Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाऊसवेडी on Fri, 07/10/2009 - 15:50
  • Log in or register to post comments
  • 4712 views

प्रतिक्रिया

Submitted by सखाराम_गटणे™ on Fri, 07/10/2009 - 16:52

Permalink

चांगला

चांगला लेख. मी धरणग्रस्तांच्या समस्या जवळुन पाहील्या आहेत. ---- एप्रिल मिपा संगीतकट्टा प्रयोजन: http://misalpav.com/node/6487
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 07/11/2009 - 09:36

Permalink

अतिशय स्तुत्य, उत्तम प्रयत्न

कृपया या विषयावर लिहीत रहा. आमच्यासारखे वाचक काय करु शकतील किंवा आंदोलनकर्त्यांना आमच्याकडून कुठली भूमीका अपेक्षीत आहे हे जरुर कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 07/15/2009 - 12:50

In reply to अतिशय स्तुत्य, उत्तम प्रयत्न by सहज

Permalink

असेच

असेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 07/11/2009 - 09:41

Permalink

चांगला लेख

>>धरण बांधण्यापेक्षा किवा न बांधण्यापेक्षा या धरणाबाबत सारासार विचार करण्याची गरज आहे नाहीतर आज इसापूर धरणासारखे न त्या पाण्याचा उपयोग आणि त्याचा त्रास विस्थ्पिताना होणे हे अपरिहार्यच आहे. या विषयावर आपण अजून लिहावे असे वाटते. वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 07/11/2009 - 10:18

Permalink

थोडक्यात तरीदेखील माहीतीपूर्ण

लेख आणि त्यातील माहीती आवडली. मेधा पाटकरांच्या बाबतीत माझे मत जरा गोंधळलेले आहे. एकीकडे त्यांचे म्हणणे पुर्ण समजू शकते म्हणूनच पटते देखील. मात्र त्याच वेळेस त्या कुठे त्याला आल्टरनेटीव्ह देतात असे वाटत नाही. त्यामुळे प्रतिमा केवळ बंडखोरीचीच होते. हे दुरून वाटणारे विचार जर चुकीचे असतील तर अवश्य सांगा. कारण विचार/कृती पटोत न पटोत त्यांच्याबद्दल आदर नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 07/13/2009 - 15:58

In reply to थोडक्यात तरीदेखील माहीतीपूर्ण by विकास

Permalink

तो

तो अल्टर्नेटीव्ह मेधापाटकरानीच द्यावा हा कसला आग्रह? लोकांच्या हक्कासाठी लढणे म्हणणे विकासाला विरोध असे म्हणायचे आहे का तुम्हाला? धरण बांधायला ना नाही पण विस्थापितांच्या पुनर्वसानाचे काय? सातार्‍याच्या उरमोडी धरणाचे पाणी स्थानीक सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्याला न मिळता त्यांच्या डोळ्यादेखत ते सोलापूरकडे वाहून नेले जाते. सरदार सरोवराचे पाणी आणंद जिल्हयातील पटेलांच्या शेतीला वापरले जात असेल तर विरोध होणारच ना? माझी जमीन/ पाणी माझ्याच भागातले आणि मी मात्र देशोधडीला हे का सहन करायचे
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Mon, 07/13/2009 - 16:07

In reply to तो by विजुभाऊ

Permalink

+१

विजु भौंशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Tue, 07/14/2009 - 08:26

In reply to तो by विजुभाऊ

Permalink

+२

>>तो अल्टर्नेटीव्ह मेधापाटकरानीच द्यावा हा कसला आग्रह? मलाही आधी पेटकर बाईंची भुमिका टोकाची वाटायची पण नंतर माझेही मत विजुभाऊंसारखेच झाले.. अजुन या विषयावरचे लेख वाचायला आवडतील..
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Sat, 07/11/2009 - 17:03

Permalink

लेख चांगला

लेख माहितीपूर्ण आहे. मूल्यांकन -४ असताना फायदा नक्की कोणाचा होतो आहे? मुळात हे धरण बांधावे अशी कल्पना कुठून आली, याबद्दलही लिहावे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाऊसवेडी on Mon, 07/13/2009 - 11:26

Permalink

सगळ्यांना धन्यवाद !!

