Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 07/15/2009 - 16:10
  • Log in or register to post comments
  • 12799 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/15/2009 - 16:50

Permalink

क्या बात है...

क्या बात है! हा लेख क्रमशः आहे असे समजतोय. पुढची वाट पाहतोय. परत एकदा भेटावं लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 07/15/2009 - 17:56

In reply to क्या बात है... by श्रावण मोडक

Permalink

क्रमशः नको राव

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 07/15/2009 - 18:03

In reply to क्या बात है... by श्रावण मोडक

Permalink

क्रमशः नको राव

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/15/2009 - 18:31

In reply to क्रमशः नको राव by प्रसन्न केसकर

Permalink

कारण...

मी स्वार्थी वाचक आहे. :) लिहा हो. हिट अँड रन तर मिळेलच वाचायला.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 07/15/2009 - 17:04

Permalink

कठीण आहे...

कठीण आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 07/15/2009 - 17:11

Permalink

उत्तम! तुम्

उत्तम! तुम्ही भरपूर लिहा. >>... अन संपुर्ण जमात सेटलमेंट नावाच्या तुरुंगांमधे बंदीवान झाली. << याचा अर्थ कळाला नाही.. सेटलमेंट काय प्रकार आहे? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Wed, 07/15/2009 - 17:15

Permalink

अभावग्रस्तांचे जिणे...

.. पांढरपेशा समाजाला कधीच कळत नाही, हे खरे. लेख आवडला. =D> (सुन्न करून गेला.) आपल्या दृष्टीआडची सृष्टी किती वेगळी असते, याचा प्रत्यय आला. "Great Power Comes With Great Responssibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 07/15/2009 - 17:24

In reply to अभावग्रस्तांचे जिणे... by ज्ञानेश...

Permalink

सहमत आहे

पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 07/16/2009 - 00:45

In reply to सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सहमत

पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते
अगदी मनापासून सहमत ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 07/15/2009 - 17:53

Permalink

सेटलमेंट

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या. १८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये. मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. या जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हणणे बंद केले अन विमुक्त असे नवे नाव दिले
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 07/15/2009 - 17:53

Permalink

सेटलमेंट

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या. १८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये. मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही. ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/15/2009 - 18:01

In reply to सेटलमेंट by प्रसन्न केसकर

Permalink

बरोबर

बहुतांश आशय बरोबर आहे. एक गडबड पहा - या जमातींना "डीनोटिफाईड ट्राईब" असे नामकरण देण्यात आले, हे खरे. त्यातून काय व्यक्त होतं, तर या जमाती कुठे तरी नोटीफाईड होत्या. कुठं होत्या, तर ब्रिटिश काळात. काय नोटिफाईड, तर जन्मजात गुन्हेगारी जमाती. म्हणजे ज्या क्षणी डीनोटिफाईड शब्द येतो, तो येतानाच तो आधीचा कलंक घेऊन येतो. माझ्यासमोर उभा असलेला माणूस डीनोटिफाईड ट्राईबचा आहे हे मला कळताच, लक्षात येते की, याच्या वाडवडिलांवर असा शिक्का होता. याला म्हणतात व्यवस्था...
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on गुरुवार, 07/16/2009 - 03:15

In reply to बरोबर by श्रावण मोडक

Permalink

गडबड म्हणता येणार नाही

जेंव्हा त्या जमातींवरचा "गुन्हेगार" हा शिक्का पुसला गेला तेंव्हा त्यांचा वेगळा उल्लेख होणे गरजेचे होते. "डीनोटिफाईड" म्हणजे वाडवडिल "नोटिफाईड" नव्हेत तर वाडवडिल देखील "डीनोटिफाईड".. जेंव्हा मी असे काही वाचतो किंवा बघतो तेंव्हामात्र मला आजही जातींवरून दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा (जसे विविध प्रकारचे आरक्षण) ही गरज वाटते. दुर्दैवाने ..... पुनेरी साहेब, आपल्या लेखांतून मला उत्तम माहिती मिळतीय !!
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 07/16/2009 - 15:21

In reply to सेटलमेंट by प्रसन्न केसकर

Permalink

सेटलमेंट

सेटलमेंट प्रकाराची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. सगळा प्रकार विलक्षणच आहे. इंग्रजांच्या फोडा आणी राज्य करा नीतिला अनुसरूनच आहे. स्वातंत्र्यानंतर दिलेल्या विमुक्त या नावाला अशी गंभीर पार्श्वभूमी आहे तर. पन्नास वर्षाममध्ये साधारण तीन पिढ्या झाल्या असे समजले तरी परिस्थितीमध्ये फारसा सुधार नाही हे पाहून वाईट वाटले. खालचे प्रतिसाद आणि त्यावरील चर्चा फार चांगली. आपण असे विषय समोर आणता आहात ते चांगलेच आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 07/15/2009 - 18:01

