✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोल्हा, कावळा आणि करकोचा

स
सुबक ठेंगणी यांनी
गुरुवार, 07/16/2009 - 12:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10480 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

हा हा हा

सहज
गुरुवार, 07/16/2009 - 12:25 नवीन
आपला अनुभव फार बोलका आहे. :-)
  • Log in or register to post comments

+१

दिपाली पाटिल
गुरुवार, 07/16/2009 - 12:31 नवीन
आणि फार सुंदर काम आहे तुझं...बाकीच्या गोष्टी प्रगत-अप्रगत किंवा प्रगतिशील देश म्हणुन होत असाव्यात बहुतेक,हा फरक बर्‍याच ठिकाणी दिसुन येतो तसा... दिपाली :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलं

यशोधरा
गुरुवार, 07/16/2009 - 12:31 नवीन
छान लिहिलं आहेस.
  • Log in or register to post comments

हाहाहा...

श्रावण मोडक
गुरुवार, 07/16/2009 - 12:38 नवीन
छान. खुसखुशीत. लिहा, अजून लिहा सांस्कृतिक देवाण-घेवाणीवर.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
गुरुवार, 07/16/2009 - 12:55 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+२

नंदन
Fri, 07/17/2009 - 11:37 नवीन
सहमत आहे. बोधकथेत अनुभव गोवण्याची कल्पकता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वा! मस्त

Nile
गुरुवार, 07/16/2009 - 12:58 नवीन
वा! मस्त रुपक जमलंय! मजा आली वाचुन! येउद्या अजुन असेच खुसखुशीत. :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.

प्राजु
गुरुवार, 07/16/2009 - 20:41 नवीन
अनुभव फार बोलका आहे. अजून येऊदेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हेच म्हणते.

प्राजु
गुरुवार, 07/16/2009 - 20:42 नवीन
अनुभव फार बोलका आहे. अजून येऊदेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सुंदर

मदनबाण
गुरुवार, 07/16/2009 - 17:59 नवीन
सुंदर कल्पना आणि उत्तम लेखन. (लहानपणी ठकठक मधली दिपू द ग्रेट ही गोष्ट आवडीने वाचणारा) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

कळली नाही

तिमा
गुरुवार, 07/16/2009 - 19:45 नवीन
रुपककथा कोणावर बेतली आहे ते कळले नाही फक्त तुम्ही जपान मधे इंग्रजी शिकवता येवढंच कळलं. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

@ तिरशिंगराव

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 09:50 नवीन
परत परत वाचा...कळेपर्यंत वाचा.. मग कळेल कदाचित! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

खुसखुशीत

रेवती
गुरुवार, 07/16/2009 - 19:52 नवीन
खुसखुशीत लेखन! खरं सांगायचं तर ती इटालियन पत्रे आल्याचं वाचताच एक आसूरी आनंद वाटला. 'बरं झालं, त्यांची जिरली' असं वाटून गेलं. रेवती
  • Log in or register to post comments

हम्म!

पिवळा डांबिस
गुरुवार, 07/16/2009 - 22:49 नवीन
पण एक प्रश्न शिल्लक रहातोच.... त्या जपानी मुलांनी इटलियन मुलांना कोणत्या भाषेत पत्रे पाठवली होती? :W
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खि..खि.. आणि

शाहरुख
Fri, 07/17/2009 - 02:04 नवीन
खि..खि.. आणि मला वाटत होते की जपान हा इटलीच्या तुलनेत कोल्हा आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

@ शाहरुख

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 10:05 नवीन
कोणाला काय वाटतं हा तर ज्याचा त्याचा प्रश्न. ह्या गोष्टीपुरतं बोलायचं तर्...स्पष्ट्च आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

@पिवळा डांबिस!

