Skip to main content

अंतराळशास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 24/07/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळातील कचरा ही समस्या आता लांबून मजा बघण्याच्या पलिकडे गेलेली असल्यामुळे मला राहवले नाही. मी बराच विचार केला व मला दोन मार्ग दिसले ते येणे प्रमाणे- १. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी. २. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी. आपल्यालाही जर काही अभिनव उपाय सुचत असतील तर जरुर येथे द्यावेत. मिपावर अंतराळविज्ञानातील शास्त्रज्ञ असतील तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला हा लेख वाचायला द्यावा व ह्याची दखल घेण्यास भाग पाडावे. कळावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15577
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

नाही. असे निशब्द राहून कसे चालेल? आपण भारतीय किती "दूरवरचा" विचार करतो हेच त्यांना दाखवून देऊ.

In reply to by अमृतांजन

हे अकरावितले मुलं फार विचार करतात बुवा! अहो एकदम सोपं आहे. कालच शनीवरुन फोन आला होता, त्यांच्या कडा झिजत चालल्यात. आपण आपला कचरा फक्त शनीच्या कड्यांकडे पाठवुन दिला की काम झाले. (तो ही कमीच पडण्याची शक्यता असल्याने आपणच शनीवर रहायला जाउन वारंवार असे उपग्रह पाठवुन कचर्‍यात, आपलं कड्यात भर घालीत राहणे हा अंतिम उपाय)

(|: (|: (|: (|: (|: (|: (|: अजुन पर्यंत तरी घरातल्या कचर्‍याच विचार करणारा --टुकुल. * का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?*

In reply to by टुकुल

* का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?* लेखाच्या लांबीचा विचार करता ७-८ विता कमीच दिसत आहेत. --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by अवलिया

आपण एका अत्यंत महत्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करत आहोत. त्याला असे फाटे कृपया फोडू नका. :-)

In reply to by अमृतांजन

विसरलोच की मी... सवारी सवारी... एक डाव माफी.. प्लीज प्लीज चांदणी वाटप केंद्रात जावु नका बर का !!! --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by अवलिया

प्लीज प्लीज चांदणी वाटप केंद्रात जावु नका बर का !!! हे सगळे काय आहे त्याची मला माहीती नाही. नंतर पाहीन पण सक्काळ पासुन त्या कालेजला लायनीत उभे राहून पाय तुटलेत त्यामुळे....आजतरी लायनीत उभे राहणार नाही. आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे.

In reply to by अमृतांजन

>>>आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे. काय सांगता ? म्हणजे आजची रात्र डोक्यावर घेणार काय तुम्ही ? सोडवा ! सोडवा ! गहन प्रश्न सोडवा... शुभेच्छा !! --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by अवलिया

हो. गहन इतका की, मिपावरचा तो "गमन" दुवा मला सारखा "गहन" भासतोय.

In reply to by अमृतांजन

आणि खरे सांगू का, मी आत्ता खूप गहन प्रश्न सोडवायच्या मागे आहे. >>> :W हे वाक्य ह्रदयाला लागल... अनिवे, शिवाजी विद्यापीठातुन यांष्यावर पिचडि घ्या तुम्ही !! --टुकुल.

In reply to by टुकुल

नाही आम्ही उत्तुंग क्षमताशील विद्यापीठातूनच पिच डी करणार. प्रोप्रा- आर्यभट्ट साटेलाईट सर्व्हीसेस

In reply to by अवलिया

चांदणी प्रकर्णाची थोडीशी माहीती मिळाली. पण मुळात धागाच जर चांदणीप्रमाणीत प्रतिसाद निर्मितीसाठी ओवला असेल तर कोण कोणाला का चांदणी देणार?

