✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मायकेल जॅक्सन गेला

प
पक्या यांनी
Fri, 06/26/2009 - 06:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32192 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

पिपल्स स्टारला सलाम ..!!!

छोटा डॉन
Fri, 06/26/2009 - 08:21 नवीन
- पॉप संगीत सामान्य जनतेपर्यंत घराघरात पोहचवणारा मायकल जॅक्सन - थ्रीलर, बॅड, डेंजरस ह्या यशाची उच्चतम पातळी गाठणार्‍या पॉप अल्बमसचा निर्माता आणि सर्वेसर्वा मायकल जॅक्सन - संगीत क्षेत्रातील महत्वाचे असे ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड तब्बल १३ वेळा जिंकणारा मायकल जॅक्सन - डान्सच्या स्टेप्समध्ये गुरुत्वाकर्षचे सर्व नियम विसरायला लावणारा मायकल जॅक्सन - आपल्या चेहर्‍याच्या १७ वेळा शत्रकिया करवुन लुक बदलवणारा मायकल जॅक्सन - गुड आणि बॅड अशा दोन्ही पब्लिसिटी लिलया कॅश करणारा मायकल जॅक्सन आज फक्त उरला आहे आठवणीत ... पॉप संगीताच्या बादशहाला आमची आदरांजली ..!!! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

सहमत. फार

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 08:52 नवीन
सहमत. फार वाईट वाटतंय! :( सगळं लहानपण गेलं त्याची गाणी ऐकण्यात ! तो नाहीये हेच अविश्वसनिय वाटतंय.. गॉन टू सून खरंच!! आणि वाईट याचे की गेले काही वर्ष गाणी सोडून भलत्याच कारणासाठी प्रसिद्ध झाला.. :( http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

वाईट तर वाटतंय...

दिपाली पाटिल
Fri, 06/26/2009 - 11:34 नवीन
आणि वाईट याचे की गेले काही वर्ष गाणी सोडून भलत्याच कारणासाठी प्रसिद्ध झाला.. आता World Tour ला जाणार होता जुलै'०९ - मार्च '१०, ५० देशांमध्ये, ५० प्रोग्रॅम्स पण होणार होते आत्ता सगळ्यांचं च खुप नुकसान होणार. दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

मायकल ने

टारझन
Fri, 06/26/2009 - 22:48 नवीन
मायकल ने वारल्यावरंही अंमळ करमणूक केलीये :) प्रतिसाद वाचून मजा आली !! अशी मजा पुरवण्यास (कळत नकळत) कारणिभूत ठरलेल्या मायकल ला वर शांती मिळो !! मायकलचा मुनवॉक फार म्हणजे फारंच अप्रतिम होता .. त्याला नाचताना पहाणं हा एक निखळ आनंद असे !! बाकी ते शात्रीय संगीत लावलं की आम्ही फ्रेश असलो तरी झोप येते ... आणि झोप आलेली असेल तर ती उडते -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

डॉनराव ,

पक्या
Fri, 06/26/2009 - 10:24 नवीन
डॉनराव , यथार्थ वर्णन केलयं आपण. व्यक्तिगत आयुष्यात तो कसाही असला तरी पॉप संगीतातला बादशाह होता. त्याच्यासारखा तोच; दुसरा होणे नाही. >>आज फक्त उरला आहे आठवणीत ... पॉप संगीताच्या बादशहाला आमची आदरांजली ..!!! माझीही आदरांजली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बरं झालं!

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 09:00 नवीन
बरं झालं! पिडा गेली..! लहान मुलामुलींशी लैंगिक चाळे करायचा साला! एक विकृत इसम गेला, फार छान झालं! :) तात्या.
  • Log in or register to post comments

वाईट वाटले

दशानन
Fri, 06/26/2009 - 09:04 नवीन
वाईट वाटले ! * माणूस कसा ही असो पण त्याला मृत्य प्राप्त झाल्यावर असा प्रतिसाद... फार छान झालं खटकले.. ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत

हेरंब
Fri, 06/26/2009 - 14:34 नवीन
तात्यांशी सहमत, कुठलाही विकृत माणूस मेला की मला आनंद होतो. जगातली एक घाण गेली असेच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मायकल

टारझन
Sat, 06/27/2009 - 03:14 नवीन
मायकल जॅक्सन .... द चाचा णेहरू मायकल ला लहान मुले आवडायची म्हणे .. नेहरूजींप्रमाणे !! कमाल आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ईश्वर शांती देवो

संदीप चित्रे
Fri, 06/26/2009 - 09:09 नवीन
एक काळ अक्षरशः मायकेल जॅक्सनचा होता. 'बीट इट' आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' ही गाणी तर कधीच विसरणं शक्य नाही. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

राजेंशी

श्रीयुत संतोष जोशी
Fri, 06/26/2009 - 09:48 नवीन
राजेंशी पूर्णपणे सहमत. तात्या तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काहीही झालं तरी मायकेल हा एकमेव होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. त्याची गाणी तोच लिहायचा ; संगीतही तोच द्यायचा ; आणी सादरही करायचा. जरा त्याचं " Heal The World " ऐका म्हणजे समजेल मायकेल हा काय होता ते ? हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत.. माणू

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 09:54 नवीन
सहमत.. माणूस मेल्यावर छान झाले असे लिहीणे म्हणजे .. जाऊदे शब्दच नाहीत.. प्रचंड संताप आला!! आणि दुसरी गंमतीची गोष्ट ही की हे असल्या प्रतिसादांची खात्रीच होती! ज्यांना शिव्या घालायच्यात त्यांनी कृपया इथे घालू नयेत, नवीन धागा करून करा तो गोंधळ! (असं मला तरी वाटतं!) :( http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीयुत संतोष जोशी

+१ 'वी आर द

कालिन्दि मुधोळ्कर
Fri, 06/26/2009 - 10:45 नवीन
+१ 'वी आर द वर्ल्ड' हे ही अविस्मरणीय. [http://www.youtube.com/watch?v=WmxT21uFRwM]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

तात्या काहीही बरळो...पण

वेताळ
Fri, 06/26/2009 - 10:00 नवीन
पॉपचा बादशहा असा एकाकी त्याच्या चाहत्याना सोडुन गेला ही खुपच दु:खद घटना आहे. त्याच्या मृत्युची बातमी वाचुन डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या. आमचे कॉलेजचे दिवस त्याची गाणी एकणे व नवे नवे अल्बम जमा करणेतच गेले.पण काही लोक त्याच्या संगीतातील योगदाना बद्दलचर्चा करण्यापेक्षा त्याच्या व्यक्तीगत आयुष्यावर टिका करण्यात धन्यता मानतात, हे खरोखर चुक आहे. मायकेल खरोखर्च पॉप संगीतातील देव होता. ईश्वर त्याच्या मृतात्म्यास शांती देवो हिच एक इच्छा व्यक्त करतो. वेताळ
  • Log in or register to post comments

मी माझं

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 10:14 नवीन
मी माझं व्यक्तिगत मत दिलं आहे. बाकी चालू द्या..! हा धागा मायकेल संबंधी आहे, माझ्या त्याच्याविषयीच्या मताविषयी नाही! आणि मीदेखील माझं त्याच्याविषयीचं व्यक्तिगत मत दिलं आहे. मिपाकरांनीही तेच करावं. माझ्या त्याच्याविषयीच्या मताबद्दल न लिहिता, त्याच्याविषयीच्या मताबद्दल लिहावं ही विनंती! मायकेल जॅ‍क्सन नावाचा कुणी एक इसम खूप् महान वगैरे होता असं काही मिपाकरांचं म्हणणं आहे. मला त्यांच्या मताबद्दल आदर आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

त्या

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 10:19 नवीन
त्या इसमाबद्दल कोणी बोलत नाहीये इथे त्या इसमाच्या गाण्याविषयी, पॉप संगीताविषयीच मतं नोंदवणे चालू आहे.. तो पर्सनली कसा होता हे खरं कोणालाच माहीत नाहीये त्यामुळे सगळे संगीताविषयीच बोलणार! मागे मुकुल शिवपुत्रंविषयी तुमची मतं ऐकली होती.. ती इथे जुळत नाहीयेत! कलाकाराची कला पाहावी इत्यादी! असो.. तुमची बर्‍याच बाबतीतली प्रिज्युडाईस्ड मतं माहीतीच आहेत.. यापुढे नो कमेंट्स! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तुमची

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 10:52 नवीन
तुमची बर्‍याच बाबतीतली प्रिज्युडाईस्ड मतं माहीतीच आहेत.. यापुढे नो कमेंट्स! ते अधिक बरं होईल..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

त्यामुळे

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 11:02 नवीन
त्यामुळे सगळे संगीताविषयीच बोलणार! तो जे काही करतो/करायचा त्याला संगीत म्हणतात ही माहिती माझ्याकरता नवी आहे! ;) असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

चष्मा मालक चष्मा ...