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 10:00 नवीन
अरे जपानी मुलांनी पत्रे इंग्रजीतून पाठवली होती... आता इटालियन मुलांना इंग्रजी कळत नव्हतं असं म्हणावं तर आधीचा सगळा पत्रव्यवहार इंग्रजीतूनच झाला होता. आता बोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

गोष्ट सुरस आणि छान लिहीली आहेस. आवडली.

नरेंद्र गोळे
गुरुवार, 07/16/2009 - 20:28 नवीन
सुबक ठेंगणी, सरस आणि ठोस विचारांची पुरस्कर्ती आहे हे वाचून आनंद झाला. जपानी शाळांबाबत आमचे प्रबोधन त्या चित्रफितींच्या आधारे करायला मात्र विसरू नकोस ही अर्जी. गोष्ट बाकी सुरस आणि छान लिहीली आहेस. आवडली.
  • Log in or register to post comments

पॉशच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/16/2009 - 20:43 नवीन
पॉशच लिहिले आहे हो ! ©º°¨¨°º© परकोचा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अस्वस्थ...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/16/2009 - 20:48 नवीन
सुठें ... नेहमीप्रमाणे छान, खुसखुशीतच लिहिलंय. पण त्याहीपेक्षा, ही कहाणी अवस्थ करून गेली. माणसाच्या मनातला उच्चनीचची भावना कधी कुठे कशी वर येईल काय सांगावं? रेवती म्हणतात तसं, इटालियन भाषेत पत्र आली तेव्हा थोडा असुरी आनंद झालाच मात्र. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/16/2009 - 20:49 नवीन
हम्म्म्म्म्..छान बोलका अनुभव. :| पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

उत्तम!!

धमाल मुलगा
गुरुवार, 07/16/2009 - 20:57 नवीन
भारतीय नाऽऽ? ते तसलेच! त्यांना काय एव्हढी किंमत द्यायची? आणि मग इटालियनमधली पत्रं बसा अक्षरं लावत आणि डिक्शनर्‍या धुंडाळत! च्यायला, राग राग नाही का हो झाला तुमचा हे असं पाहताना? :( आजही अशी सापत्नभावाची वागणुक मिळते आपल्याला आणि मारे आपण मिरवतो "सॉफ्टवेअर सेवाक्षेत्रामधली जागतीक महासत्ता" म्हणुन! च्छ्या! डोकंच सरकलं हा अनुभव वाचुन. असो, माझं बापड्याचं हे वैयक्तिक, कोत्या बुध्दीतून आलेलं मत आहे. माफ करा जर ह्यामुळं रसभंग होत असेल तर. ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

:(

ऋषिकेश
गुरुवार, 07/16/2009 - 21:25 नवीन
च्छ्या! डोकंच सरकलं हा अनुभव वाचुन
असेच म्हणतो.. मात्र अनुभव लिहिलाय मस्त ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धमु, ऋषिकेश

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 18:52 नवीन
अगदी अस्साच संताप झाला होता रे! पण इटालियनांनी परस्पर काम केलं माझं... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

छान लेख

चकली
गुरुवार, 07/16/2009 - 21:29 नवीन
रूपक कथा लिहण्याची कल्पकता सहिच! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

बेष्टं !!

टारझन
गुरुवार, 07/16/2009 - 21:42 नवीन
बेष्टं !! सुबक ठेंगणी.. लेखण आवडले हो :) (जंगलातील कोल्हा) टारकोचा नको करू कुटाळक्या || धर पंथ हाय्,हॅलोचा || टार्‍या म्हणे आता || आय.डी.घे संत एकनाथाचा ||
  • Log in or register to post comments

रूपक

क्रान्ति
गुरुवार, 07/16/2009 - 21:44 नवीन
मस्तच! अनुभव मात्र अस्वस्थ करून गेला. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ जपानी बिचारे मुकले भारतीय अनुभवांना!