: आमच्यासारखे वाचक काय करु शकतील किंवा आंदोलनकर्त्यांना आमच्याकडून कुठली भूमीका अपेक्षीत आहे हे जरुर कळवा. धन्यवाद नक्की सांगेन : मूल्यांकन -४ असताना फायदा नक्की कोणाचा होतो आहे? खरेतर मुल्यांकन -४ असेल तर धरणग्रस्तांना फयदा होतो परंतु इथे मुळातच ह आहावालाच चुकीचा असल्यामुळे पण या गोष्टीला अनेक बड्या लोकांचा पतीम्बा असल्यामुळे सरकारी अधिकारीदेखील या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करत आहेत.याची सविस्तर माहिती पुढील लेखात नक्की टाकते आणि माझं पहिल्याच लेखल प्रतिसाद देणारी आणि न देणार्यांना मनापासून धन्यवाद . जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर! मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा वेळ पाहुनि खेळ मांडणे न मंजूर
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 07/14/2009 - 00:13

Permalink

लेख चांगला

लेख चांगला आहे. लिहित राहावे. धरणे का बांधावीत, कोठे बांधावीत, धरणातले पाणी ज्यांची जमिन बुडते त्यांना कसे मिळेल/मिळेल का? जे त्या पाण्याचा वापर करतात त्यांनी विस्थापितांकरिता काय करावे/करावे का? या बद्दलसुद्धा लिहावे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 07/14/2009 - 00:21

In reply to लेख चांगला by लिखाळ

Permalink

+१

लिखाळाशी सहमत. अजून लिहावे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Tue, 07/14/2009 - 00:59

Permalink

अतिशय

अतिशय माहितीपुर्ण लेख. लिहीत रहा. -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 07/14/2009 - 01:17

Permalink

+१ असेच

+१ असेच म्हणते.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Tue, 07/14/2009 - 01:21

Permalink

लेख आवडला

अश्या विषयावर अधिक वाचायला आवडेल. कृपया असेच लेख येऊ द्या. - नीलकांत
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 07/14/2009 - 05:20

Permalink

" आधी पुनर्वसन मग धरण"

" आधी पुनर्वसन मग धरण" हेच धोरण मला जास्त योग्य वाटत. वेगळा विषय, असेच लिहीत रहा. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 07/15/2009 - 02:02

Permalink

असेच लेखन येऊ द्या

पुनर्वसन, फायदे-तोट्यांचा विचार हे सर्व महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही पर्यायही सांगितला आहे :
कमी जमीन वापरून के.ती. बंधारे,वाटर शेड म्यानेजेमेंत (Water Shed Management),पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग,जमिनीखालील पाण्याची पातळीत वाढ करण्यासाठीच्या उपाययोजना राबविल्या तर कमी जमीन व्यापणारे आणि कमी खर्चात अधिक पानी देणाऱ्या योजनांचा अधिक फयदा होईल आणि धरणाला आणि विस्थापानाला नवीन आणि योग्य पर्याय मिळेल.
हे सर्व करणार्‍या पाणी-पंचायती आहेत का? गावकर्‍यांना तांत्रिक आधार देण्यासाठी संस्था असतील तर उत्तम. वाचक काय करू शकतील याबद्दलही माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 07/15/2009 - 14:21

Permalink

अजून नक्की लिहा

वरील प्रतिसादकांशी सहमत. अजून नक्की लिहा.. अधिक माहिती द्यावी.. त्याच बरोबर दुसर्‍याबाजूवर म्हणजे या धरणाची योजना का आखली आहे? या धरणातून विद्युतनिर्मिती होणार आहे का? तिथे अजून काहि इतर सुविधांची योजना आहे का जसे पर्यटन क्षेत्र बनविणे वगैरे बद्दल लिहावे. दोन्ही बाजू निरपेक्षपणे समोर याव्यात असे वाटते ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Wed, 07/15/2009 - 16:06

Permalink

अतिशय

अतिशय योग्य विश्लेषण. पण हे केवळ याच धरणाच्या बाबतीत आहे का? अनेक धरणं अश्याच घिसाडघाईने आणि इगो प्रॉब्लेम म्हणून केली गेलीयेत/ जातायत राजकारण्यांकडून. काही फॅक्टस.. देशातली ५०% धरणे महाराष्ट्रात आहेत पण पाणीपुरवठ्यामधे आपण अजूनही मागास आहोत. कैक गावे देशोधडीला लावून दोडामार्ग येथे जे तिलारी धरण झाले. त्यात महाराष्ट्राच्या जनतेला चिंचोकेच मिळाले. त्या धरणाचं पाणी मिळतंय सगळं गोवा राज्याला. कुठल्याही विकासकामामुळे विस्थापित झालेली माणसं कधीच आनंदी दिसत नाहीत. सतत भितीच्या, असुरक्षिततेच्या छायेत वावरत असताना जाणवतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com