Permalink

उत्तम

माधवराव सानप या पोलिस अधिका-याने विमुक्त जाती जमातींसाठी काही काम चौकटी बाहेर जाउन केल होत. पण मग त्यांना कुठल्यातरी चौकशीत लटवकवल होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on Wed, 07/15/2009 - 18:01

Permalink

दाहक वास्तव

दाहक वास्तववर प्रकाश टाकणारे लेखन. पुनेरी लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Wed, 07/15/2009 - 18:25

Permalink

पारधी समाजातील मुले

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे राष्ट्रसंत भैय्युमहाराजांच्या आश्रमाच्या वतीने खास पारध्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा काढण्यात आली आहे. सध्या सुमारे ३०० मुले तेथे शिक्षण घेत आहेत. ह्याशाळेला सर्वात पहिला विरोध झाला तो पारध्यांकडून ! शाळा उभी झाल्यावर शाळेचे काच वगैरे फोडून ही मंडळी फरार ! मात्र कार्यकर्त्यांनी आशा सोडली नाही. आज एक उत्तम शाळा तेथे आहे. मध्यंतरी तेथील शिक्षकांशी बोलण्याचा योग आला. त्यांनी सांगीतले की या लोकांची परिस्थीती एवढी वाईट आहे की दिवाळी सारख्या सणाला सुध्दा काही पालक आपल्या मुलांना घेऊन गेले नाही तर त्यांनी चौकशी केल्यावर समजले की, किमान शाळेत आहेत तर मुलांना दोन वेळ जेवायला तरी मिळतं, घरी आणलं तर ती सुध्दा सोय नाही. अशी अपरिस्थीती आहे. गेल्या वर्षी पारधीसमाजातील पहिला व्यक्ती IAS झाला आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातीलच आहेत. त्यांचं नाव श्री सज्जनसिंह चौहाण . - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 07/15/2009 - 19:08

Permalink

नि:शब्द!

काय बोलु? आणि का बोलु? एकाच नाण्याच्या (गावाच्या/शहराच्या) ह्या दोन बाजू! एका बाजुला आम्ही राहतो ती स्वच्छ उजळ प्रकाशात आहे आणि दुसरी...... ह्म्म... ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 07/16/2009 - 10:13

In reply to नि:शब्द! by धमाल मुलगा

Permalink

+१

धम्याशी सहमत पुनेरी शेट लिहित रहा आपल्या देशात लोक कसे जगतात ते आता आम्हास कळाले ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 07/15/2009 - 20:40

Permalink

अजुन

अजुन एक जिवंत अनुभव. पुनेरी रावांच्या दर्जेदार लेखनाने मिपावर बहार आला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 07/15/2009 - 23:22

In reply to अजुन by आनंदयात्री

Permalink

+१

असेच म्हणतो दर्जेदार लेखन. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 07/16/2009 - 00:08

In reply to +१ by अवलिया

Permalink

+२

पुनेरी भाउ येवु देत अजुन... दर्जेदार लेखन. असेच म्हणतो ==निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 07/15/2009 - 21:05

Permalink

दर्जेदार

लिखाण. असेच म्हणतो. (विमुक्त जातीतील एका तरुणाने आत्मकथनात्मक कादंबरी लिहिली होती. तिचा बराच बोलबाला ~१० वर्षांपूर्वी झाला होता. पण काहीच तपशील आठवत नाहीत.)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/15/2009 - 21:09

In reply to दर्जेदार by धनंजय

Permalink

उचल्या...

उचल्या... लक्ष्मण गायकवाड. कादंबरी नाही. आत्मकथनच असावे ते. लक्ष्मण मानेंचं उपरा...
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 07/15/2009 - 22:05

In reply to उचल्या... by श्रावण मोडक

Permalink

मिळवून वाचायला पाहिजेत

दोन्ही पुस्तके.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/15/2009 - 22:10

In reply to मिळवून वाचायला पाहिजेत by धनंजय

Permalink

या

लेखातील लक्ष्मणराव गायकवाड ते हेच 'उचल्या'चे लेखक. दोन्ही पुस्तकं जरूर वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 07/16/2009 - 03:35

In reply to दर्जेदार by धनंजय

Permalink

दर्जेदार लिखाण. असेच म्हणतो.