चतुरंग
गुरुवार, 07/16/2009 - 22:00 नवीन
तुमची चिडचिड झाली असणं स्वाभाविक वाटतं. भारतीय (आणि त्या भूखंडाच्या आसपास म्हणजे पाकिस्तानी, बांगला, श्रीलंकन इ.) माणसांकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन हा एक मोठा विषय आहे. पश्चिमेकडून आलेलं सगळं चांगलं हा गंड घालवणे हाही एक मोठा अडसर आहे. परंतु तुम्हाला वाटलेली सखेदाआश्चर्याची, सात्विक संतापाची भावना इतक्या छान रूपकातून मांडण्याचं तुमचं कसब आणि सकारात्मक विचार मला आवडले! त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन!! :) (जरा अवांतर - मागे काही वर्षापूर्वी ग्रीन हाऊसचे काम करीत असताना हॉलंडचे इंजिनियर्स आले होते त्यांच्या ऑटोमेशन सिस्टिममधले प्रॉब्लेम्स मी सोडवून दिल्यावर ते असेच आश्चर्याने बघत राहिले की भारतासारख्या 'यःकश्चित देशातही' डोक्याने बरी माणसे असतात तर ;) ! मग तो सगळा ऑटोमेशनचा प्रॉजेक्ट मीच पूर्ण केला! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

परंतु

लिखाळ
गुरुवार, 07/16/2009 - 23:01 नवीन
परंतु तुम्हाला वाटलेली सखेदाआश्चर्याची, सात्विक संतापाची भावना इतक्या छान रूपकातून मांडण्याचं तुमचं कसब आणि सकारात्मक विचार मला आवडले! त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन!!
चतुरंगांशी सहमत आहे. भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर आहे, महासत्ता बनायची स्वप्ने बघत आहे वगैरे बाबी इतर देशातल्या सामान्य माणसाच्या गावी असतातच असे नाही. आपल्या कडच्या सामान्याला इतर विकसनशील देशांबद्दल जितपत माहिती असेल तशीच त्यांना आपल्याबद्दल. आपल्याकडच्या आकर्षक बाबी पर्यटन-व्यवसाय या दृष्टीने इतरांसमोर मांडणे याबाबत आपले सरकार गेल्या पन्नास वर्षांत कमी पडले असावे असेही असेल. मला कल्पना नाही. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रुपक आवडलं.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/17/2009 - 10:13 नवीन
चतुरंग आणि लिखाळ यांच्याशी सहमत आहे. सुबक, मलाही आसुरी आनंद झाला इटालीयन पत्रं आली हे वाचून! आजही अनेक युरोपीय लोकांना भारत म्हणजे उंटा-हत्तींचा देश वाटतो नाहीतर झोपड्यांचा. पर्यटनाच्या क्षेत्रात आपले सरकार कमी पडले असे मलाही वाटते. चिटुकल्या देशांची इत्थंभूत माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते आणि "आय.टी. किंग" म्हणवणार्‍या आपल्या देशाबद्दलची किती माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

आजही अनेक

विंजिनेर
Fri, 07/17/2009 - 12:07 नवीन
आजही अनेक युरोपीय लोकांना भारत म्हणजे उंटा-हत्तींचा देश वाटतो नाहीतर झोपड्यांचा.
असेलही. पण सगळ्या फारिनरला नान/तंदुरी-चिकन आणि ताजमहाल हमखास माहिती असतो. एकदा हैदराबाद मधे माझा तैवानी सहकारी २ दिवसांकरता(च) आला. तो ताजमहाल बघुन यायला किती वेळ लागेल असं विचारत होता =)) असो. सु.ठें - शिक्षण क्षेत्रातला हा अनुभव भारतीयांकरता नवीन नाही. त्याला कारणीभूत त्यांचे पालक असतात असं मला वाटते. अजून एक ह्या क्षेत्रातील अनुभवः उत्तम इंग्रजी केवळ सोनेरी केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या पाश्चिमात्य मुलींनाच शिकवता येतो अशी इतकी पक्की समजूत असते या लोकांची की त्याला हसावे की रडावे तेच कळत नाही. अशा तरूण-तरूणींना (भले त्यांना शिक्षकी पेशाचा गंधही नसेल) पौर्वात्य देशात हसत हसत नोकरी मिळते. मी कित्येकवेळा बातम्या वाचल्या आहेत की कृष्णवर्णीय लोकांना या देशांतील मुले घाबरतात म्हणून (इंग्रजी)शिक्षकांच्या नोकर्‍या डावलल्या जातात. असो. पुलेशु. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

@अदिती, विंजिनेर

सुबक ठेंगणी
Sat, 07/18/2009 - 06:04 नवीन
आजही जेव्हा मला माझे विद्यार्थी "तुम्ही हत्तीवरून शाळेत जात होता का?" किंवा "तुम्ही गॅसऐवजी शेण वापरता का?" असं विचारतात तेव्हा हरते मी! आजकाल तर कोणी जपानी मला "मी स्लमडॉग मिलिओनेर बघून आलो" असं म्हणाला/ली की काळजात धस्स होतं. इथे विंजिनेर म्हणतोय तेव्हढा त्रास होत नाही. पण उद्या जर गो-या कातडीचा माणूस आणि काळ्या कातडीचा ह्यातून निवड करायची वेळ आली तर मात्र नक्कीच गो-या कातडीला प्राधान्य मिळेल. मला शाळेतली मुलं तर चक्क विचारतात,"तुझा रंग एवढा काळा कसा?" तेव्हा मी लगेच "देव कुणाला गोरा रंग देतो कुणाला डोकं देतो" असं उत्तर देते :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

खूपच गमतीदार अनुभव

धनंजय
गुरुवार, 07/16/2009 - 22:17 नवीन
खुसखुशीत शैलीत अनुभव लिहिला आहे. मस्त. (पण रूपककथा इसापाच्यासारखी मितभाषी झाली असती तर अधिक मजा आली असती.)
  • Log in or register to post comments

@धनंजय आणि कर्क

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 10:14 नवीन
धन्यवाद! थोडी लांब झाली असेल गोष्ट...कारण आधी फक्त तेच लिहून माझा अनुभव लिहायचा नाही असं ठरवलं होतं. नंतर विचार केला की त्या अनुभवामुळे गोष्ट अधिक भावेल. (अवांतरः गोष्ट इसापनगरीत असतं तशा प्राण्यांच्या गावात घडलेली असली तरी गोष्ट इसापनीतीतली आहे असं कुठे म्हटलंय! :W )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

छान. लेखन

दशानन
गुरुवार, 07/16/2009 - 22:29 नवीन
छान. लेखन सुरेख.. अनुभव... काय बोलू ह्या विषयी वरील सर्व प्रतिसाद माझ्याच मनातील भावना आहेत असेच समजा... असुरी आनंद मला ही झाला ;)
  • Log in or register to post comments

छान अनुभव

स्वाती२
Fri, 07/17/2009 - 02:40 नवीन
छान अनुभव आणि रुपकही. आमच्या इथे जपानी गाड्याना सप्लाय करणार्‍या छोट्या मोठ्या बर्‍याच जपानी कंपन्या आहेत. त्यामुळे transfer होऊन आलेल्या जपानी लोकांचे एक तरी मुल माझ्या मुलाच्या वर्गात असते. असे मूल माझ्या मुलाशी शक्यतो बोलतही नाही मात्र गोर्‍या मुलाशी मैत्री करायला धडपडते. मात्र preschool पासून माझ्या मुलाबरोबर असलेले त्याचे मित्र हा प्रकार लक्षात येताच त्या मुलाला एकटं पाडतात. गेल्या वर्षी असं वागणार्‍या एका जपानी मुलीला माझ्या मुलाच्या मैत्रिणीने खुप छळले. या उलट प्रकार कंपन्यांतून. देशी असाल तर अगदी डोक्यावर घेतात. त्यातून metallurgist असाल तर बघायलाच नको.
  • Log in or register to post comments

अगं स्वाती!