मिपावरचा कचरा कमी करण्याची तात्यांनी अभिनव योजना आखल्याचे ऐकिवात आहे. त्या अनुभवाचा काही उपयोग होत असेल तर आम्ही स्वखर्चाने तात्यांना नासा किंवा जिथे आवश्यक असेल तिथे अंतराळ कचरा कमी करण्यास मदत म्हणुन पाठवण्यास तयार आहोत. कचरा कुठलाही असो साफ व्हायलाच हवा. कसे ? --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by अवलिया

+१ सहमत आहे .. असेच म्हणतो !! - आपलाच कचरु मुळे उर्फ अवांतरयात्री

हा धाग्याचा दुर्बिटणेबाई योग्य तो परामर्ष घेतीलच! तेंव्हा त्यांच्या कुरणात जास्त न चरता आम्ही दोन शब्द टाकून आमच्या कुरणात (पुण्यात स्वाईन फ्ल्यू!!) जातो... १. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी. वा!! म्हणजे आपला कचरा दुसर्‍याच्या अंगणात!!! :) २. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी. आणि मग भूस्थिर उपग्रहांचं काय? सेलफोन नाही वाटतं तुमच्याकडे? की मंगळावर स्थायिक व्हायचा प्लान आहे? :) * का हो भौ तुम्ही पण ११ वित आहात का?* हे मात्र जबराहा!!! अस्सल मिपाकरी अभिप्राय!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आणि मग भूस्थिर उपग्रहांचं काय? भूस्थिरता चंद्रावरुनही साधता येईल. आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. सगळे उपग्रह त्याच बाजूला ठेवायचे. चंद्र फिरतो आणि त्यामुळे पृथ्वी स्क्यान होईल. द्या टाळी!

In reply to by अमृतांजन

टाळी कसली मागतांय? तुम्हीच तुमचं अमृतांजन द्या थोडं, चोळतो डोक्याला!!! काय शॉट लागलाय डोक्याला!!!!! :) आजपासून तुम्ही मिपाचे आर्यभट्ट!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आजपासून तुम्ही मिपाचे आर्यभट्ट!!!! अनुमोदन ! अनुमोदन ! अनुमोदन ! =D> =D> =D> =D> =D> --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by अमृतांजन

हे कसं काय? हां तो सॅटेलाईट चंद्राच्या "भू" सापेक्ष "भूस्थिर" होईल. पण पृथ्वीच्या भू सापेक्ष? :? (ऑन सेकंड थॉट..) अरे हो शक्य आहे..त्या सॅटेलाईटचा पृथ्वीवर जो ट्रॅन्स्मिटर-रिसीव्हर आहे तो चंद्राच्याच कोनीय गती प्रमाणे पृथ्वीवर फिरता ठेवायचा..अरे हाय काय अन नाय काय? #:S