छोटा डॉन
Fri, 06/26/2009 - 11:33 नवीन
>>तो जे काही करतो/करायचा त्याला संगीत म्हणतात ही माहिती माझ्याकरता नवी आहे! संगीत म्हणजे काय ? त्याची "योग्य आणि जगमान्य " अशी व्याख्या काय आहे ? त्याच कसं आहे तात्या की जगातल्या बर्‍याच गोष्टी जर "योग्य चष्यातुन " पाहिल्या तर बरोबर समजतात. तुम्हाला आवडत/पसंत नसेल म्हणुन (सरसकट) पाश्चात्य/पॉप संगीताला वाईट बोलण्यात काय हाशील ? दुसर्‍या साईडने ती लोकं तेच म्हणु शकतात, शास्त्रिय संगीत म्हणजे काय तर एका स्टेजवर ४ लोकं उगाच ताना घेत गळा फाडतात असे कोणी जर विदेशी म्हणाला तर तुम्ही काय म्हणाल ? कारण त्याच्या चष्यातुन संगीत म्हणजे लाईटच्या झगमगाटात, वाद्यांच्या कल्लोळात, आरडाओरडा व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम. बरोबर ? शेवटी अपना अपना नजरियाँ, पण एखादी गोष्ट आपल्या नजरियाँत बसतच नसेल तर ती "अस्तित्वातच/ऑथेंटिक नाही" म्हणण्याला मी योग्य म्हणणार नाही .... खरेतर प्रतिसाद द्यायचाच नव्हता. पण मायकल जॅक्सनच्या निमीत्ताने तुम्ही एकंदर "पॉप संगीतावरच" प्रश्नचिन्ह उभे केलेत म्हणुन लिहले. असो. ------ ( पॉप म्युसिक *ट्ट न कळणारा परंतु मायलक जॅक्सनचा चाहता) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

संगीत

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 11:45 नवीन
संगीत म्हणजे काय ? मला माहीत नाही..! तुम्हाला आवडत/पसंत नसेल म्हणुन (सरसकट) पाश्चात्य/पॉप संगीताला वाईट बोलण्यात काय हाशील ? मी कुठे वाईट म्हटलंय? दुसर्‍या साईडने ती लोकं तेच म्हणु शकतात, शास्त्रिय संगीत म्हणजे काय तर एका स्टेजवर ४ लोकं उगाच ताना घेत गळा फाडतात असे कोणी जर विदेशी म्हणाला तर तुम्ही काय म्हणाल ? त्याने म्हणावं की! ते त्याचं मत असेल...! कारण त्याच्या चष्यातुन संगीत म्हणजे लाईटच्या झगमगाटात, वाद्यांच्या कल्लोळात, आरडाओरडा व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम. बरोबर ? काय म्हणालात? वाद्यांचा कल्लेळ? आरडाओरडा?? बरं बरं! ;) व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम. काय म्हणालात? बेफाट नाचत? हो, दिपकरावांच्या प्रतिसादाखाली आपण पाहिला बुवा तो नाच! खरंच बेफाट! :) असो, मायकेलला माझीही श्रद्धांजली! (खास लोकाग्रहात्सव!) ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

.

छोटा डॉन
Fri, 06/26/2009 - 12:12 नवीन
काय म्हणालात? वाद्यांचा कल्लेळ? आरडाओरडा?? बरं बरं! काय म्हणालात? बेफाट नाचत? हो, दिपकरावांच्या प्रतिसादाखाली आपण पाहिला बुवा तो नाच! खरंच बेफाट!
छे छे, ते "तसे" आहेच असे नाही. उगाच पटकन समजावे म्हणुन तसे लिहले आहे, बाकी त्या आरडाओरडीत आणि वाद्यांच्या कल्लोळात सुद्धा एक "ताल, लय" असते बरं का तात्या ... बाकी आपण डान्स पाहिला व त्याखाली माझा प्रतिसादात डान्सच्या प्रकाराचेही स्पष्टीकरणही मे दिले आहेच ;)
मायकेलला माझीही श्रद्धांजली! (खास लोकाग्रहात्सव!)
=)) हा हा हा, "खास लोकाग्रहास्तव" हे पाहुन गंमत वाटली. असो, धन्यवाद ... ( आता खास पोटाग्रहास्तव मी इथेच थांबतो आणि पॉप गाणी ऐकत जेवुन येतो, डान्सचे नाव नका काढु, भरल्या पोटाने फार अवघड असते बॉ ;) ) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बाकी त्या