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 10:07 नवीन
तुझा अनुभव वाचून तर मला अशा मैत्री करायला धडपडणा-या लोकांची अजूनच दया आली. या उलट प्रकार कंपन्यांतून. देशी असाल तर अगदी डोक्यावर घेतात. त्यातून metallurgist असाल तर बघायलाच नको. आनंद झाला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

छान लेख!

मुशाफिर
Fri, 07/17/2009 - 04:10 नवीन
फारच सुंदर रूपक आहे. वर दिलेल्या प्रतिक्रियामध्ये म्हटल्याप्रमाणे आणि तुमच्या लेखात व्यक्त केल्याप्रमाणे जपान्यांच्या (सगळया नाही, पण बराचश्या) भारताविषयीच्या भावना पाहून वाईट वाटलं. ह्या ठिकाणी उदाहरणं देउन काही मुद्दे मांडावेसे : १. 'जिओपार्डी' हा कार्यक्रम एका स्थानिक वाहीनीवर कालच पाहात होतो. लहान मुलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात त्यांना काही व्यक्तिगत प्रश्ण विचारले गेले. त्यातली एक मुलगी चिनी भाषा (खरेतर, 'मंदारिन' ) शिकते, हे ऐकल्यावर सुत्रधाराने त्याच कारण विचारलं. त्यावेळी "मागचं शतक अमेरिकेचं होत आणि हे शतकं चीनचं असेल, असं माझे वडिल म्हणतात", हे तीचं उत्तर होतं. २. 'येल' विद्यापिठाच्या अध्यक्ष्यांची मुलाखत पाहण्याचा कालच योग आला. त्यावेळी, 'येल' आता चीनमध्येही शि़क्षण देणार आहे, हेही(व्यक्तिस्वातंत्र्य आणि मुक्त विचार स्वातंत्र्याचा उदोउदो करत का होइना?) त्यांनी मान्य केलं. म्हणजेच, इतर देश चीनकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. मला वाटतं, ह्यात चीनी लोकांच्या उद्योगीवृतीचा आणि समाज/राष्ट्र म्हणून एकसंध राहण्याचा फार मोठा हात आहे (साम्यवादाशी ह्याचा काही संबंध नाही). भारतीयांनी जर मोठी उद्दिष्ट ठेवून ती साध्य केली तर आपल्यालाही कोणी दुर्लक्षीत करणार नाही. एक समाज आणि राष्ट्र म्हणून आपण नक्कीच ह्यात कुठेतेरी कमी पडलो आहोत. अवांतरः सॉफ्टवेअर उद्योगात महासत्ता होण्यासाठी भारताला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. २०१५ पर्यंत जागतिक पातळीवर ५०० बिलियन डॉलरच्या एकूण उलाढालीत भारताचा वाटा ९.५ ते १२ बिलीयन पर्यंत वाढेल, असा 'नॅसकॉम' चा अंदाज आहे. चीनचा आजच्या घडीला ह्या क्षेत्रातला वाटा १० बिलीयनपेक्षा जास्त आहे. तेव्हा 'दिल्ली बहोत दूर है!' असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

@मुशाफिर

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 18:36 नवीन
भारतीयांनी जर मोठी उद्दिष्ट ठेवून ती साध्य केली तर आपल्यालाही कोणी दुर्लक्षीत करणार नाही. एक समाज आणि राष्ट्र म्हणून आपण नक्कीच ह्यात कुठेतेरी कमी पडलो आहोत. हे मात्र मलाही पटतं. पण आपल्या देशाचं आकारमान, विविधता, आपल्यावर वेळोवेळी झालेली इतर संस्कृतींची आक्रमणे पहाता ही गोष्ट कठीण नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

छान

सुप्रिया
Fri, 07/17/2009 - 11:27 नवीन
छान अनुभवलेखन ! तुम्हाला असा अनुभव आल्यावर फक्त चिडचिड करून सोडून न देता रूपकामध्ये शब्दबद्ध केल्याबद्दल कौतुक वाटलं. -सुप्रिया देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
  • Log in or register to post comments

आपणही कधी करकोचे, कधी कोल्हे आणि कधी कावळे!

