आजपर्यंत मेधा पाटकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विविध आंदोलनाच्या बातम्या फक्त पेपर किंवा दूरदर्शनवर पाहत होते पण या वर्षी त्यांचा सापळी धरणग्रस्तांसाठी सुरु केलेला लढा जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मिपाच्या वाचकांना सांगावे म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न.
माझ्या M.Sc. नंतर मी एका कार्यालयात काम करायला सुरुवात केली आणि त्यच मुले मला हे संधी मिळाली कि मी मेधातायींचा हा सुरु असलेला लढा अनुभऊ शकले.
गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाने दोन धरणांचा प्रस्ताव मांडला होता त्यापैकी इसापूर धरण म्हणजेच अप्पर पेनगंगा रिवर भाग -1 पूर्ण झाले असून त्याचा वापर त्याच्या क्षमतेपेक्षा कमीच प्रमाणात होते आहे.आणि असे असूनही मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाला त्याचा भाग -२ म्हणजेच "सापळी धारण " पूर्ण करण्याची घाई लागली आहे आणि अर्थात यात अनेक राजकारणी आणि संधिसाधू लोकांचा समावेश आहे.
याच धरणाच्या संघर्षाची निमिताने मेधाताईना जवळून भेटण्याची आणि त्यांची लोकांसाठीची तळमळ खर्या अर्थाने समजून घ्ययला मिळाली.सापळी धरण हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या गावाजवळील कयाधू नदीवर बांधण्याचे सरकार ने योजिले आहे. या धरणासाठी एकूण ११ गावे पूर्णतः तर ३ गावे अंशतः पाण्याखाली जाणार आहेत आणि त्याचबरोबर या गावात राहणाऱ्या ३१४१ कुटुंबाचे विस्थापन होणार आहे मात्र सापळी धरणग्रस्त आता सरकार वर विश्वास ठेऊ शकत नाही कारण पहिल्या धरणाच्या वेळेस (इसापूर) विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन होणे आज धारण बांधून तीस वर्षे होऊनही झालेले नाही त्यामुळेच " आधी पुनर्वसन मग धरण" अशी भूमिका सापळीच्या लोकांनी घेतली तर त्यात त्यांचे काय चुकले?
या धरणात ५१३८ हेक्टर्स इतकी जमीन पाण्याखाली जाणार आहे आणि जलसंपदा खात्याने म्हनालायानुसार फक्त ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणली जाईल असे आहे तर मग आत्ताही या पेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहेच कि आणि जर आपल्या सरकारला जमिनिसाठीच पाणी वापरायचे असेल तर मग एवढी मोठी जमीन पाण्याखाली घालून थोडीच जमीन भिजणार असेल तर त्याचा काय उपयोग होईल ??? यापेक्षा तेथील गावकर्यांनी म्हणल्याप्रमाणे कमी जमीन वापरून के.ती. बंधारे,वाटर शेड म्यानेजेमेंत (Water Shed Management),पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग,जमिनीखालील पाण्याची पातळीत वाढ करण्यासाठीच्या उपाययोजना राबविल्या तर कमी जमीन व्यापणारे आणि कमी खर्चात अधिक पानी देणाऱ्या योजनांचा अधिक फयदा होईल आणि धरणाला आणि विस्थापानाला नवीन आणि योग्य पर्याय मिळेल.
आणि यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मुळातच कमी पाऊस असेलेल्या मराठवाड्यात धरणात साठविण्यासाठी तरी पाणी कुठून येणार आहे?? तसेच या भागातील जमीन हि काळी माती असल्यामुळे आणि कमी पावसामुळे हे धरण पाण्यापेक्षा गाळानेच जास्त भरेल आणि मग यातील पाण्याच वापर कसा आणि कुठे होणार याची विचार धरण बांधणार्यांना करावाच लागेल.
मराठवाड्यातील पर्यावरणीय मुद्द्यांचा विचार करता येथे अनेक वनस्पती आहेत यातील "शेव्रा" सारख्या गवताची वाढ जगात इतरत्र कुठेही १ मीटर पेक्षा जास्त होत नाही आणि तेच गवत कयाधू नदीच्या काठी मात्र २-३ मीटर एवढे वाढते याचबरोबर मार्वेल, जोन्धली सारख्या चार्याच्या गवतन्चहि नाश होईल.आणि तेथील वैविध्यपूर्ण अशा वनांचे नुकसान होईल असे पुण्याचे वनास्पतीतज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ आणि औरंगाबादचे डॉक्टर एस व्ही नाईक यांचे म्हणने आहे.
