✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सूर्यास्त - २

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 02/18/2008 - 20:48  ·  लेख
लेख

Book traversal links for सूर्यास्त - २

  • ‹ सूर्यास्त
  • Up
  • सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12720 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

क्लास!!

स्वाती दिनेश
Mon, 02/18/2008 - 20:51 नवीन
खल्लास चित्रे आहेत,मस्तच ! आणि त्यावरची टिप्पणीही तितकीच सुंदर! स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम

ऋषिकेश
Mon, 02/18/2008 - 20:52 नवीन
आजि म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था करून टाकलीत हो! एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे!! खूपच सुंदर!! (मंत्रमुग्ध) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

फर्माइश

धनंजय
Mon, 02/18/2008 - 22:23 नवीन
क्षितिजावरील पूर्ण चंद्राची चित्रे लावा. तुमच्या हातून ती सुंदर येतील. सर्वच चित्रे छान, पण क्रमांक ३, ४, ५ अधिक आवडली. क्र ३ कमीतकमी गाजावाजा करता खूप सांगते (जपानी रेखाचित्रांसारखे). (४, ५ गुंतागुंत चित्रित करतात. ) क्र ४ मधे मला सूर्य व्यूहात अडकलेल्या वीरासारखा वाटतो. क्र ५ मध्ये लेसच्या ओढणीमागे सरणारी स्त्री आठवते. तुमच्या मनात काही का असेना - माझ्या कल्पनाशक्तीला वाव देणारी चित्रे आहेत. थोड्या जिज्ञासू चांभारचौकशा : ही चित्रे काढताना तुम्ही कॅमेराच्या पडद्याचा वेग (शटर स्पीड) किती ठेवता, जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या केंद्रीभवनाने आतील इलेक्ट्रॉनिक्स जळून न जावेत? (काळी काच [न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर] न लावता सूर्याचा फोटो श्क्यतोवर काढू नये, असे मी पूर्वी ऐकले होते.) किती मे.पि.चा कॅमेरा आहे, आणि साधारण किती क्रॉप केले?
  • Log in or register to post comments

साक्षीदेवा,

विसोबा खेचर
Tue, 02/19/2008 - 00:23 नवीन
साक्षीदेवा, तुझ्या सूर्यास्ताने वेड लावलं रे! मला तिसरं आणि पाचवं चित्र भन्नाट आवडलं. फोटोग्राफी या कलेसंदर्भात मनात तुझ्याबद्दल कौतुक तर होतंच पण आता ती जागा आदराने घेतली आहे! साक्षिदेवा, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला मारवा हा राग संध्याकाळी गातात. वरील प्रत्येक चित्रं हे त्या हुरहूर लावणार्‍या मारव्याची आठवण करून देतं! विशेष करून तिसरं चित्रं! हे चित्रं पाहताना तर आमिरखासाहेबांचा मारवा कुठूनतरी नकळत एकू येऊ लागतो...! आपला, (सूर्यास्त पाहून उगाचंच उदास होणारा!) तात्या. एक फर्माईश - जमल्यास कधी समुद्रकिनारच्या सूर्यास्ताची चित्रेही इथे दे. अथांग सागरापलिकडे क्षितिजापार अस्ताला जाणारा तो सूर्य माणसाला खूप काही शिकवून जातो! तात्या.
  • Log in or register to post comments

शब्दच नाहित..

प्राजु
Tue, 02/19/2008 - 00:36 नवीन
इतकी सुंदर छायाचित्रे आपण टिपलित... आभारि आहे मी अपली. खूपच सुंदर.. - प्राजु
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रे , सुंदर लेख

सुवर्णमयी
Tue, 02/19/2008 - 04:13 नवीन
तीन आणि पाच खूप आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

चित्र २ वर विशेष प्रतिक्रिया

धनंजय
Tue, 02/19/2008 - 05:18 नवीन
असे लक्षात आले, की ज्यांनी-ज्यांनी विशेष करून फोटोंचा उल्लेख केला आहे, त्यांत क्र१ आणि क्र२ कुठेच दिसत नाहीत. क्र१ त्याच्या जनकाला संदर्भामुळे प्रिय आहे, पण त्याविषयी बहुतेक आस्वादविषयक चर्चा होऊ शकणार नाही. (कोणी मला त्यातलीही सौंदर्यस्थाने दाखवलीत, तर तेही छानच होईल.) क्र२ बद्दल मात्र विचार करायला गेले तर रसग्रहणाच्या दृष्टीने त्यात खूप काही "जागा" आहेत. खालचा तृतीयांश घेणारी सुंदर महिरपी भिंत, डावा तृतीयांश विभागणारे गमतीदार झाड, गच्चीच्या आणि दोन फांद्यांच्या त्रिकोणी कोंदणात मण्यासारखा सूर्य... मग (माझ्यासकट) कोणी त्याचा विशेष उल्लेख का केला नाही? याबद्दल कुतूहल वाटते. गच्चीच्या महिरपीलाही फोकसमध्ये घेतले असते, (छिद्र आणखी थोडे लहान करून) काही फरक पडला असता का? हे चित्र वेगळे कातरायला (क्रॉप करायला) हवे काय? येथील चित्रसेनांनी म्हणा, नेत्रसेनांनी म्हणा जरा विचार मांडावेत.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

कोलबेर
Tue, 02/19/2008 - 08:41 नवीन
नं. दोन चित्रामध्ये भिंगाचे छीद्र थोडे छोटे केले असते तर गच्चीची कड आणि सूर्य दोन्हीही फोकस मध्ये आले असते. तसेच त्याच चित्रातील गच्चीची बाजू कापून टाकली असती तरी चालली असती. अर्थातच हे माझे वैयक्तिक मत. शेवटी ज्याला जसे योग्य वाटते तसे त्याने चित्र काढावे. साक्षीजींची माफी काढून मी ह्या चित्रात थोडेसे फेरबदल केले आहेत ते इथे चिकटवतो. बदल पटलेच पाहिजेत असे नाही! Image removed. बाकीची चित्रे छानच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

धन्यवाद

सर्वसाक्षी
Tue, 02/19/2008 - 09:45 नवीन
मनःपूर्वक केलेले रसग्रहण, दिलेले अभिप्राय व सुचविलेल्या अनेक सुधारणांबद्दल रसिकांचे आभार. थोडेसे दुसर्‍या चित्राविषयी. जर तटबंदी आणि सूर्य हे दोन्ही एकाच वेळी किरणात घेतेले असते व आकृति स्पष्ट ठेवल्या असत्या तर त्याबरोबर तो निष्पर्ण वृक्ष देखिल त्या तटबंदीत विलिन झाला असता व एकप्रतलीय व सपाट अशी प्रतिमा उमटली असती. त्रिमित परिणाम साधून वृक्ष, थोडी दूर असलेली भींत व खूप दूरवर क्षितिजावर असलेला सूर्य या तिन्ही प्रतिमा प्रकाश व सुस्पष्टता याद्वारे आपले स्वतंत्र अस्तित्व राखून असाव्यात व तरीही एकाच दृश्यात सामावल्या जाव्यात असा या रचनेचा उद्देश होता (कितपत जमला माहित नाही:)) सर्व जाणकारांच्या सूचनांबद्दल पुन्हा एकदा आभार. माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे. आपला स्नेहांकित साक्षी
  • Log in or register to post comments

वा !!!

धमाल मुलगा
Tue, 02/19/2008 - 10:43 नवीन
अप्रतीम...केवळ अप्रतीम !!! हे जास्त छान अन् ते कमी अस॑ मला काही वाटल॑च नाही. साक्षीदेवा...खर॑च काय जबरा आहे तुमचा तिसरा डोळा... माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे. अस॑ का? बर॑ ! मिपाकर हो, जर हा मनुष्य स्वतःला "हौशी" सदरात मोडतोय, तर "एक्सपर्ट" काय असेल हो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

आणखी एक ..