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 12:40 नवीन
बाकी त्या आरडाओरडीत आणि वाद्यांच्या कल्लोळात सुद्धा एक "ताल, लय" असते बरं का तात्या ... काय सांगता? असेल असेल..! :) बाकी आम्हाला काय कळतंय म्हणा तालातलं आणि लयीतलं! आम्ही अजून आमच्या थिरखवाखासाहेबांकडून त्रितालतले कायदे, गती, रेले, आणि त्यांच्या एकापेक्षा देखण्या बंदिशींमधली 'लय' समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत..! आणि ती समजण्याकरता हा जन्म पुरेल असं वाटत नाही! अस्सल, लयदार, रियाजी तबला..! असो... लयीबद्दलची चर्चा चालू द्या...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा धागा

कालिन्दि मुधोळ्कर
Fri, 06/26/2009 - 12:58 नवीन
हा धागा मायकेलच्या संगीताबद्द्ल आहे असावा आपणच लिहीलं होतं ना? कारण नसताना वितंड-वाद (न) करण्याबाबत बाबूजी-गदिमा-मंगेश्कर-जोशी-सावरकर-आशा काळे-पु.ल. वगेरेंनी काही म्हणून ठेवले आहे काय? मग मुद्दे पट्ण्याच्या शक्यता खूप वाढतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कालिंदी

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 13:06 नवीन
कालिंदी त्यांनी लिहीले असले तरी.. इट्स ऑफ नो युझ! जॅक्सनच्या गाण्यांची चर्चा आपण ऑफलाईनच करूया.. इथे सावळा गोंधळच होणार! काय करणार.. काही साईट्स ना (फक्त) रोमन अक्षरांचे वावडे असते तर काहींना बर्‍याच विषयांचेच ! ज्यांना ज्या गोष्टीत रस आहे ती लोकं येऊन बोलतायत, ज्यांना रस नाही ते नाक न खुपसता शांत बसले तर बिघडत नाही! पण होत नाहीये तसं.. सो वी बेटर टेक धिस ऑफलाईन.. http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर

सो वी बेटर

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 13:34 नवीन
सो वी बेटर टेक धिस ऑफलाईन.. लाख मोलाची बात..! आणि एक, काय करणार.. काही साईट्स ना (फक्त) रोमन अक्षरांचे वावडे असते तर काहींना बर्‍याच विषयांचेच ! मिपाला कुठल्या विषयांचे वावडे आहे आणि कुठल्या नाही, हे वेळोवेळी सांगितले गेले आहे. मायकेल जॅक्सन हा विषय मिपाला वर्ज्य नाही. त्या संबंधात हा धागा आणि त्यावरील चर्चा येथे सुरू ठेवली गेलेली आहे. मायकेलच्या सर्व समर्थकांच्या, प्रेमींच्या, स्तुतिपाठकांच्या कुठल्याही प्रतिसदाला डावलले गेलेले नाही. असे असताना मुद्दामून मिपाला कोणत्या विषयांचे वावडे आहे इत्यादी विषय काढायचे प्रयोजन कळले नाही.. मिपा हे आहे हे असं आहे, ज्यांना आवडेल रुचेल ते येतील. इतरांकरता बाहेर जायचा दरवाजा सत्ताड खुला आहे! चपला घालायच्या अन् चालू पडायचं! कळावे, तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

कळले तुमचे

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 13:37 नवीन
कळले तुमचे मत.. विचार करते त्यावर ! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

धन्यवाद..

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 13:44 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

प्रकाटा

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 13:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर

किंग ऑफ पॉप

सहज
Fri, 06/26/2009 - 10:16 नवीन
गेले काही दशके जगभरच्या तरुणाईला आपल्या संगीताने भारावुन टाकणार्‍या किंग ऑफ पॉपला श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

या महान

घाटावरचे भट
Fri, 06/26/2009 - 10:32 नवीन
या महान कलाकाराला श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

एका पिढीवर

नितिन थत्ते
Fri, 06/26/2009 - 10:40 नवीन
एका पिढीवर राज्य केलं हे खरंच. (मायकेल जॅक्सनचे एकही गाणे न ऐकलेला) खराटा
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/26/2009 - 10:53 नवीन
>>(मायकेल जॅक्सनचे एकही गाणे न ऐकलेला) खराटा खरं आहे ! मीही कधीच मायकेल जॅक्सनची गाणी ऐकली नाहीत. मात्र त्याच्याविषयीच्या चर्चा / बातम्या खूप वाचल्या आहेत. पॉप संगीताचा ज्याला बादशाह समजले जात होते, असा मायकेल जॅक्सन गेला महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मीही कधीच

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 11:31 नवीन
मीही कधीच मायकेल जॅक्सनची गाणी ऐकली नाहीत. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, त्याची सगळीच गाणी धांगडधिंग्याची नाहित हो..

लवंगी
Sat, 06/27/2009 - 05:13 नवीन
त्याच 'You are not alone' नक्की ऐका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

(मायकेल

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 10:56 नवीन
(मायकेल जॅक्सनचे एकही गाणे न ऐकलेला) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

किंग ऑफ पॉप!

सचीन जी
Fri, 06/26/2009 - 11:01 नवीन
त्याचे स्टेज शो पण भव्य असायचे. लेझर्स, फायर वर्क्स आणि तांत्रिक करामतींनी परिपुर्ण ! त्याच्या थ्रिलर या गाण्याचा विडिओ तर अफलातुन आहे! माझी श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

पॉप

दिपक
Fri, 06/26/2009 - 11:06 नवीन
पॉप संगीताचा बादशहा मायकेल जॅक्सनला माझीही श्रद्धांजली ! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

दिपकराव, तु

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 11:35 नवीन
दिपकराव, तुमच्या प्रतिसादाखालील तो नाचणारा थोर इसम मध्येच उजव्या जांघेपाशी खाजवल्यासारखं काहीसं करत आहे. हा कुठला नृत्यप्रकार ते कळेल का? :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

हम्म्

छोटा डॉन
Fri, 06/26/2009 - 11:59 नवीन
नाचणारा थोर इसम मध्येच उजव्या जांघेपाशी खाजवल्यासारखं काहीसं करत आहे. हा कुठला नृत्यप्रकार ते कळेल का?
तात्या, वरचा थोर इसम जे काही डान्सचे प्रकार दाखवत आहे ते अ‍ॅक्युचली वेस्टर्न डान्सचे क्लब मिक्स का असेच तत्सम काहितरी आहे ... ह्यानिमीत्ताने मला आठवतात तेवढे वेस्टर्न डान्सेस इथे लिहतो ... १. फोक डान्स : लोकनॄत्य २. बॉलरुम डान्स : पार्टीमध्ये केला जाणारा डान्स ३. हिप हॉप डान्सिंग : आपल्याकडे गणपतीत करतात तसाच ढिंगचॅक्क पण थोडासा सोफॅस्टिकॅटेड प्रकार आहे ४. सांबा डान्स : ब्राझिलीयन डान्स, अंगप्रत्यांग वापरुन हा करतात ५. बेली डान्स : कमरेची जास्तीत जास्त हालचाल करुन हा करतात ६. आयरिश डान्स : एका र्‍हिदममध्ये हात-पाय आणि डोके ह्यांची हालचाल ७. टँगो डान्स : बॉलरुमचाच पण थोडासा जलदगतीचा डान्स ८. रुम्भा / मॅम्बो डान्स : लॅटिन डान्सचे प्रसिद्ध प्रकार ९. साल्सा : बहुतेक सगळ्यांना माहित आहेच, जोदीने करण्याचा फारच उत्तम प्रकार ... १०. स्विंग डान्स : जोडीने शारिरीक कसरती करत केलेला डान्स ( ऑलेंपिक मध्ये हे असते फक्त ह्याला सिन्क्रोनाईझ्ड डान्सिंग म्हणतात ) ११. डिस्को डान्स : मिथुनचे चित्रपट पहाणे १२. स्ट्रीट डान्स : समुहनॄत्य १३. मेक्सिकन वेव डान्स : हा एखाद्या सामन्याच्यावेळी हाताचा वापर करुन करतात. उदा : फुटबॉल वगैरे ... १४. बॅले : सुरावटींच्या तालावर केलेला अत्यंत प्रेक्षणीय प्रकार १५. अ‍ॅक्रो डान्स : कसरतपटुंचा डान्स १६. फ्री स्टाईल : वरच्या कुठल्याही २ किंवा अधिक डान्सचे कॉम्बिनेशन ... वरचा थोर माणुस ह्यातल्याच काही स्टेप्स मिक्स करुन वापरत आहे ... ठिक आहे ? आम्हाला महितीची देवाणघेवाण करताना नेहमीच आनंद होतो ;) ------ ( वेस्टर्न डान्सचे व्यवस्थित शिक्षण घेतलेला डान्सर आणि सविस्तर माहितीदाता) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या,

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 12:06 नवीन
तात्या, वरचा थोर इसम जे काही डान्सचे प्रकार दाखवत आहे ते अ‍ॅक्युचली वेस्टर्न डान्सचे क्लब मिक्स का असेच तत्सम काहितरी आहे ... धन्यवाद. विवक्षित ठिकाणी खाजवणे हा प्रकार पाश्चात्य नृत्याच्या क्लब मिक्स प्रकारात मोडतो ही नवीन माहिती मिळाली..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

(विषय दिलेला नाही)

मराठी_माणूस
Fri, 06/26/2009 - 12:18 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अरेरे ...

छोटा डॉन
Fri, 06/26/2009 - 12:23 नवीन
विवक्षित ठिकाणी खाजवणे हा प्रकार पाश्चात्य नृत्याच्या क्लब मिक्स प्रकारात मोडतो ही नवीन माहिती मिळाली..!
=)) =)) तात्यांबरोबर प्रश्नोत्तरे म्हणजे एक वेगळीच मज्जा ;) असो, आपल्याला माहितीचा उपयोग झाला व थोडीशी नवी माहिती कळली हे पाहुन माझ्या "दिर्घ प्रतिसादाचे" सार्थ झाले ... धन्यवाद ..!!! आता मी निश्चिंत मनाने ............ जेवायला जातो ;) बाकी एक वैधानीक इशारा : उपरोक्त दिलेया कोणत्याही डान्सच्या प्रकाराचे व त्याच्या "कोणत्याही स्टेप्सचे" तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय व व्यवस्थित प्रशिक्षणाशिवाय कॄपया घरी, बाहेर अथवा कुठेही आणि कसेही प्रयोग करु नयेत ही आग्रहाची विनंती... कारण अपुर्ण ज्ञानाने केलेल्या "स्टेप्स" तुमचे प्रचंड शारिरीक आणि मानसीक नुकसान करु शकतात अशी चेतावणी आम्ही देतो ;) ( पळा बाबा आता, लै झाले ) ;) ------ ( डान्स ट्रेनर ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Fri, 06/26/2009 - 12:50 नवीन
डान्या....लै लै हुच्च! बर्‍याच दिसांनी वर्जिनल डान्या बघायला मिळाला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आणखी काही प्रश्न..

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/26/2009 - 19:14 नवीन
प्र १ : ब्रेक डान्स म्हणजे काय? प्र २ : मायकल जॅक्सन करत असे त्याला ब्रेक डान्स म्हणत असत, हे खरे आहे? प्र ३ : मायकलच्या एखाद्या झक्कास नाचयुक्त गाण्याचा दुवा देऊ शकाल? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

स्लाइड

नीधप
Sat, 06/27/2009 - 13:38 नवीन
स्लाइड विसरलास का? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

Heal The World

प्रसाद लेले
Fri, 06/26/2009 - 11:34 नवीन
एकमेवाड्वितिय ! बाद्शाहा गेला. माझी श्रद्धांजली ! इथे मिपावर संगीत म्हन्जे फक्त फड्के,मगेशकर्,जोशि हेच आहे. वरिल सर्व महान आहेतच पण म्हनुन बकि कलाकाराना कमि लेखु नये,ते पण मेल्यवर . लेले
  • Log in or register to post comments

सो व्हेरी

भाग्यश्री
Fri, 06/26/2009 - 11:46 नवीन
=)) सो व्हेरी ट्रु !! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद लेले

इथे मिपावर

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 11:50 नवीन
इथे मिपावर संगीत म्हन्जे फक्त फड्के,मगेशकर्,जोशि हेच आहे. मिपा आहे हे असं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद लेले

पाठिंबा

हेरंब
Fri, 06/26/2009 - 14:38 नवीन
मी पुन्हा तात्यांना माझा पाठिंबा जाहीर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जो मेला तो

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/26/2009 - 11:57 नवीन
जो मेला तो नक्की मायकल जॅक्सन होता का ? ह्या संदर्भात काही पुरावे / तयार केलेले पुरावे पी. डी. एफ. फाईलच्या माध्यमातुन मिळाले होते की खर्‍या मायकल जॅक्सनला जाउन बरीच वर्षे लोटली आहेत. उच्छुकांसाठी फाईल डाउनलोडला ठेवली आहे, डाउनलोड करुन तुमची प्रतिक्रीया जरुर द्यावी. मायकल जॅक्सन º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा