आई वरील मुलाचे प्रेम हे खरंच सेम असतं... अगदी अगदी सेम ! कधी काळी मला ही वाटायचे आई म्हातारी झाली तर... मी पण दंगा केला होता... पण मागच्या वेळी घरी गेलो होतो तेव्हा आईच म्हणाली.. म्हाता-या बघ माझा एक ही केस पांढरा नाही आहे व तुझा एक ही काळा नाही =)) खरंच एवढा आनंद झाला मला तो मी येथे शब्दात व्यक्त करुच शकत नाही.... !
तै.. खरचं आनंदाचे क्षण आहेत हे.. तुझा मुला तुझ्यावर किती प्रेम करतो हे त्याच्या एका चिंतेवरून दिसत आहे... यु आर लकी !
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
असं कुणि सांगितलं?
विष्णु पदु म्हात्रे... एके काळचा हातभट्टी चालक-मालक, प्रत्येक धारेची टेस्ट करुन बघता बघता त्याच्या शरिरात रक्त कमी अल्कोहोल जास्त. गेले २५ वर्ष मि त्याला आजारी पडलेला पाहिला नाही.
आज काही करोड्चा धनी असलेला विष्णु पदु.. इस्त्री केलेला बनियन आणि इस्त्रीचा टॉवेल घालतो. टॉवेल्च्या कोच्याला दीव्याच्या ताज्या फुग्याची बाट्ली असते. शक्य असत तर त्याने सरळ सलाइनच लावल असतं.
वय वर्ष ७५ चा विष्णु पदु, दीव्याच्या हातभट्टीवाल्यांचा ब्रँड अँबॅसीडर आहे.
अवघड आहे ... जबरा लेखण !! पण ह्या असल्या णकारात्मक विचारांवर नका बॉ लिऊ... लई भ्या वाट्ट !!
लहान मुलांना इतकं जपणारी यांची अमेरिकन संस्कृती.. पण मग ५-६ वर्षाच्या मुलांना ह्युमन लाईफ सायकल सांगायची काय गरज होती.
येग्जाक्ट्ली !!! नाही नाही ते नको त्या वयात सांगतात .. अमेरिकन पाय पाहुन बर्यापैकी कल्पना येते अमेरिकन संस्कृतीची !
देवा मला म्हतारा होण्या आधीच उचल रे ( उचललो गेलो नाही तर क्रेन आण ... पण उचल रे )
(उचलायला अंमळ जड) टारझन पोते
प्राजू हे असच चालतं. आमच्याकडे केस पांढरे कधीच झालेत. आता डोळा आई-बाबांच्या वजनावर असतो. त्या हेल्थच्या तासाला ओबेसिटी आणि इतर आजार वगैरे शिकून आल्यापासून लेक food cop झालाय. आमच्या लायब्ररीयनचा मुलगा तर तिला exercise कर म्हणून छळतो. ती शाळेवर जाम चिडली होती.
घरोघरी मुलांच्या शाळा! :D
माझ्या मते आपण मोठे लोक बर्याचदा म्हातारपण, मरणे वगैरे गोष्टी जितक्या निराशेने आणि सीरिअसली घेतो तितकी ही लहान मुलं घेत नाहीत. त्यांना ती एक प्रोसेस आहे इतकाच अर्थ गवसतो आणि ती प्रश्न विचारत रहातात. नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता इतकाच त्यामागे अर्थ असतो. पण उत्तरं काय द्यायची हे मात्र कर्मकठिण असतं बर्याचदा.
चतुरंग
प्राजुताईंचा सुंदर लेख!
माझ्या मते आपण मोठे लोक बर्याचदा म्हातारपण, मरणे वगैरे गोष्टी जितक्या निराशेने आणि सीरिअसली घेतो तितकी ही लहान मुलं घेत नाहीत. त्यांना ती एक प्रोसेस आहे इतकाच अर्थ गवसतो आणि ती प्रश्न विचारत रहातात. नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता इतकाच त्यामागे अर्थ असतो.
करेक्ट! मलाही असेच वाटते. (खरे खोटे कोणास ठाउक!)
आमच्या मुलीची या विषयावरील मुक्ताफळे देण्याचा मोह टाळतो आणि कटतो....
- एकलव्य
नेहमीप्रमाणेच मस्त लेखन :)
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
क्याबात है, प्राजु. क्या बात है. सुंदर लेखन, नेहमीप्रमाणेच. पोरांची पण कमाल असते. काय काय विचारतात आणि डोक्यात घेऊन बसतात. आमच्या शेजारच्या आजी गेल्यावर त्यांच्याकडच्या एका लहान मुलीने समाचाराला आलेल्या दुसर्या एका आजीबाईंना 'आता तुम्ही पण जाणार देवबाप्पाकडे?' असे विचारून पळापळ केली होती.
लहान मुलांना कशी उत्तरं द्यावी हे एक कर्मकठिण काम आहे बॉ!!!
बिपिन कार्यकर्ते
एक घटना - गाढ झोपलेले आपले बाबा हाका मारुनही उठत नाहीत म्हटल्यावर ५ वर्षाची बहीण आणि ३ वर्षांचा भाऊ ह्यांच्यातला संवाद -
"ए बाबा बघ कसा झोपला?"
"अजिबात ओच देत नाहीये."
"मरला वाटतं."
"चल तू हात पकड, मी पाय पकडते खिडकीतून टाकून देऊ!"
चतुरंग
लेख चांगला आहे आणि चतुरंगने म्हणल्याप्रमाणे "घरोघरी मुलांच्या शाळा" अशीच अवस्था आहे.
एकंदरीत अमेरिकन पद्धतीत नको ते शिक्षण नको तेंव्हा देण्याची जरा जास्तच पद्धत आहे. ५-६ वर्षांच्या मुलांना ए बी सी डी आणि आकडे आले नाहीतरी काय घाई आहे असे म्हणतील आणि दुसरीकडे "एज अॅप्रॉपिरिएट" म्हणत असली शिक्षणे देतील.
मात्र चतुरंगशी अशंतः सहमत की लहान मुले आपल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट तितकी गांभिर्याने घेत नाहीत. तरी देखील डोक्यात कुठेना कुठे तरी हे विचार राहतातच.
-----
तरी नशिब समजा तुमच्या मुलाला इतकेच शिकवले आणि बिचारा आईच्या काळजीने हे प्रश्न विचारतोय. आम्हाला असे काही "नशिबवान" पालक माहीत आहेत की जे पोराला नीट वागण्यावरून भारतीय स्टाईल मधे ओरडले आणि काही कळायच्या आत बाहेर - पोलीस, फायर, अँब्युलन्स हजर :O चाइल्ड अॅब्युज झाल्यास ९-१-१ ला फोन करा म्हणून शाळेत शिकवलेले. चाईल्ड अॅब्युज म्हणजे काय? त्यांच्या लेखी ओरडणे देखील असू शकते...त्याच्या पुढची स्टेप जर पोलीसांना समजले नसते तर सोशल सर्व्हीस डीपार्टमेंटची लोकं येऊन, पोराला सरळ घेऊन जाऊ शकली असती.
एकंदरीत अमेरिकन पद्धतीत नको ते शिक्षण नको तेंव्हा देण्याची जरा जास्तच पद्धत आहे. ५-६ वर्षांच्या मुलांना ए बी सी डी आणि आकडे आले नाहीतरी काय घाई आहे असे म्हणतील आणि दुसरीकडे "एज अॅप्रॉपिरिएट" म्हणत असली शिक्षणे देतील.
अगदी खरं!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ईस्टर आयलॅण्ड बेटावरच्या माती मध्ये संशोधकाना एक जीवाणु सापडला आहे. त्याच्या साह्याने त्यानी म्हातारपण न येणार्या गोळ्या तयार केल्या आहेत म्हणे.
सदर माहिती काल इंडीया टीव्हीवर पाहिली आहे. :D
वेताळ
ईस्टर आयलॅण्ड बेटावरच्या माती मध्ये संशोधकाना एक जीवाणु सापडला आहे. त्याच्या साह्याने त्यानी म्हातारपण न येणार्या गोळ्या तयार केल्या आहेत म्हणे.
म्हणजे सगळे राजकारणी आता तरूण नेतॄत्व देण्यासाठी परत सज्ज होणार? :)
:(
त्याला समज येईल तेव्हा कदाचित त्याला माझ्या प्रॉमिस मागची भावना समजेल आणि तो मला समजून घेईल. असं वाटतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अगं तू त्याला के-सिरियल मधल्या अंबाआज्जी दाखव...त्या जवळजवळ पाचेक पिढ्या चांगल्या हिंडत्या फिरत्या होत्या! :D
जोक्स अपार्ट...विसरेल थोड्या दिवसांनी ! आणि मोठा झाल्यावर हा तुझा लेख वाचून हसेल!
मी माझ्या काकुशी ,आई शी , आजीशी जाम अॅटॅच आहे...त्यामुळे त्यांच्या हातावर जर सुरुकुत्या दिसल्यातरी सुद्धा मी जाम अस्व्स्थ होते. तुमचं बाळ तर लहान आहे...त्याला भिती वाटणारच...माझ्या वरुन सांगते...माझ्या लहानपणी आजोबा वारल्यावर मी पण मला आजोबांकडे ताबडतोब सोड म्हणुन धिंगाणा घालायचे.
मुल फार पसेसिव असतात आपल्या लोकांसाठी.
ज्याच्याशी त्यांच जमत त्या लोकांनाच फक्त त्रास देतात तसेच त्यांच्यावर खरखुर प्रेम करतात.
उत्तम लेख. कालांतराने मुलाच्या डोक्यातील हा किडा जाईलच आपोपाप. फार काळजी करून घेऊ नये, असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सर्वांचे मनापासून आभार.
सहज, सुनिल, सुबक..
तो विसरेल लवकर अशीच आशा करते. (सध्या दुसरं काय करू शकते तसंही)..
पुन्हा एकदा आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रभू मास्तरांना मी व्य नी ने ही समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं," सध्या काहीच नका करू, पण तुमचा एकही केस पांढरा होणार नाही याची काळजी घ्या." हरकत नाही.
मास्तरांना काय जातंय सांगायला? असा काही उपाय असता तर तो मास्तरांनीच (आणि आम्हीही) वापरला नसता का?:)
प्राजु, बाकी तू अंमळ चक्रम होत चाललीयेस बरं का! वयाचा परिणाम?:)
मी आता काय करणार आहे माहितिये का? तुझे असे लेख सेव्ह करून साठवून ठेवणार आहे आणि मग जेंव्हा तुझ्या मुलाचं लग्न होईल ना त्याप्रसंगी तुझ्या सुनेला (गरज पडल्यास इंग्रजीत भाषांतरित करून!!) ते प्रेझेंट देणार आहे!! कळू दे तिलाही आपली सासू तरूणपणी कशी अंमळ आटा सटकलेली होती ते!!!!!!
:)
आमची `हळवी' मनस्वी याबाबत फार प्रॅक्टिकल आहे. तिला जीवनोन्नतीचे सहा सोपान शिकवण्याची जबाबदारी बाप म्हणून माझ्याच खांद्यावर आहे, असे मी मानतो... (|:
त्यामुळे हे लाइफ सायकल मीच तिला समजावून सांगितले. ती मला विचारते, ``बाबा, माझी मज्जा आहे ना? मला चार चार आजी-आजोबा.' तुम्हाला नाही ना?`` :T
परवा म्हणाली, ``बाबा, मी म्हातारी होउन देवाघरी गेले, तर मग तुम्हाला कुशीत झोपायला कोण??`` :S
आणखी एक दिव्य विधान :
`बाबा, मी मोठी होईन तेव्हा शाहरुख खान, गलगले, मकरंद अनासपुरे हे म्हातारे होतील ना?``
तिला आम्ही म्हातारे होण्याची काळजी नाहीये. ही तिची दैवतं म्हातारी होण्याची काळजी जास्त आहे!! :S
त्या तुलनेत तू किती भाग्यवान आहेस प्राजु!!!
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
अश्या छकुलीला एकदा नक्कीच भेटावे लागेल... :)
आमच्या कुंद्याची पण छकुली असेच काही तरी बोलुन त्याला छळत असेल ;) तो लेकाचा आम्हाला ऑनलाईन छळतो..
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
आमच्या बायकोची एक मैत्रीण आहे सायरा. तिची मुलगी झैनब तिला एकदा विचारते,
"ममा, ममा, शारुख्खान हमारें डॅडी क्यों नहीं बन सकते??" :T :O :?
आजूबाबूच्या सगळ्यांची बोलती बंद!!!
चतुरंग(खान)
हल्लीची मुले बर्याच बाबतीत झोरबा आहेत. बुद्धाला जोपर्यन्त म्हातारपण आजारपण वेदना मरण या अवस्था माहीत नव्हत्या तोपर्यन्त झोरबा ही त्याची अवस्था होती. त्याने जेंव्हा ह्या अवस्था पाहिल्या तेंव्हा त्याला बसलेल्या मानसीक धक्यामुळे त्याला घर सोडून जाऊन विचार करायला प्रवृत्त व्हावे लागले.
रजनीश म्हणतात की तुम्हाला मृत्यूची भिती काढून टाकायची असेल तर स्मशाने ही गावात मध्यभागी बांधा.
जामनगर मध्ये एक प्रयोग केला गेला आहे. तेथील स्मशानभूमी हे एखाद्या बगिच्या सारखी बांधली आहे. त्या भागातल्या बराचशा शाळा शाळेची ट्रीप स्मशानभूमीत नेतात
प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही
म्हातारे झाल्या झाल्या लगेच काही कोणी डाय होत नाही . प्रकॄती (हेल्थ हो) चांगली असेल तर माणूस पार नव्वदी शंभरी गाठतो. असे त्याला सांगा. आणी मुलांच्या दृष्टीने 'हंड्रेड इअर्स' म्हणजे खूप मोठा आ़कडा असतो.
आज पुन्हा वाचल्यावर सहज आठवलं.
इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर टीव्हीवर त्यांचं प्रेत आणि अगणित फोटो रंगीबेरंगी फुलांच्या हारांनी सजवले होते. तेव्हा असं मेल्यावरच करतात हे माहितच नव्हतं. आम्हाला (मला आणि माझा भाऊ, चिन्मय याला) आपलं वाटलं, की राजीव गांधीचं त्याच्या आईवर लै प्रेम असल्यामुळे असं त्याने केलं असणार.
ताबडतोब आमचा आईला प्रश्न, "आई, तुझे फोटो काढून त्यांच्यासाठी असे हार का नाही घालत आपण?"...
आईचे हात कपाळाला. मग तिने नीट समजावलं की ते हार का पडलेत.
तसे लहानपणी आम्ही खूपच त्रासदायक होतो.
लहानपणी बाबा पंजाबला होते. आम्ही मात्र शिक्षणासाठी आईसोबत नागपुरला. उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुटी आली, की पंजाबला जायचो. तेव्हा, एकदा बोगदा, वळणदार ट्रॅकवर दिसणारे आपल्या गाडीचे डबे, डोंगर, दर्या आईनी हौसेनी आम्हाला दाखवलं. पुढच्या क्षणी आमचा प्रश्न - "आई गं, या दरीत आपण पडलो तर काय होईल?" आईचं उत्तर - "आपण खाली जाऊन वर जाऊ".
दिल्लीला बाबा आम्हाला घ्यायला यायचे. एकदा आम्ही विचारलं, "बाबा नाही आले दिल्लीला तर काय करायचं?" आईचं उत्तर - "तिकिट काढून नागपूरला परतायचं." आम्ही - "तेवढे पैसे आहेत?"
आपला,
(प्रश्नांनी इरिटेट करणारा "निरागस") प्रशांत
माझ्या लेकाला आई कायम छान दिसली पाहिजे, साडी, पंजाबी सुट ही नको घालु, जीनच घाल, केसच सोड. हे तर आहेच पण त्या पाठोपाठ त्याची टिचरही दिसायला सुंदर हवी नाही तर घरी येऊन आई टिचरला चष्मा का आहे, जाड का आहे तीचे केस असे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. :(
खरेतर कोणीही आपल्याला असे म्हटले की क्या बुढा हो गया है तर नकळतच आपणकाहीतरी गमावत आहे असे जाणवतेच, पण तेच कोणी "कितना बडा हो गया है" असे म्हटले तर नकळतच अंगावर मांस चढल्यासारखे वाटतेच वाटते.
दोन्ही बाजूला काळ हा जात असतोच, बडा होण्यामध्ये सुख आहे तर बुढा होण्यामध्ये काळाबद्दलची शर्यत हरण्याची खंत आहे.
प्रतिक्रिया
हो हे असेच
आई वरील
धन्यवाद. -
कुणालाच
असं कुणि
अवघड आहे ...
प्राजू हे
हे हे हे!
करेक्ट!
नेहमीप्रम
+१
क्या बात है!!!
हा हा हा!
नको ते शिक्षण
एकंदरीत
बिचार पिलु..
:-)
+१
म्हातारपणाची आता काळजी नको.
म्हणजे?
प्राजु तै
भयानक प्रॉमिस
पण दुसरं काय करू शकत होते मी??
मस्त विषय!
मस्त!!!
मस्त
धन्यवाद.
छ्या!
प्रभू
प्राजु,
आमच्या घरी...
अश्या
हा हा हा!! जबरी आहे की मुलगी तुमची!
छान!!
हल्लीची
एका
हाहाहा,,,,
म्हातारे
लेख आवडला...!
आमचे लहानपणचे निरागस+डेंजरस प्रश्न
माझ्या
बुढा आणि बडा होना.