विसुनाना
Fri, 07/17/2009 - 11:29 नवीन
जपान्यांना वेगळे कशाला गणायचे? मानवी स्वभावावर प्रकाश टाकणारी रूपक कथा आवडली. व्यक्तिगत पातळीवर काय किंवा देशपातळीवर काय? 'खोबरं तिकडं चांगभलं'! आपण भारतीय तरी कुण्या टांझानिया किंवा इथियोपियाच्या लोकांशी स्वतःहून मैत्री करण्यासाठी धडपडतो? (हे देशपातळीवर, व्यक्तिगत ज्याचे त्याने पहावे...;)) आपल्यालाही अनुक्रमे सौदी, कुवेत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देश आणि संयुक्त अमेरिका या देशांना चढता प्राधान्यक्रम द्यावा असे वाटते. ब्राझील, रशिया, अर्जेंटिना हे देशही अजून आपल्या फेवरेट लिस्टमध्ये नाहीत. तेव्हा घरोघर मातीच्याच चुली.
  • Log in or register to post comments

@विसुनाना

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 18:42 नवीन
आपण म्हणता ते खरं आहे. पण मग "इतर संस्कृती जाणून घ्यायच्या आहेत हो!" असा आव कशाला आणायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

लै भारी.

अभिज्ञ
Fri, 07/17/2009 - 12:37 नवीन
सहा एक महिन्यांपुर्वीचीच गोष्ट. मी दोहा,कतार इथे होतो. माझी तिथे बरिच मोठी आंतर्राष्ट्रीय टिम तयार झाली होती. ब्रिटिश, अमेरिकन,युरोपिअन,अरबी, फिलिपाइन्स,चीन, मलेशिया असे बरेच जण होते. अर्थात भारत पाहिलेला तिथे एकजण पण नव्हताच. मी सुट्टिकरीता भारतात परत येणार होतो. अशाच गप्पा रंगल्या होत्या अन मी सहजच प्रश्न टा़कला की तुमच्या करीता भारतातून येताना काय आणू? तिघांकडून उत्तर आले " येताना आमच्या करीता "साप" घेउन ये" मी क्षणभर अंतर्मुख झालो. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

अवांतर

ऋषिकेश
Fri, 07/17/2009 - 13:17 नवीन
तुमच्या करीता भारतातून येताना काय आणू? तिघांकडून उत्तर आले " येताना आमच्या करीता "साप" घेउन ये" मी क्षणभर अंतर्मुख झालो.
आता काळजी नको.. पाऊसवेडीताई हैत की! :) ;) देतील त्या साप पकडून ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

सगळ्यांनाच..

सुबक ठेंगणी
Fri, 07/17/2009 - 19:02 नवीन
प्रतिसादांबद्दल, आपले बरेवाईट अनुभव इथे सांगितल्याबद्दल, आणि महत्वाचं म्हणजे माझी चिडचिड, उद्वेग काही अंशी हलका केल्याबद्दल धन्यवाद! आता कसा (ब्रिटिशच्या मिथन्यावानी) मोकलं मोकलं वाट्ताय! ;)
  • Log in or register to post comments

रूपक

मृदुला
Sat, 07/18/2009 - 03:35 नवीन
ताटवाट्यांचे रूपक आवडले. अगदी चपखल. असे अनुभव घडोघडी येतात, आणि आपण सावध नसलो तर आपल्या हातूनही घडू शकतात हा धडा प्रतिक्रियांतून शिकले. :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा