हे अकरावितले मुलं फार विचार करतात बुवा!
अहो एकदम सोपं आहे. कालच शनीवरुन फोन आला होता, त्यांच्या कडा झिजत चालल्यात. आपण आपला कचरा फक्त शनीच्या कड्यांकडे पाठवुन दिला की काम झाले. (तो ही कमीच पडण्याची शक्यता असल्याने आपणच शनीवर रहायला जाउन वारंवार असे उपग्रह पाठवुन कचर्यात, आपलं कड्यात भर घालीत राहणे हा अंतिम उपाय)
* का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?*
लेखाच्या लांबीचा विचार करता ७-८ विता कमीच दिसत आहेत.
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
प्लीज प्लीज चांदणी वाटप केंद्रात जावु नका बर का !!!
हे सगळे काय आहे त्याची मला माहीती नाही. नंतर पाहीन पण सक्काळ पासुन त्या कालेजला लायनीत उभे राहून पाय तुटलेत त्यामुळे....आजतरी लायनीत उभे राहणार नाही.
आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे.
>>>आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे.
काय सांगता ? म्हणजे आजची रात्र डोक्यावर घेणार काय तुम्ही ?
सोडवा ! सोडवा ! गहन प्रश्न सोडवा... शुभेच्छा !!
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
<<<आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे. >>> :W
हे वाक्य ह्रदयाला लागल...
अनिवे, शिवाजी विद्यापीठातुन यांष्यावर पिचडि घ्या तुम्ही !!
--टुकुल.
मिपावरचा कचरा कमी करण्याची तात्यांनी अभिनव योजना आखल्याचे ऐकिवात आहे. त्या अनुभवाचा काही उपयोग होत असेल तर आम्ही स्वखर्चाने तात्यांना नासा किंवा जिथे आवश्यक असेल तिथे अंतराळ कचरा कमी करण्यास मदत म्हणुन पाठवण्यास तयार आहोत.
कचरा कुठलाही असो साफ व्हायलाच हवा. कसे ?
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
हा धाग्याचा दुर्बिटणेबाई योग्य तो परामर्ष घेतीलच! तेंव्हा त्यांच्या कुरणात जास्त न चरता आम्ही दोन शब्द टाकून आमच्या कुरणात (पुण्यात स्वाईन फ्ल्यू!!) जातो...
१. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी.
वा!! म्हणजे आपला कचरा दुसर्याच्या अंगणात!!!
:)
२. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी.
आणि मग भूस्थिर उपग्रहांचं काय? सेलफोन नाही वाटतं तुमच्याकडे? की मंगळावर स्थायिक व्हायचा प्लान आहे?
:)
* का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?*
हे मात्र जबराहा!!! अस्सल मिपाकरी अभिप्राय!!!!
:)
आणि मग भूस्थिर उपग्रहांचं काय?
भूस्थिरता चंद्रावरुनही साधता येईल. आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. सगळे उपग्रह त्याच बाजूला ठेवायचे. चंद्र फिरतो आणि त्यामुळे पृथ्वी स्क्यान होईल.
द्या टाळी!
हे कसं काय? हां तो सॅटेलाईट चंद्राच्या "भू" सापेक्ष "भूस्थिर" होईल. पण पृथ्वीच्या भू सापेक्ष? :?
(ऑन सेकंड थॉट..)
अरे हो शक्य आहे..त्या सॅटेलाईटचा पृथ्वीवर जो ट्रॅन्स्मिटर-रिसीव्हर आहे तो चंद्राच्याच कोनीय गती प्रमाणे पृथ्वीवर फिरता ठेवायचा..अरे हाय काय अन नाय काय? #:S
पिडाकाकांनी माझा इथे उल्लेख केल्यामुळे मला इथे प्रतिसाद देणं भाग पडलं नाहीतर अशा प्रक्षोभक धाग्यांवर लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं.
अंतराळात कचरा करणार्यांचा निषेध! काय होतं की तुम्ही (एनाराय, पक्षी अमेरिकास्थित भारतीय) लोकं फिरायला म्हणून जाता अंतराळात आणि कचरा टाकून येता. तुमच्या देशात तुम्ही कचरा असाच फेकून देता का? शिवाय तुमच्याकडे दुसर्या दिवशी पाऊस पडणार म्हणून आदल्या दिवशी साफ होतो तशी सफाई अंतराळात काय कारणास्तव करणार म्हणून तुम्ही ती कारवाई होऊच देत नाहीत! (हुश्श, एक लांबलचक वाक्य टंकून बोटात लचक भरली.) तो कचरा आम्हां लोकांच्या पोटावर पाय आणतो (हा पाय तो धाग्यातला नाही, कृपया गैरसमज नकोत. हा पाय मराठीतलाच ...) कारण तुम्ही अनिवासी लोकं कचरा सोडून परत येता आणि मग आकाशातल्या ज्या गोष्टींच्या अभ्यासासाठी आम्हाला पैसे मिळतात त्या गोष्टीच दिसेनाशा होतात.
आणि मग पर्यावरणवाल्यांना निष्कारण काम मिळतं. निष्कारण त्यांना पैसे मोजून "हा कचरा साफ कसा करता येईल" ते विचारावं लागतं. याला माझा व्यक्तीश: आणि अ-व्यक्तिशः साफ विरोध आहे.
आता हा कचरा साफ कसा करायचा ही गोष्ट माझ्या अभ्यासाची आणि आवडीचीही नाही. पण तरीही इथे मतं मांडण्याचा शिरस्ता आहे (कोण रे ते पच्चकन पिंक मारण्याच्या गोष्टी करत आहे?) म्हणून मीही माझं मत मांडत आहे. हा कचरा साफ करण्यासाठी आणखी काही उपग्रह सोडावेत. त्या उपग्रहांना चुंबक (धातूंचे, इतर विचार केल्यास अपमान होईल) लावावेत आणि मग तो कचरा उपग्रहाकडे येईल. जर तो कचरा फेरोम्याग्नेटीक नसेल, तर आधी त्यावर लोखंडाचा स्प्रे मारावा आणि मग चुंबकाचा प्रयोग करावा.
फेरोम्याग्नेटीक म्हणजे काय ते मलाही माहित नाही, पण जड शब्द वापरले की मग आपणही दिग्गज लोकांच्या यादीच्या जवळ सरकतो.
(चतुर चांदणी) अदिती
दुर्बिटणे बाईंशी बर्याच बाबतीत असहमत आहे. हे सगळ्याचं खापर आमच्या डोस्क्यावर मारायची या लोकांची जुनी सवय आहे.
मुळात जर तिथे आम्हाला पेपर नॅपकीन्स, डीस्पोजेबल चमचे, प्लेट्स वगैरे गोष्टी मिळणार असतील तर आम्ही इथुन घेउन जाउच कशाला? अन मग तिथे कचरा करुच कशाला?
बरं आता तिथे आम्ही गेलो तर आमच्या मुलभुत गरजांकडे लक्ष नको का द्यायला कुणी तरी, खरं तर आमची अमेरीका दर वेळी करतेच ना? Mirबांधलंच ना आम्ही?
आता आम्ही सध्या जरा मंदीत आहोत तर तिथे या सुधारणा करण्याचे तुम्ही लोक (पक्षी: तिसरे जगवाले) का नाही मनावर घेत?
काही सार्वजनिक स्वच्छतागृहे, हॉलिडे रिसॉर्ट्स, एक फुट्बॉलचे मैदान, बार्बेक्यु करता सुविधा, (छे हो या शिवाय कसली ती सुटी?) वगैरे बनवा म्हणजे झाले, अन कचर्याकरिता एक रिसायकलींग प्लांट टाका! अरे हाय काय अन नाय काय?
पिडाकाकांनी माझा इथे उल्लेख केल्यामुळे मला इथे प्रतिसाद देणं भाग पडलं नाहीतर अशा प्रक्षोभक धाग्यांवर लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं.
तुमचे उपाय लक्षणीय आहेत तसेच आक्षणीय (actionable) आहेत; तुम्ही संबंधीत अधिकार्यांना ह्या सगळ्या उपायांवर लक्ष देण्यास सांगावे.
काय होतं की तुम्ही (एनाराय, पक्षी अमेरिकास्थित भारतीय) लोकं फिरायला म्हणून जाता अंतराळात आणि कचरा टाकून येता.
आम्ही अंतराळात फिरायला जात नाही. आम्ही जर रॉकेटमध्ये जाऊन बसलो तर आमच्या वजनाने ते रॉकेट उडेल तरी का? उगाच काहितरी....
:)
आणि उपग्रहीय कचरा करण्यात इस्रोही सामील आहेच की...
त्यात नुकतंच चंद्रावर देखील एक डबडं टाकून आलो ना आपण!!!
:)
बाकी चुंबकीय उपग्रहांची कल्पना आवडली!!! त्यातही चुंबकीय उपग्रहांपेक्षा काही चुंबकीय उपग्रहिणी सोडल्या तर हे सगळे उगाच तरंगणारे आळशी उपग्रह त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतील काय?
मिपावरच्या जाणकारांनी प्रबोधन करावे....
त्यातही चुंबकीय उपग्रहांपेक्षा काही चुंबकीय उपग्रहिणी सोडल्या तर हे सगळे उगाच तरंगणारे आळशी उपग्रह त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतील काय?
चुंबकीय उपग्रहिणी की चुंबनीय उपग्रहिणी? ;) 'फ्युचरामा' बघितल्यापासून भविष्यात बेन्डरच्या कुळातले यंत्रमानवही - आणि पर्यायाने उपग्रह, उपग्रहिणी वगैरे - मानवी भावभावना बाळगणारे असू शकतात, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. तसे झाले तर चुंबकीय उपग्रहिणी चुंबनीयही असू शकतील ;)
(पर्यायी)बेसनलाडू
कल्पना कुणाची का असेना....
ते डबडं आता अनंत काळपर्यंत तिथे पडून रहाणार हे तर खरं?
मला वाटत नाही की इस्त्रोची ते रिकव्हर/ रिसायकल करण्याची काही योजना आहे!!!
:)
या गंभिर प्रश्नाची थट्टा होत आहे हे पाहून अस्वस्थ झालो आहे. #:S
कुणालाच कसे कळत नाही, जर कचरा असाच वाढत गेला तर पृथ्वी भोवतालच्या वातावरण कचर्याने आच्छादीत होईल मग रात्री चांदण्या कशा दिसणार? :?
मग बसा म्हणत, "घरात हसरे तारे असता..."
>>मग रात्री चांदण्या कशा दिसणार?
असे होणार हे माहित होते म्हणुन सरकारी स्तरावर चांदण्या वाटप कार्यक्रम आखला गेला आहे. आपल्याला सांगायला विशेष आनंद होत आहे की या कार्यक्रमाची सुरवात आपल्या गावापासुनच म्हणजेच मौजे मिपावाडी पासुन करण्यात आली आहे. सरपंचांनी उद्धाटनातच ब-याच चांदण्या मिळवल्या असे ऐकले आहे.
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
हम्म गंभीर प्रश्न आहे खरे हा???
एक काम करायचे का??? आपण काही क्लिन आप मार्शल्स नेमुया जे लोक आतंराळात कचरा करत आहेत त्यांचा कडुन पैसे वसुल करता येईल.... आणी कचरा साफ करायला क्लीन उप हिरवे रॉकेट सोडता येवु शकतात... मला तर एवढेच सुचते
(११ वीतला मिपाकर)निखिल
================================
११ वीतील मुलाने फक्त इंजिनियरींगचा अथवा मेडीकलच्या प्रवेशाचा विचार करावा... हे असले गंभीर विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेत तर त्या प्रवेशांचे जाउंदेत पण समुपदेशनाला पण प्रवेश मिळणार नाही :)
तो अंतराळातला कचरा पृथ्वीवर रात्रीच्या वेळेस पडेल अशी काही व्यवस्था करावी. पृथ्वीच्या वातावरणात येताना तो कचरा जळून मस्त उजेड पडेल. तेवढीच लोडशेडिंगवर मात करता येईल.
याचे कन्त्राट रीलायन्स देतायेईल.
अवांतरः इरीडीयम कम्पनीने त्यांचे ६५ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. उपग्रहांचा माणसाच्या पत्रीकेत विचार होतो का?
( एवढ्या लांबच्या छोटुकल्या प्ल्यूटो चा विचार होत असेल तर त्यामाने जवळचे उपग्रह विचारात घ्यायला हवेतच ना)
तुमची तळमळ पटली.
इथे खूप लोक विनोदी समजत आहेत या धाग्याला.
अशा लोकांचा खूप निषेध.
त्यांच्या डोक्यावर अंतराळातला कचरा पडो.
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
अतिशय गंभीर आणि विचारात टाकणारा धागा.
एक उपाय सुचला आहे.
यापुढे अंतराळात जाणार्या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल.
-- लिखाळ.
आपण जास्त बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असा नाही. :)
यापुढे अंतराळात जाणार्या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल.
प ड लो खुर्चीवरून!
सोबतची कॉफी थोडी सांडली; थोडे पॉपकॉर्न सुद्धा. तो कचरा गोळा करायची वेळ झालीये.
(सफाई कामगार)बेसनलाडू
'या प्रतिसादाबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत' हे लिखाळ जोशींचे वाक्य आठवून गेले.
(स्मरणशील)बेसनलाडू
ऑन अ सेकन्ड थॉट्, लिखाळांनी सुचवलेला उपाय प्रत्येक उपग्रहाच्या बाबतीत न अवलंबता, खास सफाई कामगारासारखा सफाई उपग्रह ठराविक कालावधीने सोडून त्याच्या बाबतीत अवलंबावा, असे वाटते.
(पर्यायी)बेसनलाडू
ऑन अ सेकन्ड थॉट्, लिखाळांनी सुचवलेला उपाय प्रत्येक उपग्रहाच्या बाबतीत न अवलंबता, खास सफाई कामगारासारखा सफाई उपग्रह ठराविक कालावधीने सोडून त्याच्या बाबतीत अवलंबावा, असे वाटते.
(पर्यायी)बेसनलाडू
ठीक आहे. TED आयडिया वर्थ स्प्रेडिंग मध्ये माझे भाषण असेल तेव्हा मी ही कल्पना मांडिन. तुम्हाला नंतर नेटावरचा दुवा देईन ;)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
>> पॅटन्टचे काय?
हे मी चुकून पॅन्टचे काय असे वाचले. :) असो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
यापुढे अंतराळात जाणार्या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल
+१ सहमत
प्रतिक्रिया
निशब्द..
नाही. असे
हे
निशब्द..
* का हो भौ
आपण एका
अगाबाबौ
प्लीज
>>>आणि खरे
हो. गहन
...
नाही आम्ही
चांदणी
मिपावरचा
+१
हा, हा, हा!!!
आणि मग
रिपिट झाल्याने
टाळी कसली
+१
भूस्थिरता चंद्रावरुनही ?
सृजनशील
+३.१४१५९२६५
सुटलीये..
दुर्बिटणे
पिडाकाकां
अहो कायतरीच काय!!!
चुंबकीय की चुंबनीय?
ही कल्पना आवडली
कल्पना
गंभिर प्रश्न
>>मग रात्री
हॅ हॅ हॅ
हम्म गंभीर
येस्स!
अकरावितील मुलाने...
तो
उपग्रहांच
३. आयुष्य
तळमळ
हाण्ण!!!
नाही हो सर,
अतिशय
प ड लो
ऑन अ
पॅटन्ट?
>> पॅटन्टचे
सेम हिअर!!!
चांदणी मिळायला हवी असेल
यापुढे
Pagination