✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विकास आराखडा

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sun, 09/16/2007 - 14:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21689 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

ग
गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 14:44 नवीन

अभिनंदन!

प्रकाशराव, अभिनंदन! किती अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे आपण. आवडला आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/16/2007 - 14:56 नवीन

चित्र लेख- विकास आराखडा कि आखाडा ,लोकसत्ता १४ फेब्रू २००५

टंकन करायचा कंटाळा येतो. लोकसत्तेच्या विदागारात १४ फेब्रुवारी२००५ चा विदा नाही. फ्लिकर ची लिंक सर्वांना दिसेलच असे नाही. फ्लिकरला ब्लॉक केले असेल तर ही लेख दिसणार नाही. काही प्रतिक्रिया वा मते हे लेख वाचल्याचे द्योतक समजले जाते. टंकनाव्यतिरिक्त चांगले लेख आपल्या मित्रमंडळींना दाखवायचे असतील तर इतर ही मार्ग सुचवावेत. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 14:57 नवीन

सलाम!

घाटपांडेशेठ, आपल्यातील सामाजिक जाणीवेला सलाम! विकास आराखड्याचा एक तर आखाडा तरी होतो किंवा बट्ट्याबोळ तरी होतो! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/16/2007 - 17:52 नवीन

वा घाटपांडे साहेब,

लेख आवडला, आपल्या ठिकाणी असलेल्या समाज विकासाची भावना आणि त्यासाठीचे शासनाने कोणते प्रयत्न करावे याबाबतचे विचार आवडले. अवांतर ;) पोलीस इतका उमदा विचार करणाराही असतो,यावर विश्वासच बसत नाही हो ! (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 09/17/2007 - 05:01 नवीन

काही प्रश्न.

घाटपांडेसाहेब, तुमचा लेख खरोखरच विचार करायला लावणारा आहे - माझ्या मागच्या लेखावेळी घाईत वाचला होता, आत्ता नीट वाचला. त्यावर आत्ता दोन प्रश्न विचारावेसे वाटतायत. एक म्हणजे, लोकांनी विकास आराखड्याबाबतीत शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे याची तुमची काय कल्पना आहे? दुसरे म्हणजे अल्पसंख्यांक / बहुसंख्य नक्की कोण हे मला नीट कळाले नाही. तरीपण तुमच्या लेखावरून मी असा अंदाज बांधला (चुकीचाही असू शकतो) की अल्पसंख्यांक म्हणजे समजा झोपडपट्टीवाले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले उच्चभ्रू. तर बहुसंख्य म्हणजे इतर अनेक जण जे अशा ठिकाणी कामासाठी येतात जातात आणि वाहतुकीत त्यांना अशामुळे त्रास होतो. आता आपल्याकडे एकमेकांचे पाय एवढे एकमेकांत अडकलेले आहेत की पुढे जायला सगळेच एकमेकांवर अवलंबून आणि दुसरीकडे प्रत्येकजण यातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायलाही धडपडणार. तेव्हा हे मुटकुळे सोडवायचे असले तर एकतर प्रत्येक ठिकाणी वेगळा उपाय करणे आवश्यक आहे. अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते. अजून बरेच लिहीता येईल, पण आत्ता विचार (भुकेमुळे) भरकटत आहेत (मिसळपाव समोर असतानाही खाता येत नाही आहे:-;) तेव्हा नंतर लिहीन. चित्रा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 09:46 नवीन

अल्पसंख्यांक

व्याकरणाचा आधार घेउन बोलायचे झाले तर हा बहुव्रीही समास ' ज्यांची संख्या अल्प आहे असे ते....." पुढील चित्र कल्पनाशक्तीवर सोडायचे. मी एकाला विचारले "काय रे ,अल्पसंख्यांक म्हणजे कोण? " तो म्हणला कि 'मुस्लिम' . ( वर्तमान पत्रातील अल्पसंख्यांक, प्रार्थनास्थळ इ. शब्दांवरुन त्याचा तसा समज झाला होता. हे चर्चेतून मला समजले.) दुसर्‍या मराठमोळ्या मुस्लिम मित्राला तोच प्रश्न विचारला. तो म्हणला 'ब्राह्मण'. कसं काय? "कारण ते साडेतीन टक्के आहेत, आम्ही तरी सतरा आठरा टक्के आहोत." कै. सत्यरंजन साठे आय एलएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व पुण्यातील विचारवंत, एका भाषणात हिंदुत्ववाद्यांच्या आक्षेपाचे खंडन करत होते. कुटुंबनियोजन इस्लामला मंजुर नसल्याने मुस्लिम बहुल होतील या भीतीचे निराकरण करताना म्हणाले," अशी भिती बाळगण्याचे कारण नाही. कारण आजही भारतात हिंदु ८० टक्के आहेत व मुस्लिम १८ टक्के. बहुसंख्यांनी अल्पसंख्यांचे भय बाळगण्याचे काय कारण?" मी व्याख्यान झालेवर त्यांना भेटलो . त्यांना म्हटले," मी आपल्याशी अंशत: असहमत आहे. समाजात समाजकंटक म्हणता येतील असे फार फार तर २% लोक असतील, पण त्यांचे उपद्रव मुल्य हे उरलेल्या ९८% लोकांना वेठीस धरण्याएवढे असते, म्हणुनच पोलिस खात्याची निर्मिती झाली. एखादा माणुस राष्ट्र सुद्धा वेठीस धरु शकतो. त्यामुळे संख्याबळाचा मुद्दा इथे गैरलागु आहे असे मला वाटते." त्यांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले "खरं आहे". <<अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते>> यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 09/18/2007 - 02:16 नवीन

ठीक

यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 09:41 नवीन

उत्तरे

हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. नाही ते फक्त मुखपृष्ठ आहे . केवळ दृष्टोत्पत्तीस पडावे म्हणून, सुधारक नावाचे मासिक प्रकाशित होते हे बहुसंख्य लोकांना माहीती नसणार याची खात्री वाटते म्हणून. चित्रलेख टाकतो आहे. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. यातील अल्पसंख्यांच्या बाबतीत मी लिहिले आहे , राहिला मुद्दा शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे? हा खरच अवघड प्रश्न आहे. याच्या उत्तराला चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? नाही. तीन वर्षात फरक पडाव अशी इथली सामाजिक परिस्थिती नाही असे मला वाटते. आगरकरांचे विचार जर पाहिले तर २००७ मध्ये देखील काळाच्या पुढेच वाटावेत अशी इथली सामाजिक परिस्थिती आहे. (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!). वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा Tue, 09/18/2007 - 18:30 नवीन

आजचा

आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. माहितीबद्दल आभार! ऍकॅडमिस्ट वगैरे नका म्हणू हो. त्यांचा पत्ता हाच ना? आजचा सुधारक : मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर- ४०००१०. वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! :-) तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण ८०-९० च्या दशकात एकाहून एक खोचक आणि भोचक पत्रकार दूरदर्शनच्या एकुलत्या एक वाहिनीवर मुलाखती घ्यायचे, त्यांचा खवटपणा आम्ही मुले त्यांच्याहून जास्त भोचकपणे बघत बसायचो ते आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 16:29 नवीन

आता जुने

आता जुने स्कन केलेले लेख नेट वर वाचायला मिळणार वाटत, नविन वेबसाईट च्या नावाखाली. आयडिआ चन्गलि आहे. टिकाकार
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 09/18/2007 - 07:50 नवीन

मग सध्या काय होतय व ह्या पुढे काय होइल व कधी?

विकास आराखडा यावर प्रत्येक व्यक्तिचे काही ना काही मत आहे. मग सद्यपरीस्थीती काय आहे? मला वाटते जो तो आपले "आर्थीक, राजकीय वजन/ वरपर्यंतचे संबध" वापरुन ज्या त्या सरकारी खात्याकडून आपला विकास आराखडा मंजूर करुन प्रगती करत आहे. व यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? कधि बदलणार हे? मला वाटते की वरून म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद ह्या पातळीवरून कधीतरी म्हणजे जेव्हा सर्व राजकारण्यांना रस्त्याने कूठे जाणे अत्यंत जिकीरिचे होइल, सर्व मोक्याच्या ठिकाणी बांधकाम पुर्ण होइल व परत एकदा त्या जागा बळकवायची वेळ येइल, तेव्हा आता जरा काही तरी केले पाहीजे ह्या गरजेतून काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील का? कधीतरी हे अती होउन, वरून आदेश निघेल की अमुक तमूक निकष ह्या पूढे लागू सरसकट भारतभर किंवा काही ठरावीक शहरांसाठी..... जे जे होतय ते बघत रहायचे, आपल्याला जे हवे ते जमेत तसे करत रहायचे. बघा अब्जावधी मेंढरे हाकायची म्हणजे.....जाऊ दे वेगळे कूरण शोधलेले बरे. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/19/2007 - 09:05 नवीन

सहजरावांचे सामजिक भाकित

यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? वा ! सामाजिक भाकित म्हणतात ते हेच. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल. सर्वसमावेशक विकास ही कल्पना 'चांगली 'असली तरी 'भाबडी' आहे. मध्यममार्ग व्यवहार्य. जागतिकीकरणातुन होणारी सोय ही 'इंडिया' सोबत 'भारता'ची पण झाली तर विकास होईल. अन्यथा विकासाची बेट तयार होतील. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/23/2009 - 11:36 नवीन

विकासवादी राजकारण

नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
सोकाजीरावांनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणुन आम्हाला हा धागा वरती आणावासा वाटला. राज ठाकरेंनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा पुण्यातील वसंतव्याखानमालेत २००७ मध्ये मांडला होता. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
वि_जय Mon, 11/23/2009 - 11:50 नवीन

अभ्यासपुर्ण लेख.

अभ्यासपुर्ण लेख. पक्षभेद, मतभेद विसरुन अशा चर्चाही मिपावर रंगायला हव्यात. तात्या काय वाटत तुम्हाला?
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/23/2009 - 18:37 नवीन

धावता

धावता आढावा आवडला ... जरा अभ्यास केल्यावर टंकतोच !! सू हा स...
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 10/28/2015 - 10:20 नवीन

अजूनही तितकाच ताजा लेख! सुरेख

अजूनही तितकाच ताजा लेख! सुरेख!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा