एअरपोर्ट (अंतिम; वाचला नसल्यास आधी भाग ५ वाचा)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
21 Jun 2009 - 6:01 am

आजच आधी लिहिलेला भाग ५ वाचला नसेल तर कृपया आधी तो वाचावा.

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

आतापर्यंतः
इकडे स्मिथ त्याच्या बरोबरच्या पोलीस आधिकार्‍यांना घेऊन बी टर्मिनल मध्ये शिरला.

टर्मिनलच्या तोंडाशीच असलेल्या 'क्वीन सिटी न्यूज अॅंड गिफ्ट्स' च्या दुकानावरून जातांना त्याला दर्शन झालं ते काचेतल्या
आर्थर हेलेच्या पुन्हा विक्रीला आलेल्या 'एअरपोर्ट' या गाजलेल्या पु्स्तकाचं. त्या पुस्तकातला टी डब्ल्यू ए च्या विमानात
कॅरी-ऑन बॅगेत बाँब घेऊन जाणारा गेरेरो आठवला

"जीझस, नॉट ऑन माय वॉच!" स्वतःशी पुटपुटत तो आत शिरला.

**************
लांब लांब ढांगा टाकत स्मिथ वेगाने बी १६ गेटच्या दिशेने चालत निघाला. त्याच्याबरोबर असलेले चार पोलीस आधिकारीही
पाठोपाठ निघाले. ते सर्व जण बी ४ गेटच्या जवळच्या रेस्ट रूम पाशी येताच स्मिथ आत जायला वळला. आतापर्यंत पिवळी
'CAUTION' ची टेप लावून ती मेन्स रेस्ट रूम एअरपोर्ट पोलीसांनी प्रवाश्यांसाठी बंद केली होती. ज्या पुरुषांना रेस्ट
रूमची गरज होती त्यांना शेजारच्याच 'FAMILY' रेस्ट रूम मध्ये जाण्यास सांगण्यात येत होतं.

आतापर्यंत या एकाच एअरपोर्ट वर अशी unisex रेस्ट रूम आहे याचं स्मिथ ला काही खास वाटलं नव्हतं, पण आज त्याचा
असा फायदा झालेला पाहून त्याला त्या परिस्थितीतही थोडीशी गंमत वाटली.


पिवळ्या टेपच्या खालून वाकून आत जात स्मिथने चटकन एका नजरेत रेस्ट रूम पाहून घेतली, खाली वाकत स्टॉल्स मधल्या
रिकाम्या फरश्या पाहिल्या आणि तो बाहेर पडला. बाहेर उपस्थित असलेल्या एअरपोर्ट पोलीस आधिकार्‍याने त्याला नुकत्याच
संपवलेल्या सर्व्हेलन्स व्हिडिओच्या पाहणीचा सारांश सांगितला. स्मिथ ने लगेच त्याला आणि बरोबरच्या इतर चार आधिकार्‍यांना
पुढे काय करायचं ते सांगितलं. ते पाचही जण झपाटयाने बी टर्मिनल च्या मध्यावर असलेल्या एलिव्हेटर कडे वळले, वाटेत
एकाने त्याच्या रेडिओवर स्फोटकशोधकांशी संपर्क साधला. एलिव्हेटरचं दार उघडताच सर्व जण आत शिरले, आणि त्यांपैकी एकाने दुसर्‍या
मजल्याचं बटन दाबलं. त्या बटनाशेजारी 'यू एस एअरवेज क्लब' असं लिहिलेलं होतं.

स्मिथ स्वतः बी १६ च्या दिशेने चालत निघाला. तिथे पोहोचून त्याने गेट एजंटला आपलं ओळखपत्र दाखवलं, त्याने कोपर्‍यात
बसलेल्या जॉन ख्रिस्टी कडे मान वळवून भिवया उंचावून दर्शवल्या. स्मिथ कमरेवरच्या होल्स्टर वर हात ठेवत जॉन च्या शेजारी
जाऊन बसला. जॉन ने त्याच्या हाताकडे पाहिलं आणि म्हणाला, "यू वोंट नीड दॅट, ऑफिसर, आय अ‍ॅम अनआर्म्ड, अँड हॅव बीन
वेटिंग फॉर यू."

"मिस्टर ख्रिस्टी, द लेडी आउट देअर.."

"यू मीन मिस किंगरी.."

"येस, मिस पेगी किंगरी" म्हातारीच्या बोर्डींग कार्ड वरचं नाव आठवत स्मिथ म्हणाला

"अ‍ॅन एंजल, दॅट पेगी.." जॉन टर्मिनल च्या सुरूवातीकडे वळून पाहत म्हणाला.

"अँड यू यूज्ड हर, अँड हर बॅग हॅड नो एक्स्प्लोझिव्ज"

"नॉट हर बॅग, माय बॅग," जॉन म्हणाला.

बी ४ च्या दिशेने मान हलवत स्मिथ म्हणाला, "वी ऑल्सो नो दॅट यू डिड नॉट फरगेट युअर अदर बॅग्ज इन द रेस्ट रूम देअर."

"नो, आय डिड नॉट."

"यू कॅरीड देम अपस्टेअर्स इन द एलिव्हेटर. अँड माय पीपल आर ऑन देअर वे टू फाईंड देम."

जॉन ने मान हलवली.

"आर देअर एक्स्प्लोझिव्स्ज इन दोज बॅग्स?"

"नो, देअर ऐंट एनी," जॉन म्हणाला "आय मेंट नो हार्म टू एनीवन. यू विल फाईंड देम बिट्वीन टू चेअर्स इन द लाउंज."

"इट वॉज सो इझी टू डू दॅट, आय सिंपली पर्चेस्ड अ डे पॅस फॉर फॉर्टी बक्स, स्पेंट समटाईम लॉइटरींग अ‍ॅंड लेफ्ट व्हेन
द क्लर्क वॉजंट लूकिंग, विदाऊट माय बॅग्ज," तोंडाने चक् आवाज करीत त्याने चुटकी वाजवली, "दॅट सिंपल!"

स्मिथ ने त्याच्या रेडिओ वर त्याच्या यू एस एअरवेज क्लबमध्ये गेलेल्या सहकार्‍यांशी संपर्क साधला आणि बॅगांविषयी
सांगितलं. या वेळेपर्यंत स्फोटकशोधकही परस्पर क्लब मध्ये पोहोचले होते.

"ट्रस्ट मी," जॉन ऑफीसर स्मिथ ला म्हणाला, "यू वोंट फाईंड एनीथिंग बट क्लोद्स देअर."

"आय शुअर होप यू आर ट्रस्टवर्दी. डू यू वाँट टू टेल मी व्हॉट इज ऑल दिस?"

"आय विल, अँड आय वाँट टू डू दॅट इन फ्रंट ऑफ यू एस एअरवेज ऑपरेशन्स चीफ अ‍ॅट दिस एअरपोर्ट."

"व्हाय यू एस एअरवेज ऑपरेशन्स चीफ? आर यू देअर एक्स-एम्प्लॉई? ईज दिस अबाऊट गेटिंग इव्हन?"

"यू विल सी. अँड येस, प्लीज ऑल्सो हॅव दॅट इंडियन यंग मॅन अँड पेगी हिअर टू."

"व्हाय देम?"

"अगेन, यू विल सी. प्ली़ज कॉल देम ऑल," आजू-बाजूच्या ताटकळलेल्या पण आता या दोघांकडे रोखून बघणार्‍या
कित्येक प्रवाश्यांकडे पाहत जॉन म्हणाला "इट्स टाईम टू एंड दिस ऑल."

स्मिथ ने रेडिओ वरून यू एस एअरवेज ऑपरेशन्स चीफशी संपर्क साधला, आणि त्याला ताबडतोब बी टर्मिनल ला
येण्यास सांगितलं.

दहा मिनिटांनंतर क्लबमध्ये गेलेले सर्व जण दोन बॅगा घेऊन खाली आले. एव्हाना टर्मिनलच्या तोंडाकडून भारतीय
प्रवासी, पेगी आणि यू एस एअरवेजचा ऑपरेशन्स चीफ असे सारेही बी १६ च्या दिशेने चालत आले.

"द बॅग्ज आर क्लीन," एका एअरपोर्ट पोलीस ऑफिसरने स्मिथला सांगितले, "जस्ट क्लोद्स अँड सम मॅगेझिन्स."

आतापर्यंत इतरही मंडळी तिथपर्यंत पोहोचली.

"ऑल राईट, फोक्स!" जॉन उभा राहत म्हणाला "टाईम फॉर द ट्रूथ..."

"हाऊ मच डू यू फिगर दीज टू अवर फ्लाईट डिलेज विल सेट यू एस एअरवेज बॅक बाय?" जॉन ने यू एस एअरवेजच्या
ऑपरेशन्स चीफला विचारलं. संताप आवरत तो म्हणाला "सर, आर यू अ पार्ट ऑफ यू एस एअरवेज?"

"आय वॉज."

"देन यू वूड नो दॅट दिस हॅज कॉस्ट अस डिअरली, एव्हरी फ्लाईट डिलेड बीयाँड ट्वेंटी मिनिट्स मीन्स अ लॉस ऑफ
थाऊजंड्स ऑफ डॉलर्स, द एअरपोर्ट चार्जेस, स्टॅफ ओव्हरटाईम, मिस्ड कनेक्टींग फ्लाईट्स, कॅन्सेलेशन्स...यू नो इट!"

"यू बेट आय डू!"

"देन व्हाय? व्हाय डिड यू डू इट? आय हॅव सिक्स्टीन फ्लाईट्स डिलेड राईट हिअर..."

"आय नो, दॅट इज प्रिसाईजली व्हाय आय चोज दिस टर्मिनल.."

शॅरलट चा बी टर्मिनल संपूर्णपणे यू एस एअरवेजच्याच फ्लाईट्स साठी राखीव होता.

"एनी वे, हिअर इज व्हाय," असं म्हणत जॉन ने त्याची कथा सांगितली.

'मी बारा वर्षं यू एस एअरवेजच्या पिट्स्बर्ग मधल्या ऑफिसात कस्टमर सर्व्हिसच्या विभागात काम करत होतो.
खूप कष्ट केले..चार वर्षांपुर्वी, मी इतक्या वर्षांची कमाई गुंतवून, बायकोच्या आग्रहाखातर तीन बेडरूमचं घर विकत
घेतलं होतं. त्याचे हप्ते फेडायला सुरूवात करतोय न करतोय एवढ्यातच त्यानंतर काही महिन्यांतच आमच्या एकुलत्या
एका मुलीला ब्रेस्ट कॅन्सर ने पछाडलं, जेमतेम अठरा वर्षांची माझी जेन..धीराने सर्व उपचार सहन करीत तोंड देत होती.
माझ्या नोकरीतल्या इन्शुअरन्समुळे तिच्या उपचारांचा खर्च मला कसाबसा परवडत होता....आणि अचानक, अडीच
वर्षांपुर्वी, यू एस एअरवेजने खर्चात बचत करण्याचं कारण देत आम्हां आठ ही कर्मचार्‍यांना रातोरात कामावरून कमी केलं.
आमची रिझर्व्हेशन क्लर्क्स ची कामं गेली तडकाफडकी भारतात!'

बोलता-बोलता भारतीय प्रवाश्याकडे वळून जॉन म्हणाला "बट दॅट्स नॉट व्हाय आय पिक्ड यू, यंग मॅन, आय हॅव नो इश्यूज
विथ यू ऑर युअर कंट्रीमेन, आय नो दोज फोक्स हू गॉट अवर जॉब्स ऑल्सो हॅड फॅमिलीज टू टेक केअर ऑफ.."

"यू जस्ट हॅपन्ड टू बी देअर अ‍ॅट द राईट टाईम, ....राईट फॉर मी, राँग फॉर यू!"

"अ‍ॅंड आय अ‍ॅम सॉरी फॉर ऑल द ट्रबल आय हॅव कॉ़ज्ड यू! आय नो यू मस्ट हॅव फॅमिली वेटिंग फॉर यू बॅक होम...टेल देम
आय अपॉलोजाईझ!"

यू एस एअरवेजच्या ऑपरेशन्स चीफ कडे वळत जॉन म्हणाला, "आय वॉज रिफ्युज्ड रिटायरमेंट बेनिफिट्स, बिकॉझ आय
ओन्ली हॅड फोर्टीन यिअर्स ऑफ सर्व्हिस, नॉट द मिनिमम नेसेसरी फिफ्टीन!! आय प्लीडेड विथ युअर फोक्स...टोल्ड देम
हाऊ क्रिटिकल इट वॉज फॉर मी टू कीप द जॉब...डू यू नो व्हॉट दे सेड? दे सेड माय फॅमिली कॅनॉट बी देअर प्रॉब्लेम!
दे सेड इट वॉज अन्फॉर्चुनेट दॅट माय जेन सफर्ड, ऑर दॅट आय वोंट हॅव इन्शुअरन्स टू हेल्प हर...दे सेड द कंपनी डिड नॉट
मीन एनी हार्म टू मी इन पर्सन, दॅट आय वॉज जस्ट अ‍ॅन अन-इन्टेंडेड कॅजुअल्टी..." त्याचे डोळे आता भरून वाहू लागले होते.

"कॅन यू बिलीव्ह इट? अ‍ॅन अन-इन्टेंडेड कॅजुअल्टी!!" त्याने शर्टच्या बाहीने डोळे पुसले.

"आय हॅड टू सेल अवर होम टू ट्राय अँड गेट सम मनी फॉर अवर चाईल्ड. बट विथ द बॅड इकॉनॉमी, देअर वॉज नॉट इनफ.
देन विदीन डेज, माय जेन स्टार्टेड टू डिटेरिओरेट, वी कुड नॉट अफोर्ड द कॉस्ट्ली ड्रग्स...शी डेव्हलप्ड मेटॅस्टॅसिस ऑल
ओवर द बॉडी...द डॉक्टर्स हॅड टू पुट हर ऑन पॅलिएटिव्ह केअर." जॉनने स्मिथ कडे वळून पाहिलं, "शी डाईड अ मंथ लेटर.
अवर ओन्ली बेबी..डाईड... बिकॉज माय कंपनी..." यू एस एअरवेजच्या ऑपरेशन्स चीफ कडे वळत तो म्हणाला
"द कंपनी आय स्पेंट फोर्टीन यिअर्स ऑफ माय लाईफ फॉर...डिडंट केअर, अँड टोल्ड मी आय वॉज जस्ट अ‍ॅन अन-इन्टेंडेड
कॅजुअल्टी..."

"आय ट्राईड हार्ड टू डील विथ जेन्स डेथ, बट माय वाईफ कुड नॉट..शी सफर्ड अ हार्ट अटॅक अ यिअर अगो अँड पॅस्ड अवे.."

म्हातारी कडे वळत जॉन म्हणाला, "पेगी वॉज अवर नेबर. शी अँड आय मूव्ह्ड टू अ‍ॅन ओल्ड पीपल्स होम इन नॉक्सव्हिल
अ यिअर अगो. ऑल आय हॅव बीन थिंकींग ऑफ सिन्स देन इज टू डू व्हॉट आय डिड टुडे. टू हिट माय कंपनी व्हेअर इट हर्ट्स."

"अ‍ॅंड दॅट्स द ट्रुथ," स्मिथकडे वळून जॉन म्हणाला "माय कंपनी थॉट माय फॅमिली कॅनॉट बी देअर प्रॉब्लेम! माय लॉस इज ...
जस्ट माय लॉस"

पेगी खुर्चीला धरून उठली, आणि ऑपरेशन्स चीफ कडे पाहत म्हणाली "यू टेल अस अबाऊट यूअर लॉस ऑफ टू अवर्स? आय सॉ हिम
डाय एव्हरी डे फॉर द पॅस्ट टू यिअर्स. टू यिअर्स!!"

ऑफिसर स्मिथ कडे वळून म्हातारी म्हणाली "आय टोल्ड हिम आय विल हेल्प हिम गेट हिज रिव्हेन्ज. यू कॅन अरेस्ट मी इफ
यू थिंक आय लाईड."

"बट शी नेव्हर लाईड, ऑफिसर!" जॉन म्हणाला "शी डिड नॉट ओन द बॅग, आय डिड!"

"अँड जॉन इज नॉट माय हजबंड! सो आय डिड नॉट लाय देअर!" खट्याळपणे हसत म्हातारी म्हणाली.

इतक्या वेळ इतरांसारखाच हतबुद्द होऊन ऐकत असलेला मुंबईकर प्रवासी जॉन ला म्हणाला, "आय अ‍ॅम सॉरी फॉर ऑल
युअर लॉसेस. आय ट्रुली अ‍ॅम. बट टेल मी, व्हाय मी?"

"व्हाय यू?" जॉन म्हणाला, "यंग मॅन, टुडे, यू वेअर अ‍ॅन अन-इन्टेंडेड कॅजुअल्टी!!"

http://kdka.com/local/US.Airways.layoffs.2.931673.html

Disclaimer: This story is work of fiction, and all the names, including the airport and airline company names, are used essentially with literary license, and must be so understood. If these events can happen, they can happen with any company, at any location, worldwide.

या कथेच्या निमित्ताने नंतर लिहिलेलं हे मनोगत.

कथाप्रवासदेशांतरलेख

प्रतिक्रिया

Nile's picture

21 Jun 2009 - 6:13 am | Nile

आहाहा! सुंदर, कुठे पहिला भाग अन कुठे शेवटचा!

लई भारी. फक्त ले-ऑफ ची बातमीच ह्यातील खरी घटना आहे!! कमाल आहे तुमच्या कल्पनाशक्तीची!!! लाजवाब!

अवांतरः हा भाग वाचायचा म्हणुन मी माझी बस मिस केली, बट वर्थ इट हंन्ड्रेड टाईम्स मोअर! :)

अनिता's picture

21 Jun 2009 - 6:49 am | अनिता

बहुगुणी साहेब,

उत्तम सा॑गड घातली आहे..सुरुवातीला फक्त ऐअरपोर्ट बद्दल आहे असे वाटलेली कथा फारच झक्कास जमली आहे..

धन्यौ.

क्रान्ति's picture

21 Jun 2009 - 6:56 am | क्रान्ति

खूप खूप रोचक, उत्कंठावर्धक शैली! एक एक भाग वाचताना पुढे काय येईल असं वाटत राही. शेवट तर कमालीचा वेगळा, अद्वितिय!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

अवलिया's picture

21 Jun 2009 - 7:01 am | अवलिया

अतिशय सुंदर कथानक !
मजा आली वाचतांना ... :)

येवु द्या अजुन असेच सुंदर लेखन !!!

जियो ! बहुगुणी सेठ, जियो!!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

शाहरुख's picture

21 Jun 2009 - 7:26 am | शाहरुख

झक्कास...मजा आली वाचायला.

( फोटोंचा तेवढा परिणाम नाही जाणवला मला )

रेवती's picture

21 Jun 2009 - 7:28 am | रेवती

खरच, फारच सुंदर कथा!
इतके भाग वाचकाला खिळवून ठेवणं सोपं नाही.......
अगदी शेवट येइपर्यंत वाचनात इंटरेस्ट टिकून राहिला.
इतक्या छान गोष्टीबद्दल धन्यवाद!

रेवती

सहज's picture

21 Jun 2009 - 7:57 am | सहज

एकेक भाग अतिशय प्रभावी, खिळवुन ठेवणारा, पुढल्या भागाची उत्कंठा वाढवणारा.

मिपावरील आजवर वाचलेल्या रहस्यमालेतील अतिशय अव्वल लेखमाला.

वाचनखुण साठवली आहे.

बहुगुणी तुमच्यासाठी टाळ्या. =D> =D> =D>

भाग्यश्री's picture

21 Jun 2009 - 12:54 pm | भाग्यश्री

सेम सेम !!
इतकी दमदार कथा, उत्कृष्ट संवाद, बरोब्बर वेळेवर असलेला सस्पेन्स आणि सगळ्यात महत्वाचा पेस! काय वेगाने पूर्ण केली तुम्ही ही कथा! हॅट्स ऑफ!!

http://www.bhagyashree.co.cc/

अनामिक's picture

21 Jun 2009 - 8:13 am | अनामिक

अप्रतिम कथा... कथेचा एकेक भाग वाचताना पुढच्या भागात काय होणार याची उत्कंठा लागून राहिली. शेवटही मस्तंच! अजून अशाच कथा येऊ द्या!

आता लिखाळ म्हणायच्या आधीच म्हणतो... "या कथेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत."
=D> =D> =D> =D> =D>

-अनामिक

लिखाळ's picture

22 Jun 2009 - 9:58 pm | लिखाळ

:)
खरेच आहे. फार छान कथा. एखाद्या छोटेखानी इंग्रजी चित्रपटाची कथा शोभावी अशी !
जोरदार टाळ्या
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अंतु बर्वा's picture

21 Jun 2009 - 8:25 am | अंतु बर्वा

लाजवाब लिखाण... कथेचा वेग... डायलॉग्स... वातावरण निर्मिती... सगळंच मस्त.. सर्वांगसुंदर कथा...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jun 2009 - 9:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

उ त्त म! यापुढे शब्द नाहीत.
(शाहरूखशी सहमत, फोटोंचा परिणाम नाही जाणवला!)

विनायक प्रभू's picture

21 Jun 2009 - 9:50 am | विनायक प्रभू

सर्व भाग आवडले.

शार्दुल's picture

21 Jun 2009 - 10:01 am | शार्दुल

सर्व भाग अप्रतिम,,,,,,,,, =D>

नेहा

घाटावरचे भट's picture

21 Jun 2009 - 12:39 pm | घाटावरचे भट

कडक!!

लवंगी's picture

21 Jun 2009 - 1:05 pm | लवंगी

सुरेख कथा

खालिद's picture

21 Jun 2009 - 2:45 pm | खालिद

एक नंबर!!!!

श्रावण मोडक's picture

21 Jun 2009 - 3:32 pm | श्रावण मोडक

ज ब र द स्त !!!
लेखन थांबवू नका. वेळ काढा आणि लिहा. ताकद आहे तुमच्या लेखणीत.

गणा मास्तर's picture

21 Jun 2009 - 3:56 pm | गणा मास्तर

अफलातुन गोष्ट
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2009 - 4:10 pm | स्वाती दिनेश

मस्त रंगली गोष्ट.. जबरदस्त!
स्वाती

सूर्य's picture

21 Jun 2009 - 9:05 pm | सूर्य

वरील सर्व प्रतिक्रीयांशी सहमत. उत्तम, उत्कंठावर्धक कथा. फोटो टाकण्याची कल्पनासुद्धा भारीच.

- सूर्य.

यशोधरा's picture

21 Jun 2009 - 9:15 pm | यशोधरा

मस्त!

चतुरंग's picture

22 Jun 2009 - 6:46 am | चतुरंग

अतिशय उत्कंठावर्धक आणि पकड घेणारे लेखन. सलग सहा भाग वाट पहायला लावणारे ठरले.
बहुगुणी, लिहिते रहा, तुमच्या लेखणीत ताकद आहे.

(हेर्रिंग)चतुरंग

प्राजु's picture

23 Jun 2009 - 2:34 am | प्राजु

खूप आवडली कथा.
उत्कंठावर्धक आहे . तुमच्या कल्पनाशक्तीला मानलं!!
छोट्या घटनेवरून.. किंवा संदर्भावरून इतकी मोठी कथा उभी करणं.. सहज सोपं नक्कीच नाही. सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

22 Jun 2009 - 7:31 am | नंदन

वेगवान कथा आवडली. जागेचा परिचय, वातावरणनिर्मिती आणि शेवट अतिशय उत्तम.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

22 Jun 2009 - 7:46 am | मदनबाण

झकास...
बहुगुणीजी असेच लिहीत राहा... वाचायला नक्कीच आवडेल. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

विसोबा खेचर's picture

22 Jun 2009 - 8:21 am | विसोबा खेचर

बहुगुणीशेठ,

तुम्हाला सलाम...!

अजूनही मनमुराद लिहा ही विनंती..मिपाकर वाचण्यास उत्सुक आहेत.

तात्या.

मेथांबा's picture

22 Jun 2009 - 8:42 am | मेथांबा

कामगाराच्या दु:खात मी ही सहभागी.

^^^^
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

नीधप's picture

22 Jun 2009 - 8:52 am | नीधप

वा मस्त!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विशाल कुलकर्णी's picture

22 Jun 2009 - 9:40 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम ! फक्त एवढेच लिहू शकतो !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

उपास's picture

22 Jun 2009 - 7:55 pm | उपास

क्या बात है जनाब.. अतिशय तर्कसुसंगत, नाट्यमय लिखाण. आवडलंच!

टुकुल's picture

22 Jun 2009 - 10:57 pm | टुकुल

जबरा वळण दिलित कथेला...

--टुकुल.

सुमीत भातखंडे's picture

23 Jun 2009 - 2:37 pm | सुमीत भातखंडे

निव्वळ अप्रतिम.
दुसरे शब्दच नाहीत.

धमाल मुलगा's picture

23 Jun 2009 - 4:14 pm | धमाल मुलगा

हॅट्स ऑफ टू यू!
आणखी काय बोलू?

एकदा हात बरा होऊन जाऊ द्या, मग अशाच मस्त गोष्टीच गोष्टी सांगा आम्हाला :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

स्वाती२'s picture

23 Jun 2009 - 11:25 pm | स्वाती२

मस्त!

मृदुला's picture

29 Jun 2009 - 12:42 am | मृदुला

पीळ एकदम मस्त जमला आहे. :-)

रुपी's picture

1 Apr 2016 - 2:16 am | रुपी

मिपावरच्या काही आवडत्या कथांपैकी ही एक कथा.
आजच या कथेची लिंक काहींना दिली आणि त्यानिमित्ताने मीही सगळे भाग आज पुन्हा वाचून काढले. शेवट माहीत असूनही पुढे वाचायची उत्सुकता तेवढीच होती त्यामुळे अगदी थोड्या वेळात सर्व वाचून झाले. तसेच हेही लक्ष्यात आले की मी तुम्हाला कथा वाचलेले कळवले होते, काहींना तोंडीसुद्धा सांगून झाली आहे, पण इथे एकही प्रतिसाद दिला नाही.

खरोखर खूपच छान गुंफली आहे ही कथा! वास्तवातल्या गोष्टींचा मेळही खूपच छान घातला आहे!