या धरणाच्या पर्यावरणीय अनुमतीसाठी पर्यावरणीय आघात मुल्यांकन अहवाल पाठबंधारे विभागाने तयार केला आहे मात्र हा अहवाल खूप जुना असून यातील सर्वच माहिती हि कार्यालयात बसून लिहिली आहे कारण प्रत्यक्षात मात्र कोणतीही माहिती गोळा करयला सरकारकडून एकही माणूस तिथे आला नव्हता असे गावकर्यांचे म्हणणे आहे.
तसेच इतक्या मोठ्या धरणाचा पर्यावरणीय आघात मुल्यांकन अहवाल हा फक्त ३३ पानाचा आहे आणि त्यातही अनेक चुका आहेत त्या पैकी महत्वाच्या चुका खालीलप्रमाणे
१. या अहवालात कोठेही किती जमीन पाण्याखाली जाणार आहे आणि किती पाणी मिळणार आहे हे सांगितेले नाही
२.अहवालानुसार ६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे मात्र ३० ऑक्टोबर २००६ साली पाठबंधारे विभागाने
पर्यावरणाच्या सरकारी अधिकार्यांना (MoEF) ला पत्राने (CAD/WRD/T-1/5939) नुसार ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे असे असेल तर खरी आकडेवारी कोणती ??
३. मराठवाड्यात आढळून येणाऱ्या सेर्पत्नार्या (reptiles) प्राण्यांमध्ये तिथे अजगर??? हा प्राणी सापडतो असे म्हटले आहे .
४. पर्यावरणीय आघात मुल्यांकन अहवाल हा सूची (check-list ) पद्धतीने तयार केला आहे. यात अनेक चांगलं विटे मुद्द्यांना गुण देऊन शेवटी ते मोजेले जातात आणि अहवालातील सुचीमाध्य तयार कार्नायानी मोजण्याचे कष्ट न घेत्लाय्मुळे त्यांनाच माहिती नाही कि त्यात वाईट मुद्यांचे गुण हे २६ होतात आणि चांगल्या मुद्यांचे गुण २२ होतात मग आत्ता -४ गुण असेलेला अहवाल पर्यावरणासाठी उपयुक्त कसा असू शकतो हे त्याच लोकांना माहिती.
५. पाणी आणि हवेच्या सध्या परिस्थितीचे अहवाल हे जुने म्हणजेच २००४ चे असून ते हि अत्यंत त्रोटक स्वरूपातील आणि कमी नमुने घेऊन करण्यात आले आहे यातही अहवालात पाण्यामध्ये E.coli सारखे जंतू सापडत असूनही हे पाणी पिण्यायोग्य आहे असे म्हटले आहे.
कोणतेही धारण बांधण्यासाठी सरकारची आणि जलआयोगाची तसेच पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागते जी पाठबंधारे विभागाकडे नाही कारण मुळात हा पर्यावरणीय मुल्यांकन आघात अहवालच जुना असून त्यात खूप त्रुटी आहेत आणि असे असूनही काही राजकीय पाठिंब्यामुळे या धरणाची जनसुनावणी देखील २० डिसेंबर २००८ ला कळमनुरी येथे ठेवण्यात आली. आनिताब्बळ सहा तास चालेल्या आणि हजारो लोकांचा सहभाग असेलेल्या या जनसुनावणीमध्ये या धरणाला पाठींबा देणारा आणि धारण हवे असे म्हणणारा एकही माणूस नव्हता यावरूनच आत्ता हे धरण लोकांना नको आहे हे सिद्ध होते
खरेतर , आपणही फक्त विरोधासाठी विरोध न करता आणि सरकारनेही जनता नाही म्हणते आहे म्हणून धरण बांधण्यापेक्षा किवा न बांधण्यापेक्षा या धरणाबाबत सारासार विचार करण्याची गरज आहे नाहीतर आज इसापूर धरणासारखे न त्या पाण्याचा उपयोग आणि त्याचा त्रास विस्थ्पिताना होणे हे अपरिहार्यच आहे.
आणि अर्थातच हा विषय खूपच मोठा आहे पण तरीही मी तो काही ठराविक मुद्दे घेऊन थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचने
4749
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला
अतिशय स्तुत्य, उत्तम प्रयत्न
असेच
In reply to अतिशय स्तुत्य, उत्तम प्रयत्न by सहज
चांगला लेख
थोडक्यात तरीदेखील माहीतीपूर्ण
तो
In reply to थोडक्यात तरीदेखील माहीतीपूर्ण by विकास
+१
In reply to तो by विजुभाऊ
+२
In reply to तो by विजुभाऊ
लेख चांगला
सगळ्यांना धन्यवाद !!
लेख चांगला
+१
In reply to लेख चांगला by लिखाळ
अतिशय
+१ असेच
लेख आवडला
" आधी पुनर्वसन मग धरण"
असेच लेखन येऊ द्या
अजून नक्की लिहा
अतिशय