Skip to main content

मायकेल जॅक्सन गेला

लेखक पक्या यांनी शुक्रवार, 26/06/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच (गुरुवार दुपार ) समजले की पॉप संगीताचा बादशाह समजला जाणारा मायकेल जॅक्सन गेला. राहत्या घरीच श्वास बंद पडून त्याचे निधन झाले. http://news.yahoo.com/s/ap/us_obit_michael_jackson
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32264
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

व्यक्तिगत तो कसा का असेना पण त्याने जगाला भुरळ घातली हे खर. बाकी त्याचा आता वरती चित्रगुप्ता बरोबर हिशेब चालु असेलच...

एकुणच मायकलच्या निमित्ताने पाश्चात्य संगीत आणि नृत्याच्या नावाने तोंडसुख घेण्याच्या हा प्रयत्न अत्यंत निंदनिय आहे.

मायकल जॅक्सनला श्रद्धांजली. बिकादांचा प्रतिसाद आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिनचा प्रतिसाद उत्तम. खराटा (रंग माझा वेगळा)

व्यक्तिगत तो कसा का असेना पण त्याने जगाला भुरळ घातली हे खर. बाकी त्याचा आता वरती चित्रगुप्ता बरोबर हिशेब चालु असेलच... खरंच, त्याचा आता वरती चित्रगुप्ता बरोबर कुठला हिशेब चालु असेल बरं ? :?

मायकेल जॅक्सन गेला. वाईट झालं. कुठलीही व्यक्ति गेली की आनंद होण्याएवढा दगड अजुन तरी झालेलो नाही. जॅक्सनच्या गाण्यांचा नाद १८/१९ व्या वर्षी मलाही लागला होता. पण एक दिवस प्रभा अत्रे यांचा मारु बिहाग आणि किशोरी ताईंचा भूप्/बागेश्री एकला आणि सगळच बदललं, ती आवड २० एक वर्षानंतरही तशीच आहे. आजही george michael चे careless whisper मला आवडते. पण भारतीय अभिजात संगीताची मोहीनी आणि पात्रता ह्या सर्वांहून खूप मोठी आहे.वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की अली अकबर खान गेल्याचं दु:ख आपल्या भारतीयांना झालेलं दिसलं नाही. george harrison (beatles) , yehudi menuhin ह्या सारख्यांना ह्यांचे महत्व कळ्ले, पण मूठ्भर भारतीय सन्गीत रसिक सोडून जास्त कोणालाही उस्तादजींची माहीती नाही.भारतीय media ने हीत्यांच्या जाण्याची अगदी छोटी बातमी दिली. मिसळपाव वर मी चालु केलेल्या दुव्यालाही मर्यादीत प्रतिसाद मिळाला, हे पाहुन दु:ख झाले. micahel jackson आवडणं वाईट निश्चित नाही. पण भारतीय अभिजात संगीत सर्वोत्तम असं अख्ख जग मान्य करीत असताना, आपल्याच देशात त्त्याला किंमत मिळत नाही हे बघुन वाईट वाटते. असो. मायकेल जॅक्सनला विनम्र आदरांजलि.

In reply to by शुभान्कर

शुभान्कर, उस्तादजी गेल्याचेही अतिशय दु:ख झालेच. केवळ धाग्याला प्रतिसाद मिळाले नाहीत म्हणजे दु:ख झाले नसावे, असे कसे काय म्हणता येईल?

In reply to by यशोधरा

यशोधराशी सहमत. कोणी व्यक्ती निवर्तल्याबद्दल जेवढं वाटायचं तेवढं वाईट जरूर वाटलं, उस्तादजींच्या वेळेस व मायकेलच्या वेळेसही.......पण मला कुठल्याच संगितातलं काहीही कळत नसल्यामुळे दोन्हीवर प्रतिसाद दिलेले नाहीत. बर्‍याच जणांनी प्रतिसादांमध्ये अमकं गाणं आवडलं, तमकी कलाकृती आवडली असं सांगितलय्.......मला दोन्ही वेळेस तसं काही शेअर करता येणार नाहीये/नव्हतं मग उगाच कुठंतरी वादाला कारणीभूत व्हायला नको म्हणून अश्या ठिकाणी प्रतिसाद देणं टाळलं. वर आलेले काही प्रतिसाद बघता जे केलं ते योग्यच असंही वाटलं. ज्याची त्याची आवड असते.......आपल्या इंटरेस्टचे धागे आले की आपण जरूर प्रतिक्रिया देतच असतो. रेवती

In reply to by शुभान्कर

micahel jackson आवडणं वाईट निश्चित नाही. पण भारतीय अभिजात संगीत सर्वोत्तम असं अख्ख जग मान्य करीत असताना, आपल्याच देशात त्त्याला किंमत मिळत नाही हे बघुन वाईट वाटते. असो. अर्थच कळाला नाही ह्याचा. मायकल जॅक्सन शपथ ! आता तुम्ही जे अभिजात संगित म्हणता ते एखाद्याला नसेल आवडत, पण तो भारतीय आहे आणी ते जगाने गौरवले आहे म्हणुन त्यानी आवड नसताना ऐकत बसायचे का ? उद्या प्रदिप कुमारचा अभिनय अभिजात आहे, असे जगात कोणी म्हणाले की तुम्ही जेंव्हा कधी बघाल तेंव्हा आयुष्यात फक्त त्याचाच सिनेमा बघाल का ? माणसाच्या आवडी निवडी भिन्न असतात. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणी भले अगदी जगालाही आवडते म्हणुन आम्ही पण ती उगाचच आवडुन घ्यायची का ? लोकांच्या आवडी निवडी फाट्यावर मारुन स्वतःची आवड जोपासणारा º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

लहान मुलांशी लैंगीक चाळे करणारी व्यक्ती गेली म्हणून मला काहीच फरक पडला नाही. ना आनंद ना दू:ख...! पण त्या निमित्ताने त्यावर स्तुती सुमने उधळणार्‍यांची चाललेली धावपळ पाहून अंमळ मौज वाटली आणि कीवही आली...! असो... तात्याची प्रतिक्रिया मात्र आवडली. जे काही असेल ते रोख ठोक. साला पटो वा ना पटो पण खणखणीत मत. पाश्चात्य संगीतातले *ट समजत नसताना उगीचच चांदणी देखणी असले काहीतरी गुळमुळीत लिहून कुंपणावर बसण्यापेक्षा तात्याचा सडेतोड पवित्रा भावला! खरा डॉन

In reply to by खरा डॉन

त्या निमित्ताने त्यावर स्तुती सुमने उधळणार्‍यांची चाललेली धावपळ पाहून अंमळ मौज वाटली आणि कीवही आली...! बरोबर , कारण त्या लहान मुलात ह्या कौतुक करणार्‍यांचे कोणी निकटवर्तीय असते तर त्यांच्या प्रतीक्रिया अशाच असत्या का ?

मायकेल जॅक्सन गेला का? बर बर ! बराच प्रसिद्ध होता. स्वगत : कधी सवडिने त्याचे एखादे गाणे पाहायला हवे. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

लोकरंजन करणारी प्रतिभा आणि खाजगी आयुष्याचे धिंडवडे, असे कित्येक वल्लींच्या बाबतीत झालेले आपल्याला दिसते. नवटंकीवाले, तमासगीर वगैरे, कलाकारांच्या लैंगिक नैतिकतेबद्दल आपल्याला फार वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. आणि कित्येकदा त्या कथांमध्ये तथ्यसुद्धा असते. त्यामुळे मायकेल जॅकसनचा विषय निघताना कोणी त्याच्या कला-सादरीकरणाकडे अधिक लक्ष देईल, तर कोणाच्या मनात त्याच्यावरील लैंगिक आरोपांविषयी घृणायुक्त आठवण येईल. हे अपेक्षित आहे. गाण्याबरोबर साग्रसंगीत बसवलेले (कोरिओग्राफी केलेले) नृत्य, निर्मितीच्या दृष्टीने झकपक चित्रीकरण, या सर्वांचा मिलाफ करून सादरीकरण करणारा असा मायकेल जॅकसन हा प्रथमच कलाकार होता. असे त्याच्याविषयीच्या रेडियोवरील मृत्युवृत्तांतामध्ये मी आज ऐकले. मायकेल जॅकसन याची गाणी मी फारशी ऐकलेली किंवा बघितलेली नाहीत. मागच्या वर्षीच "थ्रिलर" बघण्याचा योग आला. तेवढ्या झलकीवरून मला रेडियोवरील ही माहिती पटण्यासारखी वाटते. बाकी कमरेवर आणि जांघेसमोर हात ठेवायची नृत्यमुद्रा मायकेल जॅकसनची वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी अशा प्रकारच्या नृत्यमुद्रा कित्येक लोकनृत्याच्या शैलींमध्ये (त्यांच्या प्रादेशिक वैशिष्ट्यासह) दिसतात. काही लोकनृत्यशैलींमध्ये नर्तकी आपले थान डोळ्यात भरावेत अशा पद्धतीने हलवतात. अशा काही शैली भारतातसुद्धा दिसतात. उत्तान आणि लैंगिक हावभाव असलेली नृत्ये तेवढ्यासाठी म्हणून हेय नव्हेत, असे मला वाटते. नृत्य आणि संगीत यांचा मिलाफ करणे यातून श्राव्य किंवा दृश्य कलास्वादाचे नुकसान होत नाही. नृत्त-गान-वाद्य मिळून नाट्य प्रस्तुत करण्याची पद्धत भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या आधीपासून अभिजात आहे. यांच्यापैकी काही अभिजात नृत्य-गान-नाट्ये आपल्याला आजही प्रचलित दिसतात. लोककलांमध्येसुद्धा असा मिलाफ होतो. मायकेल जॅकसनने नृत्य-गान-कथा यांचे एकत्र सादरीकरण केले म्हणजे काही त्याने शुद्ध गाण्यात (किंवा शुद्ध नृत्यात) भेसळ मिळवली, असे म्हणणे इतिहासाच्या दृष्टीने ठीक नव्हे. संयुक्त सादरीकरणाचा कलाप्रकार जुना आहे. त्यासाठी त्याचा निकष लावावा. (उत्तम संगीत नाटक बसवायचे तर त्यातील नट बैठकीच्या गायकाइतका तयारीचा नसेल. पण सगळे नट मिळून नक्कल आणि गाणे किती सफाईने मिसळतात, दिग्दर्शन आणि निर्मिती किती सफाईने होते, त्यातून प्रेक्षकाचा कलात्मक अनुभव जन्माला येतो.) तोच प्रकार संगीत-चित्रफितींच्याबाबतीत. मायकेल जॅकसन या वादग्रस्त व्यक्तीने फार मोठ्या प्रमाणात लोकरंजन केले आणि कल्पक कलानिर्मिती केली. त्याच्या अचानक मृत्यूनंतर हे सर्व विचार मनात येत आहेत.

In reply to by धनंजय

धनंजयजी , उत्तम प्रतिसाद. तात्या कुठे गेले आता? >>मायकेल जॅकसन या वादग्रस्त व्यक्तीने फार मोठ्या प्रमाणात लोकरंजन केले आणि कल्पक कलानिर्मिती केली. एकदम सही बोललात. >>'बाकी कमरेवर आणि जांघेसमोर हात ठेवायची नृत्यमुद्रा मायकेल जॅकसनची वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी अशा प्रकारच्या नृत्यमुद्रा कित्येक लोकनृत्याच्या शैलींमध्ये (त्यांच्या प्रादेशिक वैशिष्ट्यासह) दिसतात. काही लोकनृत्यशैलींमध्ये नर्तकी आपले थान डोळ्यात भरावेत अशा पद्धतीने हलवतात. अशा काही शैली भारतातसुद्धा दिसतात. उत्तान आणि लैंगिक हावभाव असलेली नृत्ये तेवढ्यासाठी म्हणून हेय नव्हेत, असे मला वाटते'. मराठी सिनेमातील तमाशा किंवा लावणी नृत्यांमध्ये अशा नृत्यमुद्रा पाहिलेल्या आहेत. तमाशाच्या सुरवातीला पुर्ण चेहरा झाकेल एवढा डोक्यावर पदर घेवून पाठमोर्‍या अवस्थेत स्टेज वर येउन काष्ट्याच्या नऊवारी साडीत पिछाडी हलवत नाचायचे ... हे एखाद्याला अश्लिल वाटू शकते तर दुसर्‍याला त्यात कला दिसेल. नुसत्या अमेरिकन जनतेलाच नाही तर जगभरच्या लोकांना नृत्य संगीताने भुरळ पाडणारा हा कलाकार नक्कीच साधारण नव्हता. त्याच्या डान्स चा थरार एकदा आवर्जून बघावाच. बिकांचाही प्रतिसाद आवडला. http://beta.esakal.com/2009/06/27001939/editorial--story-of-michael-ja…

एका ओळीच्या धाग्याला चक्क ८० प्रतिक्रिया? आहात कुठे? :) अवांतरः - रेस्ट इन पीस माईक!!!

मला न येणारी कोणतीही गोष्ट करणारा माणूस माझ्यासाठी महान.. माझ्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका ६५ दशलक्ष लोक विकत घेणार नाहीत..त्यामुळे मायकलला माझा सलाम !!!

मायकेल जॅक्सन च्या कलेला सलाम आणि त्याच्यातील कलाकाराला माझी आदरांजली. >>एका ओळीच्या धाग्याला चक्क ८० प्रतिक्रिया? माझी ८३ वी प्रतिक्रिया. वर बिकांनी म्हटल्याप्रमाणे "लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम"... हेच यावरून दिसून येते. अगदी तात्यांनाही त्याला इग्नोर करता आले नाही.

http://beta.esakal.com/2009/06/26235619/editorial-michael-jackson.html सकाळमधला हा लेख त्याची दुर्दैवी कहाणी सांगतो. अफाट लोकप्रियता लाभलेल्या मायकेल जॅक्सन नावाच्या कलाकाराला श्रद्धांजली.

मायकेल वर जे काही आरोप केले आहेत ते अमेरिकन न्यायालयाने फेटाळले आहेत.त्यामुळे इथे त्याला त्याबद्दल दोषी धरणे चुकीचे आहे.बिकाची व धंनजयाची संतुलित प्रतिक्रिया खुप आवडली. तो कसा नाचतो किंवा काय खाजवतो अशी टिका योग्य वाटत नाही. "लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम"... सत्यवचन खर तर त्याच्या जवळ वावरणार्‍या लोकांनी त्याला नोटा छापण्याचे मशीन करुन टाकले होते.त्याच्यावर आरोप करुन मुलांच्या पालकाना अल्पावधीत खुप प्रसिध्दी व पैसा मिळत असे.त्यासाठी त्याच्यावर कित्येक खोटे आरोप केले गेले.तो खरच इतका वाईट असता तर लोकानी व लहान मुलांनी त्याच्यावर इतके प्रेम केले नसते.यावरुन परवा आलेल्या एका बातमीचा इथे उल्लेख करावा वाटतो. भोपाळ चे जिल्हापरिषद मुख्याधिकारी असणार्‍या मराठी आए एस अधिकारी श्री पाटिल ह्याच्यावर त्याच्या सहकारी अधिकार्‍याने लैगिंक सतावणुकीचा आरोप केला आहे. हे पाटील पंढरपुरचे,गरीब शेतकरी कुंटूबातुन शिक्षण घेवुन आएएस झाले आहेत.त्यानी त्या सहकार्‍याचा शैक्षणीक पोषन आहार योजनेतील भ्रष्टाचार उघडकिस आणला म्हणुन त्याने ते आरोप केले आहेत. म्हणुन पाटील दोषी ठरतात का? त्यामुळे जे काही घडले त्याबद्दल व्यवस्थित माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे. भारतिय कलाकाराशी तुलना करता त्याची लोकप्रियता सर्वा जगात खुपच जास्त आहे.आपल्या शास्त्रिय संगीतापेक्षा त्याचे संगीत जगात जास्त एकले वा बघितले जाते हे तुम्ही मान्य केलेच पाहिजे. म्हणुनच हा सामान्य लोकात प्रिय असणारा कलावंत महानच असला पाहिजे. त्याला विन्रम श्रध्दाजंली. वेताळ

मायकेल जॅक्सन हा एक शापित प्रतिभावंत होता. म्युझिक व्हिडियो हा प्रकार त्याने निर्माण केला आणि प्रचंड यशस्वी केला. गाणी लिहिणे, म्हणणे, संगीत, नाच हे करताना तो अगदी उस्ताद असे. मन लावून, अगदी परफेक्ट होईपर्यंत पुन्हा पुन्हा घोटून घेणे वगैरे बाबतीत तो कधीच कमी पडला नाही. त्याला लहानपणापासून पाश्चात्य संगीताची खूप जाण होती. त्याच्या बापाने अती महत्त्वाकांक्षेपायी पाचही पोरांना हाताशी धरुन संगीताचे कार्यक्रम करणारी टीम बनवली. त्या सर्वांमधे मायकेलच सगळ्यात उजवा होता. परंतु हा बाप अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि खुनशी होता. त्याने सगळ्या भावंडांचा जबरदस्त छळ केला. शिस्तीच्या नावाखाली मारहाण, मुलांना घाबरवणे असले प्रकार रोजचे होते. पट्ट्याने फोडून काढणे वगैरे प्रकार त्याच्या बापाने एका मुलाखतीत जाहीरपणे मान्य केले आहेत. मायकेलचे बालपण शाळेत वा मित्रांबरोबर न जाता रेकॉर्डिंग स्टुडियोतच गेले. त्यामुळे मोठे झाल्यावर तो बालपण जगत होता. प्रचंड घर होते त्याच्या आवारात एक अम्युझमेंट पार्क बनवले होते. अर्थातच ह्या अत्याचारामुळे ह्या प्रतिभावान माणसाचे मानसिक संतुलन बिघडले होते. एका चुणचुणीत दिसणार्‍या काळ्या मुलाने आपला अवतार गेल्या २०-३० वर्षात इतका बीभत्स केला होता की त्याची टवाळी, चेष्टा रोजचीच होती. पुरुष का स्त्री, गोरा का काळा, नाक खरे का खोटे हे सांगता येणार नाही असा दिसत होता. त्यात लहानमुलांवर अत्याचार केल्याचे आरोप. सिद्ध झाले नसले तरी सगळे आरोप खोटेच होते असे छातीठोकपणे मी तरी म्हणणार नाही. इतका यशस्वी, श्रीमंत, प्रतिभावंत कलावंत असा स्वतःला नष्ट करताना बघणे हे मला तरी अत्यंत क्लेषकारक वाटले. ५० हे काही मरण्याचे वय नाही. पुन्हा असा कलावंत होणे नाही.