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाकांनी माझा इथे उल्लेख केल्यामुळे मला इथे प्रतिसाद देणं भाग पडलं नाहीतर अशा प्रक्षोभक धाग्यांवर लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं. अंतराळात कचरा करणार्‍यांचा निषेध! काय होतं की तुम्ही (एनाराय, पक्षी अमेरिकास्थित भारतीय) लोकं फिरायला म्हणून जाता अंतराळात आणि कचरा टाकून येता. तुमच्या देशात तुम्ही कचरा असाच फेकून देता का? शिवाय तुमच्याकडे दुसर्‍या दिवशी पाऊस पडणार म्हणून आदल्या दिवशी साफ होतो तशी सफाई अंतराळात काय कारणास्तव करणार म्हणून तुम्ही ती कारवाई होऊच देत नाहीत! (हुश्श, एक लांबलचक वाक्य टंकून बोटात लचक भरली.) तो कचरा आम्हां लोकांच्या पोटावर पाय आणतो (हा पाय तो धाग्यातला नाही, कृपया गैरसमज नकोत. हा पाय मराठीतलाच ...) कारण तुम्ही अनिवासी लोकं कचरा सोडून परत येता आणि मग आकाशातल्या ज्या गोष्टींच्या अभ्यासासाठी आम्हाला पैसे मिळतात त्या गोष्टीच दिसेनाशा होतात. आणि मग पर्यावरणवाल्यांना निष्कारण काम मिळतं. निष्कारण त्यांना पैसे मोजून "हा कचरा साफ कसा करता येईल" ते विचारावं लागतं. याला माझा व्यक्तीश: आणि अ-व्यक्तिशः साफ विरोध आहे. आता हा कचरा साफ कसा करायचा ही गोष्ट माझ्या अभ्यासाची आणि आवडीचीही नाही. पण तरीही इथे मतं मांडण्याचा शिरस्ता आहे (कोण रे ते पच्चकन पिंक मारण्याच्या गोष्टी करत आहे?) म्हणून मीही माझं मत मांडत आहे. हा कचरा साफ करण्यासाठी आणखी काही उपग्रह सोडावेत. त्या उपग्रहांना चुंबक (धातूंचे, इतर विचार केल्यास अपमान होईल) लावावेत आणि मग तो कचरा उपग्रहाकडे येईल. जर तो कचरा फेरोम्याग्नेटीक नसेल, तर आधी त्यावर लोखंडाचा स्प्रे मारावा आणि मग चुंबकाचा प्रयोग करावा. फेरोम्याग्नेटीक म्हणजे काय ते मलाही माहित नाही, पण जड शब्द वापरले की मग आपणही दिग्गज लोकांच्या यादीच्या जवळ सरकतो. (चतुर चांदणी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुसाट सुटलीये गेल्या चार दिवसांपासून. सूर्य ग्रहणानंतरचं हे स्थित्यंतर दिसतंय. :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्बिटणे बाईंशी बर्‍याच बाबतीत असहमत आहे. हे सगळ्याचं खापर आमच्या डोस्क्यावर मारायची या लोकांची जुनी सवय आहे. मुळात जर तिथे आम्हाला पेपर नॅपकीन्स, डीस्पोजेबल चमचे, प्लेट्स वगैरे गोष्टी मिळणार असतील तर आम्ही इथुन घेउन जाउच कशाला? अन मग तिथे कचरा करुच कशाला? बरं आता तिथे आम्ही गेलो तर आमच्या मुलभुत गरजांकडे लक्ष नको का द्यायला कुणी तरी, खरं तर आमची अमेरीका दर वेळी करतेच ना? Mirबांधलंच ना आम्ही? आता आम्ही सध्या जरा मंदीत आहोत तर तिथे या सुधारणा करण्याचे तुम्ही लोक (पक्षी: तिसरे जगवाले) का नाही मनावर घेत? काही सार्वजनिक स्वच्छतागृहे, हॉलिडे रिसॉर्ट्स, एक फुट्बॉलचे मैदान, बार्बेक्यु करता सुविधा, (छे हो या शिवाय कसली ती सुटी?) वगैरे बनवा म्हणजे झाले, अन कचर्‍याकरिता एक रिसायकलींग प्लांट टाका! अरे हाय काय अन नाय काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडाकाकांनी माझा इथे उल्लेख केल्यामुळे मला इथे प्रतिसाद देणं भाग पडलं नाहीतर अशा प्रक्षोभक धाग्यांवर लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं.
तुमचे उपाय लक्षणीय आहेत तसेच आक्षणीय (actionable) आहेत; तुम्ही संबंधीत अधिकार्यांना ह्या सगळ्या उपायांवर लक्ष देण्यास सांगावे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काय होतं की तुम्ही (एनाराय, पक्षी अमेरिकास्थित भारतीय) लोकं फिरायला म्हणून जाता अंतराळात आणि कचरा टाकून येता. आम्ही अंतराळात फिरायला जात नाही. आम्ही जर रॉकेटमध्ये जाऊन बसलो तर आमच्या वजनाने ते रॉकेट उडेल तरी का? उगाच काहितरी.... :) आणि उपग्रहीय कचरा करण्यात इस्रोही सामील आहेच की... त्यात नुकतंच चंद्रावर देखील एक डबडं टाकून आलो ना आपण!!! :) बाकी चुंबकीय उपग्रहांची कल्पना आवडली!!! त्यातही चुंबकीय उपग्रहांपेक्षा काही चुंबकीय उपग्रहिणी सोडल्या तर हे सगळे उगाच तरंगणारे आळशी उपग्रह त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतील काय? मिपावरच्या जाणकारांनी प्रबोधन करावे....

In reply to by पिवळा डांबिस

त्यातही चुंबकीय उपग्रहांपेक्षा काही चुंबकीय उपग्रहिणी सोडल्या तर हे सगळे उगाच तरंगणारे आळशी उपग्रह त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतील काय? चुंबकीय उपग्रहिणी की चुंबनीय उपग्रहिणी? ;) 'फ्युचरामा' बघितल्यापासून भविष्यात बेन्डरच्या कुळातले यंत्रमानवही - आणि पर्यायाने उपग्रह, उपग्रहिणी वगैरे - मानवी भावभावना बाळगणारे असू शकतात, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. तसे झाले तर चुंबकीय उपग्रहिणी चुंबनीयही असू शकतील ;) (पर्यायी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेलाशेट, फक्त प्रश्न असा आहे की या कचर्‍यातल्या इलेक्ट्रॉनिक कचर्‍याला तिकडे पॉर्न म्हणणार का? ;-)
त्यात नुकतंच चंद्रावर देखील एक डबडं टाकून आलो ना आपण!!!
=)) =)) ओ पिडाकाका, माजी राष्ट्रपतींच्या कल्पनेबद्दल तुम्ही काय बोलता हे, शेम शेम शेम शेम ... अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कल्पना कुणाची का असेना.... ते डबडं आता अनंत काळपर्यंत तिथे पडून रहाणार हे तर खरं? मला वाटत नाही की इस्त्रोची ते रिकव्हर/ रिसायकल करण्याची काही योजना आहे!!! :)

या गंभिर प्रश्नाची थट्टा होत आहे हे पाहून अस्वस्थ झालो आहे. #:S कुणालाच कसे कळत नाही, जर कचरा असाच वाढत गेला तर पृथ्वी भोवतालच्या वातावरण कचर्‍याने आच्छादीत होईल मग रात्री चांदण्या कशा दिसणार? :? मग बसा म्हणत, "घरात हसरे तारे असता..."

In reply to by विकास

>>मग रात्री चांदण्या कशा दिसणार? असे होणार हे माहित होते म्हणुन सरकारी स्तरावर चांदण्या वाटप कार्यक्रम आखला गेला आहे. आपल्याला सांगायला विशेष आनंद होत आहे की या कार्यक्रमाची सुरवात आपल्या गावापासुनच म्हणजेच मौजे मिपावाडी पासुन करण्यात आली आहे. सरपंचांनी उद्धाटनातच ब-याच चांदण्या मिळवल्या असे ऐकले आहे. --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

In reply to by विकास

त्यासाठी मालकांनी चांदणी वाटप केंद्र सुरु केलं आहे.... लवकर त्यास भेट द्या अन् भविष्यातील काळजी वर्तमानातच दुर करा. :) - टिंग्या

हम्म गंभीर प्रश्न आहे खरे हा??? एक काम करायचे का??? आपण काही क्लिन आप मार्शल्स नेमुया जे लोक आतंराळात कचरा करत आहेत त्यांचा कडुन पैसे वसुल करता येईल.... आणी कचरा साफ करायला क्लीन उप हिरवे रॉकेट सोडता येवु शकतात... मला तर एवढेच सुचते (११ वीतला मिपाकर)निखिल ================================

In reply to by निखिल देशपांडे

येस्स! सर्व शक्यता गृहीत धरुनच आपल्याला पुढील वाटचाल करावी लागेल असे वाटते.

In reply to by निखिल देशपांडे

११ वीतील मुलाने फक्त इंजिनियरींगचा अथवा मेडीकलच्या प्रवेशाचा विचार करावा... हे असले गंभीर विचार करत अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेत तर त्या प्रवेशांचे जाउंदेत पण समुपदेशनाला पण प्रवेश मिळणार नाही :)

तो अंतराळातला कचरा पृथ्वीवर रात्रीच्या वेळेस पडेल अशी काही व्यवस्था करावी. पृथ्वीच्या वातावरणात येताना तो कचरा जळून मस्त उजेड पडेल. तेवढीच लोडशेडिंगवर मात करता येईल. याचे कन्त्राट रीलायन्स देतायेईल. अवांतरः इरीडीयम कम्पनीने त्यांचे ६५ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. उपग्रहांचा माणसाच्या पत्रीकेत विचार होतो का? ( एवढ्या लांबच्या छोटुकल्या प्ल्यूटो चा विचार होत असेल तर त्यामाने जवळचे उपग्रह विचारात घ्यायला हवेतच ना)

In reply to by विजुभाऊ

उपग्रहांचा माणसाच्या पत्रीकेत विचार होतो का? ह्यावर मी आत्ता काहीच मत देऊ शकणार नाही.

३. आयुष्य संपल्यावर विरघळून जाणारे उपग्रह ही उपाययोजनाही करता येईल असे वाटते. 'ना रहेगा बास; ना बजेगी बासुरी'.

तुमची तळमळ पटली. इथे खूप लोक विनोदी समजत आहेत या धाग्याला. अशा लोकांचा खूप निषेध. त्यांच्या डोक्यावर अंतराळातला कचरा पडो. _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

=)) =)) =)) माझं डोकं तर मगापासूनच खाजायला लागलंय. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by भडकमकर मास्तर

नाही हो सर, मीच हा धागा विरंगुळा ह्या सदरात टाकलाय. लोकांचा काय दोष? कचरा करायचा आणि मग तो काढायला नव्या मोहीमा -लाँगटर्म प्लानिंग आहे.

अतिशय गंभीर आणि विचारात टाकणारा धागा. एक उपाय सुचला आहे. यापुढे अंतराळात जाणार्‍या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल. -- लिखाळ. आपण जास्त बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असा नाही. :)

In reply to by लिखाळ

यापुढे अंतराळात जाणार्‍या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल. प ड लो खुर्चीवरून! सोबतची कॉफी थोडी सांडली; थोडे पॉपकॉर्न सुद्धा. तो कचरा गोळा करायची वेळ झालीये. (सफाई कामगार)बेसनलाडू 'या प्रतिसादाबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत' हे लिखाळ जोशींचे वाक्य आठवून गेले. (स्मरणशील)बेसनलाडू ऑन अ सेकन्ड थॉट्, लिखाळांनी सुचवलेला उपाय प्रत्येक उपग्रहाच्या बाबतीत न अवलंबता, खास सफाई कामगारासारखा सफाई उपग्रह ठराविक कालावधीने सोडून त्याच्या बाबतीत अवलंबावा, असे वाटते. (पर्यायी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

ऑन अ सेकन्ड थॉट्, लिखाळांनी सुचवलेला उपाय प्रत्येक उपग्रहाच्या बाबतीत न अवलंबता, खास सफाई कामगारासारखा सफाई उपग्रह ठराविक कालावधीने सोडून त्याच्या बाबतीत अवलंबावा, असे वाटते. (पर्यायी)बेसनलाडू
ठीक आहे. TED आयडिया वर्थ स्प्रेडिंग मध्ये माझे भाषण असेल तेव्हा मी ही कल्पना मांडिन. तुम्हाला नंतर नेटावरचा दुवा देईन ;) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

In reply to by लिखाळ

तुम्हाला नंतर नेटावरचा दुवा देईन बास्? पॅटन्टचे काय? ;) (संधीसाधू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

>> पॅटन्टचे काय? हे मी चुकून पॅन्टचे काय असे वाचले. :) असो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मीही तसेच वाचले. पण उगाच कोणाला चांदणी नको मिळायला म्हणून गप्प बसलो झालं... ;) (अप्पलपोट्या) बिपिन कार्यकर्ते

In reply to by लिखाळ

यापुढे अंतराळात जाणार्‍या प्रत्येक उपग्रहाला एक मोठा झाडू आणि सुपली जोडून सोडावी. उपग्रहाची कक्षा नागमोडी वगैरे ठेवावी. म्हणजे जास्तीत जास्त कचरा गोळा होईल +१ सहमत

In reply to by लिखाळ

अतिशय गंभीर आणि विचारात टाकणारा धागा. संवेदना (सिंपथी) दाखवल्यामुळे फार बरे वाटले.

दुर्बीणीला ब्लोअर लावून (अथवा नुसती फुंकर मारून होत असेल तर उत्तम!) कचरा दूर लोटता येईल का?

In reply to by विकास

=)) दुर्बिणीला ब्लोअर ... अगायायाया _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by विकास

हा हा हा .. जोरदार :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

In reply to by विकास

हे बाकी सगळ्यात ब्येस! चित्रात जे पिवळे दिशाबाण दिसतायत त्याबाजुलाच लावा तो ब्लोअर. सगळे उपग्रह नार्वेत पडतील; तेथे पोत्यात भरुन घेता येतील.

In reply to by अमृतांजन

मला वाटतं होतं एकचं नॉर्वे आहे पृथ्वीवर! पण यांनी डोळ्यात अंजन घालुन पाहीले असेल म्हणुन आता उगाच शंका घेत नाही.

एक मोठा यज्ञ करावा... यज्ञातल्या अग्नीला "उपग्रहाय स्वाहा" म्हणून तुपाची आहुती द्यावी... म्हणजे अग्नीवर आपोआपच ते उपग्रह गिळण्याची जबाबदारी येईल.... मग पुढे तो अग्नी जाणे आणि ते उपग्रह जाणोत.... आपण आपली जबाबदारी पार पडल्याच्या आनंदात मिष्टान्न खावे.... :)

In reply to by पिवळा डांबिस

आपण आपली जबाबदारी पार पडल्याच्या आनंदात मिष्टान्न खावे.... जावई दशमोग्रहः सारखे ब्राह्मण दशमोग्रहः होईल मग ;) (ब्राह्मण)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

जबरी !! पिडाकाकांची कल्पना फार मस्त ! :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

In reply to by पिवळा डांबिस

म्हणजे अग्नीवर आपोआपच ते उपग्रह गिळण्याची जबाबदारी येईल.... टेक्निकल मिसटेक आहे. अग्निला तेथे वर प्राणवायू कसा मिळणार? पण तुम्ही असे मिश्कीलतेने म्हणत असाल तर मी सहमत आहे!!

In reply to by अमृतांजन

अहो सगळा धागाच टेक्नीकल मिस्टेक आहे.. एवढ्याचे काय घेऊन बसलात :T ~X( - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

In reply to by नाटक्या

आम्ही मिष्टेक करायला अजिबात घाबरत नाही. मिष्टेक नाय केली तर वर्जीनल कायच तयार नाय होणार.

अरे काय चालले आहे!!!! =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

खानोलकरांची विळखे कविता मला खूप आवडते..... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

अकरावीतील मुलांच्या विचारचे कौतुक करणार्या मिपावरील अनेक आजोबांना येथे भेटून आनंद झाला. त्यांचेच मार्गेदर्शन येथे मिळेल अशी अपेक्षा होती व ते मिळाले.

हे शगले उपग्लह वल्ती कशे काय तलंगतात आप्पॉप? मी तल वल्ती उदी मालली की लगेच खाली पदतो.... :( - (दुशली 'ब') टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

खि खि खि खि..... याचे नीट उत्तर मात्र देता येणार नाही मला

In reply to by ब्रिटिश टिंग्या

यासाठी तुम्ही दुसरा धागा सुरु करावात अशी तुम्हाला विनंती करतो. तेवढाच विरंगुळा आपलं ज्ञानात भर. पण त्यापुर्वी, परिकथेतील राजकुमारांचा खालील प्रतिसाद वाचुन घ्या व त्यांना एकदा कल्पना द्या. नाही ते उगाच चांदण्यांत फिरुन यायचे म्हणुन म्हणतो. ;) वि. सुचना:- याना मध्ये 'आउट्स्टँडीग' लोकांना घेउन प्रवास करु नये कचर्‍यात वाढ होइल ;) (फेदरवेट)

नाईल, पिडाकाका, लिखाळ, कर्क, अवलिया, मास्तर, बिटी, व ई मिपाकर मित्रांनो, काल रात्रीच्या ह्या विनोद-विरंगुळ्यात सहभागी होऊन मजा आणलीत. धन्यु.