+१.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 07/15/2009 - 22:35

Permalink

लिहीत राहा

लिहीत राहा पुनेरी. तुमच्या लेखातून एका वेगळ्याच जगाची ओळख होते.डोळे उघडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 07/15/2009 - 23:19

Permalink

भयानक!!!

असं समाजाने आपल्यातल्याच एका घटकाला बाजूला टाकून असलं जिणं वागायला लावायचं हे किती भयानक आहे!!! कसलं जगणं हे... पुनेरि, तुमच्या शैलीमुळे अजून भिडतं हे सगळं. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 07/16/2009 - 09:47

In reply to भयानक!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

सहमत! हे

सहमत! हे असं काही वाचलं , अनुभवलं की जानीव होते ती आपण किती कोशात जगतो त्याची. हे वास्तव सुन्न करुन सोडतं. पुणेरी खुप वास्तव लिहीलं आहेत तुम्ही. असे अनुभव अजुन असतील तर प्लीज, ते शेअर कराच . सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 07/15/2009 - 23:49

Permalink

लेखन

लेखन प्रभावी आहे नक्कीच. या समजाबद्दल बरेच समज गैरसमज असतात आणि आहेत. ही लोकं म्हणे मांजर, कुत्री असले प्राणी खातात.. हा त्यातलाच एक. पण तुमच्यामुळे या समजाबद्दल बरेच काही समजते आहे. भरभरून लिहा इतकेच म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by inoba mhane on Wed, 07/15/2009 - 23:58

Permalink

Punyat bharpur thikani

Punyat bharpur thikani paradhi mahila ajoon hi phiratana distat. Ekhadya dukanat gholakyane jawoon gondhal karayacha,ani tewadhat haat saaf karayachya kahi ghatana mi swata pahilya ahet. Majhya eka mitrachya ghari paradhyancha daroda padala hota. Tyachi aai,vadil ani bhau tighana marun takala. Ha tewadha punyat hostel madhe asalyamule wachla.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 07/16/2009 - 00:44

Permalink

उत्तम लेख.

उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 07/16/2009 - 04:48

Permalink

अगदी

अगदी बारकाईचे वर्णन. एका वेगळ्याच दुनीयेची ओळख करून दिली. एकूणच पारधी समाजाला पोलीस गृहीत धरतात हे फार वाईट आहे. आजकाल पांढरपेशा समाजातील काही जण पण असले धंदे करतात. आणखी लेख येवू द्या. अवांतर : आता गैरसमज नाही ना काही ? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 07/16/2009 - 05:34

Permalink

उत्तम

उत्तम लेख. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 07/16/2009 - 06:26

Permalink

माहितीपूर्ण

माहितीपूर्ण लिखाण. निव्वळ घटनांवाटे प्रश्नांच्या दाहकतेची जाणीव करून देणारे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 07/16/2009 - 06:40

Permalink

उत्तम

पुनेरी यांचा अजून एक उत्तम माहितीपूर्ण लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 07/16/2009 - 07:36

Permalink

लेख

लेख उत्तम आहे यात वाद नाही पण अर्थात फक्त पारधी कसे भरडले जातात व बळी पडतात इतकेच कळते. त्या समाजातील प्रचलीत कडक चालीरीती, समज पाहता ते काही वाटतात तितके पिडीत नाही आहेत. पारध्यांनी केलेले अत्याचार व वाईट धंदे पाहून/वाचून ही तर एकच बाजु होतीयं असे वाटते. शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. कृपया गेल्या काही दशकातील पारधी टोळ्या-गुन्हेगारीची टक्केवारी याबाबत माहीती द्याना. कायद्याने त्यांना हळुहळू का होईना न्याय दिला आहे त्यांना. पुनेरी माझी तुम्हाला विनंती आहे की पारध्यांच्या पुनर्वसन, उद्धारासाठी शासकीय तसेच सेवाभावी संस्थांतर्फे जे काम होत आहे त्याबद्दल देखील (इतक्याच पोटतिडकीने / तटस्थपणे लिहा ) तुमचा अभ्यास आहे म्हणुन ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by पंकज on गुरुवार, 07/16/2009 - 10:33

In reply to लेख by सहज

Permalink

हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल.

शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. "कायदे मोडणे, गुन्हे करणे अनेकदा आमच्या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. मुलगा चोरी करतो तेव्हाच तो वयात आला असे समजतात अनेक जण. जर गुन्हा केला नाही तर त्याच्याशी सोयरीक होत नाही." हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. इतर समाजात गुन्हे करणे प्रतिष्ठेचे मानले जात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 07/16/2009 - 10:44

In reply to हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. by पंकज

Permalink

हा वेळ देणे

>हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. हा वेळ देणे म्हणजे नक्की काय याबाबतच चर्चा अपेक्षीत आहे. अन्यथा हे एक ललितलेखन म्हणून सोडून द्यावे काय? निदान पुढच्या पिढीला तरी असे लेख वाचण्यात काही तरी चुकीचे आहे व यावर ठोस उपाय योजना झाली पाहीजे असे वाटले पाहीजे. घाटपांडे काका, मोडककाका, पुनेरी साहेब, बहुदा तुम्हीही पंकज पत्रकार्-पोलीस संबधीत लोक आहात तर तुम्ही तसेच अश्या बातम्या नियमीत वाचत आलेला वाचक यांनीही काहीतरी जास्त भाष्य करावे ह्या विषयावर.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 07/16/2009 - 11:04

In reply to हा वेळ देणे by सहज

Permalink

चांगला लेख

लेख चांगलाच विचार करायला लावणारा. सहजराव, शासनाकडून भटक्याजातीजमातीचे अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. या पारध्यांच्याच वेगवेगळ्या जातीमधील ब-याच पोटजाती अजून अनुसुचित जमातीमधे नाही. असे असले तरी पारधी लोक केवळ मागासलेले राहिले आहेत असे मला वाटत नाही. म्हणजे सामाजिक जाणीव त्यांना आहे, पण त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण जे आहे, ते मात्र अजूनही त्यांचे गेलेले नाही. माझ्या तालूक्याच्या गावापासून काही अंतरावर अजूनही पारधी लोकांची वस्ती आहे. त्यातील काही शेतीही करतात. दहाएक वर्षापूर्वी रात्रीच्या प्रवास करतांना त्यांची भिती वाटायची. रस्ते अडवून पैसे लुटणे, मारणे असा त्यांचा उद्योग असायचा. आता मात्र अपराध कमी झाले असले तरी चोरी-चपाटीपासून ते दूर गेले आहेत. असे म्हणने जरा धाडसाचे होईल. सामाजिक संघट्नांची जवाबदारी आहे की, शासनाकडून मिळालेल्या सवलती त्यांना समजून सांगता आल्या पाहिजेत. त्यांच्यापर्यंत थेट पोहचवता आल्या पाहिजेत. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी वाडी-वस्तीवर जाऊन त्यांना सामाजिक विकासाच्या प्रवाहात जोडून घेतले पाहिजे असेही वाटते. तरच आपण म्हणता तसे काही बदल नजीकच्या काळात शक्य आहे..! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by inoba mhane on गुरुवार, 07/16/2009 - 10:32

Permalink

+1

@Sahaj sahamat ahe.
  • Log in or register to post comments

Submitted by पाऊसवेडी on गुरुवार, 07/16/2009 - 13:33

Permalink

अजून नक्की लिहा

लेख आवडला. माझं आईची गावी सातार्याला असे फासेपारधी लहानपणी पहिल्यांदा पहिले आणि तेव्हापासून या जमातीबाद्द्दल भीतीयुक्त आकर्षण वाटत आले आहे सुंदर लेख -*-**-*-*-***-*-*-*****------ जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on गुरुवार, 07/16/2009 - 13:37

Permalink

सहजरावांचे आणि माझे व्यनितुन संभाषण

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे. सहजरावांनी लिहिले: सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील. तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये. त्यावर मी त्यांना लिहिले: > आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. > > परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते. > त्यावर त्यांनी उत्तर दिले: हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना. माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल. काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच. अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे: हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे. वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते. गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on गुरुवार, 07/16/2009 - 13:40

Permalink

सहजरावांचे आणि माझे व्यनितुन संभाषण

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे. सहजरावांनी लिहिले: सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील. तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये. त्यावर मी त्यांना लिहिले: > आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. > > परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते. > त्यावर त्यांनी उत्तर दिले: हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना. माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल. काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच. अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे: हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे. वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते. गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 07/16/2009 - 15:05

Permalink

एक निरिक्षण!

माझ्या गावातल्या एका कुटुंबाबद्दलचं एक निरिक्षण...अर्थात केस टू केस बेसीसवर हे बदलुही शकत असेल पण तरीही.... एक कुटुंब, तसा गोतावळा चांगलाच मोठा, हे पारधी! नक्की कोणते ते ठाऊक नाही. पैसा बक्कळ...आधीच्या पिढीनं सुपार्‍या घेऊन पैसा कमवून, दिसलेल्या जागा बळकावून प्रॉपर्टी केलेली, आता जुन्या वाहनविक्रीचा एक जोडधंदा..जिथं काही कायदेशीर तर काही पळवलेल्या गाड्या विक्रीला असतात. सगळं व्यवस्थित असुनही वागणूकीत मात्र काडीचा फरक नाही...झुंडीनं फिरणं, दादागिरी करणं, हाणामार्‍या वगैरे नित्याचं...बरं, राजकीय वरदहस्त आहेच! मुलंबाळं कॉलेज बिलेज करुन शिकलेली सवरलेली(!) पण वृत्तीत मात्र काहीच फरक नाही... असं का होत असावं? समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही. ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on गुरुवार, 07/16/2009 - 16:12

Permalink

या प्रश्नाचे उत्तर नाहीच

समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही. तुम्ही म्हणता तसे होते हे मला मान्य. पण असे समाजाच्या अन्य घटकात होत नाही का? अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? तुम्ही मांडलेलेच मुद्दे इतर जातीजमातींच्या काही लोकांबाबत लागु पडणार नाहीत का? मग इथे त्यांची जात हा मुद्दा कसा होतो? पुन्हा स्पष्ट करु इच्छितो, ना मला गुन्हेगारीचे उदात्तीकरण करायचेय ना कुणाचा अमुक जातीत जन्माला आला एव्ह्ढ्याच कारणाकरता कैवार घ्यायचाय. माझ्या मते असे करणे सायकोफंसी होईल. पण काही व्यक्तींच्या वर्तनावरुन एखाद्या संपुर्ण जमातीबाबत कोणतेही मत बनवणे हे सामाजिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध, भारताच्या राज्यघटने विरुद्ध आहे तरी आपण अनेकदा असे करतो. तुम्ही तुमच्या गावातल्या पारध्यांचे उदाहरण दिले पण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणारे अनेक पारधी मला माहिती आहे. चिंध्या हे एक उदाहरण मी माझ्या लेखात दिलेच पण दुसरे आपल्या सर्वाना नेहमी दिसणारे उदाहरण म्हणजे सिग्नलवर गजरे, लिंबु-मिरची-बिब्बे, पुस्तके, खेळणी इत्यादी सामान वि़कणारे लोक. त्यातले बहुतेक पारधी आहेत अन त्यापैकी किमान ८० टक्के लोकांनी आयुष्यात कधीच गुन्हा केलेला नसतो. जातीच्या ब्रँडींगमुळे अश्या लोकांवर मोठा अन्याय होतो असे मला वाटते. अवांतरः अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! असो !! ___ Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 07/16/2009 - 17:07

In reply to या प्रश्नाचे उत्तर नाहीच by प्रसन्न केसकर

Permalink

कोणताही विरोध नाहीच!

जातीवरुन लेबलं लाऊन त्या दृष्टीनं पाहण्याचा चष्माही मुळीच नाही. केवळ एक निरिक्षण मांडलं. सगळे असेच असतात असं नक्कीच नाही! सहमत आहे मी आपल्याशी! मला असा प्रश्न पडला कारण, जसं आपण म्हणता की इतर जातीजमातींबाबत हे लागू होत नाही का, तर होतंच..पण संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब (जे साधारण २०-३० जणांचं असावं) असं वागतं ते कश्यामुळं? त्यांच्यामध्ये असलेल्या चालीरिती, प्रथा ह्यांच्यामुळे असावं की राजकीय आशिर्वाद हा सर्वसामान्य पाहण्यात आलेला मुळ मुद्दा असावा ह्याचा विचार करतो आहे. >>अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? मुळीच नाही! तो त्यांचा हक्क आहेच...मान्यच आहे तो. त्या घरातलाच एकजण कॉलेजात मित्र झाला..आणि त्यानं जीवापाड मैत्री जपली. कुठेही कुठलाही अभिनिवेश न आणता ही मैत्री राहिली. असो, विषयांतर झालं माझ्याकडून. >>अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! मुळीच नाही! चिंता नसावी. जेव्हा एखाद्या विषयात आपल्याला समोरच्यांपेक्षा अत्यंत हुकमी अशी भरपूर माहिती असते तेव्हा बर्‍याचदा त्या विषयात असा स्टान्स त्या माहितीमुळे येतोच की जो इतरांना अभिनिवेश वाटू शकतो..पण ते असतं ते अनुभव आणि ज्ञान :) पुन्हा एकदा, जसं तुम्ही चिंध्याला पाहिलंत, तसंच मी बुड्याला पाहिलं. पण तुम्हाला पोलीस ऑफिसर भेटली, मला मात्र आख्खं कुटुंब मळलेल्या वाटेनं जाणारं भेटलं...म्हणुन केवळ हा फरक :) ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com