्हणुन जाहीर झालेला. मी अत्यंत कडक शब्दात ह्या सगळ्याचा निषेध करतो आणी माझी हि प्रतिक्रीया लेखी तक्रात म्हणुन मिपा ग्रामपंचायतीने दाखल करुन घ्यावी अशी विनंती करतो. अवांतर :- कोण म्हणते अमृतांजनने डोकेदुखी जाते ? ती जाते का येते ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुमच्या ह्या निषेधाची कडकातकडक अंमलबजावणी प्रशाननाने करावी अशी मी शिफारस स्वत करत आहे. कोण म्हणते अमृतांजनने डोकेदुखी जाते ? ती जाते का येते ? ती येते आणिक जाते.. येताना कळा आणिते ~प्रोप्रा. मिपा साटेलाईट सर्व्हीसेस

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>असा धागा निघाला आहे कळल्याबरोबर मी काल रात्री ४ च्या ऐवजी ६ पेग मारुन 'रॉयल स्टॅग रॉकेटलाईन्सने' चंद्राकडे प्रयाण केले. तेथील कचर्‍याचा आढावा घेतला. =)) =)) =)) =)) =)) परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>असा धागा निघाला आहे कळल्याबरोबर मी काल रात्री ४ च्या ऐवजी ६ पेग मारुन 'रॉयल स्टॅग रॉकेटलाईन्सने' चंद्राकडे प्रयाण केले. तेथील कचर्‍याचा आढावा घेतला. =)) =)) =)) =)) =)) परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.
क्वॉन्च ईमाईन कवा उडन आन कोन्ला किती विंधन पुरन काय सांगता यायच नाई ब्वॉ. पराला पुरन वले त्यावढ विंधन. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

परा, काय हे सहा पेग ईंधन पुरले काय तुला चंद्रावर जायला.. काहीतरीच.
उपग्रहांनीपण मदत केली- आपोझिट पोल आट्राक्शन- उपग्रहांची राणीमाशी म्हणाली, "परीकथेतील राजकुमारा स्वप्नी मा़झ्या येशील का?" :-) :० ज्योक! ज्योक!!

ही योजना यशस्वी झाली तरी आंतरजालीय कचर्‍याच्या समस्येवर ही चर्चा करण्यास हरकत नाही

ही योजना यशस्वी झाली तरी आंतरजालीय कचर्‍याच्या समस्येवर ही चर्चा करण्यास हरकत नाही बाप रे, आता परप्रांतिय कचर्‍यासारखाच परलोकीच्या कचर्‍याचा प्रश्नही मनसेने हाती घेतलेला दिसतो.. उपग्रहांनो आपापल्या देशांना परता लवक्कर.. अवांतरः बाकी नासाच्या शास्त्रज्ञांचे समूपदेशन मास्तरांनी सुरू केल्याचे ऐकले.. (पहिल्याच कॉलमध्ये त्यांनी शरणागती पत्करल्याचे मास्तर अभिमानाने धमूला बराss च वेळ सांगत असल्याची तक्रार त्याची बायको माझ्याकडे करत होती) भडकमकरमास्तरही अंतराळीय कचर्‍यावर एक कादंबरी, तीन स्फूटे, तीन समि़क्षणे (व तीनशे प्रतिसाद) आणि 'अंतराळातील स्फिंक्स' ही (खास पुरूषोत्तम करंडकासाठी) एकांकिका लिहित आहेत. (एकांकिकेची खासियतः सर्व पात्रे अंतराळातून बोलत असल्याने स्टेजवर कोणीच दिसत नाही). पार्श्वभूमीला केसूकाकांचे 'अंतराळीच्या गूढ गर्भा.. हे अंतराळगीत वाजणार आहे म्हणे! ह्या धांदलीत विजूभाऊ अंतराळीय कचरा जपानी गादीत गुंडाळता येईल का अशी विचारणा आयुकात वारंवार करून भंडावत आहेत. पेठकरकाका एखाद्या रिकाम्या (निकाम्या) उपग्रहात उपहारगृह खोलायची परवानगी मागायच्या तयारीत आहेत. आता हाही कचरा पुणे मनपा आपल्या बोकांडी मारेल ह्या भीतीने उरळी कांचनमधले गावकरी उपोषणाला बसलेत सुद्धा! ते काहीही असो..तात्या मात्र खुशीत आलेत.. एव्हढ्या महत्वाच्या प्रश्नाला मिसळपावने वाचा फोडल्यामुळे नासा त्यांचा 'सिंडी क्रॉफर्डच्या हस्ते विशेष पुरस्कार (आणि इतर 'बरंच' काही) करणार असल्याची गुप्त बातमी ते परत परत सांगत ठाण्यात फिरत आहेत

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

तुमचे अस्तित्त्व दिसत नव्हते. त्यामुळं तुम्हाला काका म्हणावे की काय या विचारात होतो. तेवढ्यात आलात. हुच्च प्रतिसाद अगदी.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

एखाद्या रिकाम्या (निकाम्या) उपग्रहात उपहारगृह खोलायची परवानगी मागायच्या तयारीत आहेत. क्या आयडीया है सरजी!