कोलबेर
Wed, 02/20/2008 - 01:48 नवीन
मिसिसिप्पी नदीवर एका निरभ्र संध्याकाळी टिपलेला सुर्यास्त.. Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
Wed, 02/20/2008 - 06:36 नवीन
अप्रतिम..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

+१

धनंजय
Wed, 02/20/2008 - 21:06 नवीन
फारच सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+१

ऋषिकेश
Wed, 02/20/2008 - 21:15 नवीन
वाह!.. मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अत्यंत सुंदर!

चतुरंग
Wed, 02/20/2008 - 21:20 नवीन
सूर्य एका कोपर्‍यात असल्यामुळे तिथे नजर खिळते आणि हलकेच पुलावरून सरकत येऊन काठावरच्या झाडावर स्थिरावते. मिसिसिपीच्या पुलामुळे आणि कमानींमुळे त्रिमितीचा सुरेख भास होतोय. आकाश-नदी जोडीत अडकलेल्या क्षितिजावरची रंगांची उधळण आणि अस्ताला जाणारा सूर्य जणू सर्व शक्तीनिशी किरण उधळीत निघाला आहे असे जाणवते! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

अप्रतिम सुर्यास्त...

प्रभाकर पेठकर
Wed, 02/20/2008 - 15:25 नवीन
श्री. सर्वसाक्षी ह्याचे सर्व सुर्यास्त भन्नाट आहेत. मान गये हुजूर. श्री. कोलबेर मिसिसिपी सुर्यास्त सिंप्ली ग्रेट...!
  • Log in or register to post comments

मावळत्या दिनकराची चित्रे भन्नाट आहेत...

एकलव्य
गुरुवार, 02/21/2008 - 06:21 नवीन
श्री. सर्वसाक्षी ह्याचे सर्व सुर्यास्त भन्नाट आहेत. मान गये हुजूर. श्री. कोलबेर मिसिसिपी सुर्यास्त सिंप्ली ग्रेट...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

छायाचित्रकारांनो

ऋषिकेश
गुरुवार, 02/21/2008 - 06:51 नवीन
उत्तमोत्तम छायाचित्रकारांनो, आजच्या ग्रहणकाळातील चंद्राचे छायाचित्र कोणी काढल्ंय का?.. असल्यास इथे डकवावे ही विनंती :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

काय सही

वरदा
गुरुवार, 02/21/2008 - 07:00 नवीन
खूपच छान आहेत सगळेच फोटो...आणि वर्णनही झकास...
  • Log in or register to post comments

अहाहा... मजा

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/21/2008 - 08:58 नवीन
अहाहा... मजा आली.... सर्व छायाचित्रे आणि त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचूनही...
  • Log in or register to post comments

जबरदस्त

झकासराव
गुरुवार, 02/21/2008 - 14:22 नवीन
फोटो आणि वर्णन देखिल छान :)
  • Log in or register to post comments

आणखी एक सुर्यास्त..

कोलबेर
Fri, 03/07/2008 - 11:55 नवीन
Image removed. संध्याकाळची मिसिसिप्पी नदी Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख..

विसोबा खेचर
Fri, 03/07/2008 - 16:56 नवीन
दोन्हीही चित्रे क्लासच! केवळ अप्रतिम... वरूणदेवा, कमाल आहे तुझी! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

उदास!

पिवळा डांबिस
Fri, 03/07/2008 - 09:44 नवीन
ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हॄदया, अता मधूचे नांव कासया, लागले नेत्र हे पैलतीरी||
  • Log in or register to post comments

एकदम

जितेंद्र शिंदे
Fri, 03/21/2008 - 15:49 नवीन
एकदम क्लास दिल खूश हुआ
  • Log in or register to post comments

वा

आजानुकर्ण
Fri, 03/21/2008 - 16:59 नवीन
सर्वसाक्षीशेठ आणि कोलबेरशेठ काय अप्रतिम चित्रे काढता हो. जरा इथल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगा की. (आनंदित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

सर्वच छायाचित्रे अप्रतिम.

सुधीर कांदळकर
Fri, 03/21/2008 - 20:04 नवीन
